निबंध - माझा दादा
मला एक मोठा भाऊ आहे त्याला मी दादा म्हणते आई त्याला लाडाने बाबू म्हणते तर बाबा त्याला "घाईत झाल्यालं" असे म्हणतात. लाडावरून आठवले आई वैतागली की त्याला "बापाच्या अतीलाडाने बिघडलाय" असे म्हणते. दादा माझाही खूप लाड करतो. कॉलेजवरून येताना रोज माझ्यासाठी चॉकलेट आणतो. चॉकलेटवरून आठवले, एकदा मला दादाच्या कपाटात एक वेगळाच चॉकलेट बॉक्स सापडला. मी त्यातील एक फोडुन बघितले तर त्यात एक "बलून" होता. माझ्या हातात तो बलून बघून दादा खूपच घाबरला. "हा मोठ्या माणसांचा बलून आहे, लहान मुलांनी त्याला हात लावायचा नसतो!" असे म्हणून त्याने तो हिसकावून घेतला. मी बलून बद्दल आई बाबांना सांगू नये म्हणून दादा आता रोज चॉकलेट ऐवजी मला मोठी कॅडबरी आणून देतो. काल रात्री झोपताना तसाच बलून मी बाबांच्या उशीखालीही पहिला. मग मी दादाला म्हणाले, "तुझ्याकडे एवढे बलून आहेत तर बाबांना पण थोडेसे दे ना". तर दादा नुसताच हसला.
हसण्यावरून आठवले, दादा रोज आमच्या शेजारच्या मोहिनीकडून बघून हसत असतो. तीही येता जाता दादाकडे बघून सारखी लाजत असते. दादा रोज तिला नोट्स देत असतो. कोणी बघू नये म्हणून मलाच त्या घेऊन जावे लागते. एकदा मी नोट बुक उघडून बघितली तर त्यात एक चिठ्ठी सापडली. तेव्हा पासून मोहिनीचे दुसरं नाव "माझं पिल्लू" आहे हे मला समजलं. बाबा पण जास्त लाडात आले की कधी कधी आईला 'पिल्लू" म्हणतात. त्यामुळे मला वाटते मोहिनी पण भविष्यात दादाची 'पिल्लू' होणार. दादाची चिठ्ठी बघून मोहिनी अगोदर नाजूक हसते आणि मग लाजते. लाजेवरून आठवले, "मोहिनीने लाज सोडली आहे, माझ्या पोराला भुरळ घातलीय टवळीने!" असे आई बाबांना सारखं म्हणते. पण बाबा काहीच बोलत नाहीत. मग आई म्हणते, "पोरगा बापच्याच वळणावर गेलाय. खाण तशी माती!". दादा मात्र काहीच न बोलता खाली मान घालून गप बसतो. मानेवरुन आठवले. दादाला गल्लीत खूपच मान आहे. कोणाचं काही झालं की दादा लगेच मदतीला जातो. त्यामुळे शेजारच्या काकू अधूनमधून गॅलरीतुन दादाला डोळा मारतात. पण दादा तिकडे लक्ष देत नाही. दादाचे मित्र मोहिनी आली की, 'वहिनी आल्या! वहिनी आल्या! असे जोरात ओरडतात. मग दादा पण थोडासा लाजतो आणि विषय बदला म्हणतो. विषयावरून आठवले, दादाचे दोन विषय पाच वर्षे झाले राहिलेले आहेत. त्यामुळे आजी म्हणते, "अरं मुडद्या! पोरं काढायचं वय झालं तरी अजून तु विषयच काढ!". आजी असं म्हणाली, की दादा तिला, "तू गपय म्हातारे!" असं म्हणून बाहेर निघून जातो. म्हातारी वरून आठवले, बाबा आईला तू म्हातारी झालीस बाबूचं लग्न करून टाकू असं म्हणतात आणि दादा लगेच लाजतो. दादा लाजला की, आई त्याला "बघा लग्न म्हणलं की कश्या उकळ्या फुटतात" असे म्हणते. ते ऐकून दादा लाजत लाजत बाहेर निघून जातो. येताना मात्र मला न चुकता कॅडबरी आणतो. म्हणून मला आमचा दादा खूप आवडतो.
चिंगी ढमाले,
इयत्ता चौथी,
तुकडी फ.

Comments
Post a Comment