सुर्य गेला मावळतीला......
सुर्य गेला मावळतीला,
अन् सावल्या लांब लांब पडल्या.
तू मोठा की मी मोठा,
सुमारांच्या आपापसात चर्चा कित्येक झडल्या.
सुर्य गेला मावळतीला......
कुणी म्हणाले,
मीच खरा जातवान,
म्हणून मीच सत्ता राखणार,
महान होण्यासाठी मी कितीही थापा ठोकणार.
सुर्य गेला मावळतीला......
कुणी म्हणाले,
मीच आता नवा इतिहास इथे रचणार,
कर्तृत्वाचा वारसा फुका सगळ्यांना सांगत बसणार.
मीच माझी बखर पुन्हा पुन्हा वाचणार,
प्रत्येकाच्या वरातीत फक्त आता मीच एकटा नाचणार.
सुर्य गेला मावळतीला......
कुणी म्हणाले,
मी म्हणेन तीच आता पूर्व दिशा असणार,
माझ्या विरोधात जाणारांचे दूध आता नासणार.
सुर्य गेला मावळतीला......
Comments
Post a Comment