कविता- वेश्यापण बाईच असते.....!
आम्ही पण असतो स्त्रियाच,
आम्हांलाही असते मन.
पडलेलो असतो घरातून बाहेर परंपरेच्या चौकटी मोडून,
वेगळ्या वाटेने जाण्याची स्वप्ने उराशी बाळगून.
वाटतं काहीतरी वेगळं करावं,
मिळवावेत मानसन्मान इतरांसारखे.
असावं आपलंही एक हक्काचं घर,
फुलवीत संसाराच्या वेलीवर दोनचार फुलं,
असावं हक्काचं आपलं माणूस,
ज्याच्या खांद्यावर सुख-दुःखात डोकं टेकवता येईल.
वाटतं बदलावं आपलंही रेशनकार्ड,
वाढत जावी नावांची यादी आपल्या नावाखाली,
पण समज तेवढी वाढलेली नसते वयात येताना.
त्या नकळत्या वयात असं काही वेगळं घडतं आमच्याबाबत,
आणलं जातं आम्हांला फसवून इथं,
कधी प्रियकराकडून, कधी जिवलग मित्राकडून, मैत्रिणींकडून तर कधी नकळत घसरतो पाय आणि ढकललं जातं काळोखात.
आणि समोर पसरतो अंधार आयुष्यभरासाठी,
कारण केला जातो आमचा सौदा बोली लावून आमच्याच माणसांकडून,
कधी नवरा तर कधी जन्मदाते आई-बाप, भाऊही असतात दलाल.
मग रोज रात्रंदिवस कित्येकवेळा ओरबडले जाते शरीर, तारुण्याचा बहर ओसरेपर्यंत.
टाकून दिले जाते अडगळीत अनेक व्याधीसह,
मरण येत नाही म्हणून जगावं लागतं कुढत कुढत.
हौस म्हणून येणारे नसतेच कुणी आमच्यापैकी.
आणि हो सगळ्यात महत्वाचं!
आम्ही सगळ्या असतो,
व्यवस्थेतल्या खालच्या वर्गातल्या आणि स्तरातल्या,
असतो आम्ही दलित, आदिवासी, बेवारस, अनौरस आणि गरीबाच्या.
मोठ्या घरचं आणि घरंदाज म्हणवणारं नसतं इथं कुणी,
म्हणून तर तु धजावलास ना असं बोलायला.
त्यांना खाज असेल तर त्यांनी वेश्येकडे जावं म्हणून.
पण वेश्यासुद्धा बाईच असते अगदी तुझ्या आई, बहीण अन् बायको सारखी.
©के.राहुल ९०९६२४२४५२.

Comments
Post a Comment