साखळी हत्याकांडा (सिरीयल किलींग) मागील मानसिकतेचे प्रभावी चित्रण: रॉबर्ट रेसलर हे अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन अर्थात एफबीआयचे एक सन्माननीय आणि तज्ञ सदस्य. 1982 साली त्यांनी साखळी हत्याकांडातील गुन्हेगारांच्या मानसिकतेवर सखोल संशोधन करून त्याआधारित गुन्हेगारांची मानसिकता हा सिद्धांत मांडला. त्यानुसार सिरीयल किलरच्या मानसिकतांचा अभ्यास करताना जे वेगवेगळे सिद्धांत त्यांनी मांडले त्यामध्ये अमेरिकेत आणि इतरत्र झालेल्या साखळी हत्याकांडांमध्ये विविध गुन्ह्यांचे स्वरूप आणि गुन्हेगारांची मानसिकता त्यांनी अभ्यासली आणि त्यानुसार गुन्हेगारांच्या वर्तणुकीचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. त्यामध्ये बहुतांश गुन्हेगार साखळी हत्याकांड घडवून आणत असताना अत्यंत थंड डोक्याने हे काम करत असतात असे त्यांना आढळून आले. यातील बहुतांश गुन्हेगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उच्च असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ज्या कुटुंबांमध्ये आर्थिक सुस्थिती बरोबरच कौटुंबिक दुभंग जास्त आहे अशा कुटुंबातील मुले साखळी हत्याकांडातील गुन्हेगार असल्याचे त्यांच्या निदर्शना...