Skip to main content

द फक इट लिस्ट..........

 द फक इट लिस्ट............

आई वडील आणि मुले यांच्यातील नाते कसे आहे हे सगळ्यात जास्त चांगले कोणाला माहीत असेल तर ते त्या मुलांना. अर्थात पालकांनाही ते माहीत असते पण त्यात एक पक्षपतीपणा किंवा गैरसमज असतो. जसे की आम्ही आमच्या मुलांसाठी जे काही करतो ते इतर कुठलेच पालक करत नाहीत, आमच्या मुलांना आम्ही कधीही काहीच कमी पडू देत नाही, आमच्या मुलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, आम्हांला जे मिळाले नाही ते आम्ही आमच्या मुलांना द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला, आम्ही आमच्या मुलांना चांगली शिस्त लावली, आम्ही त्यांच्या निर्णयाला विरोध करतो म्हणजे आम्ही त्यांचे शत्रू नाही, मुलांना समज असली तरी अनुभव नसतो त्यामुळे त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरक कळत नाही, मुलांना वाईट सांगत लागू नये म्हणून त्यांना रागावलो किंवा शिक्षा केली तर त्याचा मुलांनी एवढा बाऊ कशाला करायला हवा, अशी आणि यासारखी अनेक मते आणि समज पालकांनी करून घेतलेले असतात. अश्या वेळेस पालक म्हणून याकडे पाहणारे अनेक लोक 'हो हे बरोबरच आहे!' असे म्हणून समर्थनही करताना दिसतात. बऱ्याचवेळा पालक फारच कडक शिस्तीचे आणि दुराग्रही असतील तर 'मुलांना काय अक्कल असते काय?' , 'त्यांना काय कळतंय!' असले गैरसमज बाळगून असतात आणि आपले निर्णय मुलांना आवडतील का? किंवा आपल्या वयाचा आणि पालकत्वाचा मान ठेऊन त्यांनी तो स्वीकारला तरी त्यामुळे ती आनंदी, समाधानी आणि सुखी राहतील का? यांचा विचार पालकांनी केलेला असतो का? तर त्याचे उत्तर एखादा सन्माननीय अपवाद वगळता दुर्दैवाने 'नाही' असेच आहे. 

याउलट मुलांना त्यांच्या पालकांबाबत विचारले तर एखादे बंडखोर किंवा पालकांच्या आणि समाजाच्या लेखी वाया गेलेले मूल सोडले तर बाकीची मुले पालकांबाबत बोलायला तयार नसतात. त्यामागे पालकबाबतचा आदर, त्यांच्या, नातेवाईकांच्या आणि समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याखाली ती दबलेली असतात. त्यामुळे वरवर ती हुशार, होतकरु आणि कर्तृत्ववान वाटत असली तरी ती मनातून आनंदी आणि समाधानी नसतात. दुर्दैवाने भारतीय समाजात समाज आणि पालकांनी होतकरू आणि हुशार ठरविलेली ९९% मुले अशीच असतात. मग रहाता राहिला प्रश्न बंडखोर आणि शिक्षणात 'ढ' गणल्या जाणाऱ्या मुलांचा प्रश्न!  सामाजिकदृष्ट्या या मुलांना ती जगायला लाईक नाहीत, वाया गेलेली आणि बेशिस्त आहेत असेच समजले जाते आणि या अश्या मुलांचे पालक आपली मुले इतर होतकरु मुलांसारखीच असली पाहिजेत असे अपेक्षा करत आपल्या मुलांना दूषणे देणाऱ्या आणि वाया गेलेली आहेत असे म्हणणा-या लोकांच्यात सामील होतात. साहजिकच समाजाने या मुलांबाबत काढलेल्या निष्कर्षाशी सहमती दाखवून ते ही स्वतःचा आणि आपल्या मुलांचा आनंद आणि सुख गमावून बसतात.  भारतीय समाजात सध्या या श्रेणीचे पालक, मुले आणि समाज म्हणून वावरणारे नागरिक अधिक आहेत. ते असे का आहेत? हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न असला तरी हा या लेखाचा विषय नाही. या लेखाचा विषय आहे तो पहिल्या श्रेणीतील मुलगा अचानक दुसऱ्या श्रेणीतल्या मुलांसारखा वागू लागल्यावर काय होते ते! म्हणजे एखादा होतकरु, हुशार आणि सामाजिकदृष्ट्या आदर्श म्हणून ठरविले गेलेले आणि सगळ्या कसोट्यात चपखल बसणारे मूल अचानक सगळे सोडून आपल्या मनासारखे वागू लागते तेव्हा काय होते, हा! अर्थात यावर भाष्य करणारे माध्यम चित्रपट असेल तर आणि तो ही हॉलिवूडचा चित्रपट असेल तर आणखी काही तरी वेगळे आणि आणि भन्नाट असणार यात शंकाच नसते. अश्याच हुशार, होतकरु आणि कर्तृत्ववान मुलाने तोडलेल्या चाकोरीची गोष्ट सांगणारा आणि जगातील सर्व पालक एकजात सारखे असतात यावर प्रकाश टाकणारा चित्रपट म्हणजे 'द फक इट लिस्ट' होय.

ब्रिट हा अमेरिकेतील एका सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातील एकुलता एक मुलगा! जन्मतःच कुशाग्र बुद्धी, हुशारी आणि अतिशय देखणे रूप घेऊन आलेला ब्रिट आईवडील, मित्र, नातेवाईक आणि त्याच्या शाळेतील शिक्षक या सर्वांचाच लाडका आहे. ब्रिट हुशार आहे त्यामुळे तो आपले आणि घराण्याचे नाव मोठे करील अशी पालकांना  जशी खात्री आहे तशीच त्याच्या शाळेला ही आहे. त्याप्रमाणे ब्रिट वागतही असतो. त्याला गिटार वाजवायची इच्छा असते, मैदानात जाऊन फुटबॉल खेळायचा असतो, मित्रमैत्रिणींबरोबर बीचवर जायचे असते, एका समजदार आणि होतकरु मुलींवर (दिसायला ती सूंदर आणि गोरीपान असलीच पाहिजे अशी त्याची ठोकळेबाज भारतीय अपेक्षा तर मुळीच नाही, हे ही तितकेच महत्वाचे) प्रेम करायचे असते, तिला घेऊन त्याला डेटवरही जायचे असते, चांगले सिनेमे पहायचे असतात, अधूनमधून मित्रांबरोबर पार्ट्याही करायचा असतात पण यातले त्याला काहीच करता आलेले नसते. सबब एकच 'शाळेत पहिला नंबर आला पाहिजे आणि पुढील शिक्षणासाठी फक्त आणि फक्त हार्वर्ड बिझनेस स्कुलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे'; तोही पहिल्याच यादीत. नेमके इथेच ब्रिट थोडा कमी पडतो. शालेय परीक्षेत तो संपूर्ण अमेरिकेत पहिला येतो. पात्रता परीक्षेत त्याचे अमेरिकेतील पहिल्या  नामांकित १० विद्यापीठापैकी ९ विद्यापीठाच्या प्रवेश यादीत पहिलेच नाव असते पण हार्वर्डच्या यादीत नेमके त्याचे नाव प्रतीक्षा यादीत असते. साहजिकच  नातेवाईक, पालकांचे मित्रमंडळी, शाळेतील सगळे शिक्षक बिचारा म्हणून त्याच्याकडे पहायला लागतात. पालकांना हा आपला अपमान वाटायला लागतो. त्याला इतर ९ ठिकाणी मिळालेली संधी दुर्लक्षित राहते. यामुळे ब्रिटच्या मनावर प्रचंड ताण यायला लागतो. तो आणि त्याचे आईवडील आपले स्वास्थ हरवून बसतात. आईवडील हार्वर्डमध्ये आपला काही वशिला लागतोय का याची चाचपणी करतात. व्यवस्थापनाला जाऊन भेटतात. तिथल्या प्रमुख अधिष्ठात्याची मनधरणी करतात. व्यवस्थापनातील एका सदस्याला त्याची आई आवडलेली असते. त्याने आपल्या मुलाला प्रवेश दिला तर ती त्याच्याबरोबर डेटवर जायला तयार होते. मुलाच्या भवितव्याचा विचार करून वडीलही आईच्या या निर्णयाला परवानगी देतात. हे सगळे डोळ्यासमोर घडत असल्याने ब्रिट अर्थातच प्रचंड तणावाखाली जातो आणि त्यातुन बाहेर येण्यासाठी आईवडिलांची एक तासाची परवानगी काढून मित्रांबरोबर पार्टीला जातो. ते ही खळखळ करतच परवानगी देतात. त्याबरोबर त्यांच्या त्रासदायक सूचनाही ओघाने येतातच.

ब्रिट असा चमकत असताना त्याचे मित्र मात्र सामान्यच आहेत. कमी गुण असल्यामुळे आपल्याला कुठेच प्रवेश मिळणार नाही याची जाणीव असलेले पण तरीही आहे त्यात आनंद मानणारे. ब्रिटला त्यांचे मोठे कौतुक वाटत असते. आपणही त्यांच्यासारखे दिलखुलास जगावे असे त्याला वाटते आणि त्याच्याच एक भाग म्हणून तो मित्रांबरोबर पार्टीत दारू पितो. त्यानंतर तो आपल्याला काय काय करायचे होते ते दारूच्या अंमलाखाली बोलून टाकतो. मित्रातील कोणीतरी त्याचा व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर प्रसारित करतात आणि बघता बघता तो सगळ्या अमेरिकेत पोहचतो. २४ तासात लाखो लाईक मिळतात आणि त्याचे पाठीराखेही तयार होतात. आईवडील, शाळा, समाज यांना कातावलेली त्याच्या समवयस्क अनेक मुले-मुली आपले मन मोकळे करतात आणि सगळीकडे एकच गोंधळ माजतो. हार्वर्ड सारखे व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांनी कसा शिक्षणाचा कसा बाजार मांडला आणि ते नव्या पिढीच्या सुख आणि आनंदाला कसे धोकादायक आहे  जे अमेरिकेतील विद्यार्थी जाहीर बोलायला लागतात. एक ठिकाणी एकत्र येऊन तणाव वाढविणाऱ्या सगळ्या पुस्तकांची होळी करतात. तेही समाज माध्यमातून थेट प्रसारित केले जाते. साहजिकच शिक्षणाचा धंदा केलेल्या सगळ्या शिक्षण संस्था सावध होतात. नवीन पिढीने शिक्षण सोडले तर आपला नफा, व्यवसाय आणि संस्था बुडतील असे म्हणून इतके दिवस ब्रिटच्या पालकांनी जंग जंग पछाडूनही त्याला प्रवेश द्यायला नकार देणारे हार्वर्ड विद्यापीठ त्याला मोफत शिक्षण द्यायला तर तयार होतेच पण त्याला शिष्यवृत्तीही देऊ करतात. मला आता तुमच्या संस्थेची गरज नाही. पैसे कमवायला पदवी लागतेच असे नाही. नोकरीतुन जितके पैसे मिळणार नाहीत तितके पैसे मला आता समाज माध्यमातून मिळतात असे म्हणून ब्रिट हार्वर्ड विद्यापीठाने दिलेली संधी धुडकावून लावतो. साहजिकच त्याचा हार्वर्डच्या नावलौकिक आणि प्रतिमेवर परिणाम व्हायला लागतो. काहीही करून त्याला थांबवायला हवे म्हणून हार्वर्ड मध्ये खलबते चालू होतात त्यातून त्याला आहे त्यापेक्षा मोठा ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. वयाच्या १७ वर्षीच त्याला हार्वर्ड मध्ये मानद आणि पाहुण्या प्राध्यापकांच्या नोकरीची ऑफर दिली जाते. जेणे करून शिक्षणाला नकार देणारा माणूस आमच्याकडे शिकवायला येतो म्हणजे शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पालकांना आणि मुलांना सांगता येईल असा कयास हार्वर्ड विद्यापीठाचा असतो. अर्थात त्याचे पालक त्याला बळी पडतात आणि त्याने ही संधी सोडू नये, समाज माध्यम सोडून करिअरवर लक्ष द्यावे म्हणून त्याच्यावर दबाब आणतात. त्यासाठी त्याला आम्ही तुझ्यासाठी काय आणि कसा त्याग केला? दुसरे मूलही होऊ दिले नाही? आईने तुझ्यासाठी मोठी नोकरी सोडली? आमचे जमत नसतानाही तुझ्या भल्यासाठी एकत्र राहिलो असे म्हणून त्याला भावनिक करण्याचा प्रयत्न होतो. साहजिकच तो याला राजी होतो. पण त्याअगोदर काही काळ स्वतःसाठी मागून घेतो. हार्वर्ड त्याची विनंती मान्य करते आणि त्याकाळात त्यांनी हार्वर्डच्या कर्तुत्वावर एक निबंध लिहून सादर करावा अशी अट टाकते. तो ती मान्य करतो. 

ब्रिट मिळालेल्या संधीने समाधानी आणि खुष झालेला नसतो. प्रयत्न करूनही त्याला हार्वर्डबद्दल चांगले लिहायची भावना होत नाही. दरम्यानच्या काळात तो मित्र मैत्रिणीबरोबर बीच वर जातो, खेळता येत नसतानाही फुटबॉल खेळतो, कधीही गिटार वाजवले नसताना गिटार वाजवतो त्यामूळे एक माणूस त्यांच्यापुढे पैसेही टाकतो पण त्याला त्याचे काही वाटत नाही. ती भीक तो आनंदाने स्वीकारतो. मैत्रिणीबरोबर फिरायला जातो, आपल्या प्रेमाची कबुलीही देतो. हे सगळे करणे असताना या सगळ्या घडामोडींचे व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित होत राहतात. यातून त्याला प्रचंड पैसे आणि मानसन्मान मिळतो, संपूर्ण अमेरिकेत ब्रिट प्रसिद्ध पावतो. त्यामुळे हे सगळे सोडायचे कसे? आणि हार्वर्डच्या शिक्षणाबाबत आपल्याला कौतुक नसताना किंवा आकर्षण नसताना त्याबाबत चांगले आणि सकारात्मक कसे लिहायचे याबाबत तो कमालीचा अस्वस्थ असतो. नव्या पिढीला मोकळा श्वास घ्यायला शिकवून ते चुकीचे आहे हे कसे सांगायचे असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो.

दोन्हीपैकी काय धरावे? आणि काय सोडावे? या विचाराने तो पुन्हा अस्वस्थ होतो. एकेरात्री ठाम निश्चित करून झोपतो आणि सकाळी उठून त्यातील एकाची निवड तो करतो. ती निवड कोणती असते आणि ती कशी केली जाते हे पहायचे असेल तर एकदा मायकल दुग्गनच्या दिग्दर्शनाने नटलेला आणि एली ब्राउन या नवख्या अभिनेत्याच्या दमदार  अभिनयासाठी "द फक इट लिस्ट" एकदा तरी पाहायलाच हवा!

© के. राहुल, 9096242452


Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...