Skip to main content
कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर राज्यस्तरीय शिबीर

४ थे वर्ष संकल्पना : आपला भारत-बहुविध भारत
३१.०५.२०१९ पहिला दिवस:
उदघाटन सत्र :
प्रास्ताविक - मंजूश्री जयसिंग पवार
प्रमुख पाहुणे- राम पुनियानी, कॉ. दिलीप पवार, प्रा. एन आर भोसले, इरफान इंजिनियर, पत्रकार जतीन देसाई, मेधा पानसरे, कमलताई विचारे.
अध्यक्ष- जयसिंगराव पवार.
#हिंदुबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, इसाई हेही आपले बांधवच आहेत.
#भारत हा कधीच एकपंथी, एकजाती, एकधर्मा चा नव्हता परंतु आता एकधर्म आणि सरंजामशाही मूल्ये घट्ट होताना दिसत आहेत.
# विचारांचा वारसा सांगून चळवळ आणि विचार रुजत नाहीत त्यासाठी विचारांचा पाया भक्कम असावा लागतो.
# चांगली माणसे आणि चांगले विचार मोडून किंवा गाडून दुसरे चांगले विचार आणि माणसे उभी राहत नाहीत म्हणून चांगल्या माणसांनी एकमेकांबरोबर काम करणे गरजेचे आहे नाहीतर चांगले विचार आणि माणसे मागे पडतील.

मा. राम पुनियानी
# शिबिरातील विचारधारा आंदोलनाची भाषा व्हायला हवी.
# गुलामगिरी भोगलेल्या राष्ट्रात राष्ट्रवाद भयंकर रूप धारण करतो. या देशांमध्ये प्रामुख्याने धर्माच्या नावाने राष्ट्रवाद फोफावते.
# धार्मिक राष्ट्रवाद हा लोकशाही देशातील भांडवलशाहीतुन परावर्तित होतो.
# हिंदू राष्ट्रवाद हा गुलाम राष्ट्रातील लोकशाहित भांडवलशाहितुन परावर्तीत झालेला आहे.
#भारत माता की जय याचा पहिला अर्थ तुम्ही, मी आणि आपण सर्व असा आहे.
#राष्ट्रवाद ही आधुनिक कल्पना असून ती भांडवलशाही बरोबर आलेली आहे.
#राष्ट्रवाद या संकल्पनेअगोदर राष्ट्र या संकल्पेअगोदर राज्य राजा आणि सरंजाम ही व्यवस्था होती.
#शिकारी, पशुपालन या अवस्थेत  राष्ट्रवाद नव्हता, राष्ट्र आणि नागरिक या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या.
# आपण दुसऱ्यावर आक्रमण करतो हा राष्ट्रवाद तर दुसऱ्या ने ती कृती केली तर दहशतवाद किंवा राष्ट्रद्रोह कसा काय?
#अपवाद वगळता राजेशाही ही सामन्याच्या विशेषतः शेतकऱ्याच्या शोषणावर आधारित असते. त्यातूनच लोकशाहीचा संकल्पना उदय.
# ब्रिटिश सत्तेच्या उदयानंतर भारतात राष्ट्रवादाला सुरुवात झाली. त्याअगोदर मुस्लिम शासक ही आले पण जे राजे इथेच स्थिरावले त्यांनी भारतातील संपत्ती बाहेर नेली नाही पण ब्रिटिशांनी इथे राज्य करताना भारतातील अतोनात संपत्ती लुटून इंग्लंड ला नेण्यात आली. त्यातून राष्ट्रभावना वाढीस लागली.
# ब्रिटिश सत्तेनंतर भारतात तीन वर्ग अस्तित्वात आले. १.भांडवलदार जसे की टाटा, बिर्ला
२.कामगार आणि मजूर
३.सुशिक्षीत मध्यमवर्ग
त्यातूनच विविध विचारातून विविध सामाजिक व राजकीय संघटना अस्तित्वात आल्या जसे की, INC, RPI आणि विविध क्रांतिकारी संघटना.
#याच काळात राजेशाहीला धोका निर्माण झाल्याने त्यांनी आपली संघटना स्थापन करून राणीप्रति निष्ठा व्यक्त केली.
# राष्ट्रवादाला सुरुवात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा म्हणजे सावरकर आणि जिनाने केली.
# भगतसिंग, आंबेडकर आणि गांधी यांच्यात एक समान धागा होता ते म्हणजे तिघेही secular होते.
#हिंदू- हा शब्द हिंदू च्या कोणत्याही पवित्र ग्रंथात नाही.
#हिंदुत्व- हा शब्द हिंदूंच्या राजकारणातून आला जो सावरकरांनी उच्चरला. म्हणून हिंदुत्व म्हणजे राजकारण.
#हिंदुराष्ट्र- आम्ही पुरातन काळापासून हिंदू आहोत ही भावना.
हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र यातून RSS ची निर्मिती झाली. के. सुदर्शन यांनी राज्यघटना विदेशी मूल्यावर आधारित असून ती बदलली पाहिजे असा सूर सर्वप्रथम लावला.
# याला counter attack म्हणून राज्यघटना काम करते म्हणून सरकारला ती बदलायची आहे.
#हिंदुत्ववादी जुनी मूल्ये पुन्हा लादू पाहत आहेत ज्यातून पुष्पक विमान, सर्जेरी, biotechnology या नसलेल्या गोष्टी जाणूनबुजून जोडल्या जात आहेत.
#संकुचित राष्ट्रवाद जुन्या उच्च-नीच भेदांना पुनर्जीवीत करतो म्हणून तो धोकादायक असतो. हिंदू राष्ट्रवाद या भेदावर आधारलेला आहे.
#चातुर्वर्ण्य व्यवस्था ही जिना नसलेली चारमजली इमारत आहे ज्यात इतरांना दुसरीकडे जाण्याची व्यवस्था नाही. या प्रत्येक मजल्यावर स्त्री पुरुष असा भेदाभेद आहे.
#RSS ही फक्त पुरुषांची संघटना आहे त्यात स्त्रीला स्थान नाही. ते भेदाभेद करतात.  त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. सध्या हे देशातील सगळ्यात मोठे आणि धोकादायक संघटन आहे.
५-१५ वयोगटातील मुलांना ते खेळ शिकवितात नंतर त्यांना समाजात विष पेरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. द्वेष शिकविला जातो. त्यानंतर हातात शस्त्रे दिली जातात.

मा.जयसिंगराव पवार
# तरुणांनी फुले शाहू वाचले पाहिजेत.
#पुरोगाम्यांमध्ये एकारलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. पण त्यांना सोबत घेतले पाहिजे.
# येतील तिथपर्यत घेऊन गेले पाहिजे तरीही टोकाचे मतभेद होत असतील तर त्यांना सोडूनही देता आली पाहिजे.
# आम्ही शाहूला मानतो कारण आम्ही राज्यघटनेला मानतो.
# जोपर्यंत तुम्ही राज्यघटना मानत आहात तोपर्यंत फुले शाहू आंबेडकर तुमच्या सोबत आहेत.
#धर्म ही खाजगी बाब आहे. तो घरात ठेवला पाहिजे. बाहेर आला की राष्ट्रधर्म हा एकमेव धर्म असला पाहिजे.
#प्रत्येक माणूस आपला बंधू आहे.
#विषमतेची लढाई सत्तेबरोबरच स्वतःशीही असते.

सत्र दुसरे:
विषय - भारतातील बहुधार्मिकता - इरफान इंजिनियर

सत्र तिसरे :
विषय - हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन सहअस्तित्व - मा. राम पुनियानी
# दंगली होत नाहीत त्या घडविल्या जातात. पाकिस्तान मध्ये दंगलीत ख्रिश्चन तर उत्तरप्रदेशातील मुझफ्फर नगरमध्ये मुस्लिम तर बांगलादेश मधील दंगलीत हिंदू व बौद्ध मारले गेले. यात जे अल्पसंख्य होते ते मारले गेल्याचे दिसून येते.
# भारतात मुस्लिमांइतकेच ख्रिश्चन ही बळी आहेत.
# ख्रिश्चन धर्मांतर करतात हा  आरोप करून मारले जातात.
भारतातील ख्रिश्चन हे अमेरिकी ख्रिश्चनांपेक्षा जुने आहेत. भारतात ख्रिश्चन होते तेव्हा अमेरिका अस्तित्वात ही आला नव्हता.
#भारतात २.३% लोकसंख्या ख्रिश्चन आहे.
# बहुतांश हिंदुत्ववादी नेते आणि त्याची मुले ख्रिश्चन स्कूल मध्ये शिकले आहेत वा शिकत आहेत.
# १९७१-२.६०%, १९८१- २.४३%, १९९१-२.३४%,२००१- २.३०%, २०११- २.३०% ही भारतातील लोकसंख्या आहे आहे ती घटत गेली आहे. त्यामुळे ख्रिश्चन धर्मांतर करत हे सत्य नाही.
# भारतातील मूलनिवासी हेच मुळात ६०००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून भारतात आले. त्यांनतर आर्य आले. त्यामुळे भारतात आलेले मुस्लिम राजे हे आफ्रिकेचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांना परकीय म्हणणे चूक आहे.
# बाहेरील आक्रमणे हा धर्माचा विषय नाही तो सत्ता संघर्षाचा विषय आहे.
#हल्दीघाटीच्या लढाईत अकबराच्या वतीने हिंदू राजा मानसिंग हा अकबराच्या वतीने लढत होता. तर राणा प्रतापाच्या वतीने मुस्लिम राजे लढत होते त्यामुळे ही लढाई आणि अश्या अनेक लढाया ह्या सत्तेच्या लढाया होत्या. राजस्तनामधील या अगोदरच्या भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात हल्दीघाटीच्या लढाईत अकबर पराभूत झाला असा बदल करून इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला.
#अकबराच्या नवरत्न सेनापतीमध्ये बहुतांश हिंदू होते बिरबल, तानसेन ही त्याची प्रसिद्ध नावे होत.
#शिवाजी महाराज कधीही मुस्लिम विरोधी नव्हते. अफझल खान हा साम्राज्याचा शत्रू होता धर्माचा नव्हे. त्यांच्या सहकाऱ्यामध्ये मुस्लिम आणि बहुजन होते रुस्तम ए जमाल याने शिवाजी महाराजांना वाघनखे दिली तर अफजल खानाच्या बाजूने जो हिंदू सहकारी होता त्याचे नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते. त्यामुळे हा सत्ता संघर्ष आहे हिंदू मुस्लिम संघर्ष नव्हे.
# सगळे राजे लूटमार करत होते. मुस्लिम राजे याला अपवाद नव्हते.
#म्हैसूरच्या लढाईत टिपू सुलतान आणि मराठा यांच्यातील लढाईत टिपूचा पराभव करू शकले नाहीत म्हणून मराठी सेनेने श्रींरंगपट्टणमचे हिंदू मंदिर तोडले ते टिपूने पुन्हा दुरुस्त केले.
# औरंगजेबाने कामाख्या देवी आसाम, उत्तरप्रदेशच्या श्रीकृष्ण मंदिर बरोबरच अनेक मंदिरांना देणग्या दिल्या. औरंगजेबने मस्जिद तोडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे मंदिर मस्जिद यांची तोडफोड हा धर्माचा भाग नाही.
#book "anatomy of confrontation" या पुस्तकात राममंदिर-मस्जिद च्या वादावर सखोल विश्लेषण केले आहे. त्यात अयोध्येत राम मंदिर नव्हते यावर प्रकाश टाकला आहे.
#आनंद पटवर्धन यांचा "राम के नाम" हा चित्रपट खूप बोलका.
#तुलशीदास ज्याने रामचारित्र लिहिले तर म्हणतात मला मंदिर आणि मस्जिद दोन्ही समान आहेत.
# पुस्तक "राज तरंगिनी" यात देवांच्या मंदीरे आणि त्याची संपत्ती लूटण्यासाठी पद निर्माण केलेला राजा हिंदू असल्याचे दिसते.
# जेव्हा दोन हिंदू राजे आपापसात लढाई करत तेव्हा त्यांनीही मंदिरे लुटल्याची उदाहरणे आहेत. पराभव झालेल्या राजाच्या कुलदेवतेची मूर्ती तोडून त्याचा अपमान करणे आणि आपल्या कुलदेवतेची मूर्तीची तिथे प्रतिष्ठापना केली जात असे.
#१८५७ च्या उठावात हिंदू-मुस्लिम राजे एकत्र येऊन ब्रिटिशांविरोधात लढले. त्यानंतर ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम दुहीची बीजे रोवयाला सुरुवात केली.
#भारतातील पहिली मस्जिद केरळमध्ये बांधली गेली. कारण ब्रिटिश येण्याअगोदर मुस्लिम व्यापारी समुद्रमार्गे केरळला व्यापारासाठी येत असत.
# कोणत्याही धर्माचा जबरदस्तीने प्रसार होत नाही. त्यामुळे मुस्लिमांनी जबरदस्तीने हिंदूंचे धर्मातर केले हे खोटे आहे असे स्वतः विवेकानंद सप्रमाण मांडतात. हिंदू सवर्णांच्या अत्याचाराला बळी पडून खालच्या जातीतील हिंदूंनी अत्याचारापासून बचाव करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला.
# औरंगजेबाने लावलेला जिझिया कर हा हिंदूंचे धर्मांतर करावे या उद्देशाने लावला हे खरे नाही.
# त्यामुळे या सर्व अफवांना आळा घालायचा असेल तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोणाबरोबरच  तर्कशुद्ध विचार करणे आणि दुसऱ्या ला तसे शिकविणे आवश्यक आहे.
# हे सगळे सामान्य जनतेला सांगून त्यांना शहाणे करावे लागेल आणि त्यासाठी खालील चार पातळीवर भरीव काम करावे लागेल:-
१. सामान्य जनतेची सामाजिक समज वाढवावी लागेल
२.समाजात जाऊन मिसळावे लागेल, चर्चा आणि सुसंवाद वाढवावा लागेल.
३.सामाजिक आंदोलने मजबूत करणे.
४.लोकशाहीचे संरक्षण आणि बळकटीकरण करावे लागेल.

सत्र चौथे
विषय: काश्मीर आणि कश्मीरीयत - पत्रकार जतीन देसाई
# भाजप सरकारच्या धोरणामुळे काश्मीर प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. कलम ३७० व ३५ए  रद्द करण्यावर भर दिला.
# १४ ऑगस्ट ला पाकिस्तान आणि१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आला.
# आकासाई चीन हा भाग जम्मू काश्मीरमध्ये नकाशात दाखविला होता पण तो चीनला दिला गेला.
# तत्कालीन काश्मीरचे राजे  हरिसिंग यांना अलिप्त राहायचे होते.  या काळात हिंदू आन8 मुस्लिम आपापल्या देशात स्थलांतरीत होत होते. यात १० लाख लोकांची कत्तल करण्यात आली पण श्रीनगरमध्ये एकही हिंदू किंवा मुस्लिम नागरिक मारला गेला नव्हता.
#आजच्या गुरुदासपूर जिल्ह्यात चार।मुस्लिम तालुके रेडकलीफ ने भारताला दिले ते पाकिस्तनाला द्यायला हवे होत्र तर लाहोर भारतात यायला हवे होते पण तसे झाले नाही.
# बॅरिस्टर जिना आणि पाक लष्कराला काश्मीर पाकिस्तनात हवे होते त्यासाठी २१ ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तना लष्कर सीमेवर जमा झाले आणि २६ ऑक्टोबर ला ईद च्या दिवशी काश्मीर पाकिस्तनात विलीन करायचे.
#पण २४ तारखेला राजे हरिसिंग यांच्या लक्षात आला. भारतीय लष्कर ही सजग होत्र पण आपल्याला थेट लष्कर पाठविता येत नव्हते म्हणून हरिसिंग यांनी भारतात सामील वह्यांचे ठरविल्यास भारत मध्यस्थी करेल. आणि तसेच झाले आणि चिडून पाकिस्तनाने चिडून पाकिस्तान मधून लष्कर पाठविण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत. तेव्हापासून काश्मीर चा मुद्दा पाकिस्तनाच्या अजेंड्यावर राहिलेला आहे.
# १९७७ मध्ये JKLF ची स्थापना.
# १९८५ मध्ये रवींद्र म्हात्रे या भारतीय अधिकाऱ्याचा खून केला त्याचा बदला म्हणून भारत सरकारने मकबूल बट ला फाशी दिली तेव्हा पासून त्याचा मृत्यू दिन काश्मीरमध्ये दरवर्षी साजरा केला जातो.
#त्यानंतर काश्मीर मध्ये लोकांना राहणे मुश्किल झाले.
#डिफेन्स, परराष्ट्र संबंध आणि communication जे तीन विषय भारताकडे देऊन इतर विषय काश्मीरकडे देण्यात आले ते कलम म्हणजे ३५ए.
# १९३७ ला अहमदाबाद येथे हिंदू महासभेचे अधिवेशन झाले सावरकर त्याचे अध्यक्ष होते त्यात हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे आहेत असा ठराव करण्यात आला.
#शेख अब्दुल्ला याला सहमत नव्हते. जिनांची वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी त्यांनी फेटाळली.
# ३७० कलम आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राजिनाम्याचा काहीही संबंध नाही.
#३५ए नुसार राज्याचे कायमचे नागरिक कोण असेल हे  ठरविण्याच्या अधिकार स्थानिक सरकारला प्राप्त झाला . त्यामुळे इतरांना तिथे वास्तव्य करणे आणि संपत्ती निर्माण करणे अशक्य झाले.
# हिमाचल प्रदेशातही काश्मीरप्रमाणे शेतकी जमीन खरेदी करता येत नाही.
# नागालँड सारख्या राज्यात तर इनर लँड परमिट शिवाय जाताही देत नाही. यामागे काही धोरणे आहेत तशीच धोरणे ३५ ए आणि ३७० च्या बाबतीत लागू पडतात ती समजून घ्यायला हवीत.
# पण ही कलमे लागू झाल्यावर तिथे हिंसाचार चालू झाला आणि काश्मिरी पंडित तिथून परागंदा होऊ लागले.
# कश्मीरीयत म्हणजे काश्मिरी पंडितासह काश्मीर. ही बाब पटल्याने यासिन मलिक सारखा दहशतवादी प्रवृत्तीचा माणूस शांततेची भाषा करतो. त्यामुळे २००३ ते २००७ या काळात काश्मीर खोऱ्यात हिंसाचार अत्यंत कमी झाला.
#अझहर मसूद ला सोडून देण्यास तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा विरोध होता पण वाजपेयी सरकार आणि जसवंतसिंह यांच्यामुळे त्यांना संमति द्यावी लागली. त्याची परिणीती पुलावामा हल्ल्यात झाली.

दुसरा दिवस (१.६.२०१९)
सत्र १ ले:
विषय : भारतीय स्वातंत्र्य लढा, बहुविविधता आणि सर्वसमावेशकता - मा. शेखर सोनाळकर
# १८५७ च्यास्वातंत्र्य लढ्यात  मुस्लिमां चे प्रमाण।खूप होते. म्हणून त्यांनी सरकारी सेवेत आणि लष्करात त्यांना डावलयाला सुरुवात केली.
# भारतातील असंतुष्ट लोकांना शांत करण्यासाठी,त्यांच्या मागण्या आणि मते मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून INC ची स्थापना केली.
#INC चे सर्व नेते आणि सदस्य ब्रिटिशमध्ये शिकलेले, सुशिक्षित आणि लोकशाही कशी असते याची जाण असलेले होते.
# काँग्रेसमध्येही जहाल आणि मावळ असे दोन गट होते. त्यातील जहाल गट हा हिंदुत्ववादकडे झुकलेले होते.
# गणपती हे महाराष्ट्राचे किंवा ब्राह्मणांचे ही दैवत नाही तो फक्त कोकणात पुजला जात असे पण त्यातून संघटन करण्यासाठी गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आला.
# शिवजयंती सुरू करण्याचाही तोच उद्देश होता. त्यातही त्यातून मुस्लिम विरोधाची किनार होती पण दोघांचाही समान शत्रू ब्रिटिश होते त्यामुळे त्याचे स्वरूप गंभीर नव्हते.
# १८८६ ला ब्रिटिशांनी आपले धोरण बदलून मुस्लिमांना जवळ करायला सुरुवात केली त्यातून हिंदू मुस्लिम दरी वाढत गेली.
# १९०५ ला बंगाल ची फाळणी झाली आणि त्यातून हिंदू बहुल आनि मुस्लिम बहुल प्रांत अशी फाळणी करण्यात आली. त्यातून हा द्वेष वाढत गेला.
# बंगालमध्ये दुर्गा पूजा सारखे आनेक धार्मिक कार्यक्रम चालू झाले.
# मारलॉ मिंटो समितीने मुस्लिमांना वेगळे मतदार संघ दिल्याने त्यात भरच पडली.
# या नितीमुळे काँग्रेसला पेच वाढत गेला. काँग्रेस मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन काम करू इच्छित होती. त्यामुळे लाहोर अधिवेशनात मोतीलाल नेहरू यांनी याला विरोध होता.
# आर्य समाज जात पात मानत नाही पण तो आपल्याला वेदांकडे घेऊन जातो. लाला लजपतराय आर्य होते आणि त्यांचा मुस्लिमांच्या ब्रिटिश धोरणाला विरोध होता त्यातूनच त्यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.
# त्या काळात टिळक तुरूंगातून सुटले आणि त्यांनी मावळ धोरण स्वीकारले. त्यांनी जिनांना हाताशी धरून लखनौ करार झाला. त्यात प्रांतिक अल्पसंख्याकांना त्यांच्या प्रांतात लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व द्यायचा करार झाला. त्याला मुस्लिम समाजाने पाठींबा दिला. तसेच अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदार संघ देण्याचे ठरले.
# १९१७ साली गांधी पर्व सुरू झाले. आणि त्यांनी खिलाफत आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
#खिलाफत चळवळ समाजवादी, पुरोगामी आणि आंबेडकरवादी लोकांची चळवळ होती.
# यात कॉ. श्रीपाद डांगे ही सहभागी होते आणि त्यांना अटक झाली. तसेच याच चळवळीमुळे काँग्रेस मध्ये अनेक मुस्लिम सामील झाले.
#तुर्कस्थान हा देश पहिल्या महायुद्धात जर्मनीबरोबर सामील होता आणि पराभवानंतर त्यांचे अनेक तुकडे झाले. याकाळात हिंदू आणि मुस्लिम लोक अत्यंत धार्मिक आणि कडवे होते. अनेक मुस्लिम लोक याचा विरोध करण्यासाठी  अफगाणिस्तान मध्ये गेले. पण त्यांना माघारी परतावे लागले. त्यातील अनेक धार्मिक नेते खिलपत चळवळीत सामील झाले.
# गांधीजींच्या आव्हानावरून अनेक मुस्लिमांनी हिंदू बांधवांसाठी गोमांस खाणे शपथा घेऊन बंद केले.
# याच काळात मंदीरे पुजाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याची चळवळ सुरू झाली. तशीच चळवळ मुस्लिम आणि शीख धार्मिक स्थळाबाबत सुरू झाली आणि ती यशस्वी झाली.
#याला शंकराचार्य यांनी विरोध केला.त्यांनी कोर्टाचे कायदेशीर अस्तित्व अमान्य केले आणि त्यांना साडेचार वर्षाची शिक्षा होऊन अटक झाली आणि त्यामुळे हिंदुनी चौरिचौरा येथे हिंसक उठाव केला आणि महात्मा गांधी यांनी खिलाफत चळवळ मागे घेतली.
# त्याकाळात व्ही. शांताराम याचे जावई पं. जसराज यांनी अल्लाहचे कवने गायल्याने हिंदु नि त्याला कडवा विरोध केला.
# माझा राम हा सीतेचा राम नाही- महात्मा गांधी.
#माझी राम राज्याची संकल्पना ही समतेची आणि समानतेची आहे.
# गांधीजींनी महारांची सेवा केली. ते धर्माची परिभाषा बोलत असले तरी त्यांचे कार्य धर्म निरपेक्ष होते.
# जगात फक्त येशू आणि गांधींजी यांनीच अस्पृश्य आणि कुष्ठरोगी यांची सेवा केलेली आहे.
#१९१६ ला गांधीजींनी साबरमती आश्रम सुरू केले तेथील पाहिले शिक्षक अस्पृश्य होते. तेथील लोकांनी त्याला कुटुंबासह बाहेर काढण्याची मागणी केली पण गांधीजींनी ती धुडकावली. त्यामुळे तेथील सवर्ण धनिक वरमले आणि त्यांनी आश्रमाला मदत सुरू केली.
# गांधींनी गुजरात विद्यापीठ सुरू केले आणि अस्पृश्याना प्रवेश दिला त्याला सवर्णांनी विरोध केल्यावर गांधीजींना त्यांना तुम्ही तुमची मुले काढली तरी चालतील पण मी अस्पृश्याना शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही.
# गांधीजींनी हिंदू धर्मगुरूंकडून हिंदू धर्मात अस्पृश्याना प्रवेश देऊ नये असे कुठे म्हटलेलं नाही हे कबुल करून घेतले.
# नारायण शास्त्री यांनी हिंदू धर्मात अस्पृश्यता नाही असे पत्रक काढले. त्याला गांधीजींनी पाठींबा दिला.
# याचबरोबर गांधींनी शेतकऱ्यांबरोबर काम करून ग्रामीण विकासासाठी काम सुरू केले.
# सावरकरांनि राजा हरिसिंग यांना तार करून त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन करून 'हिंदू राष्ट्र निर्माण करा, मुस्लिम राजांना जिंकून घ्या' असे आवाहन केले.
# १९४७ ला काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या ५४% इतकी होती. तरीही तेथील जनतेचा फारूक अब्दुल्ला यांना पाठींबा होता आणि त्यांना भारतात रहायचे होते.  तसे त्यांनी जाहीर केले होते.
# भावनेच्या आधारे निर्णय घेणे म्हणजे धर्माच्या आधारे निर्णय घेणे होय म्हणून देशाबाबतचे निर्णय बुद्धीच्या आधारे घेतले पाहिजेत असे महात्मा गांधी सांगत असत.
# भारतात तूम्हाला न्याय मिळाला नाही तर मी तुमच्यासाठी भारताविरुद्ध लढेन असे गांधींनी सांगितल्यावर काश्मिरी जनता भारतात सामील व्हायला राजी असताना पटेलांनी जाणूनबुजून काश्मीरमध्ये सैन्य घुसवले आणि त्यातून काश्मीर प्रश्न निर्माण झाला.


सत्र २ रे
विषय: कला, साहित्य आणि संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य - मा. गणेश विसपुते
# एकाच कुटूंबातील चार पाच पिढ्यामधील लोक एकत्र आले तर त्यांच्या शारीरिक ठेवणीत अनेक साधर्म्य आणि विविधता दिसून येतात.
# दृक श्राव्य माध्यम हे अंत्यत प्रभावी आणि परिणामकारक माध्यम आहे. याचा कसा वापर केला जातो त्यावर त्याचे चांगले वाईट पण अवलंबून असते.
# सत्ताधारी समाज आपली विचारधारा रुजविण्यासाठी कला, साहित्य आणि  संस्कृती यांचा वापर करत असतो
 सत्ताधारी वर्ग हा एकारलेला आणि कर्मठ, आणि धर्माधिष्टीत व्यवस्थेचा समर्थक असेल तर कला आणि साहित्याचा चूकीचा वापर केला जातो.
# हा वर्ग दृक श्राव्य माध्यमाचा प्रभावी वापर करून आपली विचारधारा समाजावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतो. त्याला कोणी विरोध करू नये म्हणून खरी बाजू मांडणाऱ्या वर प्रतिहल्ले केले जातात, धमक्या दिल्या जातात, वेळप्रसंगी त्यांचे मुडदेही पाडले जातात.
# हिटलर ने आणि मुसोलिनीने आपली सत्ता बळकट करण्यासाठी कला आणि साहित्याचा प्रभावी वापर करून खोट्या गोष्टी जनतेला वारंवार सांगितल्या. त्यामुळे लोकांना तेच अंतिम सत्य वाटू लागले आणि त्यांना निर्विवाद आणि निरंकुश सत्ता राबविता आली.
# १९९९ ल्या सत्तेत आलेल्या भाजप सरकारने प्रसारमाध्यमांद्वारे आपले कर्मठ विचार लोकांवर लादले. त्यासाठी दुरचित्रवाहिन्यावर देवदेवतांचे आणि कर्मठ हिंदू संस्कृतीचा पुरस्कार करणारे अनेक मालिका आणि कार्यक्रम सुरू करण्यात आले.
# २०१४ साली आलेल्या मोदी सरकारने समाज माध्यमांचा वापर करून आपली खोटी आणि चुकीचे धोरणे जनतेवर वारंवार लादली आणि त्याला सामान्य जनता बळी पडली.

सत्र ३ रे
विषय:   - भारतीय जातवास्तव व विद्रोही परंपरा - मा. आनंद मेणसे
# राजकारणात निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचे कर्तृत्व बघताना अगोदर त्याची जात पाहिली जाते. विकासाची दृष्टी आणि क्षमता बघण्यापेक्षा त्याची जात बघितली जाते. जातीय समीकरणे जुळली तर सुमारतील सुमार उमेदवारही चांगल्या आणि कर्तृत्ववान उमेदवार असताना सहज निवडून येतो.
# प्रत्येक वंशात वेगवेगळे धर्म आहेत. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या जाती आहेत.
# पप्रत्येक जातीच्या लोकांचे राहणीमान, खानपान पद्धती वेगवेगळ्या आहेत. लग्नातील विधी वेगवेगळे आहेत.

सत्र ४ थे
विषय : आदिवासी संस्कृती-लोकसंस्कृती आणि भारत
वक्ते: मा.वाहरू सोनवणे, अध्यक्ष: मा.राजन गवस
∆ वाहरू सोनवणे-
* समूह जीवन हा आदिवासी मानवी संस्कृतीचे प्रमुख लक्षण आहे.
*समता, बंधुता आणि एकता ही मूल्ये घेऊन तो जगत होता.
* यात स्वार्थ आला तेव्हा एकसंघ जगणाऱ्या समाजात दोन भाग होऊन संघर्ष सुरू झाला.
*यातील शोषक वर्गाची मूल्ये म्हणजे शोषण, दमन आणि विषमता.
* महिला या विषमतेच्या जास्त बळी ठरल्याआहेत. तिला पुरुषापेक्षा दुय्यम स्थान मिळाले.
* दागिने आणि स्त्री सौंदर्याच्या नावाखाली तिला जखडून ठेवण्यात आले.
*पतीच्या निधनानंतर तिला विद्रुप केले जाते. ती विधवा आहे याची ओळख पटावी म्हणून तिचे दागिने उतरवून आणि कुंकू पुसून तिला बंदिस्त केले जाते.
* आदिवासी समाजात मुलगा मुलीला हुंडा देतो. लग्न मोडल्यास मुलीला हुड्यांची रक्कम माघारी द्यावी लागते.
*मुलगा मुलीपेक्षा वयाने जास्त असल्यास किंवा तिला तो पसंत नसल्यास मुलीला त्याला नकार द्यायचा अधिकार आहे.
* मुलीच्या संमतीशिवाय लग्न केले जात नाही तिला आपला जोडीदार कोण असावा हे निवडायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
* मुलगा मुलीला त्रास देत असेल किंवा छळ करत असेल तर मुलीला फारकत घेऊन आपला दुसरा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तिला किंवा तिच्या जोडीदाराला बहिस्कृत केले जात नाही.
* मुलीच्या लग्नात अगोदरच्या जवायांकडे लग्नातील कामाची जबाबदारी दिली जाते आणि तोही ते आनंदाने करतो. कारण आदिवासी समाजात श्रमाला प्रतिष्ठा आहे. लग्नात आदिवासी वाध्ये वाजवून रात्रभर पारंपरिक नृत्य केले जाते.
*आदिवासींच्या लग्नात ब्राह्मनाला बोलाविले जात नाही. लग्न लावायला समाजातील प्रधान असतो. तो मुलाला आणि मुलीला त्यांची संमती विचारून विवाह झाला असे जाहीर करतो.
*आदिवासी आपली जीवनमूल्ये जपतात.
*मुलामुलींची नावे निसर्गाशी जोडणारी असतात. देव किंवा राजे सरदार यांची नावे दिली जात नाहीत. आम्ही नावे देताना त्याचे जीवनमूल्य पाहिले जाते.
*आदिवासी मुली आत्महत्या करत नाहीत किंवा तशी वेळ त्यांच्यावर येत नाही.
*मजूरी न घेता आदिवासी एकमेकांच्या शेतात काम करतात. शेतात काम करणाऱ्याना संध्याकाळी सामूहिक भोजन दिले जाते. कामाचे पैसे दिले किंवा घेतले जात नाहीत.
*  वरकड मूल्ये आधारित शेती आणून ही शेती व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
*पण ती नष्ट करण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्न करत आहे त्यांना आदिवासी असताना वनवासी असे संबोधत आहेत.
*वनवासी म्हणजे वनात राहायला गेलेले तर आदिवासी म्हणजे मानवी जीवन अस्तित्वात आल्यापासून वनात राहणारे म्हणजे अधिवास करणारे. त्यांना 2वनवासी संबोधून त्यांचे हिंदुत्त्विकरण करण्याचा आनि त्यांचा वनाधिकार नाकारण्याचा प्रयत्न चालू आहे.
* काही ठिकाणी त्यांचे ख्रिस्तीकरण चालू आहे. त्याचबरोबर त्यांचे हिंदू आणि मुस्लिमिकरण झाले असून आदिवासी संस्कृती नष्ट करण्याचे मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.
*मुख्य प्रवाहात आणण्याच्या नावाखाली आदिवासींचे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत. जे प्रवाहात आले त्यांचे प्रश्न सुटले आहेत काय? याचा विचार व्हायला हवा. जातीय उतरंडीत आदिवासींचे स्थान काय? हा चर्चेचा विषय आहे.
*अंदमानात आलेल्या त्सुनामीत एकही आदिवासी मेला नाही इतके आदिवासी समृद्ध आहेत. विकासाच्या नावाखाली त्यांचे दमन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
*आदिवासी लोकांचे स्वातंत्र्या साठी केलेले बलिदान दुर्लक्षित केले जात आहे.
*आदिवासी क्रांतिकारी फक्त इंग्रजांविरुद्ध लढले नाहीत तर ते येथील जमीनदार आणि सरंजामी लोकबरोबरही लढले आहेत हे दुर्लक्षित केले जाते.
*त्यांनी आदिवासी मुली आणि महिलांवर अत्याचार केले आणि त्यातून त्यांना झालेली मुले आदिवासी समाजाने स्वीकारून त्यांचे विवाहही लावून दिले. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही.

∆ मा. राजन गवस

पाचवे सत्र (८:३० ते १०:००)

विषय: दृक-श्राव्य माध्यम चर्चा-गोवन संस्कृती

वक्ते : मा. दिलीप बोरकर

* भारतीय आणि चिनी अश्या दोनच संस्कृती सध्या अस्तित्वात आहेत.

*  खरी भारतीय संस्कृती सर्वात चांगली आहे कारण ती सर्वसमावेशक आहे आणि म्हणूनच टिकून आहे.

*गोव्याला वेगळी संस्कृती नाही जी धर्मनिरपेक्ष भारताची जी संस्कृती आहे तीच गोव्याची आहे.

*गोव्यात साडेचारशे वर्षे पोर्तुगीज सत्ता होती त्यांनी या संस्कृतीत प्रचंड ढवळाढवळ केली. १९६४ ला स्वातंत्र्य मिळाले त्याअगोदर उर्वरित भारतात जाण्यासाठी गोव्याच्या लोकांना पासपोर्ट काढावा लागत असे.

*पोर्तुगीजांनी कोकणी भाषा आणि संस्कृती संपविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझ्यासह गोव्याचा प्रत्येक मूळ नागरिक नागरिकत्वाने डच आहे.

* त्याला शह देण्यासाठी आर्यन संस्कृती वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि त्याला काही प्रमाणात यश आले.

* पोर्तुगीजांनी गोव्याची मूळ भाषा म्हणून पोर्तुगीज भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे तेथील श्रीमंत वर्गाची भाषा पोर्तुगीज तर कामगार आणि गरिबांची भाषा कोकणी राहिली.

* त्यामुळे गोवा मुक्तीसंग्राम चालू झाल्यावर गोव्यातील आर्य लोक दक्षिणेकडे जाऊ शकत नव्हते आणि मराठी भाषिक महाराष्ट्र कोकणी भाषेला किंमत देणार नाहीत म्हणून कोकणी भाषिक राज्य म्हणून गोव्याचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्यात आले.

*लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून त्याच्यावर अत्याचार करण्यात आले नकार देणाराला हात तोडण्यापासून जिवंत जाळण्यापर्यत शिक्षा केली जाई. त्यामुळे गोव्यातील बहुतांश ख्रिश्चन हे पूर्वीचे हिंदू होते.

* ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्याना त्याच पद्धतीने पेहराव करण्यासाठी सक्ती करण्यात आली त्यामुळे गोव्यात गेलो की आपल्याला हिंदू आणि ख्रिश्चन हे पेहरावामुळे लगेच ओळखू येतात.

* आता गोव्यात मूळचा गोमंतकीय माणूस दिसणार नाही इतके पोर्तुगीज आक्रमण भयानक होते.

* अश्या वेळेस थोडेफार गोमंतक वाचले ते कोकणी भाषेमुळे. म्हणून संस्कृती टिकविण्यामध्ये भाषेचे महत्व असते.

*जरी गोवा आता स्वतंत्र असला तरी आता ख्रिश्चन लोकांची आर्थिक आक्रमणे आता वाढली आहेत. ते गोमंतकांची घरे आणि शेतजमीन चढ्या दराने खरेदी करतात आणि गोमंतक ते विकून परागंदा होत आहेत.

*यात एक महत्वाची बाब म्हणजे आता कोकणी आणि ख्रिश्चन यांचे आंतरजातीय विवाह होऊ लागले आहेत.

*भविष्यात गोव्याचे काय होईल हे सांगता येत नाही.  कारण गोव्याचे राजकारण आता अत्यंत गलिच्छ झाले असून युवा पिढी चंगळवादाच्या आहारी गेले आहेत.

*गोव्यात हिप्पी पंथाचे लोक नग्न फिरायचे पण आता सरकारने कडक कायदे केल्यामुळे त्याला प्रतिबंध झाला आहे.

*गोव्यातील विवाह संस्कृती पूर्ण वेगळी आहेत. गोमंतकीय माणसे अजूनही चार वर्ण पाळतात. त्यात गोमंतकीय मराठेही आहेत.

*गोव्यात लग्नासाठी आजही पोर्तुगीज कायदा वापरला जातो. दुसरा विवाह करता येत नाही. ज्यांना दुसरा विवाह करायचा आहे ते सावंतवाडीला जाऊन गांधर्व विवाह करतात. पण live in relationship कायद्यामुळे हा नियमही मोडीत निघाला आहे.

*पणजीतील कोकणी आणि कारवार जवळील गोव्यतील कोकणी यात फरक आहे कारवार कोकणावर कन्नडचा प्रभाव आहे.

*गोव्यातील संगीत समृद्ध आहे. देशाला पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा देण्यात गोव्याचे योगदान मोठे आहे.

* ख्रिश्चन संस्कृती असल्यामुळें तिथे गोमांस आणि पोर्क खाल्ले जाते. भाजपच्या काळातही त्यावर प्रतिबंध नाही.

*स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे गोवा पारतंत्र्यात होता. तो स्वतंत्र झाल्यावर त्याचे काय करायचे हा प्रश्न होता त्यामुळे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

* जर गोवा महाराष्ट्रात विलीन झाला असता तर गोव्याला दोन आमदार आणि एक खासदार मिळाला असता ज्याचे कोणी ऐकले नसते आणि आज गोव्याला मिळालेला A1 दर्जा मिळाला नसता. वेगळे राज्य म्हणून गोवा आज संपन्न आणि सुखी आहे.

तिसरा दिवस (२.६.२०१९ल
सत्र पहिले
विषय: पितृसत्ताक व्यवस्था आणि स्त्री- श्रुती तांबे
*शिक्षकाला स्वतःमध्ये सतत बदल करून घ्यावे लागतात.
*सतरंगी सलाम म्हणजे सर्व धर्माचे रंग आणि सर्व प्रकारच्या लैगिकतेच्या छटा यांचा एकत्रित विचार करणे म्हणजे संतरगी विचार आणि या विचाराला सलाम म्हणजे सतरंगी सलाम.
*त्यामुळे आता फक्त स्त्री बद्दल न बोलता पितृसत्ताक व्यवस्था आणि या सतरंगी व्यवस्थेबद्दल बोलले पाहिजे.
*पितृसत्ता ऐवजी पुरुषसत्ता म्हणायला हवा कारण या व्यवस्थेत वरचढ ठरणाऱ्या पुरुषी बायकांबद्दलही आपण बोलायला हवे.
*भारत म्हणजे ग्रामीण आणि इंडिया हा शहरी अशी ढोबळ मांडणी असली तरी ती इतकी सहजसोपी नसते.
*भारत म्हणजे एक गोधडी आहे आणि तेच त्याचे वेगळेपण, सौंदर्य आणि बलस्थान आहे.
*भारत कधी अस्तित्वात आला हे ठाम पणे सांगता येत नाही.
* भारताला या विविधतेत एकत्र आणणारे सूत्र म्हणजे भारतीय राज्यघटना.
*वयाच्या ३ वर्षापर्यंत मुलीला रंग-रूपाचा घरातूनच complex दिला जातो.
*मुलींनी कोणत्या रंगाचे कपडे घालावे हे ही पुरुषसत्ता ठरविते.
*मुलगा म्हणजे बलदंड, राकट आणि दणकट असावा तरी मुलींनी नाजूक, सौम्य असले पाहिजे तसेच कमी खाल्ले पाहिजे.
* the world before her हा कॅनेडियन चित्रपट यावर सखोल भाष्य करतो.
*ही व्यवस्था समजून घेण्यासाठी व्यवस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो.
* जात, धर्म, जमत, प्रदेश, पंथ आणि वर्ग यांमध्ये पितृसत्ताक व्यवस्था आहे.
*समान इच्छा असनाऱ्या विविध जाती, जमाती,धर्म आणि वर्गातील मुलींना वेगळी वागणूक मिळते. कोल्हाटी समाजातील मुलगी सूंदर, सोज्वळ आणि शिकलेली असली तरी तिने लग्नाची इच्छा व्यक्त करणे हे त्या समाजातील व्यवस्थेच्या विरुद्ध आहे.
* लिंग आणि लिंगभाव यात फरक आहे. त्या त्या समाजात स्त्री आणि पुरुष यांनी कसे वागावे याची जी रीत शिकवली जाते त्याला लिंगभाव असे म्हणतात.
*संसदेतही महिला खासदारांचे लैंगिक छळ होतात.
*मुलाला शौर्य आणि मुलीला दमन संस्कार स्वीकारले जातात.
*भाजप सरकार सत्तेत आल्यापासून खाजगी क्षेत्रात उच्चशिक्षित महिलांना मुलांपेक्षा कमी पगार मिळत आहे त्यामुळे IT क्षेत्रातील ३७% महिलांनी गेल्या चार वर्षांत नोकऱ्या सोडून दिल्या आहेत.
*५६ इंच छातीचे नेतृत्व हवे असे ठासून म्हणणे हे सुद्धा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे लक्षण आहे.
*महिलांच्या शारीरिक गोष्टींवरचे जोक आनंदाने चघळले जातात.
*पुरुषाला कमीपणा दाखविण्यासाठी महिलाच त्याला बांगड्या देण्यासारखे प्रकार करतात हेही पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रिया तिचे वाहक होण्याचे उदाहरण आहे.
*राजकारणात या व्यवस्थेच्या वाहक स्त्रियांना स्थान मिळते.
*मुलीच्या लग्नात गडगंज हुंडा देणारे मुलीच्या नावावर तिला एक रुपयाही दिला जात नाही.
* मुलीच्या पगाराचा sms नंबर नवऱ्याचा असतो.
* मुलींचे राहते घर संयुक्तपणे नवरा बायको यांच्या नावावर व्हावे  आसा कायदा असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. मासुम संस्थेने यात भरीव काम केले आहे.
*राजस्थान मध्ये भांवरी देवी या दलित महिलेवर सवर्णांनी केलेल्या बलात्काराची केस राजस्थान उच्च न्यायालयात गेल्यावर सवर्ण न्यायाधीशने "तुझ्यासारख्या तुच्छ बाईवर सवर्ण पुरुष कश्याला बलात्कार करतील" अशी टिप्पणी।करून केस रद्दबातल केली होती.
*कायदे महिलांच्या बाजूने पण व्यवस्था विरोधात आहे.

यावर उपाय काय?
*महिला आणि मुलींना उत्तम शिक्षण, आणि सुदृढ शारीरिक आणि मानसिक आरोग्य दिले पाहिजे.
*मुलीच्या लहान वयात तिच्या मन आणि तन यावर कोणताही मानसिक आघात होणार नाही  याची काळजी घ्यायला हवी.
*मुलीला निवड आणि निर्णय स्वातंत्र्य ध्यायला हवे.
*त्यांच्या आवडी निवडी जपा.
*तिला तिची बलस्थाने आणि कमजोऱ्या स्वतः ठरवू द्या.
*स्वतःची आणि इतरांची प्रतिष्ठा जपा आणि मुलीलाही ते शिकवा.
[विशेष बाब : हे सगळे आपल्या राज्यघटनेत दिले आहे.त्याची आपल्याला फक्त प्रभावी अंमलबजावणी करायची आहे.]
* सर्व रंगाची फुले फुलतात त्यामुळे पुरुष, स्त्री, समलिंगी पुरुष आणि स्त्रिया यांनाही फुलू ध्या. तरच सर्वांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील आणि पर्यायाने देशाचेही आरोग्य उत्तम राहील. यातच सर्वांचे हित आहे.

सत्र दुसरे
विषय:


सत्र तिसरे
विषय : पूर्वग्रह, परकेपणा आणि संवाद
वक्ते : मा. जयदेव डोळे
★एखाद्या घटनेबाबत किंवा गोष्टीबाबत सत्य परिस्थिती किंवा त्यामागील शास्त्र माहीत नसताना केलेले भाष्य किंवा बनलेले मत म्हणजे पूर्वग्रह.
★कोणत्याही जातीचे लोक इतर जातीच्या लोकांबद्दल चांगले बोलत नाहीत. अमुक जातिचा म्हणजे तो किंवा ती तशीच असणार असा समज म्हणजे पूर्वग्रह होय.
★ पूर्वग्रह आणि परकेपणामुळे इतर जातिच्या आणि धर्मातील लोकांशी आपले चांगले संबंध किंवा मैत्री होत नाही.
★पूर्वग्रहांची शास्त्रीय चिकित्सा करायला हवी. त्यानंतर जर तथ्ये विपरीत आली तर योग्य निर्णय घ्यावा. पण तथ्ये सुपरित आली तर पुर्वग्रह टाकून दिला पाहिजे.
★पूर्वग्रहामुळे जाती जातीचे कंपू तयार झाले आहेत. आणि त्यातून अपपरभाव वाढत जातो.
★अश्या परिस्थितित समाज एकत्र येणे शक्य नाही.
★प्रश्न उपस्थित न करता आणि संवाद न साधता आपल्या मताला आपण चिकटून राहिलो की, संवाद खुंटतो आणि संवाद खुंटला की नाते आपोआप संपुष्टात येते.
★जाहिराती, प्रसारमाध्यमे आणि अफवांनी आपल्या मनात अनेक पुर्वग्रह तयार केले आहेत.
★चरित्र्यावरून केलेली गैरकृत्ये पुर्वग्रह या सदरात येतात. कारण त्यावरून घडलेले गुन्हे तपासून पाहिलेले नसतात. त्याची शास्त्रशुद्ध पाहणी केलेली नसते. आपण ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून सत्यपासून कोसो दूर जातो.
★ आपल्याला विचार आणि अनुभव दुरुस्त करता आले पाहिजेत.
★नर हा निसर्गात: संगोपक असतो पण पूर्वग्रहामुळे तो संगोपणापासून दूर गेला आहे.
★पुरुषाने घरकाम करायचे नाही किंवा बाईने बाहेर पडायचे नाही हा पूर्वग्रह आहे.
★प्रत्येक श्रीमंत माणूस लाबडीने श्रीमंत होतो आणि परिस्थितीमुळे गरीब राहतो हाही पूर्वग्रहच
★खाणेपिणे, पेहराव, राहणे, बोलणे हावभाव, शारीरिक ठेवण यावरून आपल्याला लोकांबद्दल पुर्वग्रह असतो.
★गोमांस भक्षण वाईट आहे असा प्रचार करणे हाही पूर्वग्रह च आहे. त्यातून आपण मुस्लिम मुद्दामहून गोमांस भक्षण करतात हा पुर्वग्रह करून बसलोय.
★नीट संवाद साधला तर मुस्लिमांपेक्षा जास्त संख्येने हिंदू गोमांस खातात हे लक्षात येईल.
★ पुर्वग्रह+ परकेपणा + संवाद = मोदी
★पंतप्रधानासारख्या माणसाने पुर्वग्रह आणि परकेपणा बाळगणे हे देशासाठी धोकादायक.
★दहशतवाद हा बंदुकीनेच केला जातो असे नाही देशमुख, पाटील, ब्राह्मण आणि सावकार जमीनदार यांनी खालच्या जातीचा समजून आपल्याच बांधवांना पूर्वग्रहाने दिलेली वागणूक हाही दहशतवादच आहे.
★लालूप्रसाद यादवांना शूद्र समजुन त्याच्या लहानपणी त्यांचे केस कापले जाणार नाहीत याची सोय तेथील सवर्णांनी केली होती त्यामुळे लालूंच्या केसाला आजही भांग पाडता येत नाही.
★कमल हसन ने नथुराम गोडसेला पहिला हिंदू दहशतवादी म्हणणे हे पुर्वग्रह नाही कारण त्याने त्याचा अभ्यास केला आहे कारण त्याने हे राम स्वतःच्या चित्रपटाची कथा, पटकथा, निर्मिती आणि भूमिका करून नथुराम पूर्ण अभ्यासला आहे.
★★★
सत्र चौथे

विषय : जागतिकीकरण: २१ व्या शतकातील संस्कृती, बहूविधता व सहअस्तित्वाचा प्रश्न

वक्ते: मा. दत्ता देसाई.

◆पृथ्वीचा पहिला अवकाशातून टिपलेला फोटो वैश्विक ज्ञान देतो.

◆पृथ्वीवर माणसाची स्थलांतरे का झाली? हे समजवून घ्यावे त्यातून मानवी संस्कृती लक्षात येईल.

◆ युनोने मानव वंश ही संकल्पना भंपक आहे असे जाहीर करून रद्द केली आहे. मानव वंश शास्त्रालाही आता मानव अभ्यासशास्त्र असे म्हटले जाते.

◆बहुविविधता ही चांगली असते. त्याने आपले आयुष्य आणि भावविश्व समृद्ध आहे त्यामुळे बहुविधता ही जमेची बाजू असून त्यातुन कमतरता वर मात करता येते.

◆बहुविध क्षमता असणारी लोकं एकत्र आणली तर मानवी प्रश्नांची उकल सहज होते.

◆बहुविधता लोकशाही मूल्यांना बळकटी देऊन हुकूमशाही प्रवृत्तीला थारा देत नाही.

◆बहुविधतेत राहणीमान, खानपान, शिक्षण, धर्म, जात पंथ या अनुषंगाने आलेली बहुविधता जपली पाहिजे.

◆माणूस हा बहू अंगी सर्जनशील आहे. इतर प्राणी ही सर्जनशील आहेत पण ते साचेबंद आहेत. उदा. मधमाशी हजारो वर्षांपासून फक्त पोळ बांधून मध गोळा करते पण माणसाने आपले घर बांधण्यात आणि उपजीविका करण्यात किती तरी वरचा टप्पा गाठला आहे आणि त्यात अजूनही शोध, संशोधन आणि बदल चालू आहेत.

◆भारतात मूर्तिकला ग्रीकांकडून आली. अगोदर भारतात देव म्हणून दगड पुजला जातो. त्यामुळे दगडाचा ओबडधोबड देव ते सूंदर मूर्ती हे त्यातील उत्क्रांती मानता येईल. राशिभविष्य ही भारतात ग्रीक मधून आले आहे.

◆ बीजगणित हे भारतातून जगात गेले आहे. अश्या कालपरत्वे अनेक देवाणघेवाण होत आल्या आहेत आणि ती बहुविधतेचि लक्षणे आहेत.

◆शिवाजी महाराजांची कारभाराची भाषा पर्शियन होती.

◆युरोप आणि पाश्चात्यांच्या बहुविधतेत आशियाचे योगदान आहे. फक्त त्यात त्या त्या देशातील संस्कृती आणि सरकार यांच्या स्वीकारहार्यतेनुसार बदल होतात पण त्यात बहुविधता असते हे मात्र खरे.

◆पाश्चिमात्य संस्कृती ला विरोध करणारी जी यंत्रणा देशात तयार झाली ती कालांतराने टोकाचा धर्मवाद आणि राष्ट्रवाद करणारी यंत्रणा म्हणून काम करू लागली.

◆जगात कोणतीच संस्कृती आणि भाषा शुद्ध नसते. त्याचे शुद्धीकरण चालू झाले की त्याला ब्राह्मणवाद असे म्हणता येईल.

◆ बहुसांस्कृतिकता म्हणत असताना आपण ती इतरांवर बाहेरून लादतो आहोत का?हे पाहणे महत्वाचे आहे. म्हणजेच ती कृत्रिम असता कामा नये याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

◆ कृत्रिम बहुसांस्कृतिकता हा भांडवलशाहीचा परिपाक आहे.

◆बहुसांस्कृतिकतेचा खरा पाया कोणता हे समजून घ्यायचे असेल तर जगातील प्रत्येक संस्कृती ही बहुसांस्कृतिक आहे हे मान्य केले पाहिजे. भांडवली संस्कृतीला फाटा दिला पाहिजे.

◆प्रत्येक धर्मात इतर धर्माची मूल्ये सामावलेली असतात हे आपण स्वीकारले पाहिजे.

◆◆◆◆◆◆◆


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...