उलटे वारे:
वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, नोकरदारांचे, कामगारांचे मोर्चे, आंदोलने आणि उपोषणे सुरू झाले की सरकारचे शेवटचे दिवस चालू झाले असे समजून जायचे असते. चार वर्षांपूर्वी मोदी लाटेत वाहून गेलेले भले भले विरोधक आणि त्याचा आत्मविश्वास अगदी गेल्या महिन्यापर्यंत कायम होता. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५ वर्षाच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकून शिवसेनेलाही धोबीपछाड दिला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण महाराष्ट्रातल्या मतदारांना इतके हुशार मतदार इतर राज्यात सापडणार नाहीत. त्यांनी भाजपच्या हातात सत्तेची सूत्रे देताना भाजपला पूर्ण मोकळीक दिली नाही. अर्थात याला निवडणूक पूर्व युती झाली नाही ही बाब कारणीभूत आहेच. ही युती झाली असती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची उरली सुरली अब्रू पण गेली असती हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.

Comments
Post a Comment