नैतिकतेच्या पलिकडे
रवीचे बऱ्याच कालावधीनंतर गेल्या आठवड्यात मुंबईला जाणे झाले. शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईमध्ये काही वर्षे घालवलेली असल्याने मुंबईच्या प्रत्येक उपनगराचा आणि झोपडपट्टीचाही तसा जवळचा अनुभव. रक्ताच्या नात्याची आणि गावाकडील अनेक माणसं नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आलेली आणि स्थायिक झालेली. पण हक्काने त्यांच्याकडे जावे आणि रहावे असे फार कुणी नाही. त्यासाठी आवश्यक नात्यातील ओलावाच मुळी राहिलेला नव्हता. त्यामुळे 'मुंबईला आलोच आहे तर जाऊन येऊया' असे त्याला एकाही नातेवाईकांबद्दल वाटत नव्हते. पण एवढ्या लांब अंतरावरून मुंबईला जायचे म्हणजे मुक्काम तर होणारच. अश्यावेळी तो राहणार तरी कुठे. अर्थातच मित्रांकडे. कॉलेजला असताना जोडलेले मित्र हीच तर त्याची खरी संपत्ती होती. पण जसे रवीचे लग्न होऊन संसार चालू होता तसेच सगळेजण आपापल्या संसारात रुळले होते. त्यामुळे विवाहित मित्रांकडे जाणे त्याला फार आवडायचे नाही, मुक्कामी तर नाहीच नाही. मित्र आपले असले तरी त्यांच्या बायका आपल्याला तोच आदर किंवा किंमत देतील असे नाही, हा विचार त्यामागे होताच. तरीही अपवाद फक्त एकाचा, समीरचा! सगळयांच्या संसाराची गाडी रुळावर आली तरी हा पठ्ठया अजून संडयाच होता. त्याला कारणही तसंच होतं. अभ्यासात यथातथा असल्याने त्याने बी.ए. आणि नंतर एम.ए. केलं होतं. साहजिकच चांगली नोकरी लागेल असे करिअर त्याला करता आले नाही. घरची परिस्थिती तशी बेताची होती त्यामुळे घरूनही फार काही होण्यासारखे नव्हते. कॉलेजला असताना पार्ट टाईम रिक्षा चालवून त्याचे अर्थाजन चालायचे. आता तोही आधार नव्हता. त्यामुळे मिळेल त्या नोकऱ्या करत राहिला पण त्याला स्थिरता लाभली नव्हती. साहजिकच त्याला चांगली मुलगी लग्नासाठी मिळत नव्हती आणि गावाकडील काकुबाई किंवा सामान्य मुलीशी लग्न करण्याची त्याची तयारी नव्हती. जोडीदाराबाबत त्याची स्वतःची अशी खास मतं होती. त्यामुळे घरच्यांनीही त्याचे लग्न करण्याचा विचार कानामागे टाकला होता. साहजिकच अश्या माणसाकडे जायला रवीला काहीच अडचण नव्हती. शिवाय दोघांची मैत्री पूर्वीपासून घट्ट होती. मनातली सुख-दुःखाची कोणतीही गोष्ट आपलेपणाने सांगावी अशी.
दिवसभरात मुंबईतील आपली सर्व कामे आटोपुन रवी लोकल रेल्वेने कुर्ल्याला पोहचला होता. हा सगळा परिसर एकेकाळी चालत फिरल्याने, 100-200 रुपये भाडे मागणाऱ्या रिक्षा चालकांना भीक न घालता तो समीरच्या खोलीकडे लगबगीने पायी चालला होता. तेवढ्यात त्याला ट्राफिक पोलिसांची गाडी दिसली त्यात एक दुचाकी भरून चालविली होती. खोपडी पूर्ण तुटलेली होती पण नंबर प्लेट शाबूत होती. त्यावरील राज्य कोड आपल्या जिल्ह्याचा आहे हे लक्षात आल्यावर त्याने गाडीचा नंबरही नीट पाहून घेतला. मेंदूला थोडा जोर दिल्यानंतर "अरे ही तर समीरचीच गाडी आहे, याचा अपघात वगैरे तर झाला नाही ना!" असे चिंतातूर उद्गार त्याच्या तोडून आपसूकच बाहेर पडले. पोलिसांची गाडी सिग्नलला थांबली आहे हे पाहून रवी पळतच गाडीजवळ गेला आणि पोलिसांकडे चौकशी करून गाडी माझ्या मित्राची असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडी बाजूला घेतली आणि रवीला गाडीत बसवून पोलीस स्टेशन गाठले. "अपघात कसा काय झाला?' हे त्याने विचारताच एक पोलीस म्हणाला. अपघात झालेला आठ दिवस झाले. तीन दिवसांपूर्वी गाडीचा मालक शुद्धीवर आलाय. त्यानेच सांगितले तेव्हा आम्हांला कळाले. तोपर्यंत गाडी तशीच पडून होती. रात्रीच्या वेळी कोणीतरी ठोकर मारून निघून गेले, त्याला काही सांगता येत नाही.
खुप पिलेला होता काय?
हो, वैद्यकीय चाचणीचे अहवाल तसेच सांगतात.
हो पण आता त्याला कुठे ऍडमिट केलंय?
सायन हॉस्पिटलमध्ये आहे. पाय मोडलाय उजवा.
मी त्याला भेटायला जातो. काही कायदेशीर सोपस्कार पार पडावे लागले तर मी उध्या येतो.
तुमचा फोन नंबर देऊन जा. म्हणजे गरज पडली तर संपर्क करता येईल.
पोलीस स्टेशनला फोन देऊन मी तडक रिक्षा पकडून सायन हॉस्पिटलला गेलो. एवढ्या जवळच्या अंतरासाठी अनिच्छेने त्याच्या तोंडावर 100 रुपये फेकले आणि आत गेलो. सरकारी हॉस्पिटल असताना आणि एवढी बिकट परिस्थिती असताना समीरला सेमी डिलक्स वॉर्डमध्येच टाकलेले पाहून त्याला जरा धक्का बसला होता. समीर डोळे झाकून शांत झोपला होता. याला जागे करावे की न करावे या विचारतच त्याने समीरच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यामुळे त्याने डोळे उघडले. रवीला समोर बघून त्याचे डोळे भरून आले आणि तो रविचा हात हातात धरून रडायला लागला.
रडू नकोस त्रास होईल तुला. शांत पडून रहा, रवी त्याचे डोळे पुसत म्हणाला.
रवीच्या येण्याने त्याला कोण आनंद झाला होता. घरी अजून कोणालाच काही माहीत नव्हते. मुंबईतील कोना मित्रांनाही काहीच खबर नव्हती पण रवीला मात्र हे न सांगता एवढ्या लांबून हा कसा काय आला? या विचाराने त्याचा बांध फुटला होता.
समीर तू काळजी करू नकोस मी आता घरी कळवितो तुझ्या. येतील सगळे भेटायला. मग तर झाले.
नको करू कुणाला फोन! कोणाला सुखदुख नाही माझं. मलाही कळवता आलं असतं ना. पण नाही कळवलं. कळवावे असंही वाटलं नाही.
अरे पण का?
खूप मोठी कहानी आहे. सांगेन परत कधीतरी निवांत. बाकी तू कसा आहेस ते सांग.
मला काय धाड भरलीय, सरकारी नोकर आहे मी. तुझीच काळजी आहे, असे रवी बोलत असतानाच एक पस्तिशीची बाई त्याच्या रुममध्ये आली. येताना तिने घरगुती पद्धतीचे जेवण आणि बरीच फळे आणली होती. समीरकडे तिरक्या नजरेने बघत तिने स्मित हास्य केलं आणि त्याला नजरेनेच काहीतरी खुणावत ती बाहेर निघून गेली.
कोण ह्या? नातेवाईक वगैरे आहेत का जवळच्या?
सामान आहे आपलं!
(जवळच्या मित्रांमध्ये बायकोला सामान म्हणण्याची पद्धत आठवत) रवी आनंदाने म्हणाला, "लग्न वगैरे केलंस की काय?"
हळू बोल दोन मुलं आहेत तिला.
म्हणजे सगळं रेडिमेड आणलं म्हण की, कसलाही त्रास नको. आम्हांला तरी सांगायचं आम्ही आणली असती ना एखादी बिनलग्नाची मुलगी शोधून.
अरे बाबा लग्न नाही ना काही नाही. लफडं आहे आमचं.
काय सांगतोस?
रवीच्या तोंडाचा वसलेला "आ" एका हाताने बंद करत समीर म्हणाला, "माझे आणि तिचे शारीरिक संबंध आहेत."
घटस्फोटित किंवा विधवा आहे का मग?
नाही रे मोठ्या घरची आहे शिवाय नवराही चांगला कमावता आहे.
अरे सांगताना थोडंपण काही कसं वाटतं नाही तुला. लफडं करायला माझी हरकत नाही पण किमान एखादी तोलामोलाची किंवा बिनलग्नाची मुलगी तरी पहायची. एवढ्या मोठ्या शहरात कोणी ना कोणी भेटलंच असतं की?
खरंय तुझं पण आमची रिलेशनशिप वेगळी आहे.
वेगळी म्हणजे प्रेम करतो का तू तिच्यावर?
मी नाही करत पण ती करते माझ्यावर जीवापाड प्रेम.
आता हे काय नवीनच! ती तुझ्यावर प्रेम करते पण तू करत नाही म्हणजे तू तिची फसवणूक नाही का करत?
मुळीच नाही. नातं जोडतानाच मी तिला याची कल्पना दिली आहे.
तरीही ती तयार झाली म्हणजे कमाल आहे!
कमाल कसली. एवढा विनाअट तिच्या गरजा पूर्ण करणारा माणूस तिला कुठून भेटणार.
अरे पण तिचा नवरा, मुले यांची फसवणूक नाही का यात?
मुलांचं म्हणशील तर ती लहान आहेत आणि नवऱ्याला हे सगळं माहीत आहे.
काय?
हो, तिच्या नवऱ्याला याची कल्पना आहे. माझ्याशी शरीरसंबंध ठेवताना तिने नवऱ्याची परवानगी काढली आहे. आणि त्यानेही ती दिलेली आहे. असं तीच अभिमानानं सांगत असते.
अरे तु काय बोलतोयस मला तर काहिच कळत नाही.
जाऊ दे, जेवढं कळलंय ते खूप आहे. आपण दुसऱ्या विषयावर बोलू.
ते तर बोलूच सम्या, पण तू असा नव्हतास. कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने न पाहणारा तू . विवाहबाह्य संबंधांना नैतिक अनैतिकतेच्या तराजुतून तोलून मापून पाहणारा तू. आजचे तुझे किंवा तिचे किंवा तुमच्या दोघांचे वागणे अनैतिकता या सदरात मोडत नाही काय?
रवी काळानुसार माणूस प्रगल्भ होत जातो यावर तुझा विश्वास असेल आणि त्यानुसार जेव्हा माणूस नवा विचार मांडतो तेव्हा त्याने जुना विचार सोडलेला असतो, यावर तुझा विश्वास असेल तरच मी पुढे बोलतो!
अर्थातच आहे आणि तुझा बदललेला विचार ऐकायला मी उत्सुकही आहे.
तर एक मग. मुळात शारीरिक संबंधात नैतिक अनैतिक असं काही नसतं. सगळा असतो तो गरजेचा आणि वासनेचा मामला.
मान्य सगळं, पण तू काय एवढा लेचपेचा माणूस नाहीस कसल्याही तोडजोडी करायला.
वेळ काय करायला प्रवृत्त करेल याचा काही नेम नाही. त्यामुळे वेळेपुढे मी इतका हतबल झालो की पर्यायच नव्हता दुसरा.
पण सम्या, इतका टोकाचा विचार करताना एकदा चर्चा तरी करायची कोणाशीतरी.
कोणाशी करणार हे सगळं अचानक घडलं. आणि नंतर त्याची सवय पडत गेली.
म्हणजे?
सांगतो पण सगळं आजच ऐकूनच जाणार का?
नाही रे, ऐकायचंय पण त्याचं भांडवल करण्यासाठी नाही. आपल्या सगळ्या ग्रुप मध्ये तुझं एकट्याचच करिअर झालं ही नाही म्हटलं तरी माझ्यासाठी दुःखाची बाब आहेच. चांगलेपण मिरवायला जिवलग मित्रांचे गाडे रुळावर असणे आवश्यक असतं ना. माझ्या ग्रुपचे सगळे मोठ्या पदावर गेले असे सांगताना मला तुझा अपवाद करावा लागणे यात नाही म्हटलं तरी मैत्रीचं अपयश आहेच ना?
जाऊ दे रे झालं ते झालं. तू संकटात नसता तर मला बाहेर काढलं असतंच ना. शिवाय तुझं वेळोवेळीचं देणं अजून चुकतं केलेलं नाही मी.
माझ्या देण्याचा विचार आता नको करुस. मी काही ते सोडणार नाही. आज ना उद्या तुझे दिवस येणारच आहेत.
येतील तेव्हा येतील. पण चांगलं व्हायला सगळीकडून सकारात्मक वातावरण लागतं ते मला मिळालं नाही. म्हणून मी मागं पडलो. काही निवडक माणसे सोडली तर जग गरिबांचच आहे. त्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही.
ठीक आहे पण हे लफडं कसं काय घडलं?
तुझं कॅम्पस सिलेक्शन झाल्यावर तू कंपनी मार्फत जॉबसाठी दोन महिने अमेरिकेला गेलास. तुझ्या क्वार्टरवर होतो तेव्हा ठीक होतं सगळं पण तू गेल्यावर मी माझ्या काकांकडे रहायला गेलेलो ठाण्याला पण त्यांनी मला कायमस्वरूपी ठेऊन घ्यायला असमर्थता दाखविली. साहजिकच मला भाडयाने राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात नोकरीही चांगली नव्हती. फ्लॅट भाड्याने घेऊन राहणे आणि इतर खर्च तुटपुंज्या कमाईचा शक्यच नव्हता. गावाकडे भाऊ लग्नानंतर आईवडिलांना सांभाळायला तयार नव्हता. वेगळा रहायला लागला.आई वडील थकलेले. त्यामुळे आई वडिलांनाही पैसे पाठवावे लागतात. वय झालंय त्याचं आता. म्हणून झोपडपट्टीत रूम बघितला. तिथेच जवळ एकवेळची मेस लावली. पण जेवण फार चागले नव्हते त्यामुळे संध्याकाळी कामावरून येताना बाहेरून जेवण करून यायचो. हॉटेलचे जेवण रोज परवडणारे नव्हते म्हणून संध्याकाळी ही बाहेर मेसच्या शोधात होतो. त्यावेळेस या बाईची मेस सापडली. जेवण खूप चांगले होते. जास्त पैसे हवे असतील तर जास्त कामही करावे लागते. त्यामुळे संध्याकाळी ओव्हर टाईम करून जेवायला जायचो. रात्री 10-11 व्हायच्या जेवायला जायला. तोपर्यंत इतर सगळे मेंबर जेवून जायचे मी एकटाच रहायचो. बऱ्याचवेळा तिची मुलेही जेवण करून झोपी गेलेली असायची. अधूनमधून नवराही कुठे तरी गायब असायचा. त्यातून तिच्याशी ओळख आणि नंतर मैत्री वाढत गेली. तिने कधीही माझ्यावर लाईन मारली नाही की जबरदस्ती केली नाही. एकदिवस मला फिरायला घेऊन गेली आणि थेट मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे आहेत असे तडक सांगून टाकले. मी जरा भांबावलो. नवरा आणि मुलं असलेल्या स्त्रीने असे वागणे चुकीचे आहे हेही तिला सांगितले. तिचू आणि तिच्या नवऱ्याची chemistry खूपच चांगली आहे असे ती सांगते. त्याला आमचे संबंध माहीत आहेत पण तो कधी शत्रुत्वाने वागला नाही की राग धरला नाही. बायको इतकाच तोही माझ्याशी चांगला वागतो. इतका तो समजूतदार ही आहे. पण दोन वर्षपूर्वी त्याला डायबेटीस डिटेक्ट झाला आणि त्यांच्या शरीरसंबधात दीर्घ काळ खंड पडला. साहजिकच तिला यापासून स्वतःची सुटका करता आली नाही. तिने नवऱ्याला स्पष्टपणे ही बाब सांगितली आणि त्यानेही थोडेदिवस विचार करून तिला तिच्या आवडीच्या माणसाबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची अनुमती दिली. मी तिला आवडलोय हे तिने त्याला सांगितल्यावर त्याने स्वतः आम्हांला एकांत मिळेल अशी व्यवस्था करायला सुरवात केली. त्याने आजपर्यंत कधीही मला वाईट वागणूक दिली नाही. त्याचे अधूनमधून गायब होणे हा त्याच्याच भाग होता. त्याहीपेक्षा माझ्यदृष्टीने याला संमती देण्याचे कारण म्हणजे मी तिशी ओलांडूनही असाच राहिल्याने मलाही कुठूनतरी माझी शारीरिक गरज पूर्ण करावी असे वाटत होती.
म्हणून तू यासाठी हो म्हणालास!
हो, मला त्यावेळेस आणि आताही त्यात काही वावगे वाटत नाही.
सम्या मलाही त्यात काही वावगे वाटत नाही पण.....
पण काय रवी......
सम्या तुझंही स्वतःच कुटूंब असावं असं मला वाटतं. एक दोन मुलं असावीत असं मला प्रामाणिकपणे वाटते. पण यात तू अडकून पडलास तर तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय? तिच्या सुखासाठी ती सोय म्हणून तुझा वापर करेन. एकदा मुलं मोठी झाली आणि तिच्या गरजा संपल्या की तुझा उपयोग संपून जाईल. उर्वरितआयुष्याचं काय? तू बोलला असतास तर आपण स्वतः एखादी मुलगी पहिली असती!
खरं सांगू रवी इतका पुढचा विचार मी केलेलाच नाही. शिवाय आता माझं लग्न होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे मिळतंय तोपर्यत सुख उपभोगायचं यापेक्षा फार पुढचा विचार मी केलेला नाही.
पण सम्या.......
रवी पण नको की बिन नको, आता या विषयावर लगेच काहीच बोलू नको. मला महित आहे तुझ्याकडे यावर नक्कीच उपाय असेल पण मी आर्थिक अडचणीतून बाहेर येईपर्यंत यात काहीच बदल करणार नाही.
ठीक आहे तू म्हणशील तेव्हा आपण या विषयावर बोलू. पण सगळं हातातून निसटून जाईल इतका उशीर लावू नकोस. तुला काही पैसे लागणार आहेत का?
नाही रे आपल्या समानाने सगळी व्यवस्था केलेली आहे.
त्याचा निरोप घेऊन रवी लॉजकडे निघाला.

Comments
Post a Comment