Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

लेख- मूकनायक आणि आजची पत्रकारिता

मूकनायक आणि पत्रकारिता : भूमिका आणि सद्यस्थिती ! १ * डॉ . राहुल सदाशिव खरात . १ . सहाय्यक प्राध्यापक , वाणिज्य विभाग , मु . सा . का . महाविद्यालय , सोमेश्वरनगर , ता . बारामती , जि . पुणे .   *Email id : srass229@gmail. com प्रस्तावना  :         कोणतीही चळवळ आणि विचारधारा बळकट करायची असेल ; त्या चळवळीची आणि विचारधारेची भूमिका जनसामान्यांसमोर मांडायची असेल तर प्रसारमाध्यमांशिवाय पर्याय नाही . बदलत्या काळात प्रसारमाध्यमांची भूमिका , स्वरूप , प्रकार आणि गरज यात लक्षणीय बदल झाला असला तरी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रसारमाध्यमे म्हणून वृत्तपत्रे , साप्ताहिके , पाक्षिके किंवा मासिकेच नजरेसमोर येतात . यातील सगळीच वृत्तपत्र किंवा मासिके ही एकाच विचारधारेची नव्हती हेही तितकेच खरे . म्हणजे स्वातंत्र्याचा इतिहास पहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे अनेक वृत्तपत्रे आणि मासिके यांनी ब्रिटिश सत्तेचे लांगुलचालन करतानाच समाजसुधारणा , समता आणि दलित चळवळीविरोधी भूमि...