आपलेच दात आणि आपलेच ओठ!
काल अचानक दातांनी जीभ माझी चावली.
ओठांची खालची पातीही मग नकळत दाताखाली घावली.
जाब विचारता दाताला,
म्हणला नकळत सारे घडले.
घडले तर घडू दे,
त्यावाचून का तुझे घोडे कोठे आडले?
मी म्हणालो,
घोडे नसेल अडले तरी कळ मेंदूला अन्
वेदना झाल्या मनाला.
दात म्हणाला,
गुन्हा झाला असे वाटते तर शिक्षा कर मला.
मग मी म्हणालो, गुन्हा जरी गंभीर असला तरी ओठांइतकाच तुही आहेस जवळचा.
शिक्षा केली तुला तर घास चावायचा -हायचा,
पोटदुखी तर वाढेलच पण अब्रूचाही पंचनामा व्हायचा.
दात म्हणाला,
मग विसरून तरी जा सगळं आणि मोकळ्या मनानं माफ कर.
लावून थोडं ग्लिसरिन जखम जरा साफ कर.
मी म्हणालो, ग्लिसरीन लावता ओठाला डोळ्या येते पाणी,
घास फिरतो तोंडात आणि मुकी होते वाणी.
मग दात म्हणाला,
धरावे किंवा मारावे, एक काहीतरी करावे.
घेऊन एकदाचा निर्णय पटकन मोकळं व्हावे.
मी म्हणालो,
निर्णय एवढे सोपे नसतात,
दात आणि ओठ दोन्ही जेव्हा आपले असतात.
©के.राहुल 9096242452

Comments
Post a Comment