प्रोफेसर वॉल्टर आणि मार्श मेलो सिद्धांत
प्रा. मायकल वॉल्टर स्टॅनफर्ड विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी, "संयम आणि उशीराचं समाधान", या विषयावर विस्तृत संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर एक अभिनव प्रयोग केला त्यांनी आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला मार्श मेलो नावाचे अत्यंत चविष्ट आणि आवडते चाँकलेट दिले. ते खाण्याचे स्वातंत्र्यही दिले पण त्यासाठी एक अट घातली. चॉकलेट वाटून झाल्यावर ते मुलांना म्हणाले, "मुलानो! मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत तुम्ही तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत". त्यानंतर ते वर्गातून बाहेर पडले. आणि मुलाच्या नकळत त्यांचे निरीक्षण करत राहिले.
वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मुल त्यांच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. दहा मिनिटे संपली तरी वॉल्टर सर वर्गात येत नाहीत हे बघून अनेकांचा संयम सुटला. आणि त्यांनी आपली चॉकलेट खायला सुरुवात केली. पण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती. सरांनी या सात मुलांच्या नकळत त्यांची नावे आणि पत्ते आपल्या डायरीत नोंदविली.
साधारणपणे १२ ते १५ वर्षांनी या मुलाचे शैक्षणिक आयुष्य संपल्यानंतर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली. या मुलांची माहिती घेत असताना त्यांच्या नकळत घेतलेल्या माहितीत या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत.
मग वाल्टर यांनी लगेच चॉकलेट खाणाऱ्या आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात ज्यांनी १० मिनिटेही संयम पाळला नाही असे काही लोक होते ज्यांना अत्यंत कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते. त्यावरून प्रा. वॉल्टर यांनी " संयम सिद्धांत विकसित केला आणि त्यानुसार १० मिनीटेही संयम नसलेले लोक संपूर्ण आयुष्यात अपयशी ठरतात असा सिद्धांत मांडला आणि तो जगमान्यही झाला. ज्या चॉकलेटसचा यासाठी वापर केला होता त्यावरून त्यांनी या सिद्धांताला "मार्श मेलो थिअरी ऑफ पेशन्स" असे नाव दिले.
अनुवाद: ©के.राहुल

Comments
Post a Comment