वाळवंटातील झरा:
काही माणसे कोणत्याही क्षेत्रात असली तरी आपल्या कर्तृत्वाने आणि विचारसरणीने आपली दखल घ्यायला भाग पाडतात. त्यांच्या स्वभावाने आणि सर्वसमावेशक भूमिकेने ते आपल्या शत्रूंच्याही कौतुकाला पात्र ठरतात अर्थात अश्या माणसाला शत्रूच नसतात, असतात ते वैचारिक आणि तात्विक विरोधक. अशी माणसे मुळातच दुर्मिळ असतात. ज्यांच्या आजूबाजूला ही माणसे असतात आणि ज्यांना त्यांचा सहवास लाभतो त्याचे आयुष्यही संपन्न होते. अशी माणसे जर राजकारणात असतील तर राजकारणाचा स्तर ही उच्च राहतो आणि देशातील लोकशाही अधिक संपन्न होते.
एके काळी भारतातील समाजकारण आणि राजकारण अश्या लोकांनी अत्यंत समृध्द होते. अगदी कालपर्यंत भारतात जे काही चांगले दिसत होते ते अश्या निवडक लोकांमुळे. अश्याच निवडक लोकांमधील शेवटचा तारा म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. आज हा तारा निखळला आहे. आजच्या भाजप कडे पाहिले तर खरच वाजपेयींनी कधी काळी या पक्षाचे नेतृत्व केले होते काय? याची शंका यावी इतपत धर्मांध आणि जात्यांध झालेल्या या पक्षाचे अत्यंत समतल, संयमी आणि देशहित समोर ठेवून त्यांनी केलेले नेतृत्व त्यांच्यातील माणूसपणाची साक्ष देते.
दोन खासदार (स्वतः आणि आडवाणी) ते प्रमुख सत्ताधारी पक्ष ही भाजप(आणीबाणी अगोदर चा जनता पक्ष) ची वाटचाल त्यांनी आपल्या याच संयमी आणि राष्ट्रप्रेमी भूमिकेने साध्य केली. हिंदू असून आणि आडवाणी सारखा धर्मांध सहकारी आणि पाठीराखा असतानाही राष्ट्रहित जपताना त्यांचा संयम कधी ढळला नाही. एकेकाळी कांग्रेस पक्ष राष्ट्रव्यापी आणि बलाढ्य असतानाही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि राष्ट्रहिताच्या भूमिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. "एक दिवस अटलजी नक्कीच पंतप्रधान होतील" हे नेहरूंचे भाकीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खरे करून दाखवले. सत्ताधारी असताना त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. पाहिले सरकार जेव्हा १३ दिवसात कोसळले तेव्हा त्यांनी पुन्हा एखादा आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेवर येऊ हा आशावाद पुढच्या निवडणुकीत खरा करून दाखवला आणि विविध विचाराच्या आणि विविध स्वभावाच्या अनेक प्रादेशिक पक्षाचे आघाडी सरकार त्यांनी यशस्वी चालवून नवा वस्तुपाठ घालून दिला. ममता आणि जयललिता सारख्या टोकाची भूमिका घेणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आणि अहंकार असणारे अनेक नेते त्यांच्या सरकारमध्ये होते पण त्यांनी सर्वांना आपल्या स्वभावाने आपलेसे केले. "आपकी बेटी बहुत सताती है" ही लाडिक तक्रार ममता बॅनर्जी यांच्या आईकडे करताना त्यांनी त्यांच्या आक्रस्ताळी स्वभावाला आपल्या कवी मनाने मुरड घालायला भाग पाडले.
इंदिरा गांधींनी १९७१ ला पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा भारतात आता कोणताही राजकीय पक्ष नाही. आम्ही सगळे भारतीय आहोत आणि इंदिरा गांधींना आमचा पूर्ण पाठिंबाच नव्हे तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत ही घोषणा त्यांनी केली. नरसिंह रावांच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेल्या अनुचाचन्यांचे स्वप्न त्यांनी सत्तेवर येताच प्राधान्याने पूर्ण केले आणि त्याचे वैयक्तिक श्रेय घ्यायचा कधीही प्रयत्न केला नाही की राजकारण केले नाही.
गुजरात दंगलीच्या काळात सध्या सत्तेत असलेले आणि पंतप्रधान पदावर विराजमान असलेले अहंकारी व्यक्तिमत्त्व दंगलीत सहभागी आहे हे सिद्ध झाल्यावर त्यांचा राजीनामा घ्यायला सज्ज झालेल्या वाजपेयींनी आडवाणी आणि समस्त अंध हिंदू भक्तांप्रमाणे गुजरात दंगलीचे कधीही समर्थन केले नाही. राजकारण हा आयुष्याचा भाग असला तरी माणसाच्या माणूसपनावर त्यांचा विश्वास होता आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याला जगण्याचा हक्क आहे या लोकशाही तत्वाशी त्यांची बांधिलकी होती आणि शेवटपर्यंत त्यांनी ती जपलीही.
अश्या या भारतरत्न नेत्याकडून सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधक यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. राजकारण करत असताना त्यांच्याकडून अनेक चुकाही झाल्या किंवा कारण परत्वे आणि राजकारणाचा भाग म्हणून अपरिहार्यतेतून त्यांनी इतरांच्या अक्षम्य चूका पाठीशी ही घातल्या पण म्हणून त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचे मोल बिलकुल कमी होत नाही. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना वयोमानामुळे ते विजनवासात होते. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि विचारांची सध्या देशाला नितांत गरज असताना त्यांचे आपल्यातून जाने दुःखदायक आणि लोकशाहीला मारकच आहे. आज देशातील जनता धर्मांधतेच्या आणि जातीयतेच्या वाळवंटात गुरफटलेली असताना त्यांची लोकशाहीची तहान भागविण्याची क्षमता असणारा हा झरा आज आटला आहे.
त्यांची अशी ही एक्झिट दुःखदायक आहे. त्याचे विचार त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि बळकटी करण्यासाठी प्रेरणा देतील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
©के. राहुल ९०९६२४२४५२

Comments
Post a Comment