Skip to main content

Nelson Mandela,* former President, Republic of South Africa

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर  मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहका-यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली.  काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते. तरीही त्याने पटापट जेवण केले आणि आमचे जेवण संपायच्या आत तो तिथून निघून गेला.
तो गेल्यानंतर माझा सहकारी मला म्हणाला, "तुम्ही पाहिलंत का त्याला? तो बराच आजारी वाटत होता. त्याच्या हातापायात मुळीच त्राण नव्हते. जेवताना त्याचे हात सतत थरथरत होते."
मी म्हणालो, "नाही ते तसे नाही. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा मला ज्या बरकीत ठेवले होते तिथे हा सुरक्षा रक्षक होता. माझा छळ करणे हे त्याच्यासाठी नित्याचीच बाब होती. मी काकुळतीला येऊन जेव्हा पाणी मागायचो तेव्हा हा यायचा आणि छद्मीपणे हसत माझ्या तोंडावर लघवी करून जायचा. आता राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मी ही त्याला बोलावून त्याच्याबरोबर तसाच व्यवहार करतो की काय? या भीतीने तो थरथर कापत होता.
मला संधी होती पण ते माझ्या नैतिकेत बसत नाही.  सूड आणि द्वेषाची भावना राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाते तर सहनशीलता राष्ट्रउभारणीला पोषक ठरते.
                    - नेल्सन मंडेला,अध्यक्ष, दक्षिण आफ्रिका
अनुवाद:- © के. राहुल 9096242452.

After I became President, I one  day took some members of my close protection to stroll with me in the city & have lunch at one of its restaurants. We sat in one of the downtown restaurants and all of us asked for some food.
After a while, the waiter brought us our requests. I noticed that there was someone sitting in front of my table, waiting for food. I told one of the soldiers to ask him to join us with his food. The soldier went and asked the man so. The man brought up his food and sat by my side and began to eat.

His hands were trembling constantly, until everyone had finished their food and the man went.

The soldier said to me: the man was apparently quite sick. His hands trembled as he ate !!

"No, not at all," replied Mandela. "This man was the guard of the prison where I was jailed. Often, after the torture I was subjected to, I used to scream and ask for a little water. This very man used to come every time and urinate on my head instead"...;

So I found him scared, trembling, expecting me to reciprocate now, at least in the same way,  either by torturing him or imprisoning him as I am now the President.

But that is not part of my ethics.

The mentality of *retaliation destroys* states, while that of *tolerance builds* nations.
-Nelson Mandela, President, South Africa.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...