वॉशिंग्टन पोस्ट हे अमेरिकेतील अत्यंत धडाडीचे आणि निर्भीड दैनिक आहे. सत्तेवर कोण आहे आणि त्याचा आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होईल याची कोणतीही तमा न बाळगता पुरावांच्या आधारे सत्य मांडण्यात अग्रणी असलेल्या या वृत्तरपत्राचे भारतात ही काही निवडक शहरात वार्ताहर आहेत आणि तेही अत्यंत निर्भीडपणे भारतातील लोकशाहीची बूज राखणाऱ्या विषयांचे संतुलित आणि निडरपणे वार्तांकन करतात. त्यामध्ये दिल्लीस्थित वॉशिंग्टन पोस्टच्या वार्ताहर निहा मसीह यांचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्यांनी भारतातील विविध राज्यात फिरून भारतातील बेरोजगारीचे दृश्य आणि सदृश्य स्वरूप आणि परिणाम याचा सखोल अभ्यास करून त्याची शास्त्रीय साधनांच्या साह्याने मांडणी करून एक संशोधनपर लेख लिहिला हा लेख २४ सप्टेंबर २०२० च्या वॉशिंग्टन पोस्टने जसाच्या तसा प्रसिद्ध केला. या लेखाचा हा अनुवाद:
२७ वर्षाचा इराप्पा बावगे रोजगार हमीच्या कामावर काम करत होता. त्याच्याकडून माहिती घेत असताना त्याने इंजिनिअरिंग केल्याचे समजले. सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने त्याला शिक्षण देण्यासाठी संपूर्ण कुटूंबाने जीवाचे रान केले होते. पोटाला चिमटा घेऊन मिळालेल्या पैशातून बचत केली होती. इराप्पा अभियंता झाल्यावर सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असे त्यांना वाटत होते आणि झालेही तसेच! इरप्पाला नोकरीही लागली. पण लॉक डाउन जाहीर झाले आणि अपेक्षेपेक्षा वाढल्याने इराप्पाला आपली नोकरी गमवावी लागला. असल्या धकाधकीच्या काळात आता नोकरी लागणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर इरप्पाकडे परतला. कुटूंब चालवायचे असेल तर काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने इराप्पा खांदणी-बांधणी च्या कामावर मोलमजुरीला जातो. त्याला दिवसाला ३.७६ डॉलर म्हणजेच साधारण रु.३००/- इतकी हजरी मिळते आणि असल्या परिस्थितीत ती जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे इराप्पा म्हणतो. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच सुशिक्षित, इंजिनिअरिंग आणि एमबीए पदवीप्राप्त अनेकजण रोजंदारीवर काम करत आहेत आणि त्यांचीही अवस्था इराप्पासारखीच आहे. दक्षिण भारतात लॉकडाउन अत्यंत कडक होते त्यामध्ये साधारण एक कोटी लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे विशेष कौशल्य असलेल्या या वर्गाला रोजगार हमी सारख्या अकुशल कामगारांना काम देणाऱ्या कामावर जावे लागत आणि त्यातही ही योजना फक्त १०० दिवसांसाठी आहे.
Comments
Post a Comment