कविता- कालची गोष्ट
काल तो मला सहजच म्हणाला,
कल्चर प्रत्येकाचं एकमेकांहून वेगळं असतं.
एका जातीचं शर्ट दुसऱ्यासाठी ढगळं असतं.
आपल्या जातीचं शर्ट गपगुमान घालत जावं,
जातीला सोसल तेवढंच माणसानं बोलत जावं.
स्वतःच्या कल्चरला शोभल असंच माणसानं रहात जावं,
पडेल ताटात आपल्या ते मुकाट्यानं खात जावं.
शिकला असशील चार बुकं जास्त म्हणून
जड वाटेल मला असे कधी बोलू नकोस,
वरच्या वर्गातला आहे मी, मला कधी कोलू नकोस.
झाला जरी अन्याय तरी पुन्हा पुन्हा घोकू नको,
किरकोळ बाबीची मळमळ पुन्हा पुन्हा ओकू नको.
एक गोष्ट धान्यात ठेव, समता या मातीचा पिंड नाही,
धारातीर्थी पडायला मी, मैत्री म्हणजे पावनखिंड नाही.
दसपट तुझ्या वाईट मी सुद्धा वागू शकतो,
गुन्हेगार ठरवशील मला तर डाग तुला सुद्धा लागू शकतो.
©के.राहुल ९०९६२४२४५२
===============
होय बी म्हणंना, नाय बी म्हणंना.
किती घालू मी चकरा गं s s
जीव झाला हा वेडापिसा,
अजून किती करशील नखरा गं s s
सोंगाढोंगाचा बाजार इथला.
रंग दाविशी कुठला गं s s
आज सलामी, उद्या गुलामी,
माणूस इतका मातला गं s s

Comments
Post a Comment