कविता: डार्विन आणि माकड
रस्त्याने चाललेल्या डार्विनला,
एका माकडाने पकडले.
झडप टाकून त्याच्यावर,
दोन्ही हात जखडले.
वेदनेने डार्विन मग जोराने विव्हळला,
मी काय केले? म्हणत, माकडावर खवळला.
चिडून माकड म्हणाले,
डार्विन तुझा सिद्धांत मागे घेऊन टाक,
आमचा आणि माणसाचा संबंध कायमचा तू तोडून टाक.
मूर्खांमध्ये आमची गणना करून स्वतःला तू मिरवलेस,
'माणसाचा पूर्वज माकड' हे तू स्वतःच कसे काय ठरविलेस?
आमच्या कुळात माणसांची असली घाण नको.
उगीच डोक्याला फुकटचा ताण नको.
तुमच्या जगात माकड म्हणजे शिवी असते,
दिसणारी प्रत्येक स्त्री माणसाला मादी म्हणून हवी असते.
कधी खून, कधी दंगली, अन्यायाचा कळस करता,
एकमेकांना जीवे मारून स्वतःचा झेंडा मिरवता.
'कोण खालचा, कोण वरचा' हे तुम्ही कसे काय ठरविता?
जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग भेदाभेद तुम्हीच तर वाढविले,
खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी कित्येक जीव पायदळी तुडविले.
म्हणून आमच्यावर कुणाचा राग नको,
कुळाला आमच्या कसलाही डाग नको.
डार्विन कदाचित तुझे म्हणणे खरे असेन,
पण सिध्दांत मांडून नाते कधी जुळत नाही.
माणूस किती चुकीचा वागतोय, हे त्याला सांगून सुद्धा कळत नाही!
असलो आम्ही माकड तरी नीती आमची साफ आहे,
कळत असून सगळं तुमच्या मनात पाप आहे.
मग डार्विन म्हणाला,
तुझा त्रागा कळतोय मला पण मी खरे तेच मांडले,
मी असे बोललो म्हणून ते माझ्याशीही भांडले.
माकडाचा माणूस व्हायला हजारो शतक लागले,
माणूसपण शिकविले म्हणून माझ्याशीही ते निष्ठूरपणे वागले.
माणूस शहाणा व्हायला अजून कित्येक शतके लागतील,
माझ्यासारखे कित्येकजण रात्रंदिन जागतील.
संयम बाळगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही.
माणूस एकदा शहाणा झाला की, पृथ्वीसारखा स्वर्ग नाही.
©के.राहुल 9096242452

Comments
Post a Comment