कविता - दोन कांदे
काल बाजारामध्ये दोन कांदे एकमेकांशी बोलत होते,
तराजूमध्ये बसून वजन आपले तोलत होते.
मोठा कांदा भाव म्हणाला,
तुझ्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे,
'जास्त वजनाला जास्त पैसे', हाच नियम रास्त आहे.
छोटा कांदा त्याला म्हणाला,
जास्त भाव खाऊ नको,
हवेमध्ये जाऊ नको.
मोठा असला तरी तू सुद्धा कांदाच आहे,
दर मिळेल जास्त पण जिवंत कसा राहणार याचा मात्र वांद्या आहे.
मोठा कांदा मिरवत मिरवत म्हणाला,
माझ्यासारख्याला मोठ्या घरी वाव आहे,
पैसेवाल्यांच्या दुनियेत मलाच खरा भाव आहे.
मग छोटा कांदा म्हणाला,
ते सगळे जाऊ दे,
तुझे-माझे बाजूला राहू दे.
काल काय झाले सांगतो तुला,
संसदेत आपल्यावरून खडाजंगी झालीय,
आपल्यामुळे जनतेची म्हणे मोठी तंगी झालीय.
मोठा कांदा म्हणाला,
तंगी होऊ दे नाहीतर खडाजंगी होऊ दे,
कधीतरी आपल्याला भाव येतात,
शेतकऱ्याच्या खिशात चार पैसे जातात.
जनतेनेला जरा कळ सोसु दे,
थोडे दिवस शेतकऱ्यांना ही हसू दे.
छोटा कांदा म्हणाला,
तू तर उद्धटपणाबरोबर हुशार पण आहेस
मग अर्थमंत्री म्हणतात, "मी कांदा खात नाही" याचाही अर्थ जरा समजावून सांग.
मोठा कांदा म्हणाला,
माणसांचं काय? काहीही बोलतात,
प्रत्येक वेळेस स्वतःला जातीच्या तराजूत तोलतात.
आपल्या इथे कांदे खाणारे असुर असतात,
त्यांच्या मते ते न खाणारे सूर असतात.
छोटा कांदा म्हणाला, त्याचा आपल्याशी संबंध काय?
मोठा कांदा म्हणाला, यात सुद्धा राजकारण आहे,
जातीच्या राजकारणात विनाकारण आपले मरण आहे.
अर्थमंत्री स्वतःला उच्च समजत असाव्यात,
कांदे खाणाऱ्या जाती त्यांना तुच्छ वाटत असाव्यात.
लोकांनी त्यांना आपली कॉस्ट विचारली होती
त्यांनी मात्र आपली कास्ट सांगून टाकली.

Comments
Post a Comment