बुद्धांचे शांतता मूल्य आणि त्यांचा महात्मा गांधींच्या विचारधारेवर आणि जीवनशैलीवर पडलेला प्रभाव!
प्रा. राहुल सदाशिव खरात, मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे.
Email : srass229@gmail.com
---------------------------------------------------------
गोषवारा:
भारताने जगाला काय दिले? असे जर कोणी विचारले तर त्याचे उत्तर 'खूप काही' असेच आहे. कारण या उत्तरात अनेक जीवनमूल्ये सामावलेली आहेत आणि ती भारतातील तीन महान व्यक्तिमत्वांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जोडलेली आहेत. ही तीन व्यक्तिमत्वे म्हणजे गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी. गौतम बुद्धांनी दिलेली जीवनमूल्ये आणि त्यातून देशाला आणि जगाला दिलेला शांततेचा संदेश आणि तत्वज्ञान जगमान्य झाले. बुद्धांचे हे तत्वज्ञान आणि जीवनमूल्ये खऱ्या अर्थाने कोणी अंगिकारली असतील, त्यांचा प्रसार आपल्या कृतीतून कोणी केला असेल तर तो महात्मा गांधींनी. त्यामुळे महात्मा गांधींचे जीवन तर समृद्ध केलेच पण सामान्य राहूनही असामान्य होता येते; शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेही राजकीय आणि सामाजिक उद्दीष्टये साध्य करता येतात हे गांधीजींनी देशाला आणि जगाला दाखवून दिले. यामागे जे तत्वज्ञान दिसून येते त्यात गौतम बुद्धांनी जगाला दिलेले आणि मान्यता पावलेले शांतता मूल्य आहे.
म्हणून संशोधकाने या शोधनिबंधात गौतम बुद्धांच्या शांतता मूल्यांचा महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर आणि जीवनशैलीवर पडलेला प्रभाव यांचा अभ्यास केला आहे.
सूचक शब्द - शांतता मूल्य, गौतम बुद्ध, महात्मा गांधी, विचारधारा.
Comments
Post a Comment