Skip to main content

घेण्यासारखा "पंगा"

घेण्यासारखा "पंगा"

         गेल्या दहा वर्षात बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये काही सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येते. यामध्ये कलात्मक व स्त्रीप्रधान चित्रपटांची निर्मिती आणि चलती हा सगळ्यात महत्वाचा आणि सकारात्मक बदल असल्याचे दिसून येते. या अगोदरही स्त्रीप्रधान चित्रपट येत होते पण त्यांचे प्रमाण अत्यंत नगण्य किंवा बोटावर मोजण्यासारखे होते. शिवाय या चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये व्यावसायिक आणि कलात्मक अभिनेत्री असे दोन गट असल्याचे आपल्याला दिसून येतात. यातील व्यवसायिक चित्रपटात काम करण्याऱ्या अभिनेत्री सामाजिक आशय विषय  असणाऱ्या चित्रपटात काम करायचा नाहीत कारण त्या भूमिकांना एकतर कोणतेही ग्लॅमर नसायचे तसे ते आजही नाही.  शिवाय तिकिटबारीवर या चित्रपटांना अत्यंत थंड प्रतिसाद मिळायचा आणि अश्या चित्रपटांचा एक वेगळा प्रवाहच ठरविला गेलेला होता. या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रिला व्यवसायिक चित्रपटात संधीच मिळायची नाही. त्यातही त्या अभिनेत्रीचा अभिनय खूपच सशक्त आणि वाखाणण्यासारखा असला तरी काही अपवाद वगळता व्यावसायिक चित्रपटातील नामांकित अभिनेते आपण दुय्यम ठरू म्हणून त्याच्याबरोबर काम करायला तयार नसत. शबाना आझमी, दीप्ती नवल, स्मिता पाटील यासारख्या भूमिका जगणाऱ्या अभिनेत्रींबरोबर नामांकित अभिनेते काम करत नव्हते त्यामुळे अभिनयाचे कौतुक आणि अनेक पुरस्कार पदरात पडूनही या अभिनेत्रींना अपेक्षित व्यवसायिक यश आणि ग्लॅमर मिळाले नसल्याचेच दिसून येते. तसेच गल्लाभरू चित्रपटांच्या आणि हमखास व्यवसायिक यश मिळवून देणाऱ्या नायिका अश्या चित्रपटांमध्ये काम करायला तयार होत नव्हत्या. त्यामुळे पुरुषप्रधान चित्रपटातील दुय्यम भूमिका स्वीकारताना या अभिनेत्रीना कमीपणा वाटत नसे. कारण त्या दुय्यमपणात अनेक मानसन्मान आणि आर्थिक यश दडलेले असे आणि आजही आहे.
      पण २१ शतकाच्या पूर्वार्धात यात कमालीचा बदल झाल्याचे निदर्शनास येते. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटात यश मिळविण्याची समांतर क्षमता असलेल्या अभिनेत्री या काळाने बॉलीवूडला दिल्या. जागतिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात उदयास आलेला नवश्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय पिढीने प्रगल्भता दाखविताना  या अभिनेत्रीच्या व्यवसायिक आणि कलात्मक चित्रपटांना  समान पसंती दिली. अगदी अभिनेत्रींच्या विवाहानंतर लगेच संपुष्टात येणारे करीअर लग्नानंतरही चालू राहिले हा प्रेक्षकांमधील सकारात्मक बदल याच काळात समोर आला. त्यामुळे काही अभिनेत्रीचे कलात्मक चित्रपट व्यवसायिक चित्रपटांवरसुद्धा मात करू लागले. व्यवसायिक आणि कलात्मक या दोन ध्रुवांवर काम करणाऱ्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना या काळात मानसन्मान, पुरस्कार आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. अश्या अभिनेत्रींमध्ये तब्बू (माचीस, हुतूतू, चांदणी बार, मकबूल), उर्मिला (पिंजर, तहजीब, एक हसीना थी) विद्या बालन (कहानी, इष्कीया, तुम्हारी सुलू, ) ही नावे प्राधान्याने सांगता येतील याच यादीत समावेश होणारे आणखी एक नाव म्हणजे कंगना राणावत!
         सुरुवातीच्या काळात सुमार आणि गल्लाभरू चित्रपटांत भूमिका करतानाच या चित्रपटांना मिळाले व्यवसायिक यश तिच्यातील सशक्त अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कारापर्यत घेऊन गेले. फॅशन, तनू वेड्स मनू, क्वीन, जजमेंटल है क्या पासून आताच्या "पंगा" पर्यत अभिनेत्री म्हणून तिचा झालेला प्रवास व्यवसायिक आणि कलात्मक चित्रपटांना एकाच प्रवाहात बांधणारा आहे. हे सगळे चित्रपट पहिल्यानंतर उत्तरोत्तर तिच्या अभिनयात झालेले सकारात्मक बदल आणि विविधता प्रेक्षक म्हणून आपल्याला भावत राहते. म्हणून पंगा चित्रपट पाहण्यासारखा तर आहेच पण माणूस म्हणून आपल्याला बरेच काही शिकवून जाणाराही आहे.
           पंगाची सुरुवात जया निगम या एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान, सन्मान आणि प्रसिद्दी मिळालेल्या कब्बडीपटूच्या होणाऱ्या वरवर सुखी वाटणाऱ्या संसारातील घुसमटीतुन सुरू होतो. रेल्वेच्या संघाकडून खेळत असल्याने रेल्वेमध्ये तिला नोकरीही आहे पण कब्बडी सोडून चांगले १०-१२ वर्षे उलटून गेल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मिळणारा मानसन्मान केव्हाच संपला आहे. उलट जरा काही इकडे तिकडे झाले की तिचा पाणउतारा केला जातो आणि तुझे आता कब्बडीपटूचे ग्लॅमर कधीच संपले आहे असे वरून तिला सतत ऐकवले जाते. समाजातही तिला कोणी खेळाडू म्हणून ओळखत नाही. रेल्वे क्लार्क म्हणून तिकीट देत असताना तिला रोज रेल्वेने विविध ठिकाणी स्पर्धांसाठी जाणारे खेळाडू दिसतात आणि तिला आपल्या भूतकाळात घेऊन जातात. यातील कोणीतरी आपल्याला ओळखेल या आशेने ती आपले काम सोडून त्यांच्याकडे जाऊन त्यांना "तुम्ही मला ओळखले का?" असे प्रश्न विचारत राहते. पण तिच्या दुर्दैवाने तिला ओळखणारा एकही युवा खेळाडू तिला ओळखत नाही. त्यामुळे तिच्या दुःखात भरच पडत राहते. सगळे काही सुरळीत सुरू असतानाही तिला आयुष्याच्या या वळणावर जीवन निरस वाटायला लागते.
      कामाच्या ठिकाणी अशी परिस्थिती असली तरी तिचे त्रिकोणी कुटूंब अत्यंत सुखी आणि समाधानी आहे. तिचा नवरा प्रशांत आणि एकुलता एक मुलगा कबीर सामान्य माणसाचे आयुष्य आनंदाने जगत असतात. जस्सी गिल या अत्यंत देखण्या आणि नवख्या अभिनेत्याने तिच्या नवऱ्याची साकारलेली भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण आहे. रेल्वे अभियंता म्हणून काम करताना प्रशांत नवख्या जया निगमचा बिनधास्तपणा आणि खेळ पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्यावेळेस प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली जया प्रत्येक सामन्यात पाहिल्यापेक्षा सरस खेळ करून वरवर जात असते. एक वर्षाच्या आतच ती भारतीय कब्बडी संघाची कर्णधार बनते आणि आशियायी खेळासाठी जाणाऱ्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी तिला मिळते. नोकरी, खेळाचा सराव आणि प्रेमप्रकरण असा तिहेरी पराक्रम चालूच असतो. त्यात प्रेमप्रकरण दोन्हीवर मात करते आणि जयाला दिवस जातात.  लग्नानंतरही जयाला आपले क्रिडापटू म्हणून करिअर सुरू ठेवता येईल अशी हमी दिल्यामुळे ती आणि प्रशांत लग्न करण्याचा निर्धार करतात. बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी आशियायी स्पर्धा असल्याने आपण बाळंतपणानंतर परत खेळाकडे परंतु अशी तिला खात्री असते. त्याला प्रशांतचाही पूर्ण पाठींबा असतो. त्यासाठी तो कोणतीही तडजोड करायला तयार असतो. पण नियतीला असे व्हावे हे मान्य नसते.  कोणतेही कारण नसताना अचानक जयाची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी होते आणि पूर्ण वाढ न झालेले बाळ जन्माला येते. त्या बाळाची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याला वयाच्या १२ ते १५ वर्षे होईपर्यंत खूप जपावे लागेल असे डॉक्टर सांगतात. अश्यावेळेस जयाची आई (नीना गुप्ता) जरी मदतीला असली तरी प्रशांतला आईचे कर्तव्य पार पाडता येत नाही त्यामुळे जयाला आपल्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून बाळासाठी पूर्णवेळ गृहिणी व्हावे लागते. साहजिकच या दहा वर्षांत तिच्यातील कब्बडीपटू कधीच मेलेला असतो.
        घर, नोकरी, नवरा, मुलगा यांचे करण्यात कधी सकाळचे आणि रात्रीचे १० वाजून जातात हे तिलाही कळत नसते. मुलासाठी सकस आहार बनविणे, त्याला सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होऊ नये म्हणून रोज काळजी घेणे, कामावर जाणे, बोलणी खाणे आणि संध्याकाळी कामावरून परत आल्यावर पुन्हा घरकाम यात तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकवा यायला लागतो. जर चाललं की दम भरायला लागतो, हात पाय आणि कंबर दुखायला लागते. एकदा मुलाच्या शाळेत खेळाच्या स्पर्धा असतात आणि आई वडील दोघांनी हजर राहणे बंधनकारक असते पण जयाचा बॉस तिला रजा देत नाही म्हणून तिला हजर राहता येत नाही. साहजिकच सगळ्या मुलांचे आई वडील आलेले पाहून मुलगा नाराज होतो. आईला काही बाही बोलायला लागतो. तुला स्वयंपाकाशिवाय काहीच येत नाही असे म्हणून तिचा अपमान करतो आणि जयाला ही गोष्ट खूपच मनाला लागते. आपण काय होतो? आणि काय झालो? एवढे सगळे करूनही आपलं काय चुकलं? हे प्रश्न तिला सतावत राहतात. एकांतात तिला रडू यायला लागतं. मुलाचं हे बोलणं आणि त्याचा बायकोवर झालेला परिमाण प्रशांतच्या नजरेतून सुटत नाही. जया कामावर गेल्यावर प्रशांत कबीरला तिचा भूतकाळ सांगतो. कबीर कमजोर असला तरी त्याला समजही आहे. आई कामावरून आली की तो तिची माफी मागतो आणि माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करशील का? असे विचारतो आणि तसे वचनही तिच्याकडून घेतो. कबीर तिला परत पुन्हा तिने कबड्डी खेळायला सुरुवात करावी अशी इच्छा व्यक्त करतो. एवढया वर्षात आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमता हरवून बसलेली जया त्याला थेट नकार देते. कबीर हिरमुसला होऊन झोपी जातो. कबीरचे मन राखण्यासाठी तू कबड्डीच्या सरावाचे नाटक कर असे प्रशांत तिला सांगतो आणि नाईलाजाने जया तयार होते. दुसऱ्या दिवशी तिने कबिरला होकार सांगितल्यावर तो खुश होतो. रात्री झोपताना पहाटे ४ .०० वा. चा गजर लावतो आणि त्यानुसार तिला उठवून रनिंगसाठी बाहेर पाठवतो पण एकटी स्त्री म्हणून ती बाहेर जायला कचरते म्हणून तिच्या बरोबर प्रशांतलाही हा त्रास काढावा लागतो. जयाला थोडं चाललं तरी दम लागायला लागतो, हात पाय दुखायला लागतात, वजन वाढल्याने जया बोजड दिसायला लागलेली असते. मला हे जमनार नाही असे ती प्रशांतला सांगते पण कबीर नाराज व्हायला नको म्हणून आपण थोडे दिवस हे चालू ठेवू तो विसरला की बंद करू असे प्रशांत तिला सांगतो. सोबतच जयाच्या होणाऱ्या दुरावस्थेवर त्याला हसूही यायला लागते. "तुझ्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की कधी काळी तू कबड्डी ची आंतरराष्ट्रीय खेळाडू होतीस",  हे प्रशांतने चेष्टेने बोललेले वाक्य तिच्या जिव्हारी लागते आणि होणारा सगळा त्रास सहन करून पुन्हा खेळाडू म्हणून पुनरागमन करायचा ती ठाम निश्चय करते. त्यासाठी ती आपली एकेकाळची सहकारी आणि आत्ताची यशस्वी कब्बडी प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या आपल्या मैत्रिणीला बोलावून घेते. आता हिला काहीच जमणार नाही म्हणून जया म्हणेन त्याला होकार देणारा प्रशांत तिच्या सारावातून होणाऱ्या प्रगतीने मनातून हबकून जातो. एकदिवस धाडस करून तो तिला 'आता कबीर हे विसरला असेल तेव्हा आपण हे थांबवू या का?' असे विचारतो तेव्हा जया खंबीरपणे नाही म्हणते आणि आता तू कबिरला सांभाळायचे मी पुन्हा पुनरागमन करू शकते असा मला आत्मविश्वास आणि खात्री आहे असे ती सांगते. मुलाचे आपल्याला जमणार नाही शिवाय खायला चोखंदळ असलेल्या आणि सतत आजारी असलेल्या मुलाचे आपल्याला काहीच जमणार नाही या विचाराने तो आतुन हदरतो पण कबीर आईने पुनरागमन करावे म्हणून ठाम राहतो तेव्हा प्रशांतही तिच्या मागे ठामपणे उभा राहतो.
             

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...