स्वतःला ओळखण्यासारखे दुसरे यश नाही- डॉ. कालिदास पाटील
सोमेश्वरनगर (ता.७) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी माणसाला स्वतःशी संवाद साधता आला पाहिजे. स्वतःशी संवाद साधता आला की माणूस इतरांशी चांगला संवाद साधता साधू शकतो. ज्याला हे जमते ती व्यक्ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. परंतु त्यासाठी मन शांत असले पाहिजे आणि आपले वर्तनही चांगले असले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कालिदास पाटील यांनी येथे केले. ते सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, पुणे जिल्हा आणि परिसरातील एम. के. सी. एल. केंद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीच्या मुलांसाठी आयोजित "७ व्या करिअर मार्गदर्शन शिबीर-२०१९" मध्ये मुलांना संबोधित करताना बोलत होते. शिबिराचे उदघाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. शैलेश रासकर यांच्या हस्ते आणि करखाण्याचे कार्यकारी संचालक मा. राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संदीप जगताप होते. प्रसंगी विचारमंचावर एम के सी एल चे विभागीय समन्वयक शिवप्रसाद माळी, राजेंद्र कुंभार, सॊमेश्वर शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे, प्राचार्य एम के हजारे, प्राचार्य धनंजय बनसोडे, , डॉ. मनोहर कदम, प्रा. अजय दरेकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment