कविता- पायरी
बाप माझा म्हणायचा,
आपण आपल्या पायरीनं रहावं.
हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा,
मुंगी होऊन साखर खावं.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
वरच्या पायरीवर गर्दी असते.
जातीवाद्यांची वर्दी असते.
पायात पाय घालून कुणी तोंडावर आपटतील,
चुकून झालं! चुकून झालं! म्हणत पाठ वरून थोपटतील.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
विश्वास आपला जिंकण्यासाठी,
वरच्या पायरीवरचे कुणी खाली सुद्धा येईल.
आले कुणी खाली म्हणून विचारात बदल होत नाही,
जात ही अशीच असते, जाता जात नाही.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
आलं कुणी आडवं म्हणून,
वरच्या पायरीवर जायचं कधी सोडायचं नाही.
पाडलं! पाडलं! म्हणत रडत-कुढत बसायचं नाही.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
नकळत कुणी करील घात,
आपले वाटणारेच घालतात आपल्या अब्रूला हात.
चुकलं! चुकलं! म्हणून कुणी पाय सुद्धा धरतात,
'आम्ही असे नाहीत' म्हणत खात्या घराचे वासे हेरतात.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
आम्ही आता बदललोय म्हणत कुणी घरातसुद्धा घुसतील.
गूज मनीचे जाणून घेण्यासाठी अश्रू सुद्धा पुसतील,
सरळपणावर आपल्या पाठीमागे कुत्सितपणे हसतील.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
वाहवत कुणामागे कधी जाऊ नको,
जाणूनबुजून विषाची परीक्षा पाहू नको.
त्रास त्याचा तुलाच होईल.
हकनाक तुझा जीव जाईल.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
ताटात बसून खाल्लं म्हणून कुणी साव होत नाही.
कौतुक केलं कुणी म्हणून आपण राव होत नाही.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचं,
माझं बोलणं तुला रुचणार नाही.
पण सत्य नेहमी कटू असतं.
वरच्या पायरीवरचं प्रत्येक जण आपल्यासाठी बटू असतं.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
समाज असा आहे म्हणून आपण जगणे सोडायचे नाही,
आली किती वादळे तरी उन्मळून पडायचे नाही.
बाप माझा म्हणायचा!
बाप माझा म्हणायचा,
पायरी आपली नाही म्हणून ध्येय कधी सुटू नये.
अपयश आलं म्हणून स्वप्न कधी तुटू नये.
आपणच आपली इमारत बांधावी,
एक एक पायरी आपली आपणच सांधावी.

Comments
Post a Comment