भंगलेल्या स्वप्नांचे दुवे सांधणारी कथा - दो पैसे की धूप, चार आने की बारिश......! सुख आणि दुःख या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या घटना असतात. आयुष्यात दीर्घकाळ फक्त सुखच भोगले आहे किंवा फक्त दुःखच भोगले आहे असा माणूस सापडणे ही फारच दुर्मिळ घटना आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात हे चढउतार सतत येत असतात. सुख आणि दुःख यांच्या कसोट्यावर याचे मोजमाप करायचे झाल्यास काहींच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुखाचे क्षण जरा जास्त असतात तर काहींच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखाचे क्षण जरा जास्त असतात. साहजिकच ज्याच्या आयुष्यात दुःखाचे क्षण जास्त असतात त्या माणसाला इतरांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण पाहून फक्त आपल्याच आयुष्यात दुःख आहे असे वाटत राहते परंतु त्या माणसाच्या जवळ जाऊन हे जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्या माणसाच्या आयुष्यातही दुःख असल्याचे आणि फक्त त्याचे स्वरूप वेगळे असल्याचे लक्षात येते. अशाच सुखदुःखाचे क्षण भोगणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्याचे चित्रण आपल्याला "दो पैसे की धूप, चार आने की बारिश" या दीप्ती नवल लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटातून पहायला मिळते. आपल्या ...