Skip to main content

बिफोर द रेन : एक शोकांतिका

बिफोर द रेन : एक शोकांतिका

गल्लाभरू आणि तद्दन मसाला असलेल्या बाजारू चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक चांगल्या कलाकृती उच्चनिर्मिती मूल्य आणि कलाकारांचा कसदार अभिनय असतानाही प्रेक्षकांच्या उदासीनतेमुळे आणि बौद्धिक क्षमतेमुळे दुर्लक्षित राहतात. अश्या अनेक कलाकृती हिंदीसह अनेक भाषेत तयार होतात. असाच एक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारांच्या  अभिनयाने नटलेला आणि बहुसंख्य रद्दड प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलेला चित्रपट म्हणजे "बिफोर द रेन".

चित्रपटाचा काळ साधारणत: जग दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतानाचा आहे. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळणार नाही असे म्हटले जात होते त्या ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्याला धक्के बसू लागले होते. हिटलर आणि मुसोलिनी या धर्मवेड्या आणि वंशवाद जोपासणाऱ्या प्रवृत्तीने साम्राज्यवादी धोरण अंगीकारले होते. अश्या काळात ब्रिटिशांची सर्वात मोठी वसाहत असलेल्या भारतात संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न भारतीयांना शांतपणे झोपून देत नव्हते.

देश म्हणून भारत अखंड असला तरी भारतीय अस्मिता जागवणारा असा  कोणताही खास मुद्दा नजरेसमोर नसतानाच नेताजीने जपानच्या मदतीने ब्रिटिशांच्या भारतातील सत्तेला आव्हान द्यायला सुरुवात केली होती. त्याचवेळी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यता चळवळ जोर पकडत होती. आपल्या सत्तेला बसणारे हादरे सौम्य व्हावेत म्हणून ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे प्रातोप्रांतीचे धर्ममार्तंड आणि सवर्ण सरकारवर चिडून होते. त्यांनीही या आंदोलनाला हातभार लावला होता. सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याने स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला होता.  ही अशी स्फोटक स्थिती असलेल्या   काळातील एका ब्रिटिश अधिकाऱ्याची आणि एका सामान्य भारतीय स्त्रीच्या प्रेमाची कहाणी "बिफोर द रेन" अतिशय सशक्तपणे मांडतो.

"बिफोर द रेन" ही प्रेम कहाणी नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या केरळमध्ये घडते. प्रेमकहाणीचा काळ साधारणतः १९३७ सालचा आहे. ब्रिटिश सरकारचा एक अधिकारी हेन्री मूर केरळमध्ये एका आदिवासी क्षेत्रात राहतो आहे. त्याला त्यांच्याबद्दल कणव आहे. त्याला जंगलातली आदिवासी वस्ती मूळ गावाला जोडण्यासाठी जंगलातील विषमतेवर मात करून  रस्ता बांधायचा आहे. त्यासाठी सरकारचे अर्थसहाय्य आणि स्थानिक आदिवासी लोकांची मदत त्याला आहेच.  त्याचे इथल्या लोकांशी ऋणानुबंध जोडले आहेत. त्यातीलच एक न नावाचा आदिवासी तरुण त्याचा नोकर आहे. तो शाळा शिकलेला आहे. त्याला इंग्रजी येते. नलिनला या शिक्षण आणि सहवासातून आलेल्या सुशिक्षितपणाचे आणि  राहणीमानाचे विशेष आकर्षण आहे. इंग्रज भारतात आल्यामुळेच विकासाला चालना मिळाली या  वास्तवदर्शी विचारांचा तो आहे. त्यामुळे त्याला त्याच्या समाजातील लोकांनी स्वातंत्र्य आंदोलनात घेतलेला सहभाग अनाठायी वाटतो. आपले शेजारी, मित्र, नातेवाईक आणि त्याचे गुरु ज्यांनी त्याला शिकविले ते या आंदोलनात अग्रभागी असल्याने त्याला त्यांच्याकडे पाहून अपमानित झाल्यासारखे वाटते पण त्याचबरोबर हेन्रीबरोबर त्याची चांगली मैत्री झाली असल्याने त्याला त्याची साथ सोडवत नाही.  हेन्रीबरोबर असलेल्या इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांना या चळवळीची धास्ती आहे कारण केरळमधील आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असले तरी इतर प्रांतातील आंदोलने हिंसक झाली असून त्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पण केरळमधील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला असल्याने इथे अशी परिस्थिती ओढवणार नाही अशी आशा त्याला वाटते. म्हणूनच तोही निश्चिंत आहे.

हेन्री हा एक उमदा आणि समजूतदार अधिकारी आहे. तो कुटुंबवत्सल आहे. त्याची एक सुंदर पत्नी आणि एकुलता एक मुलगा आहे. तिचे नाव लॉरा आहे. लॉरा  आणि त्याचा छोटा मुलगा काही दिवसासाठी सुट्टीवर इंग्लंडला गेलेले आहेत. अश्या वेळेस घरकाम करण्यासाठी म्हणून त्याच्याकडे आदिवासी पाड्यातील एक स्त्री येते तिचे नाव आहे साजनी. साजनी आदिवासी आहे शिवाय अडाणी आहे, पण तिला ऐकून ऐकून इंग्रजी समजते आणि बोलताही येते. शिवाय तिला पाश्चिमात्य संगीतही आवडते. अधूनमधून ती ही गाणी गुणगुणत असते. त्यामुळे हेन्रीला ती आवडत असते. साजणी घरकामात जशी हुशार आहे तशीच इतर बाबतीतही. पण तिला स्त्री असल्याने हे गुण दाखवायला उंब्र्याच्या बाहेर  संधी नाही. कारण ती विवाहित आहे आणि तिचा नवरा अत्यंत कर्मठ आणि संशयी आहे. नवऱ्याच्या प्रती सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडूनही त्याला तिच्याबद्दल अजिबात प्रेम किंवा आदर नाही. उलट वारंवार तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करणारा आहे. त्यातच तिला अपत्य नाही, त्यामुळे घरात मन रमावे असे काहीही तिच्या आयुष्यात नाही. उलट हेन्री तिला समजून घेणारा आहे. त्यामुळे त्याचे सुर जुळतात आणि हेन्री आणि ती दोघे समजून उमजून एकमेकांच्या प्रेमात पडतात. वेळ मिळाला की ते मनसोक्त गप्पा मारतात. फिरायला जातात. पाश्चिमात्य संगीत आणि गाणी म्हणतात. हे सगळे कमी की काय म्हणून सजनिकडे मध काढण्याचे कौशल्य आहे. एकेदिवशी ती हेन्री बरोबर मध काढायला जंगलात जाते आणि तिथेच ते नदीच्या काठी एकरूप होतात. हा सगळा प्रसंग जंगलात मध गोळा करायला आलेली दोन मुले पाहतात. आपल्या असे कोणीतरी पाहिल्याचे तिच्याही लक्षात येते. जंगलात गेल्यामुळे घरी जायला उशीर होतो. हेन्री नलीनला तिला घरी सोडायला सांगतो. तिचा नवरा अगोदरच घरी पोहचलेला असतो. तिला यायला उशीर झाला म्हणून तो नलींनसमोरच  तिला मारहाण करतो. शिवाय नलीनला तो इंग्रजांचा गुलाम म्हणून हिणवत असतो. त्यामुळे साजनिबद्दल मनाच्या कोपऱ्यात हळवेपणा आणि प्रेमभाव असतानाही तो तिला याबाबत काही बोलू शकत नाही. शिवाय त्याला हेन्री आणि सजनीच्या संबंधाची कुणकुण लागली आहे.  तो सजनिला याबाबत समजवायचा प्रयत्न करतो. पण साजणी आपल्या संबंधाचे खुलेपणाने समर्थन करते. हे सगळे प्रसंग प्रेषक म्हणून अंगावर येतात पण साजणी चुकीची आहे असे कुठे वाटत नाही.

या सगळ्याला आणखी एक बाजू आहे. ती म्हणजे मानस. मानस साजनीचा सख्खा भाऊ आणि नलिनचा जिवलाग मित्र आहे. एके दिवशी दोघे मस्ती करत असताना झटापटीत मानसला नलीनकडे पिस्तुल असल्याचे आणि ते हेन्रीने त्याला गिफ्ट दिल्याचे समजते.  सर्व काही ठीक चालू असताना लॉरा आपल्या मुलाला घेऊन परत येते आणि इकडे बघता बघता सजनिने जंगलात कोणाबरोबर तरी तोंड काळे केल्याची अफवा बघता बघता गावात आणि तिच्या नवऱ्याच्या कानी जाते. लॉरा, त्यांचा मुलगा आणि साजणी याच्यात ही एक वेगळे ऋणानुबंध असल्याचे लक्षात येते. त्यांच्या मुलाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर साजणीकडे आहे त्यामुळे तिने कायम आपल्याबरोबर रहावे असे त्याला वाटते आणि लॉराला यासाठी सजनीचा दुस्वास न वाटता कौतुकच वाटते. ही पण या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

साजणी त्या रात्री उशिरा घरी जाते आणि नवरा तिला घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यादिवशी तू कोणाबरोबर जंगलात गेली होती? असा थेट प्रश्न विचारतो. साजणी घाबरत घाबरत खोटे बोलते आणि पकडली जाते. तिचा नवरा तिला रक्त बांबळ होईपर्यत मारतो. त्याच्या तावडीतून आपला जीव वाचवून ती कशीबशी सुटून धावत धावत हेन्रीच्या गेस्ट हाऊस पाशी येते आणि कोसळते. हेन्री धावत येते कोण आहे ते पाहण्यासाठी. साजनीला जखमी अवस्थेत पाहून तो खूप हळहळतो पण तिला घरात घेऊन जाऊ शकत नाही कारण लॉराला याची कुणकुण लागण्याची शक्यता असते. नलिन हेनरीच्या गेस्ट हाऊसलाच राहत असतो. हेन्री तिला गेस्ट हाऊसला घेऊन जातो. साजणी आपल्या नवऱ्याला सगळे काही समजल्याचे त्यालात्याला . हेन्रीला याचा बोभाटा झाला तर रस्त्याचे कमी थांबेल शिवाय लॉरा आपल्यापासून दूर जाईल आणि त्यापेक्षा साजणी आपल्या जमातीतून बहिष्कृत होईल याची भीती वाटते. तो नलिनला  बाजूला घेऊन तिला दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सोडून यायला सांगतो आणि खिशात असतील  तेवढे पैसे तिच्या हातात देतो. साजनिला हेनरीचे हे वागणे अनपेक्षित वाटते. हेन्री असे म्हणतो आहे हे नलींनचे सांगणे हा तिला नलींनचा काहीतरी वेगळं डाव आहे असे तिला वाटते. त्याचवेळेस तिला ती, नलिन आणि मानस लहानपणी रामायणातील सीता आणि राम आणि लक्ष्मण झालेले असतात. त्या खेळातील आपला राम झालेल्या नलिनचाच हेतू दृष्ट आहे असे वाटते आणि ती थेट हेन्रीला तुझे माझ्यावर प्रेम आहे का नाही? असे विचारते तेव्हा एकीकडे बायको, दुसरीकडे सरकार आणि तिसरीकडे रस्ता बांधण्याचा ड्रीम प्रोजेक्ट यांच्या कात्रीत अडकलेल्या हेन्रीने सगळे बळ एकवटून नाही म्हणणेम्हण सजणीचे आतून उध्वस्त होणे मन अस्वस्थ करते. त्यातूनच साजणी नलीनची पिस्तुल उचलते. आता ती हेन्रीला मारेल की काय? असे वाटत असतानाच ती स्वतः वर गोळी झाडून घेते. तिच्या या अनपेक्षित वागण्याने हेन्री मनातून तुटतो. पण ही बाब समोर आली तर सरकार समोरील अडचणी वाढतील आणि आपल्या जिवाला धोका निर्माण होईल ही बाब लक्षात घेऊन ते दोघे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावतात.

नलीन सुशिक्षित असला तरी तो रुढीबाज आहे. साजणी चा  मृतदेहाचे दफन केले नाही तर तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असे म्हणून आपल्यावर त्यामुळे गहिरे संकट येईल असेही सांगतो पण हेन्री तिचा मृतदेह दगड बांधून पाण्यात फेकून देतो. इकडे सजनीने तोंड काळे केले म्हणून  तिला वाळीत टाकून मोकळा झालेला सगळा गाव ती दोन दिवस झाले गायब आहे असे समजताच तिचा पुळका येऊन तिला शोधायला निघतो. तिचा भाऊ मानस हेन्रीकडे साजणी गायब असल्याची खबर द्यायला जातो आणि लॉरा आणि मुलाला ही बातमी समजते. लॉरा हळहळते. हेन्रीला तिचा शोध घ्यायला सांगते. पण ही आपल्याशी संबधित बाब नाही. आपण यात लक्ष घालायला नको हे जड अंत:कारणाने सांगताना हेन्रीचा अभिनय पाहण्यासारखा आहे. पण लॉरा हेन्रीला न सांगता या प्रकरणाची पोलिसात तक्रार करते आणि हेन्रीच्या अडचणी वाढत जातात.

ज्या दोन उचापती मुलांनी तिच्या प्रेमसंबंधाची बातमी गावभर पसरवलेली असते, त्याच दोन मुलांना तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसतो आणि पोलिस तिला कोणीतरी गोळी मारल्याची शक्यता गृहीत धरतात. त्यामुळे मानसचा नलीन वर तर लॉराचा हेन्रीवरचा संशय वाढत जातो. मित्रांमध्ये वितुष्ट वाढत जाते. पोलिसांना नलीनकडे पिस्तुल असल्याचे कळते. हेन्री आपल्या पदाचा वापर करून नलिन ला  यात गुंतवून मोकळा होतो. रामायणात लक्ष्मणची भूमिका करणाऱ्या मानसचा रामावरचा संशय वाढत जातो. प्रकरण आदिवासी जात पंचायतीत जाते. नलिन खून केल्याचे कबुल करत नाही पण हेन्रीचे नावही सांगत नाही. त्याचे खरेपन तपासण्यासाठी त्याला विस्तवात जीभ घालायची द्यावी लागणारी परीक्षा प्रत्यक्ष पाहण्यासारखी आहे. नलीन ही परीक्षा पास होतो पण त्याला हेन्रीचे नाव घ्यावे लागते.  त्याला जातीतून बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली जाते आणि ती शिक्षा रद्द करण्यासाठी  आणि परत जातीत येण्यासाठी  हेन्रीचा खून करण्याची शिक्षा दिली जाते. जो रस्ता बांधण्यासाठी हेन्री जीवाचे रान करतो. त्याच रस्त्यावर भर पावसात चित्रपटाचा होणारा शेवट पाहण्यासारखा आहे. म्हणूनच आदिवासींचे जीवन, केरळचे सौंदर्य आणि कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी बिफोर द रेन एकदा तरी पाहायलाच हवा.

कलाकारांविषयी थोडेसे:

नंदिता दास सारखी अभिनेत्री चित्रपट सृष्टीला मिळाली हे नशीबच. या अभिनेत्रींच्या तोडीची एकही अभिनेत्री सध्या बॉलिवूड मध्ये नाही हे दुर्दैवच आहे. शबाना आझमी आणि स्मिता पाटील सारख्या मोजक्या पण तगड्या भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीची बरोबरी खचितच सध्याची कोणी अभिनेत्री करू शकेल. त्याही पेक्षा तिची बरोबरी करू शकेल असा एकही अभिनेता बॉलिवूड मध्ये नाही हे त्यापेक्षा जास्त दुर्दैवी आहे. तरीही नंदिता दासची भूमिका जरा छोटी असल्याने गुलाम ते स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्ता अशी बहुआयामी भूमिका साकारणारा राहुल बोस आणि  सजनीचा हळवा प्रियकर साकारणारा लिनस रोंचे कणभर जास्त भाव खावून जातात.  जेनिफरने साकारलेली लॉरा अतिशय जबरदस्त आहे. सजनिचा  खून झाला हे ऐकुन कासावीस झालेली आणि हेन्रीचाच यात हात आहे हे कळल्यावर त्याचे मस्काड फोडणारी लॉरा जेनीफरने मोठ्या ताकदीने साकारली आहे.

©के. राहुल ९०९६२४२४५२.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...