सरहद्द गांधी : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान
भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अहिंसात्मक लढ्याला अनन्यसाारण महत्व आहे. शस्त्राचा आणि बाळाचा वापर करून ज्या गोष्टी साध्य झाल्या नाहीत त्या भारतातील अहिंसात्मक लढ्याने जगाला साध्य करून दाखविल्या आणि गेल्या ७५ वर्षात अहिंसा हा एक विचार, तत्व आणि जीवनपद्धती बनून गेली. यथावकाश जगानेही अहिंसेचे हे तत्त्व आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. या अहिंसक लढ्याचे श्रेय ज्या महान व्यक्तीला जाते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांना! त्यांच्यासारखा अहिंसावादी जगाने पाहिला नाही असे अनेक विचारवंतांचे मत असले तरी महात्मा गांधीचे हे मोठेपण आबाधित ठेऊन अहिंसेच्या लढ्यातील आणखी एका महामानवाचे आपल्याला विस्मरण झाले आहे असे खेदाने म्हणावे लागेल. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढ्याला पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये ' सरहद्द गांधी ' म्हणजेच ' अब्दुल गफार खान ' यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे आपल्याला फार काही माहीत नसताना एखाद्याचे महत्व नाकरण्यापेक्षा त्यामाणसाचे मोठेपण समजून घेण्यातच आपलेपण मोठेपण असते.
सरहद्द गांधी यांचा जन्म ब्रिटिशांच्या अंमलाखालील वायव्य सरहद्द प्रांतातील ' उत्मनझाई ' झाला. आता हे गाव सद्या पाकिस्तानातील पेशावर जिल्ह्यात येते. ब्रिटिशांच्या ताब्यात असूनही दुर्लक्षित असल्याने हा प्रदेश त्याकाळी अत्यंत मागास होता आणि बहुसंख्य लोक मुस्लिम त्यातही ' पश्तूनी ' जमातीचे होते. या जमामातीत असलेल्या रूढी आणि परंपरा मुळे शिक्षणाचा प्रचार - प्रसारही झाला नव्हता. साहजिकच धार्मिक शिक्षण हाच एक पर्याय त्या काळात उपलब्ध होता.
Comments
Post a Comment