कविता - चमचे
चमचे आले, चमचे!
काही तुमचे आले, काही आमचे आले.
काही घरचे आले, काही दारचे आले,
काही आतले आले, काही बाहेरचे आले.
काही खालचे आले, काही वरचे आले.
काही हवेतले आले, काही कवेतले आले.
काही कोल्हे आले, काही कुत्रे आले.
काही लांडगे आले, काही दांडगे आले.
काही लुच्चे आले, काही कच्चे आले.
काही लाळघोटे आले, काही बूटचाटे आले.
काही टुकार आले, काही मोकार आले.
काही शेंबडे आले, काही चोंबडे आले.
काही कवडीचे आले, काही दमडीचे आले.
काही हुजरे आले, काही गजरे आले,
काही माजलेले आले, काही गाजलेले आले.
चमचे आले, चमचे!
© के.राहुल, ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment