गांधी समजून घेताना........
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#1
खुद्द बापूंनी बालपणी अनुभवलेल्या गोष्टींमधूनही त्यांना जगण्याचे धडे मिळाले होते. गांधींनी लहानपणी 'श्रावणबाळ' नाटक पाहिलं होतं आणि त्यांच्या मनात मातृ-पितृसेवाभाव जागृत झाला होता. कदाचित त्याचमुळे आजोबा ओताबाबा व पिताजी कबा आजारी असताना त्यांच्या सेवेसाठी गांधी शाळेतून पळत यायचे. यातूनच गांधींना आजारी माणसाची सेवा करायची सवय जडली. आजार्यांची सेवा करता करता ते रुग्णांचे वैद्य बनले. कबा गांधींकडे अनेक धर्मपंथांचे साधुसंत यायचे. त्यांची धार्मिक चर्चा गांधींच्या कानावर पडायची. अशा चर्चेतून त्यांनी पैगंबरांची कथा ऐकली. पिताजींचे पाय दाबता दाबता त्यांनी रामायण ऐकलं. जैन परिवारांशीही गांधींचे स्नेहपूर्ण संबंध जडले. गांधींजींची माता पुतळाबाई ही उदार संप्रदायाची होती. या संप्रदायाचे मुख्य गुरू अरबी, पारशीतून लिहायचे. त्यामुळे या भाषांचही परिचय गांधींना झाला. गांधींचा परिवार वैष्णव असला, तरी अनेक धर्मांचा आदर करायचा संस्कार गांधींना घरातल्या अशा वातावरणातून मिळाला.
(श्री. नारायणभाई देसाई यांच्या "अज्ञात गांधी" या पुस्तकातून साभार)
=====================
*फेसबुकवर या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जाऊन like करायला विसरू नका.*
=====================
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#2
गांधींना लहाणपणापासून नाटक पाहण्याचा छंद होता. त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असायच्या. एक म्हणजे तिकिटाचे दोन आणे आणि दुसरी म्हणजे पिताजींची परवानगी. एकदा झालं असं, की 'नाटक पाहायला जाऊ का?' असं गांधींनी पिताजींना विचारलं. इच्छा नसतानाही पिताजी 'जा' म्हणाले. गांधी नाटकाला गेले त्या वेळी पिताजी आजारी होते. वेदनेने ते डोके आपटत असल्याची खबर नाटक पाहण्यात गुंग असलेल्या गांधींना नोकराने सांगितली. तेव्हापासून वडील जिवंत असेपर्यंत बापू कधीच नाटकाला गेले नाहीत. अशाच एका प्रसंगी बापूंनी आंबा खाणं सोडलं. निग्रहाची, संयमाची शिकवण बापूंना अशी मिळाली.

यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.
=====================
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#3
आई पुतळाबाई यांच्याकडूनही गांधींना अनेक संस्कार मिळाले. पुतळाबाई व्रतनिष्ठ होत्या. त्या पौर्णिमेचं व्रत करायच्या. चंद्र दिसल्यावरच उपवास सोडायच्या. अर्थात पावसाळ्यात चंद्रदर्शनात व्यत्यय यायचा. चंद्रदर्शन झाले नाही, तर त्या उपाशीच राहायच्या. त्या आठवणींविषयी गांधी सांगायचे, "आईने उपाशी राहू नये, तिने जेवावं, म्हणून आम्ही घराच्या गच्चीवर चंद्र पाहायला जायचो. रमझानात मुसलमानांना चंद्रदर्शनाची जेवढी उत्सुकता वाटते तेवढी आम्हाला पावसाळ्यात वाटायची. ढग थोडे विरळ झाले आणि चंद्र दिसला की आम्ही आईला ओरडून सांगायचो; पण ती गच्चीवर येईपर्यंत चंद्र पुन्हा काळ्या ढगाआड जाऊन दिसेनासा होई. चंद्रदर्शन न झाल्याने आईला उपाशी राहावं लागणार याचं आम्हांस दु:ख होई. त्यावेळी आई म्हणे, दु:खी होऊ नका. मी उपवास करावा, अशीच भगवंताची इच्छा आहे.' अशी होती माझ्या आईची व्रतनिष्ठा!" अशा या व्रतनिष्ठ आईवर गांधीजींची अपार श्रद्धा होती. अर्थात आईच्या काही गोष्टी मात्र गांधीजींनी कधी मानल्या नाहीत. 'घरात शौचकूप साफ करणार्याला शिवू नको, स्पर्श करू नको', असं पुतळाबाईंनी बापूंना सांगितलं होतं, ते गांधींनी मानलं नाही. आपण घाण करायची आणि ती स्वच्छ करणार्याला अस्पृश्य समजून स्पर्श करायचा नाही, हे त्यांना मान्य नव्हतं. बापू त्याला शिवायचे, त्याला धन्यवाद द्यायचे. त्या वेळी बापू अवघे नऊ वर्षांचे होते.

*यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.*
=====================
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व अस्पृश्यता*
#4
गांधींनी दक्षिण अफ्रिकेतून आल्या आल्या अहमदाबाद येथील कोचरब इथे आश्रम स्थापन केला. त्या आश्रमात एक जोडपं अस्पृश्य जातीच होतं. म्हणून आश्रमातच नव्हे तर त्या संपूर्ण भागात खळबळ माजली. त्या जोडप्याला आश्रमात ठेवू नये, असा दबाव जेवढा आश्रमातून होता तेवढाच तो बाहेरुनही वाढला होता. त्या जोडप्याला आश्रमाबाहेर काढलं नाही, तर आश्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली जाईल, अशी धमकीही आश्रमाला आर्थिक मदत करणाऱ्याने गांधीना दिली होती. त्या आश्रमातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा या मुद्द्यावर आश्रम सोडण्याची तयारी केली होती. एवढेच नाही तर खुद्द कस्तुरबा देखील या दबावाला बळी पडल्या होत्या. त्याही जवळ जवळ आश्रम सोडण्याच्या मानसिकतेमध्ये आल्या होत्या.
गांधी मात्र या प्रखर विरोधानंतरही कोणालाच बधले नाहीत. त्यांनी सर्वांनाच ठणकावून सांगितलं की, *‘ज्यांना आश्रम सोडून जायचं त्यांनी आश्रम सोडून जावं, ज्यांना आश्रमाची आर्थिक नाकेबंदी करायची त्यांनी ती करावी. पण कोणत्याही परिस्थितीत हे अस्पृश्य जोडपं आश्रम सोडून जाणार नाही.’* खरं तर त्या वेळी नुकतेच भारतात आलेले गांधी पुरते स्थिरावलेही नव्हते. आश्रमच बंद झाला असता तर, त्यांची अवस्था बेवारशासारखी झाली असती. तरीही ते एका अस्पृश्य जोडप्यासाठी सर्वस्वपणाला लावायला तयार होतात. _ही त्यांची कृती कोणत्या अर्थाने जातीयवादी ठरु शकते?_

#5
गांधी भारतात येण्याआधीपासून सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य असा टोकाचा वाद सुरु होता. काँग्रेसच्या राजकीय व्यासपीठाला कोणत्याही प्रकारे सामाजिक प्रश्नांचा ‘विटाळ’ नको आणि तसं झाल्यास ते व्यासपीठच पेटवून देवू, इतपत प्रखर आणि तीव्र विरोधी भावना असतानाही गांधी नागपूरच्या १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव स्वत: मांडतात. तो काय गांधी जातीयवादी आहेत म्हणून? हे जर गांधी जातीयवादी आहेत, तर १९१८ मध्ये ते जाहीरपणे म्हणतात, *‘या देशाच्या सर्वोच्चपदी भंग्याची वा चांभाराची मुलगी असणं हे माझं स्वप्न आहे आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे.’* सनातन्यांचा प्रचंड विरोध सहन करीत गांधी यावरुन उठणारं वादळ अंगावर ओढवून घेतात. का? तर गांधी जातीयवादी आहेत म्हणून?

#6
‘अस्पृश्यता ही धर्माने मान्य केलेली बाब नाही, तर ती सैतानाची करामत आहे. सैतानाने नेहमीच धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे’ असं गांधीजी म्हणत. एवढं म्हणूनही वर ते स्वत:ला धार्मिक म्हणवत. यामुळे ते नेहमीच धर्मांधांशी लढत आले.
याबाबत गांधींचं आणखी एक वाक्य देखील आपण लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे, *‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही, आणि जर तसं असेल तर मग असा हिंदू धर्म मला नको. मी हिंदू धर्मावर जीवापेक्षाही अधिक प्रेम करत असल्याने मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होवू लागला आहे.’*

गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गांधीजी व अस्पृश्यता*
#7
येरवडा तुरुंगातुन सुटल्यावर महात्मा गांधींनी प्रदीर्घ अशी साडेबारा मैलाची 'हरिजन यात्रा' काढली. त्यामुळे सवर्ण हिंदुमध्ये प्रचंड स्वस्थता, खळबळ आणि संतापाची भावना होती. त्यांच्या या यात्रेला अनेक अडथळे निर्माण करून रोखण्याचे प्रयत्न झाले. एवढेच नव्हे तर १९३४ मध्येच त्यांच्या पुण्याच्या हरिजन यात्रेच्या दरम्यान त्यांच्यावर बॉम्बहल्ला झाला. सुदैवाने त्यातून ते बचावले.
==================================
=================================+
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व अस्पृश्यता*
#8
बालपणापासूनच गांधीजींच्या मनात अस्पृश्यतेच्या प्रथेबाबत घृणा निर्माण झाली होती, ही गोष्ट त्यांच्या त्यांचे मित्र जॉन पोलॉक यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते. १९३२ च्या ‘पुणे करारा’नंतर गांधीजींना अस्पृश्यतेविरोधात देशव्यापी चळवळ सुरू करायची होती. या काळात वाई येथील प्राज्ञपाठशाळेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व अन्य धर्मपंडितांबरोबर त्यांची आगा खान पॅलेस येथील तुरुंगात हिंदू धर्मातील अस्पृश्यतेबाबत चर्चा झाली. अस्पृश्यता धर्मसंमत नाही, तिला धर्मग्रंथाची मान्यता नाही, हे शास्त्रीबुवांनी दाखवून दिल्यानंतर गांधींनी त्यांना तसे पत्रक काढावयास सांगितले. अस्पृश्यतेला धर्मग्रंथाची मान्यता असती, तरीही गांधीजींनी त्याविरोधात चळवळ केलीच असती. कारण तसे वचनच त्यांनी पुणे करारात दिले होते व सामाजिक न्यायाविरोधातली कुठलीही सामाजिक आणि धार्मिक रूढी-परंपरा त्यांना अमान्य होती.

#9
पुणे तुरुंगात गांधींबरोबर असलेल्या सरदार पटेल यांनी गांधींना स्पष्ट सल्ला दिला होता, परंपरावादी आणि आंबेडकरांचे अनुयायी यांच्यात त्यांनी मधे पडू नये. दोन्ही बाजूला आपसात भांडू देत. पण गांधींनी पटेल यांचा सल्ला नाकारला. ते म्हणाले की, ‘यामुळे लक्षावधी दलितांना असं वाटता कामा नये की, आपण त्यांना वाऱ्यावर सोडलंय.’
परंपरावाद्यांच्या वादळात एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निभाव लागणार नाही हे समजून उमजून गांधींनी हे वादळ स्वत:वर ओढून घेतलं होतं. हे कदाचित खरं असेल की डॉ. बाबासाहेबांनी या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं तसं गांधींनी दिलं नसेल. पण याला कारणंही आहेत. दोघांमध्ये या प्रश्नावरुन मतभेदही आहेत आणि तसे मतभेद असणे स्वाभाविकही आहे.
गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांच्याही संघर्षरेषा भिन्न आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित विरुद्ध सवर्ण ही संघर्ष रेषा आखली असेल तर गांधींची संघर्षरेषा साम्राज्यवादी ब्रिटीश विरुद्ध भारत अशी आहे. त्यामुळे गांधीना या प्रश्नावर आंबेडकरांइतकं आक्रमक होणं शक्य झालं नाही. कारण स्वातंत्र्यलढ्यासाठी सवर्ण आणि दलितांच्या एकीचं बळ त्यांना हवं होतं. स्वातंत्र्यलढ्याला हानी पोचणार नाही याचं भान ठेवण्याचा ताण त्यांच्यावर होताच. दुसऱ्या बाजूला आंबेडकर या ताणातून मुक्त होते. हे सर्व लक्षात न घेता गांधीना जातीयवादी ठरवणं अन्यायकारकच आहे.
एका बाजूला त्यांना परंपरावाद्यांच्या विरोधात लढायचंय. तर दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते ब्रिटीशांच्या विरोधात संघर्ष करत आहेत. तिसऱ्या बाजूला त्यांना हिंदू मुस्लीम ऐक्यासाठीही जीवाचं रान करायचंय. हे सर्व करताना स्वातंत्र्यलढ्याची फळं शेवटच्या माणसांच्या पदरात पडतील का, याचीही चिंता आहे. अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे बघताना याही गोष्टींकडे बघून गांधींच्या भुमिकेचं मुल्यांकन व्हायला हवं.

#10
‘गांधी चातुर्वर्ण्य मानत होते’ हे वाक्य शंभर टक्के खरंय आणि तेवढंच ते खोटंय. आता या वाक्याने अधिकच गोँधळ उडण्याची शक्यता आहे. कारण हे वाक्य त्यांनी वापरलेल्या पूर्ण वाक्यातील अर्धाच भाग आहे. गांधी म्हणाले होते, `मी चातुर्वर्ण्य मानतो. पण असा चातुर्वर्ण्य ज्यात उच्चनीच भेदभाव नसेल.` असा चातुर्वर्ण्य नव्हताच. हे वाक्य ‘आजीबाईंना मिश्या असत्या तर’ अशा धर्तीचं आहे.
उच्चनीच भेदभावाशिवाय चातुर्वर्ण्य नाही. गांधी अस्तित्वात असलेला चातुर्वर्ण्य मानत नाहीत आणि असा चातुर्वर्ण्य मानतात जो मुळी अस्तित्वातच नाही. हा केवळ शाब्दिक कसरतीचा भाग नाही. गांधींनी त्यांच्या आयुष्यात कधी उच्चनीच भेदभाव केलेला दिसत नाही. श्रमालाच प्रतिष्ठा असली पाहिजे. म्हणजे कोणाला प्रतिष्ठा असली पाहिजे? तर चातुवर्ण्याच्या सगळ्यात खालच्या पायरीवर असलेल्या शुद्राला प्रतिष्ठा असली पाहिजे.
चातुर्वर्ण्याच्या कोणत्या तात्विक मांडणीत श्रमाची प्रतिष्ठा आणि पर्यायाने शुद्राला प्रतिष्ठा आहे? श्रम न करताच जो खातो तो चोर आहे. आता हा श्रम न करणारा कोण आहे? तर ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या तोंडातूनच झाला म्हणून तो जन्मत:च श्रेष्ठ आहे. चातुर्वर्ण्याच्या उतरंडीवर जो जन्मत:च शिखरावरच बसलाय म्हणून तो इतर वर्णाच्याही बोकांडी बसलाय. त्याला श्रम करण्याची गरज नाही. कारण अध्ययन करणं हाच त्याचा एकाधिकार आहे. त्या वर्णाला तो श्रम करत नाही म्हणून गांधी त्याला चोर म्हणत असेल तरीही गांधी चातुर्वर्ण्य मानत होते, असं आपण म्हणत असू तर आपण आपलेच ‘चेकअप’ करुन घेणं आवश्यकच नाही तर अत्यावश्यक आहे.

#11
गांधीजी म्हणतात, ‘मी हिंदू धर्मावर जीवापेक्षाही अधिक प्रेम करीत असल्यामुळे...’ म्हणजे माझं हिंदू धर्मावर प्रेम आहे, नुसतंच प्रेम नाही तर ते जीवपलीकडे आहे. असं म्हणत धर्माचा अवकाश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि दुसऱ्या वाक्यात ‘मला या अस्पृश्यतेच्या कलंकाचा भार असह्य होऊ लागलाय` म्हणजे जे अस्पृश्यतेचं समर्थन करत असतील त्यांचं हिंदू धर्मावर अजिबात प्रेम नाही. आणि खरोखरच त्यांच हिंदू धर्मावर प्रेम असतं तर, त्यांनी हा कलंकाचा भार सहन केलाच नसता. मी हे करतो आहे कारण माझं हिंदू धर्मावर जीवापाड प्रेम आहे. तुम्ही ते करत नाही कारण तुमचं कवडीचंही प्रेम हिंदू धर्मावर नाही.
‘माझा हिंदू धर्मावर जीवपल्याड प्रेम आहे.’ हे वाक्यच मुळी धर्माचा अवकाश ताब्यात घेण्यासाठी वापरलंय आणि पर्यायाने अस्पृश्यता पाळणारे जे धर्मावर कब्जा करुन बसलेत त्यांना हुसकावून लावण्यासाठी आहे. हे जरा बारकाईने बघितल्यास लक्षात येईल.
दुसऱ्या एका वाक्यात, ‘अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा भाग नाही,’ असं गांधी म्हणतात. या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की जे अस्पृश्यता पाळतात ते हिंदू धर्मीय असूच शकत नाहीत. परत इथं पहिल्यांदा धर्माचा जो काही अवकाश आहे तो व्यापणं आणि ज्यांनी हा अवकाश व्यापलाय त्यांना तिथून हुसकावणं. मनुवाद्यांनी गांधीना ‘धर्मबुडव्या’ ठरवत त्यांची हत्याच नव्हे तर ‘वध’ करावा. त्यांना ‘राक्षस’ ठरवावं आणि मनुविरोधकांनी त्यांना मनुसमर्थक जातीयवादी चातुर्वर्ण्य मानणारे म्हणत त्यांना दुश्मन ठरवावं याच्या एवढं दुसरं दुर्देव नाही. धर्मांधाच्या नजरेत गांधींचे असंख्य ‘प्रमाद’ आहेत. त्याचाच प्रसाद म्हणून त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
*साभार - चंद्रकांत वानखडे यांनी कोलाज २०१८ दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातून*
(लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. )

#12
एकतर गांधी धर्माचा अवकाश कब्जात घेवून बसले आहेत त्यातही धर्माचा खरा अर्थ ते सांगताहेत. हे खरंतर ‘पाप’ आहे. कारण गांधी ज्या जाती, वर्णाचे आहेत. त्या जाती, वर्णाला धर्माचा अर्थ सांगण्याचा अधिकारच नाही. तसा तो सांगत असेल तर हे महापाप आहे. कारण चातुर्वर्ण्यानुसार हा कर्मसंकर आहे. असा कर्मसंकर करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. संत तुकारामानेही ‘वेदांचा तो अर्थ आम्हासिच ठावा’ असं म्हणत कर्मसंकर केला, म्हणून त्यांची ‘सदेह वैकुंठात’ रवानगी करण्यात आली. गांधी तर आयुष्यभर हा कर्मसंकर घडवून आणत होते. इसकी सजा मिलेगी, भरपूर मिलेगी, म्हणत धर्माच्या गब्बरांनी त्यांना हत्येची शिक्षा दिलीच आहे.
*साभार - चंद्रकांत वानखडे यांनी कोलाज 2018 च्या दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातून*
_(लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)_

#13
भंगीकाम, मेलेल्या ढोरांची कातडी सोलण्याची कामं कोणी करावी तर ती शुद्रांनीच अशी परंपरा होती पण गांधींनी ही कामं सवर्णांनाही करायला लावली. एवढंच नाही तर ही कामं गांधींच्या सांगण्यावरुन ब्राम्हणांनीही केली. अस्पृश्यता निवारण मोहिमेत असो, श्रमाला प्रतिष्ठा देण्याच्या नावाखाली असो, गांधींनी असली ‘हलकी’ कामं, हलक्या जातींनी करावयाची काम वरच्या जातींच्या लोकांना करायला लावली. त्यासाठी त्यांनी अनेक सवर्णांना प्रेरीत केलं आणि समाजात मोठ्या प्रमाणात कर्मसंकर घडवून आणला. गांधी चातुर्वर्ण्य मानत असते तर असा कर्मसंकर गांधींनी घडवून आणला असता?
कोकणातील आप्पासाहेब पटवर्धन शुद्ध चित्तपावन ब्राम्हण. त्यांनी आयुष्यभर गांधींच्या सांगण्यावरुन भंगीकाम आणि चांभारकाम केलं. लोक त्यांची घृणा करत आणि म्हणत, गांधीतर मेलेल्या माणसांनाही जिवंत करतो आणि दोन पायांवर चालायला शिकवतो, असं ऐकलं होतं. पण हा तर दोन पायांवर चालणाऱ्या माणसांनाही डुकरासारखा चार पायांवर चालायला लावतो. डुकराचा विष्ठेचा जो संबंध तोच संबंध आप्पासाहेब पटवर्धनांच्या भंगी कामाशी लोकांनी विशेषत: धर्ममार्तंडांनी जोडला होता.
आप्पासाहेब पटवर्धन हे तर एक उदाहरण झालं. अशी असंख्य उदाहरणं आहेत की गांधींच्या सांगण्यावरुन समाजात कर्मसंकर घडून येत होता. आणि चातुर्वर्ण्यामधे असा कर्मसंकर करणारा आणि घडवून आणणारा केवळ ‘वधा’लाच पात्र आहे. आणि त्यांच्या दृष्टीने गांधी शेवटी वधाला पात्र ठरलेच ना?

आपल्या मित्र मंडळींना या ग्रुप ला जॉईन करण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा आणि व्हाट्सएप ग्रुपच्या लिंक असणारी पोस्ट पहा.
=====================
[14/06, 7:30 am] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व अस्पृश्यता*
#14
चातुर्वर्ण्यामधे जेवढा ‘कर्मसंकर’ निषिद्ध आहे त्याहीपेक्षा निषिद्ध वर्णसंकर आहे. गांधींनी कर्मसंकर तर घडवून आणलाच पण, वर्णसंकरही घडवून आणण्याला उघड प्रोत्साहन दिलं. या वर्णसंकराला तर क्षमाच नाही. आणि तो घडवून आणणाऱ्याला तर नाहीच नाही.
सुरवाती सुरवातीच्या काळात गांधी कोणत्याही लग्नाला जात आणि वधुवरांना आशीर्वाद देत. पण नंतरच्या काळात त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. ते कोणत्याही सजातीय विवाहाला म्हणजे जातीअंतर्गत विवाहाला हजर राहिले नाहीत. पण विवाह एक सवर्ण आणि दलित, त्यांच्या भाषेत हरिजन असा असेल तर अशा लग्नाला ते आवर्जून उपस्थित राहत होते. हे सरळ सरळ चातुर्वर्ण्याविरोधात वर्णसंकर घडवून आणण्याबाबतची गांधींची बंडखोरी होती.
महादेवभाई देसाई आणि महात्मा गांधी यांचे पितापुत्राचे मानलेले नाते होते. महादेवभाई देसाईंना महात्मा गांधी पुत्रवत मानत. त्याच महादेव भाईंच्या मुलाचं लग्न ठरलं. म्हणजे एका अर्थाने गांधींचा नातू, नारायण देसाईंचं लग्न. पण या लग्नाला गांधी गेले नाहीत. कारण ते लग्न सजातीय होत.
महादेवभाई देसाईंनी आपल्या परीनं समजावून बघितलं. त्यांच्या वतीने त्यांनी गांधींचे जवळचे मित्र नरेनभाईंनाही या मोहिमेवर लावलं की त्यांनी या लग्नात हजर रहावं. पण त्याला यश आलं नाही. अखेर गांधी त्यांना म्हणाले, एक वेळ दुसऱ्या कुणाबाबतीत अपवाद होऊ शकतो. पण घरच्या मुलासाठी माझ्या प्रतिज्ञेत कसा अपवाद करू?
कर्मसंकर आणि वर्णसंकर घडवून आणणाऱ्या गांधींना जेवढं त्यांच्या शत्रूंनी ओळखलं होतं, तेवढं त्यांच्या मित्रांना ओळखता आले नाहीत. गांधी जातीयवादी आहेत. गांधी चातुर्वर्ण्य मानतात, असं म्हणत ते जातीयवाद्यांना, मनुवाद्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतच करीत राहिले. आज जातीयवाद्यांच्या, मनुवाद्यांचा, हिंदुत्ववाद्यांचा अश्वमेध चौफेर उधळलेला दिसतो. त्याची बीज महात्मा गांधींना ओळखण्यात पुरोगाम्यांनी, क्रांतिकारकांनी केलेल्या महाभयंकर चुकीत आहेत, असं वाटतं.

[15/06, 7:24 am] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व अस्पृश्यता*
#15
सुरुवातीला सनातन्यांप्रमाणे जातीय व्यवस्थेसंबंधी मते मांडणाऱ्या गांधीजींच्या विचारात पुढे पुढे मोठा बदल झालेला दिसतो.
_“सहभोजन आणि आंतरजातीय विवाह यांची अस्पृश्यता निवारण्यासाठी जरुरी नाही, असे मला वाटते. माझी वर्णाश्रमधर्मावर श्रद्धा आहे; तरी मी भंग्याबरोबर जेवतो ... .... माझ्या योजनेत आंतरजातीय विवाहाला स्थान नाही एवढेच मी सांगतो.” - (यंग इंडिया, २२-१-१९२५)_ असे १९२५ साली आपले मत सांगणारे म. गांधी पुन्हा १९४६ च्या २८ जुलैच्या ‘हरिजन’मध्ये म्हणतात, _“सहभोजन हा अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमाचा आवश्यक असा भाग नाही, असे मी एकेकाळी म्हटले आहे. पण मी स्वत: सहभोजनवादी आहे. हल्ली मी या कार्याला उत्तेजन देतो. वास्तविक आज मी त्याही पुढे जात आहे.” - (‘हरिजन’, २८-७-१९४६)._
*संकलन - हर्षल जाधव, कोल्हापूर*

#16
गांधीजींचे आंतरजातीय विवाहाबद्दलचे बदललेले मत महत्त्वाचे आहे.
गांधीजी म्हणतात, “जर एखाद्या सुशिक्षित हरिजन मुलीने सवर्ण हिंदूबरोबर लग्न केले तर त्या जोडप्याने अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला वाहून घ्यावे... एका हरिजन मुलीने चांगल्या वर्तणुकीच्या शीलवंत सवर्ण हिंदूबरोबर लग्न केल्यास त्यामुळे सर्व हरिजन सवर्ण हिंदूंचे चांगले मित्र होतील आणि हे चांगले उदाहरण होईल. ‘सवर्ण हिंदू मुलीने आपला भावी सहकारी पती म्हणून हरिजनाची निवड करावी हे अधिक योग्य होईल. त्यापुढे जाऊन मी म्हणेन, हे अधिक चांगले होईल.... मी माझ्या मार्गाने जावयाचे ठरविले तर ज्या मुलींवर माझे नैतिक वजन आहे अशा सवर्ण मुलींनी हरिजन पतीची निवड करावी असे मी त्यांना आवाहन करीन.” - (‘हरिजन’, ७-७-१९४६)

#17
*म. महात्मा गांधींमुळे भारताची फाळणी झाली…?*
- फाळणी अपरिहार्य होती. खरं तर भारतात हिंदू-मुस्लिमांचे मतभेद १९०५-०६पासून (बंगालची फाळणी) बाहेर येऊ लागले होते. बंगालच्या फाळणीपासूनच हे गृहीत धरलं जात होतं की, जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा मुस्लिमांसाठी वेगळं राष्ट्र असेल. १९१४-१५ पासून पुढची ३० वर्षं मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवं असा मतप्रवाह भारतात होता. तो सुरुवातीला फारसा प्रबळ नव्हता. कारण ब्रिटिशांना भारतातून घालवणं ही सर्वांची प्राथमिकता होती. त्यामुळे भारतातल्या हिंदूंनी आणि मुस्लिम नेत्यांनीही या मागणीला फारसं पुढे येऊ दिलं नाही. ब्रिटिशांच्या तावडीतून स्वतंत्र व्हायचंय म्हणून ती मागणी सतत मागे मागे ढकलली जात होती. १९३९ला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि आता ब्रिटिश साम्राज्य लयाला जाणार हे स्पष्ट झालं. त्यामुळे महायुद्ध संपायच्या आधीच १९४०-४१ पासून परत पाकिस्तानच्या मागणीनं जोर धरला.
*(- डॉ. कुमार सप्तर्षी दै. प्रहारच्या ‘कोलाज’ रविवार पुरवणीमध्ये २६ सप्टेंबर २०१०)*

#18
*म. गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले वा द्यायला लावले…*
- फाळणीनंतर काही काळ लॉर्ड माउंटबॅटन हेच भारत आणि पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते. या दोन्ही देशांची रिझर्व्ह बँकही एकच होती आणि तिच्याबद्दलचे धोरणात्मक निर्णय लंडनहूनच घेतले जात. त्यामुळे असं ठरलं की, रिझर्व्ह बँकेत ब्रिटिश इंडियाचे जे २२५ कोटी रुपये आहेत, ते लोकसंख्येच्या प्रमाणानुसार दोन्ही देशांना द्यायचे. हा जो करार झाला तो भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय करार. त्यात कुणी अडचण उभी करायचा प्रयत्न केला की, माउंटबॅटन त्यांना समज द्यायचे की, तुम्ही आंतरराष्ट्रीय कराराचा भंग करत आहात. भारताच्या मंत्रिमंडळाचाही हाच निर्णय होता की, पाकला त्यांच्या वाटणीचे पैसे द्यावेत… पण नंतर पाकने काश्मीरवर हल्ला केला. खरं तेव्हा काश्मीर भारतात नव्हतं... ते स्वतंत्र होतं. काश्मीरच्या राजाने स्वतंत्र राहायचं ठरवलं होतं. पण काश्मीरवर पाकने हल्ला केल्यावर काश्मीरच्या राजाने भारताची मदत मागितली आणि भारतात विलिन होण्याची तयारी दाखवली. तोवर पाकला त्यांच्या ७५ कोटींपैकी २० कोटी देऊन झाले होते, आता त्यांच्या वाटणीचे ५५ कोटी रुपये शिल्लक होते. तेव्हा काही लोकांनी हे ५५ कोटी देण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी म. गांधींनी मंत्रिमंडळावर दबाव आणावा अशी मागणी केली, तेव्हा गांधींनी ‘झालेला निर्णयच बरोबर आहे’ असं जाहीरपणे सांगितलं. यात गांधींची भूमिका असलीच तर कुटुंबप्रमुखाची होती. कुठलाही कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातल्या कुणावरच अन्याय होणार नाही हे पाहतो, तेच गांधींनी केलं. दुसरं म्हणजे ५५ कोटींचा प्रश्न आणि गांधींचं उपोषण यांची सांगड घातली जाते, ती बरोबर नाही. त्यासाठी गांधींनी उपोषण केलेलं नव्हतं, हे ‘महात्म्याची अखेर’ या जगन फडणीस यांच्या पुस्तकात विस्तारानं सांगितलेलं आहे.

#19
*म. गांधींनी मुस्लिमांचा फार अनुनय केला. त्यांना नेहमीच झुकतं माप दिलं…?*
- म. गांधी नैतिक प्रेशर वापरत होते. नैतिक प्रेशर हे कधीही हिंदू-मुस्लिम नसतं, ते वैश्विक असतं. गांधींबाबतचा हा गैरसमज खिलाफत चळवळीपासून पसरला आहे. तुर्कस्थानच्या खलिफाला हटवण्यासाठी तिकडे चळवळ चालली होती. भारतातल्या मुस्लिमांचा या खलिफाला पाठिंबा होता. तेव्हा काँग्रेसने वा गांधींनी त्याविरोधात भूमिका घेणं म्हणजे इथल्या मुस्लिमांना दुखावण्यासारखं झालं असतं आणि ते भारताच्या अखंड एकात्मतेच्या दृष्टीनं घातक होतं. भारताच्या दृष्टीनं हिंदू-मुस्लिम ऐक्य आवश्यक होतं, त्यामुळे त्याच्याशी सुसंगत भूमिका गांधींनी घेतली. फाळणीपूर्व भारतातल्या मुस्लिमांची संख्या ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत होती. एवढ्या मोठ्या समूहाला दुखावून चालणार नव्हतं. ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी टिळकांनीही मुस्लिमांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली होती. गांधींनी एका अर्थानं टिळकांचंच राजकारण पुढे चालवलं. कारण तिथं संकुचित भूमिका घेतल्यानं तोटा झाला असता.

#20
*म. गांधींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर अन्याय केला. त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद सोडायला लावलं…*
- म. गांधी आणि सुभाषबाबू यांच्यात वैचारिक पातळीवर मुख्य मतभेद होते. सुभाषबाबूंचा सशस्र लढ्यावर विश्वास होता, तर गांधींचा अहिंसेवर विश्वास होता. अगदी टोकाची श्रद्धा होती. त्यासाठी कितीही किंमत चुकवावी लागली तरी हरकत नाही, पण भारताला अहिंसेच्या मार्गानेच स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असं गाधींचं मत होतं. त्यांना पटलेला तो एकमेव मार्ग होता. सुभाषबाबूंचा मात्र त्यावर अजिबात विश्वास नव्हता. १९३९ मध्ये सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तेव्हा नुकतीच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, ‘ब्रिटन आता अडचणीत आला आहे. त्याचा फायदा घ्यावा. तेव्हा ब्रिटनचा मुख्य शत्रू जर्मनी आणि जपानची मदत घेतली पाहिजे.’ पण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चाणक्यनीती गांधींना मान्य नव्हती आणि सशस्र लढाही मान्य नव्हता. सुभाषबाबू तर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची ही भूमिका कार्यकारिणीपुढे मांडत होते, पण त्यात बहुसंख्य लोक गांधींना मानणारे असल्याने सुभाषबाबूंचा सल्ला मानला जात नसे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सुभाषबाबू दुसऱ्यांदा उभे राहिले, तेव्हा गांधी आणि सुभाषबाबू यांच्यातले मतभेद स्पष्ट झाले होते. त्यामुळे गांधी त्यांना म्हणाले की, ‘माझा तुला पाठिंबा नाही. तू उभा राहू नकोस.’ तरीही सुभाषबाबू उभे राहिले आणि निवडूनही आले. त्या वेळी गांधी म्हणाले होते, ‘सुभाष, दुसऱ्यांदा निवडून आला हा माझा पराभव आहे.’ गांधींच्या विचारांचा तो पराभव होता.

_सुभाषबाबू आणि गांधीजी यांच्यातील संबंधांवर आपण पुढील काळात आणखी सखोल माहिती घेणार आहोत._

#22
*म. गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला. पुणे कराराच्या बाबतीत तर आंबेडकरांना इमोशनल ब्लॅकमेल केलं…?*
- दुसऱ्या गोलमेज परिषदेत ब्रिटिशांनी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती. म्हणजे हिंदू हिंदूंना मतदान करतील, मुस्लिम मुस्लिमांना मतदान करतील आणि दलित दलितांना मतदान करतील. देशाच्या एकात्मेसाठी ही मानसिक फाळणी गांधींना नको होती. त्यांचं म्हणणं होतं की, ‘राखीव मतदारसंघातून दलित उमेदवार उभे करा, पण त्यांना सर्वच जण मतदान करतील.’ त्यामुळे त्यांनी ‘पुणे करारा’द्वारे ७२च्या दुप्पट जागा दलितांना राखीव देण्याची तयारी दाखवली. त्या वेळी आंबेडकरांसाठी दलितांचं हित राखणं हा प्राधान्यक्रम होता, तर गांधींचा देशाची अखंडता राखणं हा प्राधान्यक्रम होता. त्यामुळे आंबेडकरांचा गांधींवरचा राग स्वाभाविक आहे.

#23
*पटेल - नेहरू यांच्यापैकी म. गांधींनी नेहमी नेहरूंना झुकतं माप दिलं. पटेलांना पंतप्रधान होऊ दिलं नाही…*
- पटेल हेही म. गांधींप्रमाणे गुजरातमधलेच. पटेलांचंही नेहरूंप्रमाणे गांधींवर खूप प्रेम होतं. पटेलांची काँग्रेस पक्षावर विलक्षण पकड होती. पण एकूण देश पुढे घेऊन जाण्याची व्हिजन, लोकशाहीवर निष्ठा, सर्वसमावेशक चेहरा या गोष्टी पटेलांपेक्षा नेहरूंकडे होत्या. तर पटेलांकडे पक्ष चालवण्यासाठी, तो एकत्र बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त आणि कठोरपणा जास्त प्रमाणात होता. त्यामुळे गांधींना पटेलांची गुणवत्ता देश चालवण्यासाठी योग्य वाटत होती. नेहरू भारतातल्या सर्वसामान्य जनतेला ‘आपला नेता’ वाटत होते. त्यामुळे गांधींनी नेहरूंना गुणवत्ता आणि समाजमानसातली प्रतिमा यामुळे पंतप्रधान केलं.

#24
*सावरकरांना म. गांधींनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं. ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येणार नाहीत, याची काळजी घेतली...?*
- सशस्र मार्गानेच ब्रिटिशांना या देशातून घालवणं शक्य आहे, असं सावरकरांना वाटत होतं आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले. म. गांधींना हे मुळात मान्य नव्हतं. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. हा सावरकर आणि गांधी यांच्यातला मूलभूत फरक होता. सावरकरांच्या आयुष्याचे एकंदर तीन टप्पे पडतात. पहिला त्यांचं क्रांतिकारी असणं, दुसरा समाजसुधारणा (भाषाशुद्धी, अस्पृश्यता निर्मूलन, विज्ञानवादी दृष्टिकोन इ.) आणि तिसरा हिंदू राष्ट्र घडवणं. यातला पहिला आणि तिसरा टप्पा गांधींना मान्य नव्हता. दुसरा टप्पा त्यांना मान्य होता. _गांधी म्हणत, ‘तरुणांनो सरकारी नोकऱ्या सोडा.’ त्यावर सावरकर म्हणत, ‘तरुणांनो सरकारी नोकऱ्या करा. उद्या हिंदू राष्ट्र झाल्यावर आपल्याला सरकारी नोकर लागणार आहेत.’ गांधी म्हणत, ‘सैन्यातून बाहेर पडा.’ त्यावर सावरकर म्हणत, ‘सैन्यात सामील व्हा.’_ प्रमुख गोष्टींवरून ज्यांच्याशी मतभेद आहेत, त्यांच्याशी गांधींचं कसं काय पटेल?

#25
*म. गांधी हुकूमशहा होते…?*
- असा गैरसमज असणाऱ्यांचा एक छोटासा पण बुद्धिवंतांचा गट आहे. याचं साधं उत्तर असं आहे की, म. गांधींसोबत जितक्या टॉवरिंग व्यक्ती होत्या की, त्याच्या एक शतांशही इतर कुणाही सोबत नव्हत्या. समाजकारण, अर्थकारण या क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती त्यांच्यासोबत होत्या. बरं, हे लोक गांधींसोबत असले तरी काही बाबतीत त्यांचे गांधीजींशी मतभेद होते. ते जाहीरपणे गांधींना ऐकवलेही जात. गांधी हुकूमशहा असते तर या व्यक्ती त्यांच्यासोबत राहिल्या असत्या का? जगातल्या कुठल्या हुकूमशहासोबत एवढे लोक होते? उलट गांधी हे खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी होते. त्यांच्यामुळेच या देशात लोकशाही रुजली.

यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा
*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#26
*गांधीजींबाबत सर्वांत जास्त आक्षेप आहेत देशाच्या फाळणी संदर्भात!*
‘माझ्या देहाची फाळणी आधी होईल, मग देशाची’ असं म्हणणाऱ्या गांधींनी फाळणीला मान्यता कशी दिली, हा प्रश्न गेली पंचावन्न वर्षे विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधाचं असेल, तर त्या काळाचा व परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्यातून दिसणारं चित्र कसं आहे? ब्रिटिश येण्यापूर्वी ‘भारत’ नावाचं ‘सार्वभौम राष्ट्र’ कधीच नव्हतं. सन १९४७मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ६०० संस्थानं होती. जात, धर्म, भाषा, संस्कृती, भूगोल या सर्वच बाबतींत टोकाची भिन्नता होती आणि आर्थिक विषमतेचं तर विचारालाच नको. हिंदू व मुस्लिम धर्मातील दरी कमालीची रुंदावली होती. दोन्ही धर्मांतील मूलतत्त्ववादी संघटना त्यापूर्वी कित्येक वर्षे आधीपासून जनतेच्या मनात ‘द्वेषभावना’ पेरण्याचं काम करीत होत्या. या सर्वांचा परिणाम म्हणून, देशभर हिंसाचार उसळला होता. लुटालूट, जाळपोळ, बलात्कार यांचं थैमान माजलं होतं. मुस्लिम लीगच्या नेत्यांशी चर्चेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. ‘फाळणी अटळ आहे’ या निष्कर्षावर काँग्रेसचे बहुतेक नेते आले होते. जीनांशी चर्चेच सतरा फेऱ्या गांधीजींनी केल्या होत्या, पण तडजोड झाली नव्हती. शेवटी ‘काँग्रेस वर्किंग कमिटी’ने फाळणीला मान्यता दिली. त्या वेळी गांधीजींपुढे दोनच पर्याय होते. फाळणीला मान्यता देणं किंवा मुस्लिम लीग व काँग्रेस या दोन्हींच्या विरोधात उपोषण सुरू करणं. उर्वरित नेत्यांना घेऊन गांधींनी उपोषण केलं असतं तर ‘गांधी विरुद्ध काँग्रेस’ असा नवाच संघर्ष निर्माण झाला असता. देशातील आगडोंब शिगेला पोहोचला असता. सर्वच संस्थानिकांनी बंड पुकारलं असतं, देशात ‘यादवी’ माजली असती. त्याची परिणती देशाचे अनेक तुकडे होण्यात झाली असती. गांधींनी फाळणीविरोधात ‘उपोषणा’चं एकमेव हत्यार का वापरलं नाही, त्याचं कारण हे आहे!
- विनोद शिरसाठ
*( ‘लाटा-लहरी : सहा तरुण मित्रांचे वादसंवाद’ साधना प्रकाशन या पुस्तकातून साभार)*

.*गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#27
*गांधीजींनी लोकसंख्येची अदलाबदल करायला विरोध केला, हा एक मोठाच अपराध त्यांच्या माथी मारला जातो.* अशी अदलाबदल केली असती, तर सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते आणि कायमची डोकेदुखी टळली असती-असं विवेचन अनेक विद्वानांकडून केलं जातं. पण अशी अदलाबदल करणं मानवतेला काळिमा फासणारं कृत्य होतं, हा तात्त्विक मुद्दा बाजूला ठेवला तरी व्यावहारिक दृष्टीने अशी अदलाबदल अशक्य होती. हजारो किलोमीटर लांबीरुंदीचा हा देश. त्यात, विखुरलेले आठ कोटी मुस्लिम. त्यांची पाकिस्तानात रवानगी कशी करायची? नव्यानेच स्वातंत्र्य मिळालेला देश, तुटपुंजी साधनं, आर्थिक दारिद्रय आणि माथी भडकलेली माणसं. फाळणीला मान्यता मिळत नाही म्हणून सुरू झालेला हिंसाचार, फाळणी निश्चित झाल्यावर आणखी वाढला. लोकसंख्या अदलाबदलीची घोषणा केल्यावर काय झालं असतं, याची कल्पनाच करता येणार नाही. एकाच कुटुंबातील दोन भावांची नीट वाटणी झाली नाही, तर ते भाऊ परस्परांचा जीव घ्यायला उठतात; मग आठ कोटी लोकांची लाखो कुटुंबं पाकिस्तानात पाठवायची आणि तिकडचे हिंदू भारतात आणायचे, हा अविचार प्रत्यक्षात आणायचा ठरला असता तर अभूतपूर्व ‘सामूहिक हत्याकांड’ झाले असते आणि त्या अदलाबदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला माणसंच शिल्लक राहिली नसती. म्हणजे लोकसंख्या अदलाबदलीचा विचार देश बेचिराख करणारा ‘अविचार’ ठरला असता!

_आपल्याला या पोस्ट तुमच्या ग्रुप मध्ये नियमित मिळाव्यात अस वाटत असेल तर 7030140097 हा क्रमांक तुमच्या व्हाट्सएपच्या ग्रुप ला add करा._
=====================
[28/06, 08:11] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#28
*पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत यासाठी गांधीजींनी उपोषण केलं होतं, असा एक मोठा आक्षेप गेली ५५ वर्षे उपस्थित केला जातो आणि गांधीद्वेषासाठी त्याचा वापर केला जातो. यातली वस्तुस्थिती काय आहे?*
ब्रिटिशांनी हा देश सोडण्याचे ठरवले, तेव्हा अखंड भारताच्या गंगाजळीत ३७५ कोटी रुपये होते. फाळणीची प्रक्रिया पार पाडताना त्यातला पाकिस्तानचा वाटा ७५ कोटी रुपयांचा आहे, हे दोन्ही सरकारांकडून मान्य केलं गेलं होतं. फाळणीनंतरही काही काळ दोन्ही देशांची एकच रिझर्व्ह बँक होती. त्यातला २० कोटींचा पहिला हप्ता पाकिस्तानला ताबडतोब दिला गेला होता. उर्वरित ५५ कोटी रुपये देणे बाकी होते. दरम्यानच्या काळात पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला, जे काश्मीर तोर्पंत भारतात सामील झालेलं नव्हतं. तरीही काश्मीरवर आक्रमण केलं, म्हणून ते ५५ कोटी रुपये देऊ नयेत, असं भारतातील काही लोकांना वाटत होतं. पण ती रक्कम पाकिस्तानची आहे, तो आर्थिक व्यवहार आहे, त्याची राजकीय प्रश्नांशी सांगड घालू नये, असं मत अनेकांचं होतं. स्वतंत्र भारताने काश्मीरसाठी प्राणपणाने लढावे, पण आर्थिक करार पाळावा आणि पाकिस्तानचे पैसे द्यावेत, असा आग्रह इतर अनेकांप्रमाणेच गांधीजींनीही धरला. खरं तर कोणताही प्रामाणिक माणूस असाच विचार करील. हे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्यासाठी गांधीजींनी भारत सरकारवर दबाव जरूर आणला; पण त्यासाठी उपोषण केलं नव्हतं. दिल्लीत चालू असलेले जातीय दंगे थांबविण्यासाठी गांधीजींनी उपोषण केलं होतं. योगायोग इतकाच की, हे उपोषण व ५५ कोटींचं प्रकरण एकाच काळात उद्भवलं होतं. अनंत अडचणींनी हैराण झालेल्या आपल्याच सरकारविरोधात उपोषण करण्याइतपत ‘अव्यवहारी’ हा महात्मा निश्चितच नव्हता!
म्हणजे, फाळणीला मान्यता द्यायला नको होती; लोकसंख्येची अदलाबदल करायला मान्यता द्यायला हवी होती; आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी आग्रह धरायला नको होता, असे जे तीन मोठे आक्षेप गांधीजींबद्दल द्वेष पसरविण्यासाठी वापरले जातात. त्यांची वस्तुस्थिती अशी आहे.

[29/06, 07:52] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#29
*‘गांधीजींनी, सुभाषबाबूंना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला’, हा गैरसमजही जनमानसात रुजवला गेलाय.*
गांधीबाबा किती ‘पाताळयंत्री’ माणूस होता, हे सामान्यांच्या मनावर ठसविण्यासाठी हा युक्तिवाद केला जातो. पण तो किती अर्थहीन आहे, हे खोलात गेलं तर लक्षात येतं. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी कशी होती? दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या दरम्यान काँग्रेसमध्ये दोन गट पडले. महायुद्धाची संधी साधून ब्रिटनला कोंडीत पकडायचे; जर्मनी व जपानची मदत घेऊन सशस्त्र लढा उभारायचा आणि देश स्वतंत्र करायचा, अशा विचारांचा छोटा गट- त्याचे नेते होते सुभाषबाबू. या भूमिकेला दुसऱ्या मोठ्या गटाचा व गांधीजींचाही विरोध होता. नेमके त्याच वेळी (१९३८मध्ये) त्रिपुरा येथे काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. या दोनही गटांनी आपले उमेदवार उभे केले. त्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुभाषबाबू निवडून आले. गांधींचा पाठिंबा होता ते पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाले. त्या वेळी गांधीजी म्हणाले, ‘हा माझाच पराभव आहे.’ आणि ते खरंही होतं. हिटलरच्या जर्मनीची व जपानची मदत घ्यायची की नाही, या मुद्द्यावरून ती निवडणूक लढवली गेली होती. सुभाषबाबूंचा विजय हा गांधीजींना आपला पराभव वाटला, यात नवल कसलं? त्या वेळी सुभाषबाबू अध्यक्ष झाले होते, पण काँग्रेस कार्यकारिणीत त्यांच्या बाजूने बहुमत नव्हतं. त्यामुळे अनेक ठराव त्यांच्या विरोधात जात होते. म्हणून सुभाषबाबूंनी राजीनामा दिला. त्यानंतर लगेच ते जर्मनी व जपानला गेले; हे लक्षात घेतलं तर तो मतभेदाचा मुद्दा किती महत्त्वाचा होता, हे लक्षात येईल. हे तपशील विचारात घेतले, तर सुभाषबाबूंना गांधींनी राजीनामा देण्यास भाग पाडलं, हे म्हणणं चुकीचं ठरतं.
मित्रांनो, स्वत:साठी जीवनाचं तत्त्वज्ञान व देशासाठी स्वातंत्र्य मिळविण्याची साधनं म्हणजे ‘सत्य व अहिंसा’- असा ठाम विश्वास असणारे गांधीजी क्रांतिकारकांचा किंवा सुभाषबाबूंचा मार्ग कसा पसंत करतील?

#30
*गोरक्षा प्रकरणी महात्मा गांधींचे सतत दाखले दिले जातात. यासंबंधी गांधींनी वेळोवेळी काय म्हटले होते?*
‘गोसेवेचे व्रत मी अनेक वर्षांपूर्वीच घेतले आहे, पण माझा धर्म इतर सर्व भारतीयांचा धर्म कसा असू शकेल?’, १९०९ मध्ये गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये लिहिले होते.
२५ जुलै १९४७ रोजी गोहत्या बंदीची मागणी करणारी पन्नास हजार पत्रे आणि तितक्याच तारा मिळाल्याचे बाबू राजेन्द्र प्रसाद यांनी जाहीर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गांधी म्हणाले, ‘पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर हिंदूंना देवळात जाण्यास मनाई केली तर ते योग्य ठरेल का? शिवाय तेथील हिंदू देवळात जाण्याचे सोडतील का? आपला मार्ग ते शोधून काढतीलच. म्हणून मला वाटते की या तारा आणि पत्रे आता थांबली पाहिजेत. काही संपन्न हिंदू कुटुंबे गोमांस खात नसली तरी गोहत्येला प्रोत्साहन देतात. गोमास डबाबंद करून ते ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा व्यवसाय ते करतात. धर्माचा खरा अर्थ समजून न घेता गोहत्या थांबवली पाहिजे, अशा फुकाच्या गर्जना केल्या जातात’.
हिंदू गोवध करत आहेत आणि तुमच्यासारखे लोक इतरांनी गोवध करू नये म्हणून धर्म समजून कायद्याद्वारे गोवध थांबवण्याचा प्रयत्न करतात. किती हा अधर्म!
- महात्मा गांधी, रणछोडदास पटवारी यांना ऑक्टोबर ३, १९४७ला लिहिलेल्या पत्रामधून.

#31
३० जानेवारीचा दिवस उगवला. दुपारी वल्लभभाई पटेल गांधींना भेटायला आले. जवाहरलाल नेहरू व वल्लभभाईंत काही मतभेद असल्याचं एव्हाना गांधींच्या कानावर आलं होतं. वल्लभभाईंच्या खांद्यावर हात ठेवत गांधी म्हणाले होते, "आपल्यात आणि जवाहरलालमध्ये काही मतभेद असेल तर देशाच्या भल्यासाठी सर्व विसरून एकसाथ राहावं. जवाहरलाललाही मी हेच सांगेन". हाच सल्ला प्रार्थना संपल्यावर नेहरूंना बापू देणार होते. आणखी एका गोष्टीविषयी इथे बोलावंसं वाटतं. गांधींनी सरदारांना पंतप्रधान न बनवता नेहरूंना पंतप्रधान केलं, याची चर्चा नेहमी होताना दिसते. असं म्हटलं जातं, की कॉंग्रेसने नेमलेल्या समितीने पंतप्रधानपदासाठी पटेलांचं नाव सुचवलं होतं. गांधींनी त्यांचं नाव उचलून धरलं असतं तर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते. खरं तर गांधींनी कुणालाही पंतप्रधान बनवलं नव्हतं. कॉंगेस कमिटीने एकमताने आपला नेता निवडला होता. १९४५ नंतर कॉंग्रेस गांधीजींचा सल्ला मानत नव्हती आणि त्या पार्श्वभूमीवर ’माझं आता कुणी ऐकत नाही’ असे निराशेचे उद्गार स्वत: गांधींनी काढले होते.
स्वातंत्र्यानंतर ’देशाची स्थिरता’ हा गांधींचा मुख्य विषय होता. सरदारांचं वय झालं होतं. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ते गांधींचे पेशंट होते. गांधींचे निसर्गोपचार त्यांच्यावर चालू होते. पटेलांना अटक झाली त्या वेळी ’मी त्यांची चिकित्सा करतो. त्यांना माझ्याबरोबर ठेवा’ , असं पत्र गांधींनी गव्हर्नरला लिहिलं होतं. त्यांच्या प्रकृतीची गांधींना चिंता वाटत होती. पंडित नेहरू हे पटेलांच्या तुलनेत जवान व धडधाकट होते. पंतप्रधान अधिक काळ टिकले नाहीत तर वारसाबद्दल कटकटी निर्माण होतात, देशाच्या स्थिरतेला धोका निर्माण होतो, हा विचार गांधींनी केला होता. म्हणून नेहरूंना पंतप्रधान केल्यावर गांधींजींनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. सरदार पटेल हे सैनिकी बाण्याचे होते. कोणत्याही पदावर राहून देशसेवा करण्याची त्यांची वृत्ती होती. नंतर पंडित नेहरू सतरा वर्षं पंतप्रधान राहिले. सरदार पटेलांचं स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांत निधन झालं. नेहरूंनी देशाला स्थिरता दिली, हे कुणी नाकारू शकत नाही.
*( श्री. नारायणभाई देसाई यांच्या "अज्ञात गांधी" या पुस्तकातून साभार)*

#32
*गांधी-ईश्वर-धर्म*
गांधीजी नुकतेच आफ्रिकेतून भारतात आले होते, तेव्हाची ही गोष्ट. गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांचं भारतभ्रमण सुरू होतं. हिमालयाजवळच्या महात्मा मुन्शीरामच्या आश्रमात ते गेले. तेथे एका कट्टर हिंदू धर्मीयाने गांधींना शरीरावर हिंदुत्वाच्या खुणा बाळगण्याचा आग्रह केला. जानवं घालायला त्यांनी नकार दिला. कारण खालच्या जातींना ते धारण करण्याचा अधिकार नाकारला होता.
*धर्माची शेपटी पकडून ठेवली*
मात्र डोक्याच्या मागे हिंदू परंपरेनुसार शेंडी ठेवायला ते राजी झाले. कालांतराने त्यांनी ही शेंडीही काढून टाकली. पण हिंदू धर्माची धरून ठेवलेली शेपटी मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. धर्माचा अवकाश व्यापण्यासाठी तर ही शेपटी धरून ठेवणं गरजेचीच असल्याची धारणा असावी. म्हणूनच गांधीजींच्या आयुष्यात राम दिसतो. रामनाम दिसतं. रामनामाचा जप दिसतो. पण रामाचं मंदिर गायब दिसतं. रामाची मूर्तीही दिसत नाही. एवढंच काय रामाचा साधा फोटोही दिसत नाही.
*गांधींचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे गांधी धर्माचा अवकाश अजिबात सोडायला तयार नाहीत. ही गोष्ट चांगली की वाईट यावर वादच नाही, तर वादंगही होऊ शकतो. गांधीजींना हा अवकाश तर घट्ट धरुन ठेवायचाच आहे. पण ज्या धर्मांधांनी या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुन त्यावर ताबा मिळवलाय, बळजबरी कब्जा मिळवलाय, त्यांना तिथून हुसकावूनही लावायचंय.*
गांधी ईश्वर मानतात पण या ईश्वराच्या दर्शनासाठी कधी मंदिरात जावं, त्याची पूजाअर्चा करावी, असं त्याला वाटत नाही. बरं, बाहेर मंदिरात जात नसेल तर किमान आश्रमात देव्हारा असावा. त्यालाही त्यांची मान्यता नाही. प्रार्थना गांधीजींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा आश्रमाच्या परिसरात किमान प्रार्थना मंदिर असावं, हेही त्यांना मान्य नाही.
- चंद्रकांत वानखडे (लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

#33
*गांधी-ईश्वर-धर्म*
*देव आहे, पण मूर्ती नाही*

हे ही एक वेळ ठीक आहे. पण ज्यांना असं वाटतं, त्यांनाही ते अशा प्रकारचं कोणतंही मंदिर आश्रम परिसरात बांधू देत नाहीत. देव आहे पण मंदिर नाही. मंदिर नाही म्हणून मूर्ती नाही. आणि मूर्ती नाही म्हणून त्याची पूजा नाही. पण हाच माणूस येरवड्याच्या तुरुंगात असतो. तेव्हा पत्रव्यवहारात मात्र येरवडा मंदिरातून असा उल्लेख आवर्जून करतो. म्हणजे हा माणूस तुरुंगालाच मंदिर मानतो किंवा बनवतो.
मग या माणसाचा देव, ईश्वर, परमेश्वर आहे तरी कुठं? गांधीच मग कधीतरी आपल्याला हळूच पत्ता सांगतात. ‘कोट्यवधी मूक जनतेच्या हृद्यात आढळणाऱ्या परमेश्वराशिवाय मी दुसरा कोणताही परमेश्वर ओळखत नाही. या कोट्यवधी लोकांच्या सेवेतून मी सत्यरूपी देवाची सेवा करत असतो.’ आता हा दोघांचीही पंचाईत करून ठेवतो. देव मानणाऱ्यांची आणि देव न मानणाऱ्यांचीही.
मंदिरात देव नाही असं काहीसं सूचवून गांधीजी देवाच्या नावावर धंदा करणार्यांची पंचाईत करतात. तर देव न मानणाऱ्यांनी त्यांना तात्विक देव मानतो म्हणून आस्तिक कॅटेगरीत घ्यावं, तरी अडचण आणि त्यांना नास्तिक म्हणावं तरी पंचाईत.

#34
*गांधी-ईश्वर-धर्म*
*देवाला उलटं केलं आणि धर्मालाही*
गांधीजींनी देवधर्माच्या नावाखाली किती लोकांना अडचणीत आणलं असेल, किती लोकांना गोंधळात टाकलं असेल, त्याचं त्यांनाच माहीत. गांधींनी देवधर्माच्या क्षेत्रात जेवढा धुडगूस घातला तेवढा कोणी घातला नसेल. पहिले तर गांधींनी देव या संकल्पनेलाच उलटं केलं. ‘परमेश्वर हेच सत्य’ म्हणजे गॉड इज ट्रूथ हेच खरं तर रुढ होतं. पण गांधीजींनी त्याला ‘सत्य हाच परमेश्वर’ म्हणजे ट्रूथ इज गॉड असं उलटं केलं. गांधीजींनी देवालाच उलटं केलं असेल तर त्याच्या धर्माला सहजासहजी थोडीच सोडणार आहेत.
हिंदू धर्माची व्याख्या करताना गांधी म्हणतात, अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणं म्हणजे हिंदू धर्म. तर ‘सत्य आणि अहिंसा’ ही गांधींची धर्मश्रद्धा. सत्याच्या शोधाची अविश्रांत साधना म्हणजे धर्म. गांधीच्या दृष्टीने ईश्वर म्हणजे सत्य आणि प्रेम. ईश्वर म्हणजे आचारधर्म आणि नैतिकता. निर्भयता म्हणजे ईश्वर. सद्सद्विवेक बुद्धी म्हणजे ईश्वर आणि आपल्या समाजाची आणि जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा.
गांधीजींची यातली देवाधर्माची भाषा कोणत्याही अर्थाने धार्मिक वाटत नाही. गांधी स्वत:ला ‘मी सनातनी हिंदू आहे’ असंही म्हणतात आणि दुसऱ्याच वाक्यात, ‘पण मी वेदप्रामाण्य मानत नाही’ असंही म्हणतात. रूढ अर्थाने जो वेदप्रामाण्य मानत नाही, तो हिंदूच असू शकत नाही. गांधी तर म्हणतात, ‘मी सनातन हिंदू आहे.’

[05/07, 07:44] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#35
*गांधी-ईश्वर-धर्म*
*मग मॅक्सम्युलरलाच गुरू मानुया*
बरं हा सनातनी हिंदू शंकराचार्यांनाच उघड आव्हान देतो. म्हणतो, _‘वर्तमान शंकराचार्य आणि शास्त्री पंडितांनी हिंदू धर्माची खरी व्याख्या केली, असा त्यांचा दावा असला तरीही ती व्याख्या मी नाकारतो.’_ त्यापुढे जाऊन ते म्हणतात, _धर्माची कोणी कितीही पांडित्यपूर्ण व्याख्या केली तरीही माझ्या विवेकाला आणि नैतिक बुद्धीला जे पटणार नाही. अशा कोणत्याही गोष्टी मी स्वत:ला बंधनकारक मानत नाही,_ असंही सांगतात.
गांधी एका बाजूला हिंदू धर्मग्रंथांवर विश्वास आहे, असंही म्हणतात. पण दुसर्या बाजूला त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ मानलीच पाहिजे, असं मी मानत नाही, असंही बोलतात. त्यांनी वेदांच्या अनुषंगाने विचारलेला एक प्रश्न खोचक भोचक तर आहेच. पण परंपरावाद्यांच्या जिव्हारी लागावा असाही आहे.
ते म्हणतात _‘ब्राम्हण वेदांचे अध्ययन केल्यामुळे धर्मगुरू होत असतील, तर वेद जाणणारा मॅक्सम्युलर आमचा धर्मगुरू ठरला पाहिजे.’_ शेवटी हा धार्मिक माणूस असंही म्हणतो की, _हिंदूस्थानातील प्रत्येक गरीबाला आपण पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने धर्माला काही अर्थ उरत नाही._

[06/07, 08:22] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#36
*गांधी-ईश्वर-धर्म*
*पोटात शिरून नकाराची संतपरंपरा*
धर्माच्या नावावर केलं जाणारं शोषण, देवाधर्माच्या नावावरचं कर्मकांड, वाईट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता, उच्चनीच भेदभाव दूर करण्यासाठी धर्माचा अवकाश सोडून चालणार नाही, असं तर गांधी मानत होते? संतपरंपरेचीही हीच धारणा दिसते. तुकारामांनी धर्मावर, त्याच्या नावाने चालणार्या ढोंगबाजीवर कितीही कठोर प्रहार केले असतील. पण त्यांनी कधी विठ्ठल सोडला नाही.
‘तुमच्या देवावर काय कुत्रंही टांग करुन मुतते’ इतपत कठोर भाषा गाडगेबाबांनी वापरली असेल, पण ‘गोपाला’ सोडला नाही. तुकाराम तर आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनीं अनुभवावा।।’ हे सगळं माहीत असूनही विठ्ठल धरुन ठेवतात. गांधीही राम धरून ठेवतात. मी सनातनी हिंदू आहे. असं म्हणत धर्माची शेपटी मात्र सोडत नाही.
भारतीय विचार परंपरेत नकार देण्याच्या अनेक परंपरा आहेत, त्यात पोटात शिरून नकार देणं, ही एक मध्ययुगीन परंपरा आहे. भक्ती आणि संतपरंपरेने हीच पद्धत स्वीकारली, असं दिसतं. मी तुमचाच आहे असं म्हणत म्हणत त्यातली स्युडो प्रस्थापित व्यवस्था नाकारणं आणि नवा आशय देत राहणं, असं या पद्धतीमधे केलं जातं. गांधीही तसंच करतात की काय असं वाटतं.

[07/07, 09:59] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#37
*गांधी-ईश्वर-धर्म*
*देवधर्म मानत नाही तर बोलता का?*
तुम्ही देव, धर्म मानत नसाल तर कृपया तुम्ही आमच्या देवाधर्मावर बोलू नका, असं परंपरावादी धर्मांधच नाही तर सर्वसामान्य माणूसही म्हणवू शकतो. धर्म ही अफूची गोळी आहे, असं तुम्ही मानता ना, तर ठीक आहे. पण तुम्हाला आता आमच्या देवाधर्मावर बोलण्याचा काय अधिकार? तुम्ही आपला धर्म सोडला ना? दुसऱ्या धर्मात गेलात ना?
‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असं म्हणून धर्माचा अवकाश व्यापणारे संत गाडगेबाबाच ‘तुमचा देव काय, त्याच्यावर कुत्रंही मुतत.’ अस ठणकावून म्हणू शकतात. आणि ते त्यांच्या तोंडून सर्वसामान्यही ऐकून घेतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हेच वाक्य देवधर्म न मानणाऱ्याने उच्चारलं, तर ते कदाचित सहनही केलं जाणार नाही. ते वाक्य उच्चारणाऱ्याला लोक नाकारतीलही. हीच शक्यता अधिक आहे.
देव आणि धर्माचा आधार शोषकांनी घेत शोषण केलं. म्हणून देव, धर्म नाकारणाऱ्या परिवर्तनवादी चळवळी करणाऱ्यांपेक्षा, देवधर्म स्वीकारत ज्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो जास्त परिणामकारक ठरलाय का? हे ही एकदा गांभीर्याने तपासलं पाहिजे. अखेर देव आणि धर्म ही समाजाची मानसिक गरजच असेल तर तिचा अव्हेर आपण कितपत करू शकू? गांधीजींनी देवा-धर्माचं अवकाश का पकडून ठेवलं होतं याचं उत्तर यात स्पष्ट होतंय.

[08/07, 08:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#38
*गांधी-ईश्वर-धर्म*
*राम हिंसक झाला आणि गायही*
देवधर्माच्या बाबतीत गांधी म्हणतात, ‘लंगड्या माणसाला जोवर तुम्ही चालायला शिकवत नाही तोवर त्याच्या कुबड्या काढून घेण्याचा अधिकार नाही.’ देवाला निवृत्त करता करता अनेकजण निवृत्त झाले, पण देव काही निवृत्त होताना दिसत नाही. ज्या देवाला आपण समाजातूनच काय घरातूनही निवृत्त करू शकलो नाही, त्या देव आणि धर्माच्या मागे हात धुवून लागण्यापेक्षा त्याचा अवकाश व्यापून आपण त्याहून अधिक काही चांगलं करू शकू, ही धारणा गांधीजींची होती.
ती त्यांची भूमिका योग्य की अयोग्य यावरही बराच वाद होवू शकतो. परंतु राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि लालकृष्ण अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय.
जी गोष्ट रामाची तीच गोष्ट गाईचीही आपण अनुभवलीय. गाय जोपर्यंत गांधींच्या खुट्याला बांधून होती, तोपर्यंत गाय हा पाळीव प्राणीच होता. पण हीच गाय आता हिंस्त्र पशू झाल्याचाही आपण अनुभव घेतोय. धर्माच्या बाबतीत तरी याहून वेगळं काय घडतंय?
*यामुळेच गांधीजींचा खून झाला*
गांधींच्या धार्मिक असण्याने पुरोगामी, डाव्यांचा पार गोंधळ उडाला असेल. परंपरावाद्यांनी मात्र हा आपला दुष्मन आहे, हे नीट ओळखलं होतं. त्यांच्या धार्मिक धुडगूसाने आपली दुकानदारी कायमची बंद होऊ शकते, हेही त्यांच्या ध्यानात आलं. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन गांधीजींचा खून करून त्यांना आपल्या रस्त्यातूनच कायमचं हटवून टाकलं.
आज तर धर्माचा हा सारा अवकाश धर्मांधांनी, परंपरावाद्यांनी व्यापलाय. संत, महाराज, बुवा, बाबा, योगी, साधू, साध्वी यांचा धर्माच्या नावाने राजकारणातला प्रवेशही भयावह आहे. एका अर्थाने गांधीच यांना रोखू शकतो, पण त्यासाठी गांधी समजून घ्यावा लागेल ना?

#39
*गांधी-ईश्वर-धर्म*
बहुतेक धर्मग्रंथ आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ अशी भूमिका घेत असताना महात्मा सर्वधर्मसमभावाची भूमिका कशी घेऊ शकला, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे अगदी समर्पक उत्तर नरहर कुरुंदकर देतात.
*‘सर्वधर्मसमानत्व कोणत्याच धर्माला मान्य नसते. प्रत्येक धर्माचे अनुयायी आपला धर्म परिपूर्ण, निर्दोष व श्रेष्ठच मानीत असतात. हिंदू, बौद्ध व जैन आपणाला परिपूर्ण व निर्दोषच मानतात. फक्त ख्रिश्चन व मुसलमान यांच्याप्रमाणे आपला धर्म इतरांवर लादणे न्याय्य व समर्थनीय मानत नाहीत. ख्रिश्चन व मुसलमान तर आपला धर्म सर्वश्रेष्ठ असल्यामुळे तो इतरांच्यावर लादणे अन्याय समजतच नाहीत. अशा अवस्थेत सर्वच धर्म सारखेच खरे ही भूमिका म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान धर्माला आपला धर्म इतरांवर लादण्याची गरज नाही, अशी भूमिका आहे. सर्वच धर्मातील अध्यात्म तेवढे खरे असून चालीरीती खोटय़ा आहेत अशी ही भूमिका आहे’. (जागर, नरहर कुरंदकर, पृ. १३२-१३३)*
गांधीजी सर्वच धर्म परमेश्वरप्रणीत आहेत असे मानत असत. पण धर्मग्रंथांना ते मानवनिर्मित मानत असल्याने त्यातील ज्या गोष्टी सामाजिक न्याय व समतेच्या विरोधात असतील त्या गोष्टी गांधी नाकारताना गांधीजींना कधी अडचण वाटली नाही. त्यासाठी धर्म आडवा येऊ देण्यास महात्मा तयार नव्हता.
-डॉ. विवेक कोरडे
लेखक गांधीवादी कार्यकर्ते व त्यांच्या विचारांचे अभ्यासक आहेत.

#40
*गांधी-ईश्वर-धर्म*
नोव्हेंबर २१, १९४४
_अहिंसेशिवाय सत्याचे मुळीच ज्ञान होऊ शकत नाही. यामुळेच अहिंसा परमोधर्मः, अहिंसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे म्हणतात._
नोव्हेंबर २२, १९४४
_सत्याचा शोध आणि अहिंसेचे पालन या गोष्टी ब्रह्मचर्य, अस्तेय (अचौर्य), अपरिग्रह, निर्भयता, सर्व धर्माबद्दल समान आदरभाव, अस्पृश्यता निर्मुलन आणि अशाच इतर गोष्टींशिवाय अशक्य आहे._
- *महात्मा गांधी*
(संदर्भ - संपूर्ण गांधी साहित्य, खंड ७८)
संकलन - हर्षल जाधव, कोल्हापूर

#41
*गांधी-ईश्वर-धर्म*
‘ख्रिश्चन वा अजून कोणता धर्म खरा आहे, असे मला कळताच त्याचा प्रचार करण्यापासून मला जगातील कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही. जिथे भीती असते तिथे धर्म नसतो. कुराण व बायबलचा मी जो अन्वयार्थ लावला आहे, त्यानुसार मला स्वत:ला ख्रिश्चन वा मुसलमान म्हणवून घेण्यावर माझी कोणतीही आपत्ती असू नये. कारण तशा अवस्थेत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे सर्व पर्यायी शब्द होऊन जातील. परलोकात ना हिंदू आहेत, ना मुसलमान, ना ख्रिश्चन अशी माझी भावना आहे. जिथे व्यक्तीचे मूल्यमापन नावाच्या वा धर्माच्या पट्टय़ा पाहून करण्यात येत नाही तर त्यांच्या कर्माच्या आधारावर करण्यात येते, मग त्यांचा धर्म कोणताही असो. आमच्या लौकिक जीवनात या नामपट्टय़ा राहतीलच. त्यामुळेच जोपर्यंत या पट्टय़ा माझा विकास अवरुद्ध करीत नाहीत आणि कुठेही चांगली गोष्ट दिसली तर ती आत्मसात करण्यापासून या पट्टय़ा मला अडवत नाहीत, तोपर्यंत पूर्वजांच्या नामपट्टय़ा कायम राहू देणे मला उचित वाटते. (यंग इंडिया, २ जुलै १९२६, पृ. ३०८) महात्मा सनातनी धर्माचा अर्थ असा लावत होता.

#42
*गांधी-ईश्वर-धर्म*
नोव्हेंबर २७, १९४४
_आपण आपल्या धर्माबद्दल जसा आदरभाव बाळगतो तसाच इतरांच्या धर्माबद्दलही बाळगला पाहिजे. केवळ सहनशीलता पुरेशी नाही._
डिसेंबर १९, १९४४
_संतांची प्रवचने ऐका, धर्मग्रंथांचा अभ्यास करा आणि विद्वान व्हा. परंतु तुम्ही तुमच्या अंत:करणात ईश्वराला विराजमान केले नसेल तर तुम्ही काहीही मिळवले नाही._

[13/07, 09:38] +91 96373 51400: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#43
*गांधी-ईश्वर-धर्म*
“हिंदू क्रोधाला वश झाले तर ते हिंदू धर्माला काळिमा फासतील आणि होऊ घातलेले हिंदू-मुस्लिम ऐक्य लांबणीवर टाकतील. उलट त्यांनी संयम पाळला तर उपनिषदांच्या व क्षमामूर्ती असलेल्या युधिष्ठिराच्या संदेशास आपण पात्र आहोत, असे ते सिद्ध करतील, एका व्यक्तीचा अपराध सर्व जमातीला आपण लागू करू नये. तसेच आपण आपल्या चित्तांत सूडबुद्धी बाळगू नये. एका मुसलमानाने एका हिंदूवर अन्याय केला असे न मानता, एका प्रमादशील बंधूने एका वीरावर अन्याय केला, असे आपण समजले पाहिजे.”
- महात्मा गांधी
(संदर्भ यंग इंडिया, ३०/१२/१९२६)

[14/07, 07:57] +91 96373 51400: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#44
*गांधी-ईश्वर-धर्म*
डिसेंबर २५, १९४४
_आज नाताळचा दिवस आहे. आपण सर्व धर्म समान आहेत असे मानतो. यामुळे आपल्याकरिता राम, कृष्णाप्रमाणे हा दिवससुद्धा वंदनीय आहे._
ऑगस्ट २, १९४५
_खरे ज्ञान धर्मग्रंथाच्या वाचनाने होत नसते. त्यांतील गुणांचे अनुसरण केल्याशिवाय ते होणे खरोखरच कठीण आहे._

[15/07, 08:50] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#45
*गांधी-ईश्वर-धर्म*
- “मुसलमान लोक सुरे व पिस्तुले यांचा वापर सढळपणे करीत असतात, यात शंका नाही. समशेर ही काही इस्लामची खूण नव्हे. पण इस्लाम अशा परिस्थितीत जन्माला आला की तेथे सर्वश्रेष्ठ कायदा समशेरीचा होता आणि तो अजूनही आहे. येशूचा संदेश फोल ठरला. याचे कारण तो ग्रहण करण्याला परिस्थिती परिपक्व झालेली नव्हती. पैगंबराच्या संदेशाचेही असेच झाले. अजूनही मुसलमानांमध्ये समशेर फार चमकताना दिसते. इस्लाम म्हणजे शांतता, हे जर खरे ठरावयाचे असेल तर ती समशेर त्यांनी म्यान केली पाहिजे.”

[16/07, 08:29] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#46
*गांधी-ईश्वर-धर्म*
ऑगस्ट ८, १९४५
नानक आकाशाखाली उघड्यावर झोपले होते. एक गृहस्थ म्हणाले, “जवळच चांगली
धर्मशाळा आहे. तिथे का जात नाही?” नानकनी उत्तर दिले, "संपूर्ण पृथ्वी माझी धर्मशाळा आहे,
आणि आकाश छप्पर.”
सप्टेंबर ११, १९४५
प्रत्येकजण, राजा वा रंक स्वतःच आपल्या धर्माचा चौकीदार असतो. यात सुख काय आणि दुःख काय?

[17/07, 08:48] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#47
*गांधी-ईश्वर-धर्म*
“पाकिस्तानाचे धोरण काहीही असो, भारत हा हिंदू, मुसलमान, शीख, पारशी, ख्रिस्ती वगैरे लोकांचे आश्रयस्थान पूर्वी होता आणि पुढेही तसाच राहील. जे जे म्हणून भारताला आपली मातृभूमी मानतात ते सारे भारतीय होत, आणि त्या सर्वांना नागरिकत्वाचे समान हक्क आहेत.”
- महात्मा गांधी
(संदर्भ ‘हरिजन’, २७/७/१९३७)

[18/07, 08:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#48
*गांधी-ईश्वर-धर्म*
ऑक्टोबर ४, १९४५
तो धर्म काय कामाचा जो दैनंदिन जीवनात उपयोगात आणता येत नाही?
ऑक्टोबर ५, १९४५
धर्माचा पोषाख घातल्याने पाप पुण्य होत नाही आणि चूक चूक राहत नाही असे नाही.

[19/07, 08:16] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#49
*गांधी-ईश्वर-धर्म*
“देशाच्या राजकारणात मुसलमान लोक कमी लक्ष घालतात, याचे कारण ते अजून हिंदुस्थानाला आपली मायभूमी मानीत नाहीत. आणि तिच्याविषयी अभिमान बाळगीत नाहीत. आपण विजेत्यांचे वंशज आहोत, असे ते स्वत:विषयी समजतात. पण ते अगदी चूक आहे, असे मला वाटते.”
- महात्मा गांधी
(संदर्भ ‘हरिजन’, २/२/१९४७)

[20/07, 06:56] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#50
*गांधी-ईश्वर-धर्म*
ऑक्टोबर २६, १९४५
हे खाण्यात आणि ते न खाण्यात धर्म नाही तर आपल्या आतील ईश्वराची आतून ओळख होण्यात धर्म असतो.
ऑक्टोबर २७, १९४५
धर्म तेव्हा धर्म राहत नाही जेव्हा तशाच लोकांमध्ये तो टिकाव धरतो. अहिंसेची कसोटी हिंसेच्या वातावरणातच असते.

[21/07, 06:20] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#51
*गांधी-ईश्वर-धर्म*
‘मी कट्टर हिंदू असतानाही माझ्या धर्मात ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू या सर्व धर्मातील उपदेशांकरिता स्थान आहे आणि यामुळेच काही लोकांना माझे विचार ढिगाऱ्याप्रमाणे वाटतात, तर काहींना मी सारसंकलन करणारा आहे असे वाटते. एखाद्याला सारसंकलक म्हणतात याचा अर्थ त्या माणसाचा कोणताच धर्म नाही, असा होत असतो. उलट माझा धर्म एक व्यापक धर्म आहे व तो ख्रिश्चनांच्याच काय परंतु प्लायमाऊथ ब्रदर्ससारख्यांच्याही विरोधी नाही. तसेच तो कट्टराहून कट्टर मुसलमानांचाही विरोध करीत नाही. व्यक्तीच्या कट्टरपणामुळे तिला बरीवाईट म्हणायची माझी तयारी नाही, कारण मी कोणत्याही व्यक्तीला तिच्या स्वत:च्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. माझा हा व्यापक धर्मच मला जिवंत ठेवतो. (यंग इंडिया, २२ डिसेंबर १९२७, पृ. ४२६) अशा व्यापक दृष्टीमुळेच महात्मा साऱ्या धर्माकडे आदराने पाहू शकत होता. सारेच धर्म खरे आहेत असे म्हणू शकत होता.

[22/07, 08:26] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#52
*गांधी-ईश्वर-धर्म*
डिसेंबर ७, १९४५
जितकी माणसे आहेत तितकेच धर्मही आहेत परंतु माणूस जेव्हा आपल्या धर्माच्या मुळाचा शोध घेतो तेव्हा वास्तवात ते सर्व धर्म एकच असल्याचे त्याला आढळते.
डिसेंबर १५, १९४५
जो धर्म जगाची नोंद घेत नाही आणि केवळ या जगापलीकडे पाहतो त्याला धर्म हे नाव शोभत नाही.
डिसेंबर ३१, १९४५
खऱया धर्माला प्रदेशाच्या मर्यादा नसतात.

[23/07, 06:57] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#53
*गांधी-ईश्वर-धर्म*
_माझे हिंदुत्व मला इतर धर्मांचा द्वेष करायला सांगत नाही ; उलट ते मला अंतर्मूख करुन माझ्याच धर्मातील जुने दोष नाहीसे करायला आणि तो जास्तीत जास्त शुद्ध व स्वच्छ करण्याची शिकवण देते._
- महात्मा गांधी
संदर्भ : - गांधीजी आणि त्यांचे टीकाकार ( पृ.क्र.82)
लेखक : - सुरेश द्वादशीवार.

[24/07, 07:52] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#54
*नियतीवादासंबंधी गांधीजी*
प्रश्न - ईश्वराने प्रत्येक माणसाच्या मृत्यूचा क्षण, जन्माची वेळ व तो कसा मरेल हे आधीच ठरवलेले असते काय? असे असेल तर आपण आजारी जरी पडलो तरी काळजी करण्याचे कारण काय?
उत्तर - माणसाच्या मृत्यूचा क्षण, जन्माची वेळ व तो कसा मरेल हे आधीच ठरवलेले असते की नाही हे मला माहीत नाही. मला इतकेच माहीत आहे की ‘गवताचे पातेसुद्धा ईश्वराच्या इच्छेशिवाय हालू शकत नाही’. ही गोष्टसुद्धा मला अस्पष्टशी कळते. जी गोष्ट आज अस्पष्ट आहे ती प्रार्थनापूर्ण प्रतिक्षा केल्यानंतर उद्या नाही तर परवा कळेलच. परंतु ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. सर्वशक्तिमान आपल्यासारखी व्यक्ती नाही. तो अथवा ती सर्वोच्च जिवंत शक्ती म्हणजे विश्वनियम आहे. यामुळे तो कोणतेही काम करताना मनमानी करत नाही तसेच त्याच्या कायद्यात सुधारणा करण्याला वा दुरुस्ती करण्यालाही वाव नसतो. त्याची इच्छा ध्रुवाप्रमाणे स्थिर असते, क्षणोक्षणी बदलणारी नसते. इतर गोष्टीत बदल होत असतो. आणि नियतीचा वा नशिबाचा असा अर्थ कधीही होत नाही की आजारी पडल्यानंतरही आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेऊ नये. आजारी पडणे पाप आहे आणि आजारी पडल्यानंतर काळजी न घेणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. दिवसेंदिवस चांगले होण्याचा प्रयत्न तर माणसाने सुरूच ठेवला पाहिजे. आपण आजारी का पडतो वा का पडलो याचा विचार तर माणसाने केलाच पाहिजे. निसर्गाचा नियम आरोग्य आहे आजार नाही. आपल्याला जर आजारी पडायचे नसेल वा आजारी पडल्यानंतर दुरुस्त व्हायचे असेल तर आरोग्याच्या नियमांची आपण माहिती करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे राहायला पाहिजे.
पाचगणी, जुलै १८, १९४६
हरिजन, जुलै २८, १९४६
(संकलक- ब्रिजमोहन हेडा)

[25/07, 07:55] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#55
*गांधी-ईश्वर-धर्म*
नेहरूंपासून सगळ्या नेत्यांनी हे गृहीत धरलं होतं की, जसजसा आर्थिक विकास होईल तसतसा भारताच्या सार्वजनिक जीवनात धर्माचा प्रभाव निष्प्रभ होत जाईल, कमी कमी होत जाईल. याला अपवाद आहेत गांधी. ते म्हणाले होते, ‘हे होणे नाही. इथं धर्म हा कातडीला चिकटला आहे गोचिडासारखा. कातडं वेगळं काढलं तर रक्त बाहेर येईल, पण धर्म जाणार नाही. तेव्हा इथल्या धर्माविषयी काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. ती सर्वधर्मसमभावाची भूमिका.’

[26/07, 07:54] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#56
*गांधी-ईश्वर-धर्म*
*धर्मग्रंथ*
केवळ वेदच दिव्य आहेत असे मी समजत नाही. बायबल, कुराण आणि जेंदअवेस्ता हे ग्रंथही वेदांप्रमाणेच ईश्वरी प्रेरणेने प्रकट झालेले आहेत, असा मला विश्वास आहे. हिंदू धर्मंग्रंथाबरोबर माझ्या विश्वासाचा अर्थ असा नाही की, मी त्यातील एक एक शब्द दैवी प्रेरणेने निर्माण झालेला आहे, असे समजतो.... या
ग्रंथांचा लावण्यात आलेला असा कोणताही अर्थ, मग तो कितीही मोठ्या विद्वानाने लावलेला असो, विवेक आणि नैतिकता यांच्या विरोधात असेल तर मी तो मानण्यास नकार देतो.
- *महात्मा गांधी*
(संदर्भ - यंग इंडिया, १९-१-१९२१, पृ. ३९७)

[04/08, 11:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#62
नवरा, बायकोचं नातं दुधावर यायला बराच काळ जावा लागतो. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असतं. खूप धीरानं घ्यावं लागतं. परस्परांत विश्वास आणि आदर असावा लागतो. ‘तू किसी रेल सी गुजरती है/ मैं किसी पुल सा थरथराता हूँ,’ असं आंतडं पिळवटून काढणारं आणि त्याचप्रमाणे तारकांनी भरलेल्या आभाळाची श्रीमंती बहाल करणारं प्रेम कस्तुरनं मोहनदासला आणि मोहनदासनं कस्तुरला दिलं.
गांधींचं जे जे पटलं ते ते कस्तुरबाई स्वीकारत गेल्या. नाही समजलं, कळलं तिथं त्या आपल्या मर्यादेत राहिल्या. छोट्या, छोट्या गोष्टींचा हट्ट सोडला नाही. गांधींचं ब्रह्मचर्याचं व्रत त्यांनी पाळलं. पण चहा, कॉफीची सवय बरीच वर्ष राहिली. अनेकदा गांधीच त्यांना कॉफी करून द्यायचे. शेवटी शेवटी मात्र कस्तुरबाईंनी कॉफीचा मोह सोडला.
आपल्या बायकोनं शिकावं, पुस्तकं वाचावीत, नवं ज्ञान मिळवावं ही गांधींची इच्छा कस्तुरबाई पुरी करू शकल्या नाहीत. त्यांना ते जमलं नाही. पण १९४२ मधे पुण्याच्या आगाखान तुरुंगात असताना गांधी आणि त्यांचे सचिव प्यारेलाल कस्तुरबाईंचे मास्तर झाले. मनुबेनबरोबर बसून गुजराती कविता, इंग्रजी, भूगोल, इतिहास हे विषय शिकावं लागायचं. लक्षात काही राहायचं नाही. आदल्या दिवशीचं दुसर्या दिवशी विसरायच्या. लाहोर ही कलकत्त्याची राजधानी असं बिनदिक्कत ठोकून द्यायच्या. मात्र गांधींबरोबर गुजराती कविता वाचायला त्यांना आवडायचं.
- अंबरीश मिश्र
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत असून त्यांचा हा लेख साप्ताहिक साधनाच्या १३ एप्रिल २०१९ च्या अंकातून घेतला आहे.)

[05/08, 08:46] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#63
*मुलांच्या बाबतीतही कठोर नियम*
बापू सार्यांशी आत्मीयतेनं वागत. मात्र आपल्या मुलांबाबत ते कमालीची शिस्तप्रिय आणि काहीसे कठोर होते. ‘एखाद्या कलावंतानं, ज्ञानी माणसानं, नेत्यानं आपली परंपरा आपल्या नंतरच्या पिढ्यांमार्फत पुढे नेऊ नये काय,’ असा प्रश्न १९२४ मधे त्यांना एका पत्रकाराने विचारला. बापू म्हणाले, ‘निश्चितच नाही. अशा माणसाचे अनुयायी अनेक असतात. त्यांची संख्या त्याच्या मुलांहून मोठी असते. द्यायचंच झालं तर त्यानं या मोठ्या वर्गाला द्यायला हवं.’
बापू स्वतःबाबत जेवढे कठोर आणि निग्रही होते तेवढेच आपल्या मुलांनीही असावं असा त्यांचा आग्रह होता. आपली मुलं भक्त प्रल्हादासारखी निग्रही आणि सत्याग्रही असावी असं ते म्हणत. हरिलाल गांधीजींच्या मागे गुजरातेतच राहिला होता. १९०६ मधे वयाच्या १८ व्या वर्षी तो लग्न करायला तयार झाला, तेव्हा बापूंनी आपले ज्येष्ठ बंधू लक्ष्मणदासजी यांना लिहिलं. ‘त्यानं लग्न केलं काय आणि न केलं काय मला त्यामुळे कोणताही फरक पडणार नाही. मी त्याचा विचार करणं थांबवलंय.’
एवढ्या अल्पवयातलं त्याचं लग्न बापूंना मान्य नव्हतं. सहा वर्षानंतर मणीलाल या त्यांच्या दुसर्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतील एका विवाहित भारतीय महिलेनं आपल्या जाळ्यात ओढलं. त्यावर चिडलेल्या गांधींनी त्यांच्या विवाहालाच नव्हे तर एकत्र येण्यालाही विरोध केला. त्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. पुढे जाऊन मणीलालनं कधी लग्नच करू नये असाही आदेश त्यांनी काढला.
१९२७ मधे बांच्या आग्रहावरून बापू नमले आणि मणीलालला त्याच्या वयाच्या ३५ व्या वर्षी विवाह करता आला. बापूंनी त्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यायला नकार दिला. त्याचा राग पहिल्या दोघांनी मनात धरला.
- सुरेश द्वादशीवार यांच्या "गांधीजी आणि त्यांचे टिकाकार" या पुस्तकातून साभार

[06/08, 07:36] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#64
कस्तुरबाई आश्रमात कष्टाची कामं आवडीनं करायच्या. त्या गांधींपेक्षा जास्त कणखर होत्या. केव्हा केव्हा राग अनावर झाला की गांधी स्वत:च्या थोबाडीत मारून घेत. कस्तुरबाईंवर अशी वेळ कधी आली नाही. गांधींत एक स्त्री होती. कस्तुरबाईंत शंभर पुरुषांचं बळ होतं. म्हणूनच त्या गांधी नावाच्या महापुरात टिकून राहिल्या.

[07/08, 18:26] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#65
*रक्ताच्या नात्याहून विचाराचं नातं महत्त्वाचं*
व्यक्तिमत्त्व आणि नीती यांचा विकास अधिक मोलाचा आहे असं सॉक्रटिससारखंच बापूही म्हणत असत. अर्थातच ते कोणत्याही तरुणाला न पटणारं होतं. मगनलाल या आपल्या पुतण्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. त्याने त्यांचा ब्रह्मचर्य राखण्याचा आदेश विवाहित असूनही पाळला होता. हा मगनलाल मृत्यू पावला तेव्हा बापूंनी लिहिलं, ‘तोच माझे हात होता, पाय होता आणि डोळेही होता. त्याच्या मृत्यूनं वैधव्य आलेल्या त्याच्या पत्नीचे हुंदके मला ऐकू येतात. पण मी तिला कसं सांगू की मला तिच्याहून जास्तीचं वैधव्य आलय.’
रक्ताच्या नात्याहून विचाराचं नातं बापूंना महत्त्वाचं वाटत असावं. बांना मात्र आपल्या मुलांविषयीचा लळा मोठा होता. १९१६ मधे मणीलालनं आश्रमाची एक रक्कम कोणालाही न सांगता हरिलालला पाठवली. हरिलाल तेव्हा कलकत्त्याला उद्योग करण्याच्या प्रयत्नात होता. बापूंच्या कानावर ते आलं तेव्हा त्यांनी मणीलालला सरळ आश्रम सोडून जाण्याचाच आदेश दिला. शिवाय त्याच्याविरुद्ध त्यांनी एक दिवस उपवासही केला. सारा दिवस मणीलाल बापूंची समजूत घालत आणि त्यांना उपोषण सोडण्यासाठी विनवत राहिला.
बा आणि देवीदास सारा दिवस रडत राहिले. पण बापू बधले नाहीत. त्यांनी मणीलालला काही खर्चाचे पैसे देऊन आश्रमाबाहेर घालविलं. दोन महिने अज्ञातवासात घालवल्यानंतर तो पुन्हा बापूंना भेटायला आला. यावेळी बापूंनी त्याला जी ए नटेसन या मद्रासी प्रकाशकाच्या नावानं ओळखपत्र दिलं. ‘त्याला पत्रकारिता शिकवावी. मात्र त्याला त्याचं अन्न स्वतः शिजवायला लावावं आणि त्याला सूत कातायलाही भाग पाडावं’ असं त्या पत्रात त्यांनी लिहिलं.
मणीलालची परीक्षा पूर्ण झाली तेव्हा बापूंनी त्याला दक्षिण आफ्रिकेत पाठवून ‘इंडियन ओपिनियन’चं संपादन करायला लावलं. पुढे तो भारतात येत राहिला. बापूंना भेटतही राहिला. बापू त्याच्याशी आत्मियतेनं वागले, पण त्यांच्या मनातली त्याच्याविषयीची अढी कधी गेली नाही. एकदा तो त्यांना म्हणाला, ‘बापू, तुम्ही आमचे लाड कधी केले नाहीत. आम्हाला कपडे धुवायला लावले. लाकडं फोडायला लावली. बागकाम आणि स्वयंपाकही आमच्यावर लादला. आता मात्र तुम्ही बदलला आहात. आश्रमात नव्यानं आलेल्यांचे तुम्ही लाड करताना दिसता.’
बापू त्यावर खळाळून हसले आणि मुलांना म्हणाले, ‘अरे, बघा हा मणीलाल काय म्हणतो ते.’ मात्र मणीलाल तेवढ्यावरही त्याचा संयम सांभाळून जगला. हरिलालला ते जमले नाही. त्याचं धुमसणं सुरूच राहिलं. त्याची पत्नी १९१८ मधे वारली. तेव्हा त्याच्या दुसर्या विवाहाला गांधींनी विरोध केला. मग तो दारूच्या आहारी गेला. त्या नशेत तो बापूंना शिवीगाळ करू लागला.
धर्मांतर करून तो अब्दुल्ला झाला. मुस्लिम लीगने त्याला पक्षात घेऊन गांधींविरुद्ध सभा घ्यायला उभं केलं. पुढं बाच्या मृत्यूच्या काळात सरकारनं त्याला पकडून बांच्या भेटीला आणलं. तेव्हाही तो प्यायलेलाच होता. पाचच मिनिटात त्याला बांपासून दूर केलं गेलं. बांचा जीव मात्र त्याच्यासाठी अखेरपर्यंत तळमळत राहिला. आमच्या शिस्तीमुळे तो बिघडला याची खंत त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिली.

[08/08, 08:33] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#66
महात्मा आणि बापू या दोन भूमिकांतला समतोल गांधींना साधता आला नाही हे कस्तुरबाईंचं दु:ख होतं. मुलांचे खास करून हरिलाल आणि मणिलाल यांचे हाल झाले. हरिलाल तर वडिलांशी वैर धरून बसला. हे कस्तुरबाईंना फार लागलं.
एकदा गांधी आणि कस्तुरबाई जबलपूर मेल गाडीनं प्रवास करत होते. कटनी स्टेशनाला गाडी लागली. खूप लोक आले. गांधींचा जयजयकार सुरू झाला. त्या गर्दीतून वाट काढत हरिलाल तिथं आला. आणि त्यानं ‘माता कस्तुरबा की जय’ असा नारा दिला. बापूंचं लक्ष गेलं. त्याचं उतरलेलं नि भकास रूप पाहून कस्तुरबा रडू लागल्या. हरिलालनं झोळीतून एक संत्रं काढलं आणि आपल्या आईला दिलं.
‘मला नाही का देणार संत्रं?’ गांधींनी विचारलं.
‘नाही. तुम्ही आज जे आहात ते माझ्या बामुळे,’ एवढं बोलून ‘माता कस्तुरबा की जय’ म्हणत म्हणत हरिलाल गर्दीत मावळला. मुलगा जेवला असेल की नाही या काळजीनं कस्तुरबाईंचा जीव कासावीस झाला होता.
आपल्यासमोर जे आलं ते आपलं मानावं नि जे गेलं ते जाऊ द्यावं या भारतीय जीवनसंस्कारातून कस्तुरबाईंनी बळ घेतलं.
गांधींचं आपल्या बायकोवर निस्सीम प्रेम होतं. मुलगा देवदासचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. प्रसूतीच्या वेळी डॉक्टर मिळेना तेव्हा गांधींनी एखाद्या कसबी सुईणीप्रमाणे कस्तुरबाईंचं बाळंतपण केलं.

[11/08, 09:09] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#67
वय वाढत गेलं तसे गांधी आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत मऊ झाले. लहानग्यांशी दंगामस्ती करू लागले. कस्तुरबाईंशी थट्टा-मस्करी चालायची. अनेकदा गांधी कस्तुरबाईंच्या केसातून हात फिरवायचे तर कधी त्यांच्या पिचक्या गालावर हलकी चापटी मारायचे. ते जेवायला बसले की कस्तुरबाई त्यांच्या शेजारी बसून असायच्या. त्यांच्याकडे एकटक पाहात.
दोघं आगाखान तुरुंगात स्थानबद्ध होते. तिथं गांधींच्या डॉक्टरांना कुणीतरी 29 आंबे पाठवले. त्या दिवशी डॉक्टरसाहेबांच्या लग्नाचा एकूणतिसावा वाढदिवस होता. कस्तुरबाईंनी गांधींना हळूच विचारलं, ‘आपल्या लग्नाला किती वर्षं झाली हो?’ गांधी खळखळून हसले नि म्हणाले, ‘चला. म्हणजे आता मीसुद्धा तुला आंबे पाठवायचे की काय?’

[16/08, 07:52] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#68
सरलादेवी चौधुरानी या सुसंस्कृत, कलासक्त बंगाली स्त्रीकडे गांधी काही काळ-- खरं तर अगदी अल्प काळ-- आकृष्ट झाले होते. हा चित्तवेधक प्रवेश १९१९-१९२० या काळातला. सरलादेवींशी आपलं आध्यात्मिक मीलन व्हावं असं आपल्याला वाटतं, असं गांधींनी तेव्हा लिहिलं होतं. पण होतं सगळं फार संदिग्ध.
एका पत्रात ‘तुम्ही माझ्या स्वप्नात येता. तुम्ही शक्तीचं स्वरूप आहात,’ वगैरे मजकूर गांधींनी सरलादेवींना लिहिला होता, असं राजमोहन गांधी यांनी ‘मोहनदास’ या ग्रंथात नमूद केलंय.
महादेवभाई देसाई, सी.राजगोपालाचारी, गांधींचे एक नातलग मथुरादास त्रिकमजी यांनी बापूंची बरीच समजूत काढली. राजाजींनी आपल्या पत्रात ‘सरलादेवी आणि कस्तुरबा यांची तुलना होऊ शकत नाही’ असं गांधींना निक्षून सांगितलं. ‘कुठे सकाळचा सूर्य आणि कुठे घासलेटचा दिवा?’ असंही विचारलं.
अखेरीस गांधींच्या मुलानं, देवदासनं वडिलांना सवाल केला- ‘तुमच्या अशा वागण्यामुळे आईच्या मनाला किती यातना होतील याचा विचार केलाय काय?’ हे ऐकल्यावर गांधींनी सरलादेवी प्रकरणावर पडदा पाडला.

[17/08, 10:03] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#69
एकदा सेवाग्रामात कस्तुरबाई आजारी पडल्या. गांधी न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांची विचारपूस करायचे. एके दिवशी या क्रमात खंड पडला. कस्तुरबाई रुसल्या. दुसर्या दिवशी सकाळी बापू आपल्या पत्नीच्या कुटीत दाखल झाले. त्या घुम्मच होत्या.
‘कसं वाटतंय तुला?’ गांधींनी विचारलं.
‘तुम्हांला कशाला पर्वा माझी? तुम्ही महात्मा ना? तुम्हांला सगळ्या दुनियेची काळजी. मी पडले बापडी,’ कस्तुरबाईं घुश्शात म्हणाल्या.
‘तुलासुद्धा मी ‘महात्मा’ वाटतो?’ गांधींनी हसत हसत कस्तुरबाईंना विचारलं आणि त्यांच्या केसातून हात फिरवू लागले.

[18/08, 07:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#70
कैकदा गांधींच्या ‘महात्मापणा’चे चटके कस्तुरबाईंना बसायचे. अशा वेळी त्या गप्प बसायच्या नि नवर्याची बोलणी ऐकून घ्यायच्या. एकदा त्यांचा मुलगा रामदास प्रवासाला निघाला. कस्तुरबाईंनी त्याला खाऊचा डबा करून दिला. ते पाहून गांधी चिडले. म्हणाले, ‘आश्रमातली सगळी माणसं आपल्याला सारखीच आहेत. मग रामदासचे असे लाड कशाला करायचे?’
कस्तुरबाईं म्हणाल्या, ‘आश्रमातल्या सगळ्यांना मी आपलं मानतेच, पण रामदास हा माझा पोटचा गोळा आहे.’ यावर गांधी त्यांना आणखी बरंच बोलत होते. त्या गप्प ऐकत होत्या. एरवीदेखील त्या फार बोलत नसत. ‘बस एक चुप-सी लगी है, नहीं उदास नहीं’ एवढंच होतं कस्तुरबाईंचं म्हणणं. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधींनी १९०६ मधे ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं. हा त्यांचा एकतर्फी निर्णय होता. तो त्यांनी कस्तुरबाईंना कळवला. तेव्हादेखील त्या एक चकार शब्द बोलल्या नाहीत.

[19/08, 10:08] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#71
एकेकदा वाटतं की गांधींनी सगळं अवघड करून टाकलं होतं. इतकं टोकाला कशाला जायचं? चमचमीत खाऊ नका; साधं, पौष्टिक अन्न घेत चला एवढं म्हटलं तरी चाललं असतं. गांधी एकदम अ-स्वादव्रताची थोरवी सांगू लागले. आश्रमात बिनमिठाचं, बिनतिखटाचं जेवण असायचं. मीठ-मसाल्याशिवाय भोपळ्याची भाजी मिळमिळीत लागायची. घशाकडे अडकायची. ती खाल्ल्यावर काही स्त्रियांचं पोट बिघडायचं.
एकदा काही स्त्रियांनी बापूंच्यी अळणी, मिळमिळीत भोपळ्यावर गरब्याचं गाणं रचलं नि ते खणखणीत स्वरात गाऊन दाखवलं. या निषेध-गीतात कस्तुरबाई सामील झाल्या होत्या. मग बापूंनी भोपळ्याबद्दलचे नियम बरेच शिथिल केले.
कस्तुरबाई सोज्वळ आणि सोशिक होत्या, पण गिळगिळीत नि पिळपिळीत नव्हत्या. जो सोसतो तो आतून टणक होतो हे सत्य कस्तुरबाईंच्या जगण्यात मुरलं होतं.

[21/08, 08:28] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#72
गांधी १९१८ च्या जुलैत डिसेंट्रीनं खूप आजारी होते. बरेच औषधोपचार झाले, पण फारसा फरक पडत नव्हता. निर्जंतुक अंडी खा, असं डॉक्टरनं सुचवलं. गांधींनी ठाम नकार दिला. इंजेक्शनला नको म्हणाले. गाईचं दूध तरी प्या ही डॉक्टरांची सूचनादेखील त्यांनी फेटाळून लावली. गाईच्या दुधावर तिच्या वासराचाच हक्क आहे, असं ते म्हणायचे. दरम्यान, त्यांची तब्येत ढासळत होती. गांधी निरवानिरवीचं बोलू लागले.
कस्तुरबाई हवालदिल झाल्या. अगदी निकराच्या क्षणी त्यांना बकरीच्या दुधाचा पर्याय सुचला. त्यांनी गांधींची बरीच समजूत काढली. अखेरीस गांधींनी पेलाभर बकरीचं दूध घेतलं. आणि दुखण्यातून बरे झाले. अखेरपर्यंत शेळीचं दूध घेत होते.
बायकोच्या आग्रहाला आपण बळी पडलो कारण मनात जगण्याची, जनसेवेची जबरदस्त ओढ होती, असं गांधींनी नंतर म्हटलं. या प्रसंगावर थोर पत्रकार आणि गांधींचे चरित्रकार लुई फिशर यांनी ‘द लाइफ ऑफ महात्मा गांधी’ या आपल्या रसाळ ग्रंथात फार मार्मिक भाष्य केलंय. फिशर म्हणतात:
Gandhi feared neither man nor government, neither prison nor poverty nor death. But he did fear his wife. Perhaps it was fear mixed with guilt; he did not want to hurt her; he had hurt her enough
आपण कस्तुरबाईंना चांगलं वागवलं नाही, अशी कायम रुखरुख गांधींना होती. ११ ऑगस्ट १९३२ ला आपल्या मुलाला, रामदासला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात-
‘मी तुमच्या आईकडे जसं वागलो तसं तुम्ही कुणीही आपल्या बायकोकडे वागू नये. ती माझ्यावर रागावू शकत नव्हती, पण मी तिच्यावर पुष्कळदा संतापायचो. मी स्वत:ला भरपूर स्वातंत्र्य बहाल केलं, तेवढं तिला दिलं नाही.’

[22/08, 07:23] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#73
तुकारामांच्या संन्यस्त वृत्तीचा त्यांच्या बायकोला मनस्ताप झाला हे खरं असलं म्हणून तुकाराम महाराजांचं श्रेष्ठपण तसूभरदेखील कमी होत नाही. थोरपण हे आख्खं पॅकेज असतं. ते तसंच्या तसं स्वीकारावं लागतं. कस्तुरबाईंनी गांधी नावाचं पॅकेज विनातक्रार स्वीकारलं.
दुसरं, समानतेचं मूल्य मानणार्या सामाजिक चळवळींत थोरपणाला जागा नसते. एकाला थोरपण बहाल का करावं? अन् समजा केलं तर तो/ती इतरांवर अन्याय करणारच नाही याची गॅरंटी काय हे आजचे प्रश्न आहेत. तेव्हा हल्लीचे नियम लावले तर गांधी-कस्तुरबाई हे काय गौडबंगाल होतं ते आपल्याला समजणार नाही.
हल्लीचा आणखी एक विचार. समाजाचं भलं करण्यात वेळ, पैसा आणि शक्ती घालवण्यापेक्षा माणसानं आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची काळजी घ्यावी असा मानणारा एक मोठा वर्ग आपल्याकडे तयार झालाय. हा तद्दन स्वार्थी विचार जागतिकीकरणानंतर सुशिक्षित, बुद्धिवादी मध्यमवर्गीयांत बराच लोकप्रिय आहे.
खरं तर आजचा मध्यमवर्ग आपल्या मुलाबाळांपुरतंच पाहात असतो. आपल्या कुटुंबाला भरपूर नी महागड्या सुखसोई मिळाव्यात, आपली पुढची पिढी परदेशात शिकावी म्हणून अहोरात्र झटत असतो. तरीही दुभंगलेल्या आणि दु:खी कुटुंबाच्या संख्येत वाढच होतेय. कैक घरांत आई-वडील आपल्या मुलांसमोर हतबल झालेले असतात. असं का होतंय?
कस्तुरबाईंनी फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार केला असता तर गांधींचं एकही मोठं काम उभं राहिलं नसतं.
गांधी आयुष्यभर प्रत्येक मनुष्यात देव शोधत होते.
कस्तुरबाई आयुष्यभर गांधींतल्या माणसाशी लपंडाव खेळत होत्या.
दोघं सुखी झाले.

[23/08, 08:48] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#74
*बापूंच्या मांडीवरच घेतला अखेरचा श्वास*
‘चले जाव’ची १९४२ ची घोषणा झाल्यानंतर बांना बापूंसोबत आगाखान पॅलेसमधे आणले गेलं. तिथं त्या बापूंच्या सेवेत रमल्या असतानाच त्यांचा अखेरचा आजार उसळला. आपल्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली, तेव्हा त्या क्षेत्रातले नामांकित डॉक्टर्स तेथे बोलावले गेले. पण आजार बळावत गेला.
अखेरच्या काळात देवदासनं त्यांच्यासाठी तेव्हा नुकतंच प्रचारात आलेलं पेनीसिलीनचं महागडं इंजेक्शन आणलं. पण ते लावू द्यायला बापूंनी नकार दिला. आता अखेरच्या काळात तिच्या देहाला वेदना नकोत, असं ते म्हणाले. ब्राँकायटिस आणि हृदयविकार अशा अनेक आजारांनी आणि तुरुंगवासातील कष्टप्रद जीवनानं जर्जर झालेल्या बांनी अखेर २२ फेब्रुवारी १९४४ ला सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी बापूंच्या मांडीवर डोकं ठेवून अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या जाण्यानं गांधीजी कोलमडलेच. बांचं शव ठेवलेल्या दालनाच्या एका कोपर्यात दोन्ही पाय पोटाशी घेऊन मूकविलाप करणार्या बापूंचं चित्र पाहणार्यांचे डोळे आजही ओलावणारे आहेत. आयुष्याचा मध्यबिंदू आणि विसावा हरवल्याचा अनुभव घेतलेल्या आणि काहीसं डगमगलेल्या अवस्थेतच बापूंनी बांना निरोप दिला. पुढचा त्यांचा प्रवास देशाच्या सहवासातला राहिला.

[24/08, 08:18] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*गांधीजी व कस्तुरबा*
#75
आगाखान पॅलेसमध्ये नजर कैदेत असताना २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सार्वजनिक ठिकाणी करायला सरकारने परवानगी नाकारली. निवडक निकटवर्तीयांना हजर राहण्यास परवानगी दिली. गांधीजीनी महादेवभाईच्या समाधी शेजारीच बांची दहनक्रिया करायचे ठरविले. जेलर कटेली यांनी बांच्यासाठी शुद्ध खादी मागविली. गांधीजी म्हणाले ' मी उगाचच खादी जाळू इच्छित नाही. ती गरीबांना कामाला येईल.'
श्रीमती ठाकरसी यांनी चंदनाची लाकडे आणायची का असं विचारल्यावर गांधीजी म्हणाले ' जर मी गरीबाला चंदनाच्या लाकडावर अग्नी देउ शकत नाही तर बा ला कसं देणार ? ती ज्याची पत्नी आहे तो स्वत:ला गरीबातील गरीब मानतो. कसं जाळू चंदनाच्या लाकडावर ?'
साभार – विजय तांबे

[25/08, 10:34] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#76
गांधी हा माणूस कधीही नीट समजावून घेतला गेलेला नाही, प्रतिगाम्यांकडूनही नाही आणि पुरोगाम्यांकडूनही नाही. विलक्षण गुंतागुंत असणारं हे व्यक्तिमत्त्व आहे. कुणी असं म्हणतं की, हा ‘संतांमधला राजकारणी’ होता; कोणी असं म्हणतं की, हा ‘राजकारण्यांमधला संत’ होता. दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. दुसरं म्हणजे सातत्यानं प्रवाही असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणं जरा अवघडच असतं. आयुष्याबद्दलची, आयुष्यातील घडामोडींबद्दलची, राजकारणाबद्दलची, समाजकारणाबद्दलची ज्यांची मतं ठाशीव असतात, ठरीव असतात, जी काळ बदलला तरी बदलत नाहीत, अशा विचारवंताचा अभ्यास करणं तुलनेनं सोपं असतं. कारण ठरीव मत असल्यामुळे ते नंतर काय बोलले हे पाहावं लागत नाही. त्या ठरीव मतांसाठीच ते प्रसिद्ध असतात. दुर्दैवानं गांधी याला अपवाद आहेत. खरं तर सुदैवानं म्हणायला पाहिजे.
गांधी हे अत्यंत प्रवाही असणारं व्यक्तिमत्त्व आहे. मी थोडं अतिशयोक्त विधान करतो आहे असं वाटत असेल, पण माझी खात्री आहे हे विधान बरोबर आहे. मला स्वतःला असं वाटतं की, विसाव्या शतकानं पाहिलेला हा जगातला एकमेव आणि धैर्यवान माणूस आहे. कारण आपलं आयुष्य इतक्या खुलेपणानं, इतक्या पारदर्शक पद्धतीनं लोकांसमोर ठेवण्याचं धाडस जगातल्या भल्या भल्या मंडळींनासुद्धा झालेलं नाही. आपल्या आयुष्यातल्या चुका कुठेतरी आपल्याला कुरतडत असतात, खात असतात. त्यामुळे आत्मचरित्र लिहिणारी माणसंसुद्धा सगळं सांगतात असं नाही. काही राखून ठेवतात. कारण त्या चुकांचा एक गिल्ट तयार झालेला असतो. गांधींच्या बाबतीत असं काहीही आपल्याला दाखवता येत नाही. ज्याला आपण आरसा म्हणतो तसा हा माणूस त्याच्या लेखनात दिसतो, बोलण्यात दिसतो, आत्मचरित्रात दिसतो, त्याच्या पत्रव्यवहारातही दिसतो. त्यात कुठेही दुभंगलेपणा नाही.
ही विलक्षण धैर्याची गोष्ट असल्यामुळे मी म्हटलं की, हा एकमेव धैर्यवान माणूस विसाव्या शतकानं पाहिला. त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती... दुबळं असण्याची नाही, कृश असण्याची नाही, आपल्याला जगभर पाठिंबा मिळेल की नाही याची नाही.
( _एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि युसुफ मेहेरअली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी १५०’ निमित्त २२, २३ आणि २४ एप्रिल २०१७ दरम्यान एक अभ्यास शिबीर घेण्यात आलं होतं. त्याच्या सहाव्या सत्रात बेडकीहाळ यांनी ‘म. गांधी : समज आणि गैरसमज’ या विषयावर केलेल्या भाषणाचा संपादित भाग..._)
(शब्दांकन - विजय तांबे)
लेखक *किशोर बेडकीहाळ* ज्येष्ठ अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आहेत.

[26/08, 08:27] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#77
‘कोणत्याही वादग्रस्त विषयाच्या संदर्भामध्ये माझं शेवटचं म्हणणं प्रमाण माना’ हे म्हणणं कधीच सोपं नसतं. ‘शेवटचं म्हणणं’ याचा अर्थ पहिलं काहीतरी आपलंच खोडून काढायचं. कारण वेळोवेळी ते बदलत गेलेले आहेत. परिस्थितीच्या रेट्यानं त्यांच्यात बदल झालेला आहे. आंबेडकरांसारख्या एका अत्यंत बुद्धिमान प्रतिस्पर्ध्यामुळेही त्यांना बदलावं लागलं आहे.
बदल हा त्यांच्या आयुष्यातील एक स्थायीभाव आहे. आपल्या सगळ्यांची अडचण अशी आहे, विशेषतः गांधींच्या टीकाकारांची अडचण अशी आहे की, ते एका विशिष्ट गांधींबद्दलच बोलतात. म्हणजे गांधी जातीयवादी आहेत, धर्मवादी आहे असं म्हणणारे लोक गांधींच्या १९१५-१६ सालच्या विधानांच्या आधारे बोलत असतात. त्याच्यानंतर ते १९४८ सालापर्यंत जगले हे त्यांच्या गावीही नसतं. त्यांनी मुसलमानांचा अनुनय टोकापर्यंत केला, त्यामुळे फाळणी झाली हे तर आजतागायत बोललं जातं.
या माणसाची आणखी दोन वैशिष्ट्यं आहेत, ज्याच्यामुळे आपल्यासारख्यांची पंचाईत होते. हा माणूस वेळोवेळी आपल्या चुकांची कबुली देई. एवढ्या मोठ्या माणसाला एखाद्या प्रश्नाविषयी आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या किंवा लहान असणाऱ्या माणसाला सल्ला विचारायची लाज वाटत नव्हती.
गांधींचं वैशिष्ट्य हे होतं की, त्यांच्याभोवती अशा माणसांचा गराडा होता, ज्यांची जगातल्या नाना विषयांत तज्ज्ञता होती. उदाहरणार्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. त्यांच्याशी गांधी धर्मशास्त्राबद्दल चर्चा करत असत. असे अनेक लोक होते की, ज्यांच्याशी बोलायला गांधींना कधी कमीपणा वाटला नाही. कुठेतरी आपल्या आकलनात कमतरता आहे याची जाणीव असलेला हा नेता होता. नेत्याला नेहमी असं वाटत असतं की, माझं आकलन परिपूर्ण आहे आणि माझ्यानंतर दुसरं कोणाचं आकलनच असू शकत नाही. अशा प्रकारची भूमिका गांधींनी कधीही घेतली नाही. चुकांची कबुली ते सतत देत गेले.

[27/08, 08:19] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#78
हौतात्म्याच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक क्षणी सत्याग्रहीनं मरणाची तयारी ठेवावी लागते, असं गांधींचं एक वाक्य आहे. सत्याग्रहीला फक्त मरणाचंच संरक्षण असतं असं ते म्हणत. ते त्यांनी स्वतःलाही लावून घेतलं होतं. आयुष्यात सगळ्यात बदनाम होण्याचा कालखंड त्यांच्या वाट्याला आला तो नौखालीच्या दरम्यान, त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये. विशेषतः त्यांचे जे ब्रह्मचर्याचे प्रयोग आहेत त्या संदर्भामध्ये. सबंध काँग्रेस वर्किंग कमिटी नाराज होती. एका बाजूला जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आहेत आणि गांधी ब्रह्मचर्याचे प्रयोग करताहेत. हे काय चाललंय, यातून बदनामी पलीकडे काय होणार, असं सगळं बोललं जात असताना स्वतःच्या आत्मबळाची परीक्षा घेणं आणि आपला कमकुवतपणा तपासणं, यासाठी अत्यंत खुल्या पद्धतीनं त्यांनी ब्रह्मचर्याचा प्रयोग केला. त्याबद्दल पुष्कळ आक्षेप घेतले गेले तो नंतरचा भाग. पण इतका खुलेपणा या माणसाच्या जगण्या, बोलण्यात, लिहिण्यात आपल्याला दिसतो. कुठेच लपवाछपवी नाही. त्यामुळे त्यांचं कुठलं विधान प्रमाण मानायचं आणि कुठलं विधान अंतिम मानायचं, या गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार केल्याशिवाय त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. मात्र असं बोलण्याऐवजी समज-गैरसमज पसरवणं सोपं असतं.
एकोणिसाव्या शतकात जन्मलेला, विसाव्या शतकात हुतात्मा झालेला हा माणूस जगात सगळ्यात वंदनीय मानला गेलेला आहे आणि आताच्या कालखंडात आपल्याकडे सगळ्यात निंदनीय मानला जातो. जेवढे प्रशंसक गांधींना भेटले, तेवढेच टीकाकारही भेटले. अनेक अंगांनी गांधींचा अभ्यास झालेला आहे. मानसशास्त्रीय अंगानंसुद्धा. एरिक एरिसनसारख्या माणसानंसुद्धा त्यांचा अभ्यास केला. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे व्यक्तिमत्त्व कसं दिसतं, काय काय कमकुवतपणा त्यांच्यात होता, हे शोधण्याचा प्रयत्न झाला. इतक्या बाजूनं अभ्यास होऊनसुद्धा या माणसाविषयीचं कुतूहल शिल्लक आहे. हे त्यांचं इतर सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळेपण आहे असं मला वाटतं.

[28/08, 08:14] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#79
गांधींनी स्वतःतील उणिवा कळल्यानंतर त्या दूर करण्याचा सतत प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की, जे आपल्यापैकी कोणालाही जमण्याची शक्यता नाही, ते म्हणजे माझ्या मनात ज्या प्रकारचा विचार आहे, भूमिका आहे त्याच्याशी मी स्वतःच्या जीवनात तडजोड करणार नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या विचारप्रणालीशी कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही, पण सार्वजनिक जीवनात त्याबद्दल तडजोड करायला तयार आहे. म्हणजे समाजाच्या पुढे मी एक पाऊल असेल, समाज माझ्या मागे एक पाऊल आला तरी पुरे आहे, एवढ्या मर्यादेत सार्वजनिक जीवनात गांधी तडजोडीला तयार असत, पण स्वतःच्या वर्तनामध्ये मात्र तडजोडीला तयारी नसे. मग तो आफ्रिकेमध्ये असताना कस्तुरबांना मध्यरात्री उठवून बाहेर काढण्याचा प्रसंग असो. आजच्या स्त्रीवादी दृष्टीतून कदाचित ते मोठं गैरकृत्य ठरलं असतं, त्या काळात ४९८कलम असतं तर गांधींवर लागलंही असतं, इथपासून ते अहमदाबादच्या आश्रमातील भूमिकांपर्यंत कुठेही त्यांनी स्वतःची विचारप्रणाली आणि स्वतःचं जीवन यात अंतर ठेवलेलं नाही.
ते स्वत:ला धार्मिक म्हणवत, पण ‘ज्या देवळात अस्पृश्यांना जाता येत नाही, त्या देवळात मी जाणार नाही’ ही त्यांची स्वच्छ भूमिका होती. गांधी म्हणाले होते की, ‘मी तर जाणारच नाही, पण माझ्या परिवारातील व आश्रमातील कोणीही तिथं जायचं नाही.’ ओरिसात जगन्नाथपुरीला काँग्रेसची बैठक संपल्यावर सायंकाळी कस्तुरबा, महादेवभाई देसाई, त्यांची पत्नी हे तिघं जगन्नाथपुरीच्या देवळात गेले. त्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. गांधींनी जाण्याचा प्रश्नच नव्हता. नंतर महादेवभाईंच्या चूक लक्षात आली. गांधी त्यांना असं म्हणाले की, ‘हे सांगायला तू परत आलास, त्याच्यापेक्षा तिथं सत्याग्रह करून मेला असतास तर मला अधिक आनंद झाला असता.’ इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी महादेवभाईंची कानउघाडणी केली आहे.
‘ज्या लग्नामध्ये जोडप्यापैकी एक पार्टनर दलित समाजातील नाही, अशा लग्नाला मी जाणार नाही,’ अशी गांधींची भूमिका होती. हेच कारण देऊन गांधी महादेवभाईंच्या मुलाच्या लग्नाला गेले नाहीत. स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा इतका परखडपणा गांधींकडे होता. आपल्या सगळ्यांची भूमिका बरोबर याच्या उलट असते. आपल्या सगळ्यांना सार्वजनिक जीवनात तडजोड नको असते, पण व्यक्तिगत जीवनात भरपूर तडजोडी हव्या असतात.

[22/09, 21:17] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#80
गांधींनी हा महत्त्वाचा आदर्श घालून दिलेला आहे- ‘मी पुढे जात राहणार आहे या मूल्यांच्या अंगानं, माझ्या मागून तुम्ही या. एक पाऊल आलात तरी मला आनंद आहे.’ म्हणून इतकं खुलं जीवन लोकांसमोर असल्यानंतर अशा माणसाबद्दल खरं तर गैरसमज व्हायला नको आहेत. पण ते आहेत. याचाच अर्थ गैरसमज होतात, त्याच्यामागे विशिष्ट हितसंबंध कार्यरत असतात, त्याशिवाय ते होणार नाहीत.
गांधींनी सगळ्या भारतीयांसाठी सत्याग्रहाचं हत्यार उपलब्ध करून दिलं, हे आपल्याला माहीत आहे. सत्याग्रही उभा करण्यामागची भूमिका काय आहे? माणसाकडे असं कोणतं बळ असतं की, जे म्हटलं तर कोणाला नाहीसं करता येत नाही आणि ते जागं झालं तर त्या माणसाला थांबवता येत नाही? आत्मबळ. गांधींच्या वाङ्मयात ‘आत्मबळ’ या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे. म्हणजे ते आत्मबळ एकदा जागं झालं तर त्याला शस्त्राची गरज नसते. त्या आत्मबळाची तेजस्विता जेव्हा प्रगट होते, त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या प्रखर प्रतिकाराला माणूस तयार होतो. हे आत्मबळ जागं करणं गांधींच्या सगळ्या आयुष्यभराच्या कार्यक्रमाचा मूलभूत गाभा आहे.
प्रत्येक माणसाचं आत्मबळ जागं झालं पाहिजे. तुम्ही शस्त्र द्याल, पण लढणारं मन देऊ शकत नाही. तेव्हा लढणाऱ्या मनाला आत्मबळ असल्याखेरीज शस्त्राचाही उपयोग नाही. आत्मबळ जागं झालं तर शस्त्राची गरजही नाही.
म्हणून हे आत्मबळ जागं केलेल्या माणसांना लढाईत आणतानाही त्यांनी काही पथ्यं पाळली. प्रत्येक आंदोलनाच्या आधी गांधी काही कसोट्या लावत असत. (याला फक्त १९४२चं आंदोलन अपवाद आहे.) कसोट्या असत- आंदोलनाला पात्र आहे का? सत्याग्रह कळला आहे का? सर्वांशी प्रेमानं वागावं ही भूमिका सत्याग्रहींच्या अंगी बाणली गेली आहे का? ब्रिटिशांचा द्वेष करत नाही आहे ना? कारण त्यांच्या सत्याग्रही असण्यामध्ये द्वेषाचा कुठे मागमूस नाही. सत्याग्रह कोणा व्यक्ती विरुद्ध नसून व्यवस्थेविरुद्ध आहे. त्यामुळे ब्रिटिशांचासुद्धा द्वेष होता कामा नये, कुठल्याही ब्रिटिश व्यक्तीला इजा होता कामा नये, ते इथं राहतील तोपर्यंत आनंदानं आणि प्रेमानंच आपण त्यांच्याशी राहिलं पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेबद्दल आपल्याला राग आहे आणि तो सत्याग्रहामार्फत आपल्याला व्यक्त करायचा आहे. त्यामुळे प्रेम हा सत्याग्रहीच्या आयुष्याचा, लढाईचा पाया असला पाहिजे. या प्रेमाधारे जे आत्मबळ होईल, ते सत्याग्रहीला क्लेष सोसण्याची ताकद देतं. आणि क्लेष कुठपर्यंत सोसायचे तर गांधींनी त्याची कसोटी सांगितली आहे. हे क्लेष सोसण्याची शेवटची कसोटी मरणाची आहे. सत्याग्रहीनं कोणतंही संरक्षक कवच घ्यायचं नाही, मरण हे त्याचं अंतिम संरक्षक कवच आहे.
म्हणून अशा मरणाची तयारी असणारा, प्रेममय दृष्टीनं सगळ्यांकडे पाहणारा, स्वतःच्या आत्मबळाच्या आधारे पुन्हा पुन्हा उभा राहणारा असा माणूस लढवय्या होता. ‘माझ्यावर हात उगारला तरी चालेल, पण मी हात उगारणार नाही’ असं म्हणत सत्याग्रहाच्या तंत्रामध्ये गांधींनी प्रयोगशीलता आणली होती.
१९३०च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी असं लक्षात आलं की, आंदोलनात तोच तोचपणा यायला लागला. गांधींनी ताबडतोब तंत्र बदललं आणि मिठाच्या गोदामांवर धाडी घालायला सुरुवात केली. मग सत्याग्रही रोजच मार खायला लागले. काल सायंकाळी ज्यांनी मारामुळे पट्ट्या बांधल्या होत्या, तेच लोक पुन्हा आंदोलनात यायला लागले. तेव्हा मारणाऱ्यांनाच लाज वाटायला लागली. हा गांधींनी ३०च्या आंदोलनात केलेला प्रयोग होता.
(_एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि युसुफ मेहेरअली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी १५०’ निमित्त २२, २३ आणि २४ एप्रिल २०१७ दरम्यान एक अभ्यास शिबीर घेण्यात आलं होतं. त्याच्या सहाव्या सत्रात बेडकीहाळ यांनी ‘म. गांधी : समज आणि गैरसमज’ या विषयावर केलेल्या भाषणाचा संपादित भाग..._)

[24/09, 19:20] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#81
गांधींनंतरचं किंवा आजचं नेतृत्व कशावर खूश असतं, तर प्रतिसाद किती मिळतो यावर. एकच माणूस सगळ्या जगभर टीव्हीवर दिसणार. त्या माणसाला बरं वाटतं की, आपल्याशिवाय कोणी नाही. इतका प्रतिसाद मिळाला, इतके लोक आपल्या पाठीमागे आहेत. याची गांधींना बिलकूल तमा नव्हती. ही त्यांची कसोटी नव्हती. एका जरी माणसाकडून ब्रिटिशांची हानी झाली, इजा झाली, द्वेष झाला तर त्याक्षणी टिपेला गेलेलं आंदोलन मागे घेण्याची हिंमत असलेला हा एकमेव नेता होता. हे चौरीचौराच्या वेळी त्यांनी केलं होतं.
दुसऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलंत तर असं दिसेल की, गांधी राजकीय स्वातंत्र्याची लढाई स्वराज्यासाठी लढत होते. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होणं एवढ्या मर्यादित उद्दिष्टाशी गांधींची लढाई नव्हती. ती स्वराज्यासाठी होती. इतर बाकी सगळे पक्ष स्वराज्य मिळालं की, तिथंच थांबणार होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी पुढचे मुद्दे महत्त्वाचे नव्हते. गांधींसाठी ती एक स्वराज्याची पूर्वअट होती. स्वराज्याची शर्त कोणती तर स्वातंत्र्य. म्हणून स्वातंत्र्यलढा हा गांधींच्या आयुष्यातला एक टप्पा आहे... साधारण १९१९पासून सुरू होऊन १९४७साली संपलेला.
याच्यापलीकडेही गांधी आहेत. १९१९ ते १९२२, ३०, ३२, ४२ नौखाली, बिहार, कलकत्ता हा गांधींच्या लढ्यांचा काळ. मधल्या काळात गांधींचं स्वराज्याची पायाभरणी कशा पद्धतीनं करता येईल, त्याच्या रचना कशा असतील, त्याच्या संस्था कशा असतील याचं काम चालू होतं. पण या सगळ्या संस्था अशा रीतीनं बांधल्या जात असत की, स्वातंत्र्याच्या लढ्याचा जर निर्णायक क्षण आला तर या सगळ्या संस्था मोडून लोक आंदोलनात येऊ शकले पाहिजेत. ४२ सालचा जो लढा झाला, त्यावेळी गांधी चार दिवस आधी सर्वोदयी कार्यकर्त्यांसमोर बोलताना असं म्हणाले होते की, ‘मी आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये माणसं पारखून घेतली, कसोट्या लावल्या. यावेळी मी कसोटी लावणार नाही. तुम्ही स्वतंत्र आहात असं समजून वागायचं. आतापर्यंतच्या आंदोलनात मी हिंसा-अहिंसा असा विवेक केला, आता तोही विवेक या आंदोलनापुरता करणार नाही. तुम्हाला जे जे या देशाला स्वतंत्र करण्यासाठी करता येईल, ते ते करा.’ पुढे ते असं म्हणाले की, ‘सर्वोदय संस्था या क्षणाला आंदोलनात आल्या नाहीत, तर त्यांचं आयुष्य व्यर्थ आहे.’ संस्था निर्माण करायच्या पण त्यांच्यात अडकून पडायचं नाही. स्वातंत्र्यासाठी त्या संस्था मोडायची पाळी आली तर मोडल्या पाहिजेत. पुन्हा नव्यानं उभ्या केल्या पाहिजेत, ही त्यांची दृष्टी होती. तिथं त्यांनी हिंसा-अहिंसेचा मुद्दा केला नाही.

[01/10, 08:13] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#82
आपण सत्याग्रहासंदर्भात बोलत आहोत तर हिटलर-मुसोलिनीच्या संदर्भामध्ये याचं काय झालं असतं याचा विचार करू. सत्याग्रहीची मूलभूत भूमिका अन्यायाविरुद्ध लढणं, अन्याय्य कायदा तोडणं, प्रसंगी मरण पत्करणं. ज्यावेळी आपण असं म्हणतो हिटलर आणि मुसोलिनीनं गोळ्या घातल्या असत्या, तुम्हाला उभंच राहू दिलं नसतं. त्याचा एक अर्थ असा आहे की, नसतं राहू दिलं, पण आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न केला असता. गांधींच्या लेखी किती लोकांनी सत्याग्रह केला हा मुद्दा नव्हता, कशासाठी केला हा मुद्दा असे. राज्यकर्ता सुसंस्कृत आहे का खुनशी आहे हे बघून सत्याग्रही उभा राहात नाही. तो अन्यायाच्या विरोधात उभा राहतो. अन्याय करणारे इंग्रज असतील नाहीतर हिटलर-मुसोलिनी.
दुसरं मरणापर्यंत जाण्याच्या वेळेपर्यंत सत्याग्रही व्यक्तीचं रूपांतर आत्मबळाचं तेज लाभलेल्या एका संपन्न माणसाच्या व्यक्तिमत्त्वात झालेलं असतं. तो लढायला उभा राहतो, तेव्हा त्याची भूमिका मरण आलं तर माणूस म्हणून मरण्याची असते.

[02/10, 07:52] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#83
गांधींमध्ये काय काय बदल झालेत पहा. ३२नंतर गांधी अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात जास्त आग्रही आणि आक्रमक झाले होते. काँग्रेसच्या सभासदत्वाचं जोखड तोडल्यामुळे पूर्णवेळ ते अस्पृश्यता निवारणाला घालवायला तयार झाले आहेत. या काळामध्ये गांधींनी देवळं मुक्त करा, अस्पृश्यांचा शाळाप्रवेश, शिष्यवृत्त्या, त्याचा फंड याकडे लक्ष केंद्रित केलं. म्हणजे ते या कार्यात आणखी आक्रमक झाले. ३२ पूर्वी निवडक सत्याग्रहांना गांधींनी पाठिंबा दिलेला आहे. ही गांधींची भूमिका ३२नंतर सुटलेली आहे. आंबेडकरांच्या दबावाचा भाग असेल आणि आंबेडकरांबाबत काय घडलं बघा. ३३-३४पर्यंत सत्याग्रही पद्धतीनं देऊळ प्रवेश करा. आता यापुढे सत्याग्रहाची आंदोलनं नाही, यापुढे संसदीय राजकारण असं आंबेडकर म्हणतात. म्हणजे आंबेडकर ज्यावेळेला संसदीय राजकारणाकडे आक्रमकरीत्या गेले, त्यावेळेला गांधी अस्पृश्यता निर्मूलनाकडे अधिक अग्रक्रमानं वळले. हे कशातून निर्माण झालं, तर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया आहेत याच्यातून दोघेही घडत गेले. म्हणून असं मानलं जातं की, गांधींच्या महात्मा बनण्यामध्ये आंबेडकरांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आंबेडकरांनी गांधींना बदलवलं.
तीच गोष्ट धर्मांतराबद्दलची आहे. गांधींना धर्मांतराची कल्पना अमान्य होती. घटनासमितीत याची चर्चा झाली, त्यावेळी धर्मांतराचं स्वातंत्र्य मान्य करावं लागलं. धर्मांतराच्या संदर्भातली जी उपसमिती होती घटनासमितीची, त्याचे अध्यक्ष सरदार पटेल होते. पटेलांच्या समितीनं धर्मांतराचा हक्क मान्य केलेला आहे.

[25/02, 07:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
२३२. एक पत्र
जून १०, १९४७
ईश्वरप्राप्तीकरिता माणसाला तीर्थयात्रेकरिता जावे लागत नसते वा आपल्या दैवतासमोर तुपाने भरलेले दिवे लावावे लागत नसतात की सुगंधी ऊदबत्तीचा धूप जाळावा लागत नसतो की मूर्तीला शेंदूर लावून रंगवावे लागत नसते. कारण ईश्वराचा वास आपल्या हृदयात असतो. आपण जर नम्रपणाने आपल्यामधील देहाची जाणीव पुसून टाकू शकत असू तर आपल्याला त्याचे याची देही याची डोळा दर्शन होऊ शकते.
-------------------
संदर्भ - *महात्मा गांधी संकलित साहित्य, खंड ९५*
[28/02, 07:45] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#86
जो माणूस भीतीमुळे शस्त्र घेऊन फिरतो तो ईश्वराला नाकारतो आणि शस्त्रांना आपला देव करतो.
- महात्मा गांधी, एप्रिल २७, १९४६
_____________
यापूर्वी च्या सर्व पोस्ट वाचण्यासाठी आमचे facebook page fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.
[29/02, 11:56] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#87
*हिंसा कशी थांबवता येईल?*
(याचे मूळ हिंदी मे १९, १९४६ च्या हरिजनसेवकमध्ये प्रकाशित झाले होते.)
_प्रश्न - काही दिवसांपूर्वी सैन्याचा पुण्यातील एक अधिकारी, जो लवकरच इंग्लंडला परतणार होता, म्हणाला की हिंदुस्तानातील हिंसा वाढलेली आहे आणि ती अजून वाढेल कारण लोक अहिंसेच्या मार्गापासून दूर जाऊ लागले आहेत. “तो म्हणाला की आम्हा पश्चिमेकडील लोकांचा हिंसेवर केवळ विश्वासच नाही तर आमची समाजरचनाही त्याच आधारावर झाली आहे. अनेक गुलाम राष्ट्रांनी हिंसेच्या बळावर स्वराज्य मिळवले आहे आणि ते आज शांततेत राहत आहेत. हिंसा थाबवण्याकरिता आम्ही अण्वस्त्रांचा शोध लावला आहे. मागील महायुद्ध याचा पुरावा आहे.” (हिंदी आवृत्तीत या ठिकाणी आहे - “अण्वस्त्राच्या मदतीने आम्ही किती लवकर युद्ध थांबवले हे जगाने पाहिले आहे.”) पुढे तो सेनाधिकारी म्हणाला, “गांधीजींनी तुमच्या लोकांना अहिंसेचा मार्ग दाखवला आहे. परंतु त्यांनी अण्वस्त्रासारख्या अशा एखाद्या शक्तीचा शोध लावला आहे काय ज्यामुळे लोक ताबडतोब अहिंसेकडे वळतील आणि शांततेचे राज्य सुरू होईल? गांधीजींचे ‘अण्वस्त्र’ लोकांना हिसेचा मार्ग सोडण्याकरिता प्रवृत्त करू शकत नाही काय?_
_नंतर ते मला म्हणाले की जनतेवरील आपल्या प्रभावाचा उपयोग करून तिने हिंसेचा विचार पूर्णपणे सोडून गांधीजींच्या धर्माचे पालन करायला लावायला गांधीजींना सांगा. देशात पसरत असलेल्या भयानक हिंसेपासून आज जर ते आपल्या लोकांना परावृत्त करू शकत नसतील तर त्यांना अतिशय दुःखी व्हावे लागेल आणि त्यांचे आजपर्यंतचे सर्व काम वाया जाईल.” (हिंदीत इथे असे आहे - “तुम्ही या ब्रिटिश अधिकाऱ्याची शंका दूर कराल अशी आशा आहे.”)_
उत्तर - या प्रश्नात विचारांचा भरपूर गोंधळ आहे. अण्वस्त्राने हिंसा थांबलेली नाही. लोकांच्या अंतःकरणात हिंसा भरलेली आहे आणि तिसऱ्या महायुद्धाची तयारी सुरू झालेली आहे असे म्हणता येऊ शकेल. ज्याप्रमाणे हिंसेने मानवजातीकरिता जगात शांतता आणली आहे असे म्हणणे मूर्खपणाचे होईल त्याचप्रमाणे हिंसेने काहीही साध्य होत नाही असे म्हणता येऊ शकत नाही.
मला हिंसा थांवता आली नाही तर मला पश्चात्ताप करावा लागेल ही गोष्ट अहिंसेशी जुळू शकत नाही. असे काही अहिंसेत होऊच शकत नाही. कोणताही माणूस हिंसा थांबवू शकत नाही, तसे केवळ ईश्वरच करू शकतो. माणसाला तर तो निमित्तमात्र करत असतो. भौतिक साधने हिंसा थांबवू शकत नाही असे जरी म्हटले तरी हिंसा थांबवण्याकरिता भौतिक साधनांचा उपयोग करू नये वा केला जात नाही असे नाही. भौतिक साधनांनी जरी हिंसा थांबली तरी ईश्वरी कृपेनेच थांबत असते. हं इतके म्हणेन की ईश्वरीकृपा हा रूढ प्रयोग आहे. ईश्वर त्याच्या नियमाप्रमाणे काम करत असतो, आणि यामुळे हिंसासुद्धा त्याच्या नियमाप्रमाणे थांबेल. माणसाला ईश्वरी नियम माहीत नसतात आणि कधीही माहीत होऊ शकत नाहीत. यामुळे आपण जितके काही करू शकतो तितके केले पाहिजे. माझे मत आहे की हिंदुस्तानात अहिंसेच्या प्रयोगाला बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे. यामुळे प्रश्नात उल्लेखिलेल्या नैराश्याला इथे कोणतेही स्थान नाही. अखेरीस अहिंसा जगातील फार मोठा सिद्धांत आहे आणि जगातील कोणतीही शक्ती तो पुसून टाकू शकत नाही. तो आदर्श साध्य करण्याच्या प्रयत्नात माझ्यासारखे हजारो मरू शकतील परंतु अहिंसा कधीही मरणार नाही. आणि अंहिसाधर्माचा प्रसार अहिंसेवर विश्वास ठेवणारांनी अहिंसेकरिता मृत्यू पत्करल्यानेच होऊ शकेल.
सिमला, मे ९, १९४६
हरिजन, मे १९, १९४६
-------------------
*यापूर्वी च्या सर्व पोस्ट वाचण्यासाठी आमचे facebook page fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा*
[02/03, 19:30] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#88
नवी दिल्लीतील प्रार्थना सभेत २३ ऑगस्ट १९४७ रोजी गांधीजी म्हणाले होते:
_"Officers and men in government and in the police force must realise that in their work they are not Hindus,Muslims or Shikhs.They are all Indians bound by to give full protection to afficted people without any regard to the faith of the victims.By being impartial,one does not become less of a Muslim ,or Hindu or Shikh.On the contrary,one becomes better,and more faithful."_
*(Mahatma Gandhi - The Last 200Days-from the pages of The Hindu.)*
आज पुन्हा एकदा गांधींचे हे विचार वाचले आणि केंद्र सरकार ,दिल्ली पोलिस यांनी दिल्लीत काय केले की,ज्यामुळे दंगल ,हिंसाचार झाला,असा प्रश्न पडला.
कालच दिल्ली उच्च न्यायालयाने तेथील पोलिस यंत्रणा काय करते आहे,चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल केलेत का,असे प्रश्न विचारल्यावर आता ती यंत्रणा हालचाल करू लागली आहे.
ज्या बातम्या आपण पाहत होतो,त्यात पोलिस बघे म्हणून अनेक ठिकाणी दिसत होते.कपिल मिश्रा सारखा नेता भडकाऊ भाषण पोलिस मागे पुढे असताना करतो आणि त्याला पोलिस अटकाव करत नाहीत,हे कायद्याचे राज्य आहे? वारीस पठाण यांनी केलेले वक्तव्य किती भयंकर होते!या विखारी नेत्याने साधी दिलगिरी तरी नीट मागितली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दिल्ली पेटली होती.आज सकाळी दंगलीतील मृतांचा आकडा २७ आहे,जखमिंची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.
उच्च न्यायलयाने पोलिस यंत्रणेला बजावले आहे की,१९८४ सारखी स्थिती आम्ही निर्माण होऊ देणार नाही!
फाळणी जाहीर झाली त्या काळात दिल्लीत पंडित नेहरू स्वतः फिरून लोकांना दिलासा देत होते आणि हल्लेखोरांना रोखत होते.आज असे आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडून अपेक्षित नाही.कारण ते फक्त tweet करतात.संवादासाठी,लोकांना दिलासा देण्यासाठी पीडित ग्रस्त वस्तीत जाऊन भेटावे लागते ही भूमिका ते कशी घेतील?तसे केले तर नेहरूंची नक्कल केल्याची टीका काँग्रेस त्यांच्यावर करील.
पण गांधी नेहरूंचा वारसा सांगणारी काँग्रेस तरी काय करते आहे?लोक मेल्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन राजीनामे मागणार?राहुल गांधी invisible आहेत आणि प्रियंका गांधी काही बोलत,भेटत आहेत.आपवरही टीका होते आहे आणि त्यांच्या भूमिकेबाबत शंका येत आहेत!
गेले दोन दिवस वाहिन्यांवर केंद्र सरकारचा चेहरा म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हेच आपद्ग्रस्त परिसरात फिरताना दिसत आहेत.
या परिस्थितीत सर्वसामान्य लोक भरडले जातात आणि पोलिसही त्यांचे गाऱ्हाणे ऐकत नाहीत!सुधा शर्मा यांचे आक्रंदन जे वाहिन्यांवर दिसत होते,काय करू शकतो आपण?
भाजपा ,काँग्रेस,काही संघटना यांच्या राजकारण खेळाचे हे सगळे पडसाद उमटत आहेत आणि हे थांबवा अशीच आपली त्यांना हात जोडून विनंती आहे!
मुल्ला मौलवी,हिंदू धर्म रक्षक संघटना आणि जय श्रीराम चे नारे लावणारे गट या सगळ्यांना बाजूला करून पोलिसांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम केले पाहिजे,ही अपेक्षा आहे.
अरुण खोरे/संपादक- लोकशाहीसाठी समंजस संवाद, पुणे/दि.२७.०२.२०२०
------------------------
यापूर्वी च्या सर्व पोस्ट वाचण्यासाठी आमचे facebook page fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा
[03/03, 09:14] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#89
_माझ्याकरिता अहिंसा धर्म आहे तर कॉंग्रेसकरिता तो धर्म कधीही नव्हता. कॉंग्रेसने अहिंसेचा स्वीकार केवळ धोरण म्हणून केला होता. धोरणानुसार जोपर्यंत आचरण केले जाते तोवरच धोरणाला धर्माची प्रतिष्ठा मिळते. कॉंग्रेसला ज्या क्षणी आपले धोरण अनुसरण्यायोग्य नाही असे वाटेल त्या क्षणी तिला ते धोरण बदलवण्याचा पूर्ण अधिकार असेल. परंतु धर्माची गोष्ट वेगळी असते. तो सदैव कायम असतो व त्यात बदल करता येत नाही._
- महात्मा गांधी
१४ जुलै १९४७ला दिलेल्या प्रार्थना प्रवचनामधून
---------------

[05/03, 07:29] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#90
जी व्यक्तिगत सेवा वैश्विक सेवेशी एकजीव होते तीच सेवा करण्यायोग्य असते. बाकी सर्व निरर्थक आहे.
- मो. क. गांधी,
संदर्भ - अमृत कौर यांना ३१ जुलै १९४७ला लिहिलेल्या पत्रातून.
___________________
*गांधी समजून घेताना...* या पोस्ट तुम्हाला ग्रुप ऐवजी वैयक्तिक हव्या असतील तर 9637351400 हा मोबाईल नंबर save करून आपलं नाव आणि पत्ता वरील नंबर ला पाठवून द्या.
[06/03, 08:58] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#91
गांधी कथा
*हरिजन सेवा*
त्रिवेंद्रमच्या हरिजन सेवक संघाचे एका छोटेसे आणि आटोपशीर असे छात्रालय होते. १९३७ मध्ये गांधीजीनी छात्रालयाला भेट दिली. मुलांना दिलं जाणारं खाण बारकाईनं पहात त्यांनी विचारलं ” मुलांना ताक दिलं जातं का? आणि नारळाचं तेल इकडचं आहे की बाजारातलं?”
संचालक म्हणाले ” प्रत्येक मुलाला भांडभर मठ्ठा देतो.”
बापूंनी विचारलं ” पण त्यात दूध आणि लोण्यापेक्षा पाणीच जास्त असेल ना?”
हे ऐकल्यावर सगळे हसायला लागले . बापूंनी मुलांकडे वळून म्हटलं ” रेक्टर तुमच्या बरोबर जेवतात की घरी जेवतात?”
रेक्टर हसत म्हणाले ” मी दिवसभर मुलांच्यात असतो. रात्री दहानंतर घरी जातो.”
गांधींनी विचारले ” मग घरी गेल्यावर तुम्हाला काही खावं लागतं ना?”
रेक्टरनी उत्तर दिलं ” आम्ही त्रावणकोरची माणसं रात्री उशीरा खात नाही.”
” ही फारच चांगली गोष्ट आहे.” गांधीजी उत्तरले.
छात्रालयाचे पदाधिकारी गोविंदन रेक्टरची बाजू घेत म्हणाले ” इथं शुद्ध दूध मिळणं कठीण आहे. म्हणून मठ्ठ्यात पाणी जास्त असतं . काय करणार? एका दोन गायींची गरज आहे. आपण गुजरातवरून पाठवू शकाल का?”
गांधीजी विनोदानं म्हणाले ” जरूर पाठवू. पैसे द्या .लगेच पाठवू.”
” पण आमच्याकडे पैसे कुठून येणार?”
गांधीजी हसत हसत म्हणाले ” मग तुमच्या राज्याच्या मंदिरातून एक एक सोन्याचं भाडं का नाही आणत? चोरू नका.त्रावणकोर सारख्या हिंदू राष्ट्रात चोरीचं नाव असता कामा नये. पण कोणत्याही चांगल्या कामासाठी , हरिजनांना जेवू घालायला भीक मागणे ही काही नवीन गोष्ट असता कामा नये. जा त्या अधिकाऱ्यांना सांगा, स्पृश्यास्पृश्य भाव आता संपलाय.ब्राम्हणांना आपण दूध पाजू शकता तर मग हरिजन मुलांना पितळ्याच्या भांड्यातून मठ्ठा सुद्धा पाजू शकत नाही?”
सौजन्य -विजय तांबे
===================
"गांधी समजून घेताना" पोस्ट दररोज आपल्या मोबाईलवर हव्या असतील तर 9637351400 क्रमांकाला व्हाट्सअपवर तुमचे नाव व संपूर्ण पत्ता मेसेज करा. यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.
===================
[07/03, 07:08] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#92
*हिंसा अहिंसा*
१९२८ मध्ये भागलपूरला सरोजिनी नायडूंच्या अध्यक्षतेखाली एक विद्यार्थी संमेलन झाले. त्यावेळी काही स्वयंसेवकांनी गांधीजींची भेट घेतली. मुलांनी सांगितले ” महात्माजी आता अहिंसेवर आमचा विश्वास नाही राह्यला. कानपूरमध्ये क्रांतीकारकांची पत्रकं आम्ही वाटली. ती पत्रकं आम्हाला गणेश शंकर विद्यार्थी आणि इतरांकडून मिळत होती.”
गांधीजीनी विचारले ” ती माणसं तुम्हाला क्रांतीकारकांच काम कसं शिकवतात?”
एक मुलगा म्हणाला ” चोरून.”
ते ऐकल्यावर गांधीजी म्हणाले ” हे काही शूर शिपाई किंवा शूर देशभक्ताचे काम नाही. तुमचा जर हिंसेवर विश्वास असेल तर मैदानात येउन सांगा.”
” हा तर सरळसरळ फासावर चढायचा मार्ग आहे.”
गांधीजीनी उत्तर दिलं ” तुम्ही फाशी गेल्यावर जर अजून दहा वीस जन फासावर गेले तर आपण म्हणू की हिंसेने काम केले. नाहीतर नाही. मी तर अहिंसेची तलवार घेउन लढतोय. जिला दोन्ही बाजूंनी धार आहे. हिंसेच्या तलवारीला एका बाजूनेच धार असते म्हणून ती ब्रिटीश सरकारच काहीच नुकसान करू शकत नाही.”
सौजन्य -विजय तांबे
===================
*"गांधी समजून घेताना" पोस्ट दररोज आपल्या मोबाईलवर हव्या असतील तर 9637351400 क्रमांकाला व्हाट्सअपवर तुमचे नाव व संपूर्ण पत्ता मेसेज करा. यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.*
===================
[08/03, 11:56] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
#93
स्त्री पुरुषाची सहचर आहे, तिच्या मानसिक क्षमता पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. पुरुषाच्या लहानाहून लहान कामापासून सर्व कामांमध्ये भाग घेण्याचा तिला अधिकार आहे आणि तितक्या प्रमाणात तिलाही स्वातंत्र्याचा आणि मोकळेपणाने वागण्याचा अधिकार आहे. स्त्रीला आपल्या कार्यक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्याचा तितकाच अधिकार आहे जसा पुरुषाला आपल्या कार्यक्षेत्रात. ही परिस्थिती स्वाभाविकपणे असली पाहिजे, शिकल्या-सवरल्यानंतरच स्त्रीला असे अधिकार मिळतील असे काही नाही. चुकीच्या परंपरांमुळे मूर्ख आणि कवडीकिंमत नसलेले लोक स्त्रीपेक्षा श्रेष्ठ बनून मजा करत आहेत, वास्तवात त्यांची तशी योग्यता नाही व असूही नये. स्त्रियांच्या या अवस्थेमुळेच आमची अनेक आंदोलने अधांतरी लटकत राहतात.
- *मो.क. गांधी* ( _द हिंदू_, २६.१२.१९१८ )
==================

[09/03, 07:09] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#94
_हिंदू मुसलमानांचे वातावरण विषाक्त झाले होते. एका माणसाने मुसलमानांना सापाची उपमा दिली व सापावर दया दाखवली तर तो दया दाखवणारालाच चावा घेऊन मारून टाकतो असे गांधीजींना लिहिले. त्यावर गांधीजींनी दिलेले हे उत्तर विचार करण्यासारखे आहे -_
२७. निंद्य तुलना
एक गृहस्थ, ज्यांच्या नावावरून त्याची मातृभाषा हिंदी आहे असे वाटते, इंग्रजीतून लिहितात -
मुसलमानांनी पाकिस्तानमध्ये जाऊ नये म्हणून तुम्ही त्यांना आपले भाऊ समजा आणि व त्यांच्या रक्षणाची ग्वाही द्या अशी विनंती तुम्हा सातत्याने करत असता. या बाबतीत मी एक दृष्टांत देऊ इच्छितो. थंडीच्या दिवसात एक माणूस कुठे तरी चालला होता. रस्त्यात त्याला एक साप पडलेला दिसला. तो थंडीने गारठलेला होता. त्या सरपटणाऱ्या प्राण्याची कीव येऊन त्याने त्याला उचलले आणि त्याला ऊब देण्याच्या दृष्टीने आपल्या खिशात ठेवले. ऊबेने तो साप परत सावध झाला आणि आपल्या रक्षकालाच चावा घेऊन त्याला मारून टाकण्याचे त्याने पहिले काम केले.
या पत्रलेखकाने संतापाच्या भरात चुकीचा दृष्टांत दिला आहे. एक माणसाला, मग तो कितीही अधःपतीत झालेला असो, विषारी सापासारखा समजायचे आणि मग त्याच्याशी अमानूष व्यवहाराचे औचित्य सिद्ध करायचे ही गोष्ट खरे सांगायचे तर स्वतःला अधःपतीत करण्यासारखी आहे. कोणत्याही धर्माच्या काही थोड्या वा बऱ्याच लोकांच्या चुकीमुळे त्या धर्मातील करोडो लोकांना विषारी साप समजणे मला वेडेपणाची सीमा वाटते. पत्र लिहिणाऱ्या सज्जनांनी लक्षात ठेवले पाहिजे की असे कट्टर आणि पागल मुसलमान आहेत की तेसुद्धा हिंदूंबद्दल असेच उदाहरण देतात. कोणत्याही हिंदूला साप म्हणवून घेणे आवडेल असे मला वाटत नाही.
एकाद्या माणसाला भाऊ समजण्याचा अर्थ असा नाही की त्याने धोका दिल्यानंतरही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि तो धोकेबाजी करील अशा भीतीने त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मारून टाकणे हे भ्याडपणाचे चिन्ह आहे. अशा समाजाचे चित्र तुमच्यासमोर उभे करा की ज्यात प्रत्येक माणूस आपल्या सोबतच्या माणसाच्या गुणदोषाचा निर्णायक होतो. परंतु भारताच्या काही भागात आपली अशीच अवस्था झाली आहे.
अखेरची गोष्ट म्हणजे सर्पजातीबद्दल लोकांमध्ये जो भ्रम पसरला आहे तो मी दूर करू इच्छितो. ८० टक्के साप मुळीच विषारी नसतात आणि ते निसर्गात उपयोगी काम करत असतात.
नवी दिल्ली,
ऑक्टोबर ३, १९४७
हरिजन, ऑक्टोबर १२, १९४७
_________________
*गांधी समजून घेताना...* या पोस्ट तुम्हाला ग्रुप ऐवजी वैयक्तिक हव्या असतील तर 9637361400 हा मोबाईल नंबर save करून आपलं नाव आणि पत्ता वरील नंबर ला पाठवून द्या.
[10/03, 08:18] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#95
आज ऊठसूठ लोक सत्याग्रह करू लागले आहेत. अशा वेळी गांधीजींनी सत्याग्रहासंबंधी व्यक्त केलेले विचार सत्याग्रहींनी आणि इतरांनीही लक्षात ठेवले पाहिजे -
देशात अनेक ठिकाणी सत्याग्रह सुरू असल्याचे मला दिसते. लोक ज्याला सत्याग्रह असे म्हणतात तो सत्याग्रह आहे की दुराग्रह आहे हेच मला खरोखरी कळत नाही. या देशात लोक बोलतात एक आणि करतात त्याविरुद्ध असे सुरू आहे. आज प्रत्येक कर्मचारी, मग तो डाक विभागात असो की तार विभागात वा रेल्वेत वा भारतीय संस्थानात, जेव्हा सत्याग्रह करतो तेव्हा हा सत्याग्रह सत्याकरिता आहे की असत्याकरिता याचा आपण विचार केला पाहिजे. असत्याकरिता सत्याग्रह करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि जर तो सत्याकरिता असेल तर कोणत्याही परिस्थितीत सत्याग्रह केलाच पाहिजे. स्वार्थी हेतूने जे केले जाते त्याला सत्याग्रह कधीही म्हणता येऊ शकत नाही. तसे करणे म्हणजे असत्याचा आग्रह धरणे. सत्याग्रहाकरिता मी फार कमी अटी सांगितल्या आहेत. सत्याग्रहाकरिता दोन गोष्टी आवश्यक आहेत असे मी म्हणालो होतो. पहिली गोष्ट ही की ज्या मुद्द्याकरिता आपण सत्याग्रह करतो तो सत्य असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्याचा आपला आग्रह निरपवादपणे अहिंसक असला पाहिजे.
आज जे लोक सत्याग्रह करत आहेत त्यांनी तसे पूर्ण विचारांती केले पाहिजे. मूळ गोष्ट जर सत्य नसेल आणि मागण्या मान्य करून घेण्याकरिता बळजबरी असेल तर तो सत्याग्रह मागे घेणेच योग्य. जर मूळ गोष्ट विषाक्त असेल तर तो दुराग्रह होईल आणि असत्यही होईल आणि जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही तिची मागणी आपण रेटू लागलो तर अशी मागणी करत असताना आपण अहिंसक राहू शकत नाही हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. असा सत्याग्रह अहिंसक होऊ शकत नाही, तिथे केवळ हिंसा असेल. हे शक्य आहे की एखादा अन्याय्य मागणी करत असेल आणि त्याच वेळी तो अहिंसक राहत असेल.
------------
ऑक्टोबर ३, १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून.
____________________

[11/03, 11:22] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#96
_७ ऑक्टोबर १९४७च्या प्रार्थना प्रवचनातील मैत्रीसंबंधी गांधीजींनी केलेले हृद्य विवेचन_ -
कोणत्या बाजूने पहिल्यांदा आक्षेपार्ह वर्तन केले आणि कोणी जास्त अतिरेक केला असे म्हणणे हा काही मैत्री करण्याचा खरा मार्ग नाही. मैत्रीचा खरा मार्ग आपण नेहमी न्यायाच्या बाजूने असणे व चांगले वागणे हा आहे. आपण जर हा मार्ग अनुसरला तर रानटी माणूस आणि विवेकाचे भान सुटलेल्या लोकांची विवेकबुद्धीसुद्धा जागृत होऊ शकते. कोणाचा अपराध मोठा आणि कोणाचा लहान वा कोणी सुरुवात केली यांत पडण्याची आपल्याला गरज नाही. असे करणे शुद्ध अडाणीपणा आहे असे मला वाटते. मैत्री करण्याचा हा मार्ग नाही. कालकालपर्यंत जे शत्रू होते आणि आज जर त्यांना मित्र व्हायचे असेल तर त्यांनी भूतकाळातील शत्रुत्व विसरून मित्राप्रमाणे वागायला सुरुवात केली पाहिजे. वैरभावनेची आठवण ठेवून काय लाभ? जमत असेल तर मैत्री करू आणि आवश्यकता पडली तर भांडण्याचीही आमची तयारी आहे असे म्हणणारे मित्र होऊ शकत नाहीत. मैत्रीची वाढ अशी होत नसते.

[12/03, 08:59] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
🍂🍂🍂🍂🍂🍂
#97
हरिजनांना ब्राह्मण म्हणाल्यामुळे हरिजनांचा कोणताच फायदा होणार नाही परंतु ब्राह्मण जर हरिजन झाले तर बरेच काही साध्य होऊ शकेल.
- महात्मा गांधी
संदर्भ- २ डिसेंबर १९४७ला सत्येन यांना लिहिलेल्या पत्रामधून.

[13/03, 08:46] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#98
एक बंधू मला लिहितात की सोमनाथचे जे मंदिर होते त्याचा जिर्णोद्धार होईल. (इसवी सन १०३५ मध्ये महम्मद गझनीच्या आक्रमणात त्याचा विध्वंस करण्यात आला होता) त्याकरिता पैसा पाहिजे आणि जुनागढमध्ये सावलदास गांधींनी तयार केलेल्या सरकारने त्याकरिता ५०,००० रुपये मंजूर केले आहेत. जामनगरने त्याकरिता १ लाख कबूल केले आहेत. आज सरदार जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा मी त्यांना विचारले की सरदार असून हिंदू धर्माकरिता सरकारी खजिन्यातील हवा तितका पैसा काढून देईल असे सरकार तुम्ही तयार करणार आहा काय? सरकार तर सर्व लोकांनी बनवले आहे. इंग्रजीत याला सेक्युलर स्टेट म्हणतात. याचा अर्थ होतो हे काही धार्मिक सरकार नाही. वा असे म्हणा की कोणत्याही एका धर्माचे हे सरकार नाही. असे असेल तर ते असे तर म्हणू शकत नाही की हिंदूकरिता इतका, शिखांकरिता इतका आणि मुसलमानांकरिता इतका पैसा देऊन टाकू. आपल्याजवळ तर एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे सर्व भारतीय आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळा धर्म असू शकतो. माझ्याजवळ माझा, तुमच्याजवळ तुमचा.
एका दुसऱ्या बंधूंनी एक चांगली चिठ्ठी लिहिली. ते म्हणतात की जुनागढ सरकार सोमनाथ मंदिराच्या जिर्णोद्धाराकरिता जर पैसा देईल वा येथील केंद्रीय सरकार पैसा देईल तर तो फार मोठा अधर्म होईल. मला वाटते की त्यांनी अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. यामुळे हे खरे आहे काय असे मी सरदारजींना विचारले. ते म्हणाले की मी जिवंत असताना असे होऊ शकत नाही. सोमनाथच्या जिर्णोद्धाराकरिता जुनागढची एक कवडीसुद्धा जाऊ शकत नाही. जर माझ्या हातून हे होणार नसेल तर बिचारा एकटा सावळदास काय करू शकतो? सोमनाथकरिता अनेक हिंदू पैसा देऊ शकतात. जर ते कंजूष होतील आणि पैसा देणार नाहीत तर सोमनाथचे मंदिर असेच पडून राहील. दीड लाख तर झाले आहेत आणि जामनगर साहेबांनी एक लाख रुपये दिले आहेत. अजून लागले तरी रुपयांची व्यवस्था होऊन जाईल.
- महात्मा गांधी. २८ नोव्हेंबर १९४७च्या प्रार्थना प्रवचनमधून.

[14/03, 07:16] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
🌸🌸🌸🌸🌸
#99
तुमच्या करुणेचे मला कौतुक वाटते. परंतु कुत्र्यांना खच्ची करून आपली उद्दिष्टपूर्ती होऊ शकते असे मला वाटत नाही. आपण कुत्रे पाळायची कला शिकलो पाहिजे. आणि रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना कमीतकमी वेदना होईल अशा प्रकारे मारून टाकले पाहिजे. यात हिंसा नाही असे मला म्हणायचे नाही, परंतु हीच अहिंसक पद्धती आहे असे मी म्हणेन. - महात्मा गांधी, २ डिसेंबर १९४७ला गुलाम रसूल कुरेशी यांना लिहिलेल्या पत्रामधून.

[16/03, 09:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#100
गांधीजींच्या आश्रमात मुलीसुद्धा रहात होत्या. एक दिवस कुठूनतरी येताना रस्त्यात काही तरूणांनी त्यांना त्रास दिला. मुली घाबरून आश्रमात धावत आल्या. प्रार्थनेनंतर त्यानी महात्माजींना घडलेली घटना सांगितली. महात्माजी त्यांना म्हणाले ” तुम्ही का पळून आलात ? हिंमतीने तिथेच थांबायचे.”
एका मुलीने उत्तर दिलं ” मुलांनी आमची छेडछाड केली असती तर ?”
गांधीजी म्हणाले ” तर त्यांच्या तोंडावर दोनचार गुद्दे हाणायचे.”
ते ऐकून मुली चमकल्या. एका स्वरात सर्वजणी म्हणाल्या ” ही हिंसा नाही का?”
गांधीजी हसत म्हणाले ” हिंसा म्हणजे काय हे तुमच्या गालावर एका थप्पड मारल्यावरच तुम्हाला समजणार का?”
अहिंसा हे शूराचे अस्त्र आहे हे कोणाला समजत नाही. गांधीजीनी नेहमी सांगितले आहे ” अहिंसेच्या तत्वांनी आपला कमकुवतपणा आणि भीती झाकली जात नाही.”
सौजन्य – विजय तांबे

[17/03, 16:31] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#101
शिक्षण विचार
असहयोग आंदोलनाच्या सुरवातीच्या दिवसात अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजचे शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. नागपूरचे असे विद्यार्थी गांधीजींना भेटायला आले. त्यांच्यातल्या एकाने विचारले ” आपण आम्हाला विद्यापीठाचे शिक्षण घ्यायला प्रतिबंध केलात. मात्र अधिक ज्ञान मिळविण्याची आमची इच्छा अपुरी राहिली आहे. त्यासाठी आपण कोणती योजना बनविली आहे का?”
गांधीजी म्हणाले ” आपण जे बोलत आहात ते योग्य नाही. आपले शिक्षण बंद व्हावे अशी माझी कधीच इच्छा नाही. मी आपल्याला विद्यापीठातून काढलेले नाही उलट खऱ्या विद्यापीठात दाखल केले आहे. हे विश्वच एका विश्वविद्यालय आहे. राष्ट्रासाठी कार्य करत असताना जर शिक्षण बंद झालं अशी भीती वाटत असेल तर ते राष्ट्रीय कार्य नव्हे. राष्ट्रीय कार्य हेच शिक्षण आहे. संकुचित, चार भिंतीत कोंडलेल्या शिक्षणाला मी व्यापक शिक्षणाकडे नेतोय.धन,ऐश्वर्य,सुख किंवा बुद्धीमत्तेपेक्षा आत्म्याला महत्व मिळायला हवं याची दक्षता घ्यायला हवी. शिक्षणाच्या संबंधात माझी ही कल्पना आहे की आपण ‘ महान ‘ पेक्षा ‘ चांगले’ बनावे. जीवन हे सेवेसाठी आहे हा मूलमंत्र आपण मनात पक्का कोरून ठेवा. कारण शिक्षणाचा मूळ उद्देश तोच असतो. ”
हे सर्व ऐकल्यावर प्रश्न विचारण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हढ्यात एका छोट्या मुलाने विचारले ” कोणत्या वेळी काय करावे असा प्रश्न निर्माण झाल्यावर कसा व्यवहार करावा हे मला सुचत नाही. कृपा करून आपण सांगाल का?”
गांधीजी म्हणाले ” अरे, यात काय कठीण आहे. जेंव्हा असा प्रश्न उभा राहील त्यावेळी सर्वाधिक त्यागाचा मार्ग अवलंबायचा. तो सर्वात सुरक्षित मार्ग असतो.”

[18/03, 07:42] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#102
सेवाग्राम आश्रमात एका दिवस भल्या सकाळी गांधीजीनी केस कापायच्या मशीनला साफ करून तेलपाणी दिलं आणि समोर आरसा ठेवून स्वत:चे केस कापायला लागले. साधू बाबांचा भक्त तिकडून जात होता. हे साधूबाबा आश्रमातच रहात होते आणि त्यांचा हा भक्त जातीने न्हावी होता. शिष्याला बधून साधूबाबा गांधीजींना म्हणाले ” भीमाला केस कापायला सांगा. तो चांगले कापतो. त्याचा व्यवसायच तो आहे.”
गांधीजींनी ठीक आहे म्हणत त्याला बोलावले. भीमाने गांधीजींच्या डोक्यावर मशीन फिरवायला सुरवात केल्यावर गांधीजीनी त्याला विचारले ” माझ्या मते आपल्या हरिजन मंडळींचे केस कापायला तुला कोणती अडचण नसेल ना?”
भीमा अडखळत म्हणाला ” मनात तसं काही वाटत नाही.”
बापू म्हणाले ” ते मला माहीत आहे. जसे माझे केस कापतोयस तसेच तू इतर हरीजनांचे कापशील ?”
तो पुन्हा अडखळला. गांधीजीनी साधू महाराजांना सांगितले ” मला असं वाटलं की याला माझे केस कापायला द्यायच्या आधी तुम्ही याची माहिती काढली असेल.”
साधू महाराज म्हणाले ” लक्षात नाही आलं त्यावेळी.”
गांधीजी म्हणाले ” तर मग आता मला यावर विचार करायला लागेल की केस कापणं अर्ध्यावरच थांबवून भीमाला जायला सांगावं.”
भीमा न राहवून म्हणाला ” नका करू असं. मी सहसा हरीजनांचे केस नाही कापत. पण आता तुम्हाला वचन देतो . आजपासून त्यांच्याशी भेदभाव करणार नाही. ”

[19/03, 10:17] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#103
गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत असतानाच आपल्या जवळचं सर्वकाही आश्रमाला देउन टाकलं होतं. भारतात परतल्यावर वडिलोपार्जित मालमत्तेवरील वारसाहक्काचा त्यांनी त्याग केला होता. सर्वस्व देउन ते निष्कांचन बनले होते. ते स्वता:च्या व्यक्तिगत खर्चासाठी कोणाही कडून पैसे घेत नसत. खरं तर त्यांना व्यक्तिगत असा काही खर्चच नव्हता. गोकीबहन नावाची गांधीजीची विधवा बहीण होती. तिची संसाराची काही सोय व्हावी म्हणून त्यांनी आपले जुने मित्र डॉ.मेहता यांना तिला दरमहा दहा रुपये पाठवायला सांगितले. डॉ मेहता पैसे पाठवत असत.
काही दिवसांनी गोकी बहनची मुलगी विधवा होवून आईकडे माहेरी परतली. महिन्याला दहा रुपयात दोघींचे भागणे कठीण झाले. बहिणीने गांधीजींना लिहीले ” आता खर्च वाढलाय. पैसे पुरत नाहीत म्हणून आम्हाला शेजाऱ्यांचे दळण दळून देउन भागवावे लागत आहे.”
गांधीजीनी उत्तर दिले ” दळण दळणे खूप चांगलं असतं. दोघींची तब्येत चांगली राहील. आम्ही इथे आश्रमात सुद्धा दळण दळतो. तुला जेव्हा वाटेल त्यावेळी हक्काने आश्रमात या आणि जमेल तेवढी जनसेवा करा. जसे आम्ही राहतो तसंच तुला राहावं लागेल. मात्र घरी मी काहीही पाठवू शकत नाही किंवा मित्रांनाही सांगू शकत नाही.”
लोकांची दळणे दळून मोलमजुरी करणाऱ्या बहिणीला आश्रमाचं जीवन कठीण नव्हते. मात्र आश्रमात हरिजन रहात होते. ही जुन्या वळणाची माणसे त्यांच्या सोबत रहाणं, जेवणं कसं करू शकणार ? ती बहीण आली नाही. गांधीजीनी सुद्धा तिच्यासाठी पैशाची व्यवस्था केली नाही.

[20/03, 14:32] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#104
गांधींच्या आग्रहाखातर ना. गोखले यांनी आफ्रिकेत सुद्धा मराठीतून भाषणे केलीत. शक्यतो मातृभाषेतूनच आणि व्याकरणशुद्ध इंग्रजीपेक्षा व्याकरणरहित हिंदीतून बोलणे इष्ट आहे, असे गांधी मानीत.
मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, असा त्यांचा आग्रह होता. गांधींनी तर स्वातंत्य प्राप्तीच्या वेळी बी.बी.सी.च्या वार्ताहराला सांगितले होते. 'स्वातंत्र्यदिनापासून गांधींना इंग्रजी येत नाही, हे सर्व जगाला सांगा" यात इंग्रजीचा विरोध नव्हता, तर स्वभाषा व स्वदेश यांच्याबद्दलचे प्रेम होते.
(माहिती व जनसंपर्क महासंचनालय, महाराष्ट्र शासन यांनी प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्र आणि महात्मा गांधी" या पुस्तकातून साभार)

[22/03, 12:40] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#106
लोकमान्य टिळकांचे तर गांधीजी उत्तराधिकारीच होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्या जनतात्मवासी महान नेत्याबद्दल त्यांनी जे उद्गार काढले त्यांची नोंद गांधीजींच्याच शब्दात घेणे योग्य ठरेल. गांधीजी म्हणतात, 'भारतमातेने दिवंगत लोकमान्यांचा जसा बहुमान केला, तसा आपल्या कोणत्याही सुपुत्राचा पूर्वी कधी केला नाही. त्या दिवंगत देशभक्तांचे जे स्मारक आपण उभारीत आहोत त्याचा केवळ पाया म्हणजे हा एक कोटी रुपयांचा टिळक स्मारक निधी आहे, पण त्याचा कळस आहे स्वराज्य. एवढ्या महापुरुषाच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी स्वराज्याहुन कमी प्रतीचे स्मारक उपयोगी नाही.

_आता मिळवा फक्त 50 रुपयात एक महिना Pdf पुस्तके आणि मासिके, साप्ताहिके.. तब्बल 2500 रुपये पर्यतची सर्व पुस्तके मिळवा आपल्या मोबाइल वर... अधिक माहितीसाठी *7030140097* या क्रमांकाला व्हाट्सएपवर मेसेज करा._
=====================
[23/03, 08:43] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
👀👀👀👀👀👀👀👀👀
#107
*भगत सिंगची फाशी रोखण्याचे गांधीजींनी प्रयत्न केले काय?*
"भगतसिंगसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगची फाशी वाचवु शकले असते, परंतु जाणुनबुजुन त्यांनी तसं केलं नाही" अशी एक चर्चा सध्या मुद्दामहून होत असते. पण त्याबाबत ची वस्तुस्थिती वेगळीच आहे .
गांधींजीवर टीका करण्यासाठी भगत सिंग च्या खांद्यावर बंदूक ठेवणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत , हे वेगळे सांगायची गरज नाही .
भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा ,७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली या शिक्षेच्या विरुद्ध केलेले Special Petition हे त्यावेळी Privy Council समोर करावे लागत होते, ते Petition ११ फेब्रुवारी १९३१ रोजी फेटाळले. त्यावेळी जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. नेहरूंनी ८ ऑगस्ट १९२९ रोजी लाहोरच्या तुरूंगात जाऊन भगत सिंग आणि त्याच्या सहका-यांची भेट घेतली, त्यांना त्यांचा मार्ग जरी मान्य नसला तरी त्यांच्या उद्दिष्टांबद्दल समर्थन देऊन कॉग्रेस अंतर्गत त्यांना समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगीतले आणि लाहोर मधे त्याबाबत जाहीर वक्तव्यही केले!
भगत सिंगच्या सहका-यांनी त्यानंतर कैद्यांना सुविधा द्याव्या म्हणून गांधीजीच्या प्रेरणेतून सत्यागृह सुरू केला व आमरण उपोषण केले. गांधी, पटेल, नेहरू, बोस या नेत्यांनी हे उपोषण संपवावे म्हणून खूप प्रयत्न करूनही ६३ दिवसाच्या उपोषणामुळे जतींद्र नाथ दास यांना मृत्यू आला. अखेर नेहरू आणि बोस यांच्या आग्रहामुळेच ११६ दिवसांनी भगत सिंग यांनी आपले उपोषण सोडले! कॉग्रेसची त्याकाळात भुमिका अशी होती की, सशस्त्र क्रांतीकारकांच्या हिंसक कृत्यास समर्थन नाही मात्र त्यांच्या न्यायालयीन लढाईसाठी, कारावासातील त्यांच्या मानवी हक्कास सर्वतोपरी सहकार्य केले जात असे.
काकोरी कटातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक मदत व विधी सल्ला स्वरूपात सहाय्यता मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई यांनी दिली होती. अनेक कॉग्रेसी नेते संघटनेच्या पातळीवीर सशस्त्र लढ्यास विरोध करत असले तरी व्यक्तीगत पातळीवर शक्य तेवढे विधीसहाय्य करण्याबाबत तत्पर असत. कारण मतभेद मार्गाबद्दल व साधनांबद्दल होते, भारताचे स्वातंत्र्या हे उद्दिष्ट मात्र सर्वांचे एकच होते.
संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी -आयर्विन कराराचा मसुदा गांधीजी ,पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी मिळून तयार केला होता. या कराराच्या वेळी ही भगत सिंगला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता, नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली . गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पुर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला आणि त्यावेळी देखील भगत सिंगच्या माफीवर चर्चा झाली. या वेळी करारादरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली.
गांधी आयर्विन कराराचा हा प्रसंग अजय देवगण याच्या ' दि लेजंड ऑफ भगत सिंग ' या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे ,जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे.त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्च ला गांधीजीनी लॉर्ड आयर्विन ची भेट घेवून भगत सिंगला माफी देण्याची विनंती केली, याच अनुषंगाने २२ मार्च ला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंगच्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिले आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली ,हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिले गेले. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील कांही उपयोग झाला नाही .भगत आणि त्याच्या सहकार्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला, १९३१ मध्ये कराची मध्ये होणाऱ्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते ,त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले .गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते अगदी याचा दाखला लॉर्ड आयर्विन यांच्याही लिखाणात आहे.
"As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved."
इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची हि काही कारणे होती .भगत सिंग विरोधात प्रचंड नाराजी Civil Services Officers मध्ये होती.पंजाब प्रांताच्या गवर्नर ने भगत सिंग ला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती ,कारण भगत ला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती , त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडर च्या नाराजीचा परिणाम असा होता की ,संपूर्ण वसाहती देशातील ICS केडर च्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झाली होती. ब्रिटीश त्यांच्या राज कारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंगसाठी आफ्रिका , म्यानमार , अफगाणिस्तान , अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की , ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत. ICS केडर च्या एकजुटीचा उइद्देश हा देखील होता !
या सर्व कारणास्तव भगत सिंह ला माफी मिळणे कठीण गोष्ट होती आणि एकदा दया याचिका फेटाळली कि निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नर च्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली, आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे . वी.एन.दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. भगत सिंग यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे, खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले .
पण महत्वाची गोष्ट अशी कि , भगत सिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी -नेहरू -पटेल यांनीच केला , आज भगत सिंग यांची बाजू घेवून गांधीजींवर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही. संघटनेला कांही मर्यादा असतील हे मान्य केले तरीही व्यक्तीगत पातळीवरही या संघटनेच्या नेत्यांनी असा प्रयत्न केल्याचा कांहीही पुरावा नाही. कांही संघटना पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आव्हान करत होत्या मात्र गांधीजींच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे म्हणून पत्रक काढणाऱ्या संघटनांनीही भगत सिंगचे समर्थन करणारे किंवा भगत सिंग ला माफी द्यावी असे कोणतेही पत्रक काढले नाहीत किंवा तसे प्रयत्न देखील केले नाहीत!
भगत सिंह चे कार्य महान आहेच ,पण भगत सिंगला माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्या असत्या, कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे. माफी मिळवताना पुन्हा राजकारणात, स्वातंत्र्यचळवळीत भाग घेणार नाही अशी मान्य करून त्या अटींचे पालन प्रामाणिकपणे करणे प्रत्येकास शक्य नसते. कांही मोजक्याच व्यक्तींत अशी क्षमता असते.ब्रिटीशांच्या अटीचे तंतोतंत पालन करणा-यांवर माफीवीरांवर ब्रिटिशांनी पुढे कोणतीही कारवाई केली नाही, याची अनेक उदाहरणे आहे. पण भगत सिंग यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंग याने ब्रिटीशांच्या अटीचे पालन केले असते ,असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंगला सतत माफी मिळणे देखील अशक्य होते. मुळात स्वत: भगत सिंग देखील अशा माफीच्या विरोधात होता. त्याच्या वडिलांनी व नातेवाईकांनी माफीसाठी प्रयत्न केल्याचे कळल्यावर त्याने पत्र लिहून त्यास तीव्र विरोध केला होता. शिवाय भगत सिंगला माफी मिळाली असती तर त्याला ती आवडली नसतीच आणि कदाचित त्याचे नावही एवढे अजरामर झालेच असते की नाही याबद्दल कांही सांगता येत नाही.
भगत सिंग हिंदुत्ववादी नव्हता तर तो मार्क्सवादी होता , नास्तिक होता आणि जन्माने तथाकथित उच्चवर्णीय देखील नव्हता ! त्यामुळे माफी मिळाल्यानंतर माफिनाम्यातील अटीनुसार ब्रिटीश मायबाप सरकारचे आदेश तंतोतंत पालन त्यास करावे लागले असते आणि असे पालन त्यानेही केले असते तर माफी मागणाऱ्या इतरांना ज्याप्रमाणे गौरविण्यात आले ,तो गौरव ,तो सन्मान त्याच्या मिळाला असता किंवा दिला गेला असता ,याची शक्यता खूप धुसर असल्याचे चित्र दिसते !भारतीय समाज रचनेचे ते एक वास्तव आहे !
© राज कुलकर्णी .
संदर्भ: -
1) Gandhi Marg Vol no.32 Issue no .3 Oct-Dec.2010 - Chander Pal Singh
2) Bhagat Singh Diaries - J.N.Sanyal
3) Selected writings of Bhagat Singh - Shiv Varma, Samajvadi Sadan Kanpur.
4) Fragments of Past - Aruna Asaf Ali.
5) Homage to Martyrs- Pub.Shahid Ardh Shatabdi Samaroh Samiti, Dehli 1981.
6) Towards Freedom- Jawaharlal Nehru.
7) Savarkars Mercy Petition - Frontline Volume 22 - Issue 07, Mar. 12 - 25, 2005
8) A Revolutionary History of Interwar India - Kama Maclean
===================
"गांधी समजून घेताना" पोस्ट दररोज आपल्या मोबाईलवर हव्या असतील तर _*9637351400*_ क्रमांकाला व्हाट्सअपवर तुमचे नाव व संपूर्ण पत्ता मेसेज करा. यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी fb.me/GandhiSamjunGhetana या लिंक ला जा.
[24/03, 12:25] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#108
गांधींनी दृढ निश्चय केला होता की, ते संपूर्ण स्वराज्य प्राप्ती खेरीज ते साबरमतीला परत येणार नाहीत.' या दृढ निश्चयानेच गांधीजी १२ मार्च, १९३० रोजी दांडी यात्रेस निघाले होते. त्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन विधायक आणि रचनात्मक कार्य हेच त्यांनी त्यांचे ध्येय मानले. त्यानंतर जमनालालजी बजाज यांच्या विनंतीवरून वर्ध्यास, २९ ऑक्टोबर १९३४ पासून कायम वास्तव्यासाठी आले. सुरुवातीला त्यांनी कन्या आश्रम व मगनवाडी येथे वास्तव्य केले. परंतु नगरात राहण्याऐवजी खेडेगावातच आपल्या कार्याची उभारणी करण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यासाठी त्यांनी वर्धा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावरील सेगाव हे खेडे निवडले. ते खेडेगाव जमनालालर्जीच्या मालगुजारी हक्काचे गाव होते. ते प्रामुख्याने हरिजनांची वस्ती असलेले गाव होते. तेथे जाण्यापुर्वी गांधींनी सेगावच्या खेडुतांच्या नावे एक निवेदन पाठविले. ज्यात म्हटले होते, मी स्वतःस तुमच्यावर लादू इच्छित नाही. तुमची सेवा करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हेतूने मी येथे येऊ इच्छित नाही. अनेक ठिकाणी माझी व माझ्या कार्यक्रमाची लोकांना फार भीती वाटते. याचे कारण असे आहे की, अस्पृश्यतानिवारण हे मी माझे जीवनकार्य मानले आहे. तुम्हास मीराबेनकडून कळले असेलच की मी अस्पृश्यतेचा पूर्ण त्याग केला असून, मी सर्वधर्माच्या, जातीच्या लोक लोकांना समान लेखतो. जन्मावर आधारित भेदभाव मी अनैतिक मानतो, पण मी माझे विचार तूनच्यावर लादणार नाही.
नी माझ्या स्वत:च्या उदाहरणावरून मतपरिवर्तनाद्वारे ते सिद्ध करीन. तसेच ग्रमोद्योगाचे पुनर्रजीवन करून व स्वयंनिर्भरता शिकवून तुम्हाला मदत करीन. तुम्ही माझ्याशी सहकार्य केल्यास मला आनंद होईल आणि न
केल्यास तुमच्यामध्येच सामावून घेऊन मी त्यातच समाधान मानीन”.

घरीच राहून स्वतः ला आणि प्रशासनाला मदत करा सोबत "गांधी समजून घेताना" पोस्ट दररोज आपल्या मोबाईलवर हव्या असतील तर 9637351400 क्रमांकाला व्हाट्सअपवर तुमचे नाव व संपूर्ण पत्ता मेसेज करा.
=====================
[31/03, 10:57] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना...*
#109
*भयग्रस्त जग आणि ‘हिंद-स्वराज्य’ची समकालीनता*
म.गांधींच्या विचारांची प्रस्तुतता हा विषय या ना त्या निमित्ताने नेहमी चर्चेत असतो. म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात येण्याआधी त्यांनी लिहिलेले ‘हिंद-स्वराज्य’ (१९०९) तर अलीकडे वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येत असते. गांधीविचार समजून घेताना ही लहानशी पुस्तिका फार महत्त्वाची आहे. ‘भारतीय सभ्यतेचा पुरस्कार आणि पाश्चिमात्य सभ्यतेचे खंडन’ हिंद-स्वराज्यच्या लेखनामगील मुख्य हेतू आहे. हा विचार मूळातून समजून घेण्यासाठी या पुस्तिकेला पर्याय नाही. तरीही या पुस्तिकेचा वापर गांधींविचारांच्या समर्थनापेक्षा गांधीवर टीका करण्यासाठी गांधींच्या टीकाकारानी केलेला आहे. मात्र पुस्तक वाचताना हे लक्षात घेतले पाहिजेत की, म. गांधींनी अगदी तारुण्यात लिहिलेल्या या पुस्तिकेतील विचारांचे शेवटपर्यंत समर्थन केले आहे. या पुस्तिकेतील त्यांच्या तारुण्यातील विचारांची सुस्पष्टता अचंबित करणारी आहे. ‘हिंद-स्वराज्य’मधील विचार अनेकांना प्रतिगामी, कालबाह्य आणि अवैज्ञानिक वाटले आहेत. त्याअंगाने या पुस्तिकेवर खूप टीका झाली आहे आणि तेवढेच किंवा त्याहून अधिक पटीने समर्थनही. ‘हिंद-स्वराज्य’वाचताना एक गोष्ट सतत ठसठशीतपणे समोर येते ती म्हणजे, गांधीजी तेंव्हाही बरोबर होते आणि आजही बरोबर आहेत. गांधीविचारांची कालातीतता ही पुस्तिका ठळक करते. वसंत पळशीकर ‘हिंद-स्वराज्य’बद्दल म्हणतात तसे, ‘भारताने आणि साऱ्या जगानेच, भविष्यात कोणती वाट धरावी, कोणती सभ्यता आदर्श मानावी, संस्कृती कशाला म्हणावे या मुद्दांच्या बाबतीत मुळातून विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे सामर्थ्य तीमध्ये आहे.’ म्हणून जगाच्या प्रत्येक वळणावर ‘हिंद-स्वराज्य’ दिशादर्शक ठरणार आहे.
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी ही पुस्तिका लिहिताना औद्योगिक प्रगतीच्या अंगाने केवळ सुरुवात झाली होती. रेल्वेचे जाळे आजच्या इतके प्रचंड वाढले नव्हते. डॉक्टर आणि वकीलांनी ताळतंत्र सोडून लोकांना लुबाडायला सुरुवात केलेली नव्हती. तरीही या सर्वांतील फोलपणा गांधींच्या नजरेने हेरला होता. गांधी स्वत: वकील असून ते वकीलीबद्दल बोलतात ते आजच्या पार्श्र्वभूमीवर आंतर्मुख करणारे आहे. म्हणूनच या पुस्तिकेतून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करतात. ‘कोरोना’ विषाणूच्या निमित्ताने आज जगासमोर नवेच संकट उभा ठाकले आहे. लोक यानिमित्ताने पर्यावरण, विकास, पैसा, औद्योगिक प्रगती, आरोग्य अशा अनेक गोष्टींचा विचार करू लागले आहेत. (अर्थात कोरोनाबरोबर हा विचारही ते काही दिवसांनी झिडकारून देतील हा मुद्दा वेगळा.) तथापि, या सर्व गोष्टींचा विचार ‘हिंद-स्वराज्य’मध्ये ठासून भरला आहे. तो समजून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. गांधीजी ब्रिटिश अंमल, आरोग्य आणि दुष्काळ या संदर्भाने रेल्वेचा विचार करताना लिहितात, ‘रेल्वे नसेल तर इंग्रजांचा ताबा हिंदुस्थानावर आज आहे तितका तर नक्कीच राहणार नाही, हे तुम्हाला उमगेल. रेल्वेमुळे प्लेगचादेखील फैलाव झाला आहे. रेल्वे नसेल तर फार थोडी माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील आणि त्यामुळे सांसर्गिक रोग देशभर पसरण्याचा संभव राहणार नाही. पूर्वी आपण असे ‘सेग्रिगेशन’ म्हणजे सुतक स्वाभाविकपणे पाळीत होतो. रेल्वेमुळे दुष्काळ वाढले आहेत, कारण रेल्वेच्या सोयीमुळे लोक आपले धान्य विकून टाकतात. जिकडे महागाई असे तिकडे धान्य खेचले जाते, लोक बेदरकार बनतात आणि त्यामुळे दुष्काळाचे दु:ख वाढते. रेल्वेमुळे दुष्टता वाढते. वाईट माणसे आपला वाईटपणा झपाट्याने फैलवू शकतात. हिंदुस्थानात जी पवित्र स्थाने होती ती आता अपवित्र झाली आहेत. पूर्वी लोक फार अडचणी सासून तिकडे जात. ते खरा भाव धरून ईश्वराची भक्ती करायला जात. आता भामट्यांची टोळी फक्त भामटेगिरी करण्याकरिता तिकडे जाते.’(पृष्ठ ६६) अर्थात या पुस्तिकेतील हा एक मुद्दा आजच्या स्थितीसंदर्भाने विचार करताना उद् धृत करावासा वाटला. ‘हिंद-स्वराज्य’ वाचताना गांधीजींच्या भूमीनिष्ठ विचारांचा घनिष्ठ परिचय होतो. समाज स्वत:ला कितीही पुढारल्याचे समजू लागला, औद्योगिक विकासाच्या गप्पा आणि भौतिक सुखांचे महत्त्व सांगू लागला तरी, गांधीजींचे हे लहानसे पुस्तक समाजाच्या धारणांबद्दल पुनर्विचार करायला प्रवृत्त करते. आजच्या भयान पार्श्वभूमीवर गांधींचा या पुस्तिकेतील विचार जगासमोर येणे हीच जगाच्या कल्याणासाठीची सर्वात मोठी निकड वाटते.
- नंदकुमार मोरे, कोल्हापूर
===============
[02/04, 08:20] +91 96373 51400: *गांधी समजून घेताना...*
#110
_*गांधी_आणि_रामराज्य*_
महात्मा गांधीना त्यांच्या आईने रामायणातील गोष्टी लहानपणी सांगितल्या....
आणि महात्मा गांधीनी अत्युच्च माणुसकी व मर्यादापुरुषोत्तम होण्याची प्रेरणा देणारे राम मानले.....
पण... त्यांनी भाकडकथा, भाकडकथांवर पिढ्यांनपिढ्या जगणारे रामचरीत्र अमान्य केले....
त्यांनी रामाला कर्मात अवतीर्ण केले.
त्यांनी मंदिरात कोंडून ठेवलेला कोणताच देव न मानता..... 'वैष्णव जण तो तेणे काहिये जो पीड पराई जाणे रे' असे देवाचे रूप साकारले......
त्यांची 'रामराज्याची' कल्पना या रामायणातील रामाशी संबंधित नाही हे त्यांनी बोलून, पुस्तक लिहून स्पष्ट केले.....
गांधींचा सहजधर्म भाव इतका जागृत होता की चुकूनही अधर्म होणार नाही याची संवेदनशीलता त्यांनी अंगी बाळगली.
त्यांनी राम नाम इतके आत्मसात केले की त्यांनी जिवंत माणसांव्यतिरिक्त कुणातही देव बघितला नाही.
गांधी हा पहिला हिंदू ज्याने व्यक्तिगत, स्वतःपुरती करण्याच्या प्रार्थनेला (भजन, कीर्तन वेगळे) सामूहिक स्वरूप देऊन 'सर्वधर्म प्रार्थना' सुरू केली....
धर्मांधता नाही तर धार्मिक-आध्यत्मिक सहजभाव त्यांनी वाढविला....
गांधींचे सतत राम नाम घेणे कट्टरवादी हिंदूंना टोचायला लागले आणि ज्या रामायणात उत्तम, दर्जेदार पुरुषोत्तम होण्याबद्दल सांगितले त्यातील मतितार्थ विसरून केवळ प्रतिकांवर भाळणाऱ्या नथुराम गोडसे या राक्षसाने गांधींना गोळ्या घातल्या....
गांधीचा खून केला म्हणून काही जणांना शिक्षा तर काही जणांची पुराव्याअभावी... सलमान खान जसा निर्दोष सुटला तशी सुटका झाली....
असे होते बापू....
रामायणातील रामाच्या गोष्टीतील सद्गुण घेऊन त्यावर जगण्याचा प्रयत्न करणारे... आणि कधीच त्यातील काल्पनिक गोष्टींना बढावा न देणारे.....
आदर्श राज्याची कल्पना म्हणून लोकांच्या मनात परंपरागतपणाने प्रस्थापित रामाला लोकशाहीचा नवीन आयाम देतांना लोकांसाठीच्या राज्याला 'रामराज्य' म्हणून मांडणारे व तरीही न घाबरता सांगणारे, लिहिणारे की हा माझा राम म्हणजे रामायणातील राम नाही केवळ एक आदर्शाची कल्पना आहे....
गांधी खरच भन्नाट होते. मारूनही मरत नाहीत, जगविण्याची गरज नाही असे गांधी......
गांधी मरते नही है मेरे दोस्त....कल्पनिकता, कल्पनाविस्तार मर सकता है.... और इसिलीये उसे जिंदा रखनेकीं कोशीष मे लोग लगे रहते है!....

[09/04, 09:03] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#111
*गांधीजींची देणग्या गोळा करण्याची ही शैली निश्चित अभ्यास करण्यासारखी तसेच मनोरंजक वाटेल.*
----------------------------
तुम्ही दोन मिनिटांकरिता आला होता परंतु मी तुम्हाला दहा मिनिटे दिली. विद्यार्थ्यांशी मी जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा त्यांच्यात मिसळण्यात आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात मला आनंद वाटतो. अर्थातच या बाबतीतील माझी भूक मी पूर्णपणे भागवू शकत नाही कारण अनेक कामात मी व्यस्त असतो. परंतु मला एक सांगा - या स्वाक्षरीकरिता तुम्ही प्रत्येकी मला पाच रुपये द्याल काय? याशिवाय मी बंगालीत सही केली आहे. याकरिता मला जास्त फी मिळायला नको काय? (यावर सर्व विद्यार्थी खळखळून हसू लागले. एक विद्यार्थी म्हणाला,“बापूजी!, तुम्ही बनियाचे कौशल्य वापरताहात!”)
दरिद्रनारायणाची सेवा करण्याकरिता मी हा व्यवसाय स्वीकारला आहे. यामुळे मी इतर कोणतेही काम करत असलो तरी माझ्या या व्यवसायाकडे माझे नेहमी लक्ष असते. परंतु तुम्ही जर जास्त देऊ शकत नसाल तर मला सांप्रदायिक ऐक्याकरिता मदत करा. विद्यार्थ्यांमध्ये जात वा समुदायावरून भेदभाव नसावा. आणि तुम्ही दुःखीकष्टी गरिबांना मदत जर करू शकत नसाल तर निदान त्याच्याशी चांगले वर्तन करून त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा. तुम्ही जर हे प्रामाणिकपणे कराल तर तुम्ही मला फार चांगली किंमत दिली असे मी समजेन. (एका मुलीने आपल्या गटाद्वारे आपली सोन्याची आंगठी काढून गांधीजींना दिली.)
गुजरातीवरून, बिहारनी कौमी आगमां, पृष्ठ ३५३-६)
-------------------
मे १४, १९४७ला विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेमधून
===================
कोरोनाच्या भयभीत वातावरणात मजेशीर गीत आमच्या youtube चॅनेल वर पाहायला विसरू नका. खालील लिंक ला जाऊन चॅनेल subscribe करा.
https://youtu.be/cn-Gv8YtTcA
===================
[13/04, 11:32] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#112
*'गांधी आणि मंदिर’ : रामचंद्र गुहा*
“गांधी स्वत:ला धर्मपारायण मानीत. पण आपल्या दृढ हिंदू धर्मश्रद्धेचे प्रदर्शन स्वत:समोर (आणि दुसऱ्या समोर) करणेदेखील त्यांना नापसंत होते. त्यामुळेच अहमदाबादमधील प्रदीर्घ वास्तव्यादरम्यान शहरातील कोणत्याही मंदिरात ते गेले नाहीत. साबरमती नदीकिनारी असणाऱ्या झोपडीसमोरील अंगणात बसून ते प्रार्थना करत असत. सेवाग्रामच्या आश्रमात स्थायिक झाल्यानंतरही तेथील खुल्या वातावरणातच प्रार्थना करणे त्यांनी पसत केले. गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, समिश्र बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. इतर धर्मांच्याविषयी त्यांना तितकाच आदर होता आणि म्हणून आपले अवघे जीवन त्यांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्याकरिता व्यतीत केले. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारले शब्द हे एका हिंदू देवतेचे रामाचे होते. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती. समतावादी समाज त्यांच्यादृष्टीने ' रामराज्या ' समान होता. अध्यात्मिक कल असणाऱ्या मित्रांसोबत चर्चा करताना गांधी त्यांना एकाग्र चित्ताने आणि भक्तीभावाने रामनामाचा जप करण्याचे फायदे सांगत असत .
गांधींचे मंदिरात जाणे क्वचितच होई ; त्यांचा हिंदू धर्म विविध प्रकारे आणि वेगवेगळ्या जागी प्रतीत होत असे . मंदिरात जाणे हा गांधींसाठी धर्मातील महत्त्वाचा मुद्दा कधीच नव्हता. त्याचबरोबर प्रसिद्ध तीर्थस्थळी त्यांना आलेला अनुभवदेखील फार सुखद नव्हता. १९०२ साली वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला दिलेल्या पहिल्या भेटीने महात्मा गांधी फार प्रभावित झाले नाहीत. त्या वाराणसी भेटीचे वर्णन करताना गांधी लिहितात, ' घोंगावणाऱ्या माश्या , यात्रेकरू आणि दुकानदारांचा गोंगाट हे सर्व माझ्यासाठी असह्य होते . जिथे शांत चित्ताने मन एकाग्र करता येईल आणि जिथे जिव्हाळ्याचे वातावरण असेल अशी अपेक्षा होती , तिथे सर्व काही अगदी विरुद्ध घडत होते . पुढे ते लिहितात , ' या मंदिरात , देवाच्या शोधार्थ मी सर्वत्र फिरलो , मात्र या अस्वच्छतेने परिसरात देव मला काही मिळाला नाही . ' १९१६ मध्ये भारतात परतल्यानंतर गांधींनी काशी विश्वनाथ मंदिराला पुन्हा भेट दिली . तेव्हा त्यांना तो परिसर पूर्वीपेक्षाही जास्त अस्वच्छ आणि बकाल वाटला. आणि यामुळेच वाराणसीमधील या अनुभवाने त्यांची खात्री पटली की, हिंदू धर्मातील देव - देवता या मंदिरांमध्ये असूच शकत नाहीत . पुढील तीन दशकांत गांधींनी पायी चालत अथवा रेल्वेने देशभर प्रवास केला . या प्रवासादरम्यान महत्त्वाची हिंदू मंदिरे असणाऱ्या प्रत्येक शहरांना त्यांनी भेटी दिल्या. पण या पुरातन मंदिरांच्या । आत प्रवेश न करता ( फक्त एक अपवाद वगळता , ज्याच्याकडे आपण लेखात पुन्हा येऊ ) ही मंदिरे त्यांनी बाहेरून पाहणेच पसंत केले. गांधींची मंदिराच्या आत जाऊन प्रार्थना न करण्यामागे दोन कारणे होती . एक - त्यांची अशी धारणा होती की, देव मानवाच्या हृदयात वास करतो आणि मानवाचा देवावरील विश्वास किंवा देवावरील प्रेम हे प्रार्थना, कर्मकांड , तीर्थयात्रा , समारंभ यांच्यापेक्षाही जास्त वर्तणुकीतून प्रतीत होत असते. दुसरे कारण म्हणजे, हिंदू मंदिरांमध्ये स्त्रियांविरुद्ध कठोरपणे लिंगआधारित केला जाणारा भेदभाव आणि दलितांच्या विरुद्ध निर्दयतेने जाती आधारित केला जाणारा भेदभाव त्यांनी जवळून पाहिला होता . काशी विश्वनाथ मंदिरास दिलेल्या सुरुवातीच्या भेटींमध्ये आलेल्या काहीशा वाईट अनुभवांमुळे गांधींनी त्यानंतर मात्र, वाराणसीमध्ये अनेक वेळा येऊनदेखील या मंदिरास पुन्हा भेट दिली नाही. पुरी शहरालादेखील भेट दिल्यानंतर त्यांनी जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला. तंजावर येथेसुद्धा त्यांनी बृहदेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यास नकार दिला होता. परंतु , वीस वर्षे स्थानिकांनी केलेल्या अथक संघर्षानंतर १९४६ साली दलितांना मदराईमधील मिनाक्षी मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली, तेव्हा हिंदू धर्मातील या रुढीवादी परंपरेला मंदिराने फाटा दिला या कृतीस समर्थन दर्शवण्यासाठी गांधींनी या मंदिराला भेट दिली . १९२१ मध्ये गांधींनी अयोध्या शहरास पहिली आणि शेवटची भेट दिली. शहरातील इतर मंदिरांना भेट देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. तिथे दिलेल्या एका भाषणात, त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता हिंसेची निर्भत्सना कठोरपणे केली. आणि ' हिंसेला ईश्वर आणि मानवा विरुद्ध केले गेलेले पाप ' असे संबोधले.”
रामचंद्र गुहा / कालपरवा
साधना । २३ फेब्रुवारी २०१९

[14/04, 13:37] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#113
*आंबेडकर - गांधी लव्ह हेट रिलेशन*
- प्रा. हरी नरके
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते एकमेकांचे स्पर्धक होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?
ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा एका कर्तव्यभावनेपोटी हे लिहित आहे.
१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.
२. ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नाही.
३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो. अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट गांधी अॅंड काँग्रेस हॅव डन टू दि अनटचेबल्स" या महाग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नक्कीच नाही.
४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात.
बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]
दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]
५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे.
यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.
२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.
६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते.
त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.
७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले.
त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला." पहिला भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, मला मातृभूमी नाही तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना महाग पडली. बाबासाहेब आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]
८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.
घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.
मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ.जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले.
ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे.
काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.
९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?
१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले.
नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.
११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.
पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]
गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी.
त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "
बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."
आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.
या दोघा महामानवांना वंदन.
-प्रा.हरी नरके, २९ सप्टेंबर, २०१८
________________________

[15/04, 09:36] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#114
स्वातंत्र्याचा जो अंतिम लढा भारत छोडो या नावाने ओळखला जातो, त्याची
सारी योजना सेवाग्राम आश्रमातच झाली. त्याचा निर्णय गांधीजींनी जुलै १९४२ मध्ये सेवाग्राम आश्रमातच घेतला होता. त्या लढ्यासंदर्भात गांधीजींनी आश्रमवासीयांना सांगितले होते की, "संकल्पित आंदोलनात आश्रमाचे अन्नपाणीसुद्धा सरकारकडून बंद होण्याची शक्यता आहे. म्हणून जे कार्यकर्ते अपुर्या अन्नपाण्याशिवाय राहू शकतील, त्यांनीच आश्रमात राहावे. अन्यथा त्यांनी आपापल्या घरी परतावे. " अर्थात एकही आश्रमवासी आश्रम सोडून गेला नाही, ही गोष्ट अलाहिदा!

[16/04, 11:07] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#115
गांधी स्वतःला स्वच्छक, सूत कातणारा विणकर य मजुर म्हणवून घेत. न्यायालयातील खटल्याच्या वेळी त्यांनी आपला हाच व्यवसाय आहे असे सांगितले होते. ते स्वेच्छेने स्वच्छक झाले हेते अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न हा त्यांच्या जीवनाचा अभिन्न भाग होता. अस्पृश्यता निवारणाच्या कामासाठी जीवही देण्याची त्यांची तयारी होती त्याना पुनर्जन्म नको होता, पण तो यावयाचा असेल तर अस्पृश्याचाच असावा अशी त्यांची मागणी होती १९१६ साली अहमदाबाद येथील सभेत मस्तक पुढे करून व मानेवर हात ठेवून मोठ्या गांभीर्याने त्यांनी घोषणा केली होती की, हे शीर अस्पृश्यता निवारणार्थ वाहिलेले आहे. स्वत: गांधीजी व त्यांचे सहकारी ज्या मंदिरात हरिजनांना प्रदेश नसे त्या मंदिरात जात नसत.

[17/04, 11:33] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#116
अस्पृश्यता घालविणे म्हणजे मानवामानवातील भेदभावाची तटबंदी कोसळणे एवढेच नव्हे, तर जीवमात्रातील उच्चनीचता लयास नेणे, अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक
आहे. अस्पृश्यता मानणे हे स्पृश्य लोकांचे महान पातक आहे. अस्पृश्यतेशी चाललेला माझा लढा हा अखिल मानवजातीतील अशुद्धतंशी चाललेला लढा आहे. एखादा स्वच्छक राष्ट्रसभेचा कारभार चालवीत आहे , असे ज्या दिवशी मला दिसेल, तेव्हा मला खरा आनंद होईल.”

[18/04, 08:56] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#117
"अंत्योदयातून सर्वोदय” ही गांधींच्या चळवळीची दिशा होती. यात दयाभावनेऐवजी कर्तव्यभावनाच
अधिक होती म्हणून तर गांधीच्या विधायक कार्यक्रमात 'हरिजन सेवेला' महत्त्वाचे स्थान होते. नेल्सन मंडेला व मार्टिन ल्युथर किंग याना गांधी, दलित, पददलित व शोषितांचा 'मसीहा” वाटले. ल्यूथर किंग म्हणत की, गोऱ्या लोकांचे मन गोरे झाल्याखेरीज काळ्या लोकांचा प्रश्न सूटणार नाही.'' सवर्णांचे मन गोरे होऊन त्याचे ह्दय परिवर्तन होण्यासाठी गांधींनी हरिजन सेवा हे सवर्णांचे कर्तव्य आहे असे मानले.

[19/04, 10:48] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#118
गरजांवर आधारित लोकांचे जीवन हाच महत्त्वाचा संदेश आहे,' असे गांधीजी म्हणत आणि तसे जीवन जगणारी मंडळी महाराष्ट्रात होती, आजही आहेत. गांधीजी तर म्हणत की, ' *माझे जीवन हाच माझा संदेश आहे.'* गांधीजींना अभिप्रेत समाजरचना प्रस्थापित करण्याची शक्ती महाराष्ट्रात होती आणि आजही आहे. गांधीर्जींना कुणी “भारतपिता" किंवा 'हिंदुस्थानपिता' म्हटले नाही. त्यांना 'राष्ट्रपिता' म्हटले आणि तेही सुभाषचंद्र बोस यांनी.
गांधीजींच्या पूर्वीही आद्य शंकराचार्य यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला होता. पण त्यांची प्रेरणा आध्यात्मिक होती. अखिल भारताचा दौरा करून गांधीजींनी या देशात राष्ट्रभावना निर्माण केली. गांधीजींची सामुदायिक प्रार्थना हे त्यांचे प्रतीक आहे. सामुदायिक प्रार्थना ही एकमेकांच्या भल्यासाठी ईश्वराला केलेली. प्रार्थना आहे.

[20/04, 14:48] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#119
*महात्मा गांधींशी नातं असलेल्या 'त्या' 8 महिला*
*1. मेडेलीन स्लेड उर्फ मीराबेन, 1892-1982*
मेडेलीन ही ब्रिटीश अॅडमिरल सर एडमंड स्लेड यांची मुलगी होती. एका महत्त्वाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं त्यांचं आयुष्य एकदम शिस्तीत व्यतीत झालं.
जर्मन पियानिस्ट आणि संगीतकार बीथोवेन यांच्या मेडेलीन या चाहत्या होत्या. त्यातूनच त्यांचा लेखक आणि फ्रान्समधले बुद्धीजीवी रोमेन रोलँड यांच्या संपर्कात आली. रोमेन रोलँड यांनी संगीतकारांवर लिखाण केलंच, शिवाय महात्मा गांधींचं चरित्रही लिहिलं.
रोमेन रोलँड यांनी लिहिलेलं गांधींचं चरित्र वाचून मेडेलीन खूप प्रभावित झाल्या. गांधींचा प्रभाव मेडेलीन यांच्यावर इतका पडला की, संपूर्ण आयुष्यभर गांधींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा निर्णय तिनं घेतला.
गांधींबाबत वाचून प्रभावित झालेल्या मेडेलीन यांनी त्यांना पत्र लिहून आपले अनुभव सांगितले आणि आश्रमात येण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
त्यासाठी त्यांनी दारू पिणं सोडून दिलं, शेती करण्यास शिकल्या, तसंच शाकाहार घेण्यास सुरुवात केली. गांधींचं वृत्तपत्र, यंग इंडिया वाचणंही सुरू केलं. ऑक्टोबर 1925मध्ये मुंबई मार्गे त्या अहमदाबादला आल्या.
गांधींसोबतच्या पहिल्या भेटीचं वर्णनही मेडेलीननं खास शब्दांत करून ठेवलं आहे.
त्यांचे तेव्हाचे शब्द होते की, "जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा समोर एक अंगकाठीनं बारीक व्यक्ती पांढऱ्या गादीवरून उठून माझ्या दिशेनं आली. मला माहीत होतं की ते बापू आहेत. मला आनंद तर झालाच आणि माझ्यातली श्रद्धाही जागृत झाली. मला समोर एक दिव्य प्रकाशच दिसत होता. मी त्यांच्या पावलासमोर झुकले. बापूंनी मला उठवलं आणि तू माझी मुलगी आहेस असं म्हटलं."
(साभार प्रमोद कपूर, बीबीसी हिंदीसाठी )

[21/04, 12:06] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#120

*2. निला क्रॅम कुक, 1872-1945*
आश्रमात लोक निला यांना निला नागिनी म्हणून ओळखत असत. स्वतःला कृष्णाची गोपिका मानणाऱ्या निला माऊंट अबूमधल्या एका स्वामींसोबत (धार्मिक गुरू) राहत होत्या.
अमेरिकेत जन्मलेल्या निला यांचं म्हैसूरच्या राजकुमारावर प्रेम जडलं होतं. निला यांनी 1932मध्ये गांधींना बंगळुरुहून पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी स्पृश्य-अस्पृश्येतेविरोधात सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली होती.
यानंतर दोघांमधील पत्रव्यवहारास सुरुवात झाली. निला यांची 1933च्या फेब्रुवारीमध्ये महात्मा गांधींशी येरवडा जेलमध्ये भेट झाली. गांधींनी त्यांना साबरमती आश्रमात पाठवलं, जिथे काही काळानंतर त्यांची नव्या सदस्यांसोबत चांगली मैत्री झाली.
खुल्या विचारांच्या निला यांना आश्रमाच्या बंद वातावरणात सामावून घेणं सुरुवातील जड गेलं. यातच त्या एकदा आश्रमातून पळून गेल्या. काही काळानंतर त्या वृंदावन इथे सापडल्या.
त्यानंतर काही काळानं त्यांना पुन्हा अमेरिकेत पाठवण्यात आलं. जिथे जाऊन त्यांनी इस्लाम स्वीकारला आणि कुराणचा अनुवाद केला.

[23/04, 08:17] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#121

*3. सरलादेवी चौधरानी, 1872-1945*
उच्चशिक्षित आणि स्वभावानं सौम्य असलेल्या सरलादेवी यांना भाषा, संगीत आणि लेखनाची विशेष आवड होती.
सरला या रवींद्रनाथ टागोर यांची भाची होत्या.
लाहोरमध्ये गांधी सरला यांच्या घरीच उतरले होते. या दौऱ्याच्या काळात त्यांचे पती आणि स्वातंत्र्यसैनिक रामभुजदत्त चौधरी जेलमध्ये होते.
दोघंही एकमेकांच्या फार जवळ होते. ही जवळीक इतकी होती की, गांधी सरला यांना अध्यात्मिक पत्नी मानत असत. नंतर यामुळे त्यांचं लग्न मोडता-मोडता वाचलं हे गांधी यांनी हे मान्य केलं.
गांधी आणि सरला यांनी खादीच्या प्रचारार्थ भारताचा दौरा केला होता. दोघांमधल्या नात्याची माहिती त्यांच्या जवळच्यांनाही होती. अधिकारवाणी गाजवण्याच्या सरला यांच्या स्वभावानं गांधींनी त्यांच्यापासून नंतर अंतर राखण्यास सुरुवात केली.
काही काळानंतर हिमालयातील एकांतवासात असताना सरला यांचा मृत्यू झाला.
(साभार प्रमोद कपूर, बीबीसी हिंदीसाठी)

[24/04, 10:49] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#122

*4. सरोजिनी नायडू, 1879-1949*
सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.
गांधींना अटक झाल्यानंतर मिठाच्या सत्याग्रहाची जबाबदारी सरोजिनी यांच्या खांद्यावर होती.
सरोजिनी आणि गांधींची पहिली भेट लंडन इथे झाली होती.
या भेटीबाबत सरोजिनी यांनी स्वतःच आपल्या भावना तेव्हा व्यक्त केल्या होत्या.
"एक कमा उंचीचा माणूस, ज्यांच्या डोक्यावर केसही नव्हते, ते जमिनीवर एका चादरीवर बसून ऑलिव्ह ऑईलमधून काढलेले टॉमेटो खात होते. जगातल्या सगळ्यांत मोठ्या नेत्याला असं बघून मी आनंदाने हसू लागले. तेव्हा त्यांनी डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की, तुम्ही नक्कीच मिसेस नायडू असाल. एवढं श्रद्धा नसलेलं कोण असू शकेल दुसरं? या माझ्यासोबत जेवण घ्या."
याच्या उत्तरादाखल धन्यवाद देत नायडू म्हणाल्या, काय चुकीची पद्धत आहे ही? अशा रितीनं सरोजिनी आणि गांधी यांच्या नात्याला सुरुवात झाली.

[26/04, 10:16] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#123

*5. राजकुमारी अमृत कौर, 1889-1964*
शाही परिवाराशी संबंधित असलेल्या राजकुमारी पंजाबच्या कपूरथलाचे राजा सर हरनाम सिंह यांच्या कन्या होत्या. राजकुमारी अमृत कौर यांचं शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण झालं होतं.
राजकुमारी अमृत कौर यांना गांधी यांची सगळ्यांत जवळची सत्याग्रही महिला मानलं जातं. राजकुमारी या देखील सगळ्यांशी सन्मानानं आणि मिळून मिसळून वागत.
1934 मध्ये गांधी आणि राजकुमारी यांच्यात पहिली भेट झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना शेकडो पत्र पाठवली. मिठाचा सत्याग्रह आणि 1942च्या भारत छोडो आंदोलनावेळी त्यांना जेलमध्यही जावं लागलं होतं.
स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री होण्याचं भाग्यही राजकुमारी अमृत कौर यांना लाभलं होतं. गांधी राजकुमारी अमृत कौर यांना पत्र लिहीताना पत्राची सुरुवात 'मेरी प्यारी पागल और बागी' अशा मथळ्यानं करत असत आणि पत्रात स्वतःला 'तानाशाह' म्हणजे हुकूमशहा म्हणत.

[27/04, 12:26] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#124

*6. डॉ. सुशीला नय्यर, 1914-2001*
महादेव देसाई यांच्यानंतर गांधींचे सचिव बनलेले प्यारेलाल पंजाबी परिवारातले होते. सुशीला या प्यारेलाल यांची बहीण होती.
आईच्या विरोधानंतरही हे दोघं बहीण-भाऊ गांधींकडे येण्यासाठी स्वतःला रोखू शकले नाहीत. काही काळानंतर मुलं गांधींकडे गेली म्हणून रडणारी त्यांची आई गांधींची समर्थक झाली.
डॉक्टर झाल्यानंतर सुशीला महात्मा गांधी यांच्या खाजगी डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. मनू आणि आभा यांच्याशिवाय थकलेले वृद्ध गांधी ज्यांच्या खांद्यावर आपले हात ठेवत, त्यात सुशीलाही होत्या.
भारत छोडो आंदोलनावेळी कस्तूरबा गांधी यांच्यासोबत मुंबईत सुशीला यांनाही अटक झाली होती. पुण्यात कस्तूरबा गांधींच्या शेवटच्या दिवसांत सुशीला त्यांच्यासोबत राहिल्या होत्या.

[29/04, 08:23] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#125

*7. आभा गांधी, 1927-1995*
आभा जन्मानं बंगाली होत्या. आभा यांचं लग्न गांधींचे पणतू कनू गांधी यांच्याशी झालं होतं. गांधींच्या सभेत आभा भजन गात असत तर कनू फोटोग्राफी करत.
1940 च्या काळातही गांधींची अनेक छायाचित्रं कनू यांनीच काढलेली आहेत. आभा नोआखाली इथं गांधींसोबत राहिल्या होत्या. त्यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली भडकल्या होत्या आणि गांधी हिंदू-मुस्लिम यांच्यात शांतता स्थापित करण्याच्या प्रयत्नात अडकले होते.नथुराम गोडसेनं जेव्हा महात्मा गांधींना गोळी घातली तेव्हा आभा तिथं उपस्थित होत्या.

[30/04, 07:37] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#126

*8. मनू गांधी, 1928-1969*
अगदी लहान वयातच मनू महात्मा गांधी यांच्याकडे आल्या होत्या. मनू महात्मा गांधींच्या दूरच्या नातेवाईक होत्या. गांधी मनू यांना आपली नात मानत असत. नोआखालीच्या दिवसांत आभासोबत मनुदेखील त्यांच्यासोबत होत्या. ज्या बापूंच्या थकलेल्या शरीराला आधार मिळावा म्हणून स्वतःच्या खांद्यावर त्यांचा हात ठेऊन पुढे चालत असत.
गांधींच्या विरोधात ज्यांनी त्यांच्या मार्गात मल-मूत्र टाकून विरोध केला होता, त्या रस्त्याची सफाई गांधींसह आभा आणि मनू यांनीही केली होती.
कस्तूरबा यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची सेवा करण्यात मनू अग्रभागी होत्या. महात्मा गांधी यांची शेवटची काही वर्ष कशी होती हे मनू यांची डायरी पाहिली की कळतं.

[01/05, 07:08] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#127
*गांधीजी विधायक कार्यकर्ते कसे निर्माण करीत?*
*‘गोपुरी शौचघरे’ निर्माण करणारे अप्पा पटवर्धन*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली गावातील अप्पा पटवर्धन नावाचे एक युवक ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून पहिल्या वर्गात एम. ए. उत्तीर्ण झाले. ते गांधीजींना भेटण्यासाठी साबरमती आश्रमात गेले व त्यांना म्हणाले की, “मला समाजसेवा करावयाची आहे. आपण मार्गदर्शन करा!” गांधीजी त्यांना म्हणाले की, “देशात आज मानवी मैला उचलून तो वाहून नेण्याचे काम समाजातील एक विशिष्ट वर्ग करीत आहे. हे फार अन्यायकारक आहे. ही प्रथा बंद झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही काम करा.” गांधीजींची ही आज्ञा शिरसावंद्य मानून अप्पा पटवर्धन सरळ कणकवली येथे परत आले. त्यांनी एक कावड तयार केली. ही कावड खांद्यावर ठेवून ते कणकवली गावात जात असत व तेथील मैला भरून ती कावड खांद्यावर ठेवून आपल्या गोपुरी आश्रमात परत येत असत. त्यावेळी कणकवली येथे टोपल्यांची शौचघरे होती. तो मैला चरात टाकून त्यापासून ते खत बनवीत असत. ते खत भातशेती, भाजीपाला पिके व फळझाडांना दिले जात असे.
अप्पासाहेबांनी मैला वाहून नेण्याचे हे काम अनेक वर्षे केले. पुढे त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मैलापासून खत बनविण्याची शौचघरे तयार केली व त्यांना ‘गोपुरी शौचघरे’ असे नाव दिले. कणकवलीच्या नागरिकांनी अशी शौचघरे तयार करून त्याचा वापर केला आणि मैला वाहण्याची प्रथा बंद झाली.
- स्व. डॉ. जयंत पाटील, नियोजन आयोगाचे माजी सदस्य व ज्येष्ठ फळशेतीतज्ज्ञ, ठाणे
स्त्रोत वनराई जुलै 2015

[02/05, 08:33] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#128

*ग्रामोद्योग अर्थशास्त्रज्ञ जगदीश कुमारअप्पा*
तामिळनाडू राज्यातील जगदीश कुमारअप्पा नावाचे युवक अमेरिकेत राहत होते. त्यांनी ‘चार्टर्ड अकौंटंट’ ही सनद प्राप्त केली होती. ते या क्षेत्रात व्यवसाय करीत होते व त्यांची प्राप्ती चांगली होती. त्यांच्या डोक्यात एक दिवस विचार आला की, अमेरिकेत आपण फक्त पैसा मिळवित आहोत. येथे समाजसेवेला काही वाव नाही. समाजसेवेला वाहून घेता यावे, म्हणून ते आपला व्यवसाय सोडून भारतात परत आले. भारतात आल्यावर पहिल्यांदा ते गांधीजींना भेटण्यास सेवाग्रामला गेले. गांधीजींना त्यांनी आपली पार्श्वभूमी सांगितली व म्हणाले की, मला समाजसेवा करावयाची आहे. आपण मार्गदर्शन करा! गांधीजी म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान आहे. त्यात ग्रामोद्योगांना मोठे महत्त्व आहे. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. म्हणून ग्रामोद्योगाच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करा. त्यासाठी वर्ध्याला जा व मगनवाडीत जी तेलघाणी आहे, ती प्रत्यक्ष चालवून त्याचा अभ्यास करा. गांधीजींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कुमारअप्पा वर्ध्याला गेले. घाणी कशी चालवावयाची, हे त्यांनी कारागिराकडून शिकून घेतले. ते स्वत: घाणीत तेलबिया टाकीत व दिवसभर बैल हाकीत असत. बैल हाकत असताना ते तेलघाणीच्या अर्थशास्त्राचा विचार करीत असत. त्यांना असे दिसून आले की, गावात तेलघाणी असल्यास लोकांना ताजे खाद्यतेल मिळते. जी पेंड राहते, तिचा पशुखाद्य म्हणून उपयोग होतो. गावातील दूध-दुभते वाढते. बालकांना सकस आहार प्राप्त होतो. कामाच्या बैलांना पेंड मिळते व ते मशागत चांगली करतात. त्यातून शेतीची उत्पादकता वाढते व शेतकर्यांना उत्पन्न सुरक्षा प्राप्त होते. या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कुमारअप्पांनी ‘तेलघाणी अर्थशास्त्र’ लिहिले. गांधीजींमुळेच हे शक्य झाले असल्याचे कुमारअप्पा नेहमी सांगत असत. पुढे कुमारअप्पांनी देशातील सर्व ग्रामोद्योगांचा अभ्यास केला. प्रत्येक ग्रामोद्योग स्वत: करून त्यापासून ते अनुभव मिळवित असत व त्यावर आधारित अर्थशास्त्र लिहीत असत. ते म्हणत असत की, ग्रामोद्योग असले पाहिजेत. त्याद्वारे गावातील भूमिहीन कारागिरांना उत्पादक रोजगार मिळेल, तसेच शेतकर्यांनी प्रक्रिया केलेले ताजे अन्न व इतर पदार्थ मिळतील. ग्रामस्वराज्य निर्माण करण्यात ग्रामोद्योगांचे स्थान फार मोठे आहे, किंबहुना भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करावयाची असेल, तर ग्रामोद्योगांचा विकास केला पाहिजे.

[03/05, 07:06] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#129

*निरा आणि ताडगूळ निर्मितीस प्रोत्साहन देणारे गजानन नाईक*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गजानन नाईक नावाचे एक युवक गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्राम येथे गेले. ते गांधीजींना म्हणाले की, मला समाजसेवा करावयाची आहे, आपण जी आज्ञा द्याल, तिचे मी पालन करीन. गांधीजी म्हणाले की, आपल्या सेवाग्रामच्या परिसरात शिंदीची खूप झाडे आहेत. त्यापासून निरा काढा व ताडगूळ बनवा.
गजानन नाईक लगेच वर्ध्याला गेले व त्यांनी शिंदीपासून निरा काढण्याचे व ताडगूळ बनविण्याचे कौशल्य शिकून घेतले. ते सेवाग्रामला परत आले. इथल्या शिंदीच्या झाडावर ते स्वत: चढत असत. त्यांचा शेंडा छेदून निरा काढीत व ताडगूळ बनवित असत. यातून त्यांना मोठा अनुभव मिळाला.
शिंदीच्या झाडाविषयी बोलताना ते म्हणत असत की, शिंदी हे अत्यंत काटक असे झाड आहे. ते पडीक जमिनीवर येऊ शकते व वर्षाला 200 ते 250 लिटर निरा देऊ शकते. निरा हे अत्यंत सकस पेय आहे. जी निरा शिल्लक राहते, त्यापासून ताडगूळ बनविता येतो व त्याचा आहारात उपयोग करता येतो. त्याचबरोबर शिंदीच्या वाळलेल्या पानांपासून चटया व झाडू बनविता येतात, त्यामुळे शिंदीचे झाड हे बहुउपयोगी आहे. हे सर्व मी प्रत्यक्ष कामातून शिकलो असून, त्या कामाची प्रेरणा मला गांधीजींकडून प्राप्त झाली आहे. गांधीजी त्यांना म्हणाले की, या तुमच्या अनुभवाचा देशात उपयोग करा.
गजानन नाईक प्रथम तामिळनाडूत गेले. तेथे कडल्लोर येथे त्यांनी निरा - ताडगूळ प्रशिक्षण केंद्र सुरू केले व त्याचा प्रसार केला. महाराष्ट्रात बोर्डी येथे आचार्य भिसे हे गांधीजींच्या मुलोद्योग शिक्षणाचे कार्य करतात, असे त्यांना समजले. त्यामुळे 1938 साली ते बोर्डीस आले व त्यांनी ‘निरा-ताडगूळ प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले.

[04/05, 07:43] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#130

*शिंदी वृक्ष लागवडीचा महाराष्ट्रात प्रसार करणारे भालचंद्र पाटील*
आचार्य भिसे यांनी 1948 साली ओसबाड येथे ‘कृषी शिक्षण संस्था’ स्थापन केली. या संस्थेत शिंदीची झाडे होती. गजानन नाईक तेथे आले व त्यांनी ‘निरा-ताडगूळ ग्रामोद्योग प्रशिक्षण’ केंद्र सुरू केले. ते आम्हास म्हणाले की, शिंदीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयोग करा. संस्थेतील कृषी शास्त्रज्ञ श्री. भालचंद्र हरी पाटील यांनी या संशोधनाला वाहून घेतले आणि सेंद्रिय खताद्वारे शिंदीची निरा देण्याची उत्पादकता वाढते, हे त्यांनी दाखवून दिले.
भालचंद्र पाटील हे गजानन नाईक यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत. सतत त्यांच्या संपर्कात असत, त्यामुळे त्यांनाही असा विचार आला की, आपण शिंदीचा प्रसार महाराष्ट्रातील जिरायती जमिनीत केला पाहिजे, म्हणून ते प्रथम सोलापूर जिल्ह्यात गेले व तेथे त्यांनी शेतकर्यांची शिबिरे घेऊन शिंदी लागवड करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी उत्तम प्रतिसाद दिला व अनेकांनी शिंदीची लागवड केली. माळीनगर येथील नीलकांत ओगले (भ्र. 9423528686) यांनी तर 3 हजार 500 शिंदीची झाडे लावली. त्यांच्या या झाडांपासून निरा उत्पादन सुरू असून, ते आधुनिक पद्धतीने त्याची विक्री करीत आहेत. ते कल्पतरू निरा उत्पादक सोसायटीचे अध्यक्ष आहेत. गजानन नाईक यांचे स्वप्न होते की, महाराष्ट्रातील जिरायती जमिनीत शिंदीसारखे काटक झाड रुजवावे, ते आता प्रत्यक्षात पूर्णत्वास येत आहे.

[05/05, 06:52] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#131
गांधीजी विधायक कार्यकर्ते कसे निर्माण करीत?
तोताराम - कडूनिंबाची लागवड हेच जीवित कार्य
फिजी देशातून तोताराम नावाचा एक युवक साबरमती आश्रमात आला. त्यांनी गांधीजींना सांगितले की, मला आपणासोबत आश्रमात राहावयाचे आहे. आपण मला राहण्याची संमती द्या. त्या युवकाची ती इच्छा गांधीजींनी मान्य केली. आश्रमात राहणार्या प्रत्येक व्यक्तीला शारीरिक श्रम करावे लागत असत. तोतारामने गांधीजींना विचारले की, मी कोणते काम करू?
गांधीजी म्हणाले, “आपल्या आश्रमाचा परिसर उजाड असल्याने तू तेथे कडूनिंबाची लागवड कर.” आश्रमापासून दूर अंतरावर कडूनिंबाची झाडे होती. त्या झाडाखाली कडूनिंबाची रोपे उगवलेली होती. तोताराम तेथे जात असे. कडूनिंबाची रोपे काळजीपूर्वक उपटून ती आश्रमात आणत असे आणि आश्रमाच्या परिसरात त्यांची लागवड करीत असे. रोपांना पाणी देता यावे म्हणून तोतारामने एक कावड बनविली होती. त्या कावडीने तोताराम साबरमती नदीच्या पात्रातील पाणी आणून आश्रमातील कडूनिंबाच्या रोपांना घालत असे. आश्रमाचा सारा परिसर तसेच आश्रमापासून ते साबरमती कारागृहापर्यंतचा 3 किलोमीटर लांबीचा रस्ता व त्याच्या दुतर्फा त्याने कडूनिंबाची शेकडो रोपे लावली. आज या रोपापासून कडूनिंबाचे प्रचंड वृक्ष तयार झाले असून, सारा परिसर हिरवागार झाला आहे. कडूनिंबाच्या निंबोण्या खाण्यास जे पक्षी येतात. त्यांच्या गुंजनाने वातावरणात मोठा आंनद निर्माण होतो.
कडूनिंबाची लागवड हेच आपले जीवित कार्य आहे, असे तोतारामने मानल्यामुळेच हे घडून आले.

[06/05, 10:12] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#132
४२ सालचा जो लढा झाला, त्यावेळी गांधी चार दिवस आधी सर्वोदयी कार्यकर्त्यांसमोर बोलताना असं म्हणाले होते की, ‘मी आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये माणसं पारखून घेतली, कसोट्या लावल्या. यावेळी मी कसोटी लावणार नाही. तुम्ही स्वतंत्र आहात असं समजून वागायचं. आतापर्यंतच्या आंदोलनात मी हिंसा-अहिंसा असा विवेक केला, आता तोही विवेक या आंदोलनापुरता करणार नाही. तुम्हाला जे जे या देशाला स्वतंत्र करण्यासाठी करता येईल, ते ते करा.’ पुढे ते असं म्हणाले की, ‘सर्वोदय संस्था या क्षणाला आंदोलनात आल्या नाहीत, तर त्यांचं आयुष्य व्यर्थ आहे.’ संस्था निर्माण करायच्या पण त्यांच्यात अडकून पडायचं नाही. स्वातंत्र्यासाठी त्या संस्था मोडायची पाळी आली तर मोडल्या पाहिजेत. पुन्हा नव्यानं उभ्या केल्या पाहिजेत, ही त्यांची दृष्टी होती. तिथं त्यांनी हिंसा-अहिंसेचा मुद्दा केला नाही.

[07/05, 08:03] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#133
महात्मा गांधी हे नाव अहिंसा या तत्त्वाशी कायमचे जोडले गेले. मुळात हिंसा न करणे म्हणजे अहिंसा असा अहिंसेचा नकारात्मक अर्थ काढण्यात काही हशील नाही. हिंसा वाईट असते हे मान्य, परंतु गुलामीही त्यापेक्षाही जास्त वाईट असते. त्यामुळे जिथे हिंसा किंवा गुलामी हा संघर्ष उभा राहिला तिथे गांधींना हिंसा वर्ज्य नव्हती. १९४२ मध्ये हिटलरच्या विरुद्ध ब्रिटनच्या बाजूने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उतरण्यास गांधींची तयारी होती. १९४७ मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर गांधी नेहरूंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. अहिंसा हे गांधींचे साधन होते, साध्य नाही.
- राकेश परब

[08/05, 07:14] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#134
एकदा एका पत्रकाराने गांधींना प्रश्न विचारला की, “तुमच्या आणि नेहरूंच्या मध्ये असलेल्या मतभेदांचे स्वरूप कसे आहे?” गांधींनी यावर फार मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले, “जवाहरच्या मते ब्रिटिश गेले पाहिजे आणि ब्रिटिश व्यवस्था राहिली पाहिजे. परंतु मला वाटते ब्रिटिश राहिले तरी चालतील, पण ब्रिटिश व्यवस्था मात्र गेली पाहिजे.”

[09/05, 15:29] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#135
‘गांधी’ हा चित्रपट तयार करण्यासाठी दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो भारतात आले, तेव्हा अनेक भारतीयांनी कुतूहल वाटलं. एका भारतीय दिग्दर्शकानं त्यांना प्रश्न विचारला- ‘अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारा वॉशिंग्टन तुमच्या समोर होता, आयर्लंडचा बेलरा, रशियाचा लेनिन, इटलीचा गॅरिबाँल्डी आणि चीनचा माओही. मात्र एवढे सारे नेते सोडून तुम्ही गांधींवर चित्रपट करायला का आलात?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिलं- ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती तलवार घेऊन लढणारे नेते प्रत्येक देशातच लढले आहेत. मात्र स्वातंत्र्यासाठी नि:शस्त्र लढा देणारा नेता फक्त तुमच्याच देशात झाला आणि तो ‘गांधी’ होता.’
- लेखक विशाल बाळू डोळे स. प. महाविद्यालयात एम.ए.करत आहेत.

[10/05, 13:35] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#136
काशीला विनोबा भावेंना गांधीजींनी काशी हिंदू विश्व् विद्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणाची चर्चा ऐकायला मिळाली. त्यावर त्यांच्या मनात काही प्रश्न उभे राहिले. विनोबांनी गांधीर्जींना एक पत्र लिहिले. गांधीजींचे उत्तर आले - प्रत्यक्ष भेटावे, पत्रव्यवह्यराने शंकासमाधान होणार नाही.
विनोबा सरळ गांधीजीच्या आश्रमात पोहोचते. आत प्रवेश केला तर तेथे एक गृहस्थ भाजी चिरत बसले होते. त्यांना विचारले, गांधी कुठे भेटतील? ते गृहस्थ म्हणाले, बस, आणि एक चाकू विनोबांच्या हाती देऊन त्यांनाही भाजी चिरायला सांगितले. पुढे कळले की तेच गांधीजी होते. विनोबा म्हणतात, भाजी चिरायला लावून गांधीजींनी मला कर्मयोगाची दीक्षा दिली...

[11/05, 09:58] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#137
*ना संत ना पापी*
मला वाटते को आजच्या जीवनातून 'संत' हा शब्द काढून टाकला पाहिजे. हा शब्द इतका पवित्र आहे को कोणाशीही या शब्दाला असेच जोडणे बरोबर नाही. माझ्यासारख्या माणसाशी तर अजिबात नाही, कारण मी केवळ सत्यशोधक असल्याचा माझा नम्र दावा आहे. माझ्या मर्यादांचे मला भान आहे. मी चुका करतो आणि त्यांची मी निःसंकोच कबुली देतो. मी जाहीरपणे कबूल करतो को एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे मी जीवनातील काही 'शाश्वत सत्यांविषयी' प्रयोग करत असतो. असे असले तरीही मी वापरत असलेल्या पद्धती प्रमाण आहेत असा कोणताही पुरावा माझ्याजवळ नाही. वैज्ञानिक असल्याचा दावाही मी करू शकत नाही, कारण आधुनिक विज्ञानाची जी मागणी असते त्याप्रमाणे माझ्या प्रयोगातून कोणताही प्रत्यक्ष परिणाम सिद्ध झाल्याचेही मी दाखवू शकत नाही.
(यंग. १२-५-१९२०, पृ. २)
मला संत म्हणणे जरी शक्य असले, तरी अजून ती वेळ बरीच दूर आहे. कोणत्याही स्वरूपात मी संत असल्याचे मला जाणवत नाही. परंतु जाणीवपूर्वक वा अजाणतेपणी झालेल्या चुकांनंतरही मी स्वतःला सत्याचा पुजारी नक्कीच समजतो.

[12/05, 11:35] +91 70301 40097: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#138
*तिरस्कार?*
या जगात कुणाचाही तिरस्कार करणे मला जवळ-जवळ अशक्य होते. ईश्वर परायणतेमुळे मी खूप संयमी जीवन जगू शकलो व गेली चाळीस वर्ष कुणाचाही द्वेष करणे मला शक्य झाले नाही. हा एक खूप मोठा दावा आहे हे मी जाणतो, तरी अत्यंत नम्रतापूर्वक मी तो प्रस्तुत करतो. जेथे जेथे दुष्कर्म होत असेल, तेथे तेथे त्याचा धिक्कार करायला मी समर्थ आहे, तसे करतोही. पण इंग्रज प्रशासनाने भारतात जी शिरजोरी चालवली आहे त्याचा केवळ धिक्कारच करीत नाही, तर द्वेषही करतो. हिंदुस्तानाचे अत्यंत निर्दयपणे शोषण करणाऱ्या या नीतीचा मी हृदयापासून धिक्कार करतो. त्याप्रमाणे ज्या पृणित प्रथेचे कोट्यवधी हिंदू समर्थन करतात त्या अस्पृश्यतेचाही मी धिक्कार करतो, *मात्र शिरजोरी करणाऱ्या इंग्रजांना किंवा हिंदूना मी धिक्कारत नाही, कारण प्रेमाने किंवा अन्य उपायांनी त्यांचे हृदय परिवर्तत करता येईल असे मला अजूनही वाटते.*
- मो. क. गांधी
संदर्भ - गांधी - गंगा (मराठी) प्रा. मुरलीधर शहा
पान नंबर – ८

[13/05, 08:56] +91 70301 40097: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#139
विनोबा आश्रमातच रुळले, हिमालय वैगैरे सुटले. तेव्हा कुणीतरी विनोबांना विचारले, तुम्ही आध्यात्मिक शांती आणि क्रांतीचे विचार घेऊन निघाला होता, त्याचे काय झाले? विनोबांनी उत्तर दिले - हिमालयाची शांती आणि बंगालची क्रांती दोन्ही मला गांधीजीं मध्ये मिळाली. म्हणून मी गांधीजींच्या चरणी स्थिरावलो. गांधीजींनी लवकरच विनोबांचे पाणी ओळखले. *ते अँड्रूज यांना म्हणाले कि, आश्रमात मुले काही शिकायला येतात. हा मुलगा आश्रमाला काही द्यायला आला आहे..*

[14/05, 08:27] +91 70301 40097: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#140
*सत्याची नीती*
_संताच्या वेषातील मी राजकीय पुढारी नाही. परंतु सत्यात पराकाष्ठेचा सूज्ञपणा असल्यामुळे कधी कधी माझे कार्य उच्च कोटीच्या राजकीय पुढा-यांसारखे वाटते. सत्य आणि अहिंसेच्या धोरणापेक्षा माझे कोणतेही वेगळे धोरण नाही, असे मला वाटते. मी माझ्या देशाच्या वा धर्माच्या उद्घाराकरिताही सत्य आणि अहिंसा यांचा बळी देणार नाही. तसे पाहिले तर सत्य आणि अहिंसेचा बळी देऊन देशाचा वा धर्माचा उद्धार करता येणार नाही._
- महात्मा गांधी
संदर्भ - यंग इंडिया २०-१-१९२७ पृ. २१

[15/05, 07:12] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#141
*ज्या गांधीना मी जाणतो - विनोबा*
गांधीजींना सगळा देश बापू म्हणत होता. पण मला असे वाटते की, ते 'पित्या' पेक्षा 'माता' अधिक होते. आपण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण करतो तेव्हा तेव्हा दुसऱ्या कुठल्याही गुणांपेक्षा त्यांचे वात्सल्य अधिक आठवते. जुन्या परंपरेचे फळ व नव्या परंपरचे बीज म्हणून एका वत्सल मातेसमान महापुरुषाचे दर्शन आपल्याला बापूजींमध्ये होते. 'गीते' च्या कर्मयोगाचे प्रत्यक्ष आचरण मी बापूमध्ये पाहिले. स्थितप्रज्ञाची लक्षणे ज्याला लागू पडतात असा
शरीरधारी क्वचितच आढळेल. पण या लक्षणांच्या खूप जवळ पोहचलेल्या महापुरुषाला मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या आश्रयाला मला राहता आले हे माझे भाग्यच. त्यांचा आश्रय घेणाऱ्या प्रत्येकाला याचा अनुभव येतो की, आधी आपण वाईट होतो पण नंतर चांगले झालो, लहान होतो पण नंतर मोठे झालो. हजारो लोकांचे महत्त्व त्यांनी वाढवले.
*गांधीजींचे काही विचार लोकांना आवडत नाहीत. तर कुणीतरी त्यांना म्हणायचे. “तुम्ही आता हिमालयात जाणेच योग्य'. बापू त्याला हसून उत्तर देत. जर तुम्ही हिमालयात गेलात तर मी तुमच्या पाठोपाठ येईनच, आणि जर तुम्ही येथेच राहिलात तर तुमचा हा सेवक तुमची सेवा करायला इथेच राहील. 'जेथे स्वामी तेथे सेवक' पुढे ते असेही म्हणत की, 'माझ्या तपस्येचा हिमालय तर तेथेच आहे, जेथे दारिद्र्य आहे जेथले शोषण अजून दूर करावयाचे आहे व दुःख निवारण बाकी आहे'.*
एक नैतिक ध्वनि आला आणि सगळ्या देशाने त्याचे अनुकरण केले अशी कुठलीही संस्था किंवा व्यक्ती सध्या देशात दिसत नाही. वेगवेगळ्या पक्षाचे नेते जनतेपुढे जाऊन एक दुसऱ्यांवर चिखल उडवितात. यामुळे जनतेत
कुठलीही कार्यशीलता निर्माण होत नाही. देशात एक प्रकारची निष्क्रियता, शून्यता आणि रिकामेपण आले आहे. जनता भ्रमित आहे व काय करावे हे तिला सुचत नाही.

पान नंबर – ८-9

[16/05, 11:59] +91 70301 40097: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#142
१९४० साली, विनोबा पवनारला जीवनाचे विविध प्रयोग करण्यात रंगले असता, गांधीर्जींनी विनोबांना सेवाग्रामला बोलावले. भेट झाल्यावर गांधीजी म्हणाले, _'आता सरकारच्या विरोधात व्यक्तिगत सत्याग्रह सुरू करायचा आहे. आरंभ तुला करावयाचा आहे. तू तुझी कामे आटोपून कधी मोकळा होऊ शकशील? . विनोबा उत्तरले, 'मी तुमचा आणि यमराजाचा निरोप समान समजतो. तुम्ही म्हणाल तर मी आताच तयार आहे, पवनारला परत जाण्याचीही गरज नाही.' विनोबांच्या जीवनात विचाराचा निश्चय आणि त्याचा अंमल यात जराही अंतर नसे._

[17/05, 07:24] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#143
माझ्या जीवनात मला कोणताही अंतर्विरोध दिसत नाही आणि कोणताही वेडेपणा दिसत नाही. हे खरे आहे की ज्याप्रमाणे माणसाला आपली पाठ दिसू शकत नाही त्याचप्रमाणे त्याला आपले दोष वा वेडेपणाही दिसत नाही. परंतु विद्वानांनी धार्मिक व्यक्तींना बहुधा वेडेच ठरवलेले असते. त्यामुळेच मी असे समजतो को मी वेडा नसून ख-या अर्थाने धार्मिक आहे. या दोन्ही गोष्टींमधून मी नक्की काय आहे याचा निर्णय मी मेल्यानंतरच होऊ शकेल.
- महात्मा गांधी
(यंग इंडिया १४-८-१९२४ पृ. २६७)

[18/05, 19:14] +91 70301 40097: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#144
*आता कुठे उजाडतंय - विनोबा*
स्वराज्य मिळाले आणि ईश्वराने गांधीजींना उचलून नेले. ईश्वराचा हेतू जाणणे मनुष्याच्या लेखी कठीणच, तरी चिंतनाने आपण त्याचे अनुमान करु शकतो, आपल्या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले यापेक्षा ईश्वराची इच्छा वेगळी असती तर त्याने गांधीजींना आपल्यात राहू दिले असते. पण देश सर्व प्रकारच्या पराधीनतेमधून बाहेर पडावा असे त्याला वाटत होते. इंग्रजांच्या जाण्यामुळे बाहेरचा असलेला दबाब तर गेला. गांधीजींना घेऊन ईश्वराने
आपली बुद्धी डळमळीत करून टाकली जणू ते आपल्याला सांगत आहेत की “तुम्ही लोक सर्वथा स्वतंत्र आहात. स्वतंत्र बुद्धीने विचार करा व खऱ्या अर्थाने स्वतंत्र बना, मनुष्य कितीही महान असला तरी तो काय सर्व देशाला स्वराज्य देऊ शकेल? माझी झोप मलाच पार पाडावी लागते.' त्याप्रमाणे माझे स्वराज्य पण मलाच मिळवावे लागेल. परमेश्वर नेहमी आपल्यासाठी वरून महापुरुष पाठवणार असेल तर त्याने आपली उन्नती होईलच असे नाही. ईश्वर वारंवार अवतार घेत नाही, ही सुद्धा त्याची कृपाच समजायला हवी. लोक असं म्हणतात की गांधीजीनंतर सर्वत्र अंधार पसरला आहे. माझे म्हणणे असे की उजाडायला सुरूवात झाली आहे. डोळे उघडले तर लक्षात येईल. गांधीजी वारंवार हे सांगत होते की, मी जे काही सांगतो त्यावर तुम्ही स्वतंत्र बुद्धीने विचार करा; आणि ते पटले तरच त्याप्रमाणे वागा. पण आपण विचार करण्याचे श्रमसुद्धा न घेता केवळ त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिलो, म्हणून ईश्वरानेच असे ठरवले की आता या लोकांना विचार करण्याचा त्रास द्यावाच लागेल.

पान नंबर – 9 – 10

[19/05, 08:32] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#145
गांधीजींनी अनेक कामांसोबत एक अत्यंत महत्त्वाचे कामही केले, लोकांचे त्याकडे जावे तसे लक्ष गेलेले नाही. गांधीजींनी स्त्रियांना राजकीय आणि विशेषत: सामाजिक क्षेत्रांत पुढाकार घ्यायला शिकविले. अनेक स्त्रियांनी भीती सोडून जेलच्या वाऱ्या केल्या. स्वातंत्र्याच्या आंदोलनात जोमाने भाग घेतला आणि विशेषत: दारूबंदीच्या कार्यक्रमात तर त्याच अग्रेसर राहिल्या. सामाजिक क्षेत्रांत स्त्रिया निर्भयतेने भाग घेऊ लागल्या. विनोबांनी गांधीजींचे हेच काम पुढे नेऊन ब्रहमविद्या-मंदिराची स्थापना करून, स्त्रियांना आध्यात्माची सगळी द्वारे मोकळी करून गांधीजींचे अपूर्ण राहिलेले कामच पूर्ण केले. म्हणूनच ब्रम्हविद्या- मंदिर हि त्यांची शेवटची सर्वश्रेष्ठ कृती आहे.

[20/05, 09:16] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#146
मला असे वाटते को, अहिंसेपेक्षा सत्याचा आदर्श मला अधिक चांगला समजलेला आहे आणि माझा अनुभव मला सांगतो को सत्यावरील माझी पकड सुटली तर अहिंसेचे रहस्य मला कधीही उलगडता येणार नाही.... वेगळ्या शब्दांत सांगायचे तर एकदम अहिंसेचा मार्ग अनुसरण्याचे साहस कदाचित माझ्यामध्ये नसेल. तत्त्वतः सत्य आणि अहिंसा एकच आहेत आणि श्रद्धेची उणीव वा दुर्बलता यांमुळेच संशय निर्माण होत असतो. त्यामुळेच मी रात्रंदिवस प्रार्थना करत असतो को, 'हे देवा मला श्रद्धा दे.' (ए. पृ. ३३६)

[21/05, 09:17] +91 70301 40097: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#147
*मलयगिरीचे गौरव गान - विनोबा*
वडाच्या झाडाच्या सावलीत इतर लहान झुडपे वाढत नाहीत. या करता की लहान झाडांना मिळणारे पोषण मोठे झाड खेचून घेते. ह्या उदाहरणावरून असे म्हणता येते की, मोठ्या पुरुषांच्या आश्रयाने छोटी माणसे वाढत नाहीत.
पण मोठी माणसे वेगळी व महापुरुष वेगळे. महापुरुष महत्त्वाकांक्षी म्हणजे स्वार्थी नसतात. ते महानच असतात. ते इतरांचे पोषण घेत नाहीत. उलट इतरांना पोसत असतात. त्यांना वत्सल गायीची उपमा देता येऊ शकेल.
गाय स्वत:चे वूध पाजून वासराचे पोषण करते. त्यामुळे वासरू रोज वाढते. आपल्यामुळे सर्वांची उन्नती व्हावी ही महापुरुषांची आकांक्षा असते. दुसऱ्यांना उन्नत करण्यासाठी ते नम्र होतात, खाली वाकतात. बापूजींच्या जीवनात आपण हा 'गोवत्स न्याय' प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यांचा आश्रय ज्यांनी घेतला ते लहानाचे मोठे झाले. जे खोटे होते ते खरे झाले. कठोर होते ते कोमल बनले. बापूजींच्या सोबत असलेला प्रत्येक जण स्वत:च्या अनुभवातून हेच सांगेल.
एका कवीने लिहिले आहे 'ज्याच्या आश्रयाला असलेले वृक्ष जसेच्या तसे राहतात तो सुवर्णगिरी किंवा रजतगिरी का असेना. पण आम्ही त्याचा गौरव करीत नाही. आम्ही गौरव करतो मलय पर्वताचा कारण त्याच्या आश्रयाने
सामान्य वृक्षसुद्धा चंदनाचे बनून जातात.'

[22/05, 06:04] +91 90221 21242: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#148
अखेर २४ स्प्टेंबरला दुपारनंतर गांधीजींनी उपोषण थांबवावे, असे आंबेडकरांनी समजावून सांगितले. याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता पुणे करारावर गांधीजींच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. या करारानुसार मागासवर्गाला प्रांतनिहाय आरक्षित जागा, सरकारी नोकऱ्यांमध्ये सुयोग्य प्रतिनिधित्व आणि शिक्षणाच्या पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे नमूद करण्यात आले होते. या करारावर डॉ. आंबेडकरांसह मदनमोहन मालवीय, सप्र, जयकर, राजगोपालाचारी, एम. सी. राजा, उद्योगपती जे. डी. बिर्ला आणि त्या काळातील नामवंत क्रिकेटपटू असलेले, मागासवर्गीय समाजाचे पालवणकर बाळू यांनी सह्या केल्या. येथे नोंदविण्यासारखी गोष्ट म्हणजे गांधीजींनी या करारावर सही केली नाही, त्यांच्या वतीने देवदास गांधी यांनी सही केली होती. या सर्व मान्यवरांची एक बैठक दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २५ सप्टेंबर १९३२ रोजी मुंबईत भरली. या बैठकीत आंबेडकरांचेही भाषण झाले आणि या कराराचे सर्वाधिक श्रेय त्यानी गांधीजींना दिले.

[23/05, 06:47] +91 90221 21242: *गांधी समजून घेताना…*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#149
मला असे वाटते की, लहानपणापासूनच मी सत्याचा कैवारी राहिलो आहे. हे माझ्याकरिता अतिशय स्वाभाविक होते. माझ्या प्रार्थनापूर्ण शोधाने ईश्वर सत्य आहे' या सामान्य तत्त्वाऐवजी 'सत्यच ईश्वर आहे' हे तत्त्व मला दिले. हे तत्त्व एक प्रकारे मला ईश्वरासमोर उभे करते. माझ्या अस्तित्वाचा कण-न-कण ईश्वरव्याप्त असल्याचा अनुभव मला येत असतो.
(हरिजन ९-८-१९४२, पृ. २६४)

[24/05, 06:02] +91 90221 21242: गांधी समजून घेताना…
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
#150
*ते दोन शब्द खोडले - लल्लूभाई पटेल*
कलकत्त्यात हिंदू-मुसलमानांच्या दंगली सुरूच होत्या. एका टोळक्याने गांधीजी राहात होते त्या घरावरच हल्ला चढवला. दरवाजे-खिडक्या तोडून त्यांनी फर्निचरचेही नुकसान केले. गांधीजींवरही विटा फेकल्या पण सुदैवाने कुणालाच इजा झाली नाही. या घटनेमुळे ते गहन विचारात बुडाले. त्यानी उपवासाचा निर्णय जाहीर केला. त्यांनी सांगितले की, भान हरपलेल्या कलकत्त्याला ठिकाणावर आणण्यासाठी मी उपवास करतोय. माझा धर्म म्हणतो की, घरोघर फिरून तू लोकांना स्वत:चे मतभेद विसरून पुनश्च एक व्हायला सांगायला हवे. पण आता या वयात ते शक्य नाही. म्हणून मी उपवासाचा आश्रय घेतलाय. उपवासात पाणी, सोडा व लिंबूचा रस घेण्याविषयी निवेदनातच त्यांनी म्हटले होते.
राजाजी त्यावेळी बंगालचे गव्हर्नर होते. त्यांना वाटले की, लिंबूचा रस घेणे गांधीजींनी ज्या अर्थी ठरवले आहे, त्याअर्थी उपवास सोडण्यासंबंधी त्यांच्याशी बोलण्याची संधी आहे, राजाजींनी गांधीजींची भेट घेऊन त्यांना उपवास न करण्याची कारणे सांगितली. ते म्हणाले 'उपवासच करायचा असेल तर मग हा लिंबूचा रस तरी कशाला हवा?' गांधीजींनी निर्मलबाबूंकडे पाहिले आणि म्हणाले 'माझे निवेदन तुम्ही तपासले तेव्हा ही
गोष्ट तुमच्या लक्षात कशी आली नाही? राजाजी मला गेली कित्येक वर्षे ओळखत आहेत आणि त्यामुळे त्यांनी माझी दुबळी नस अगदी बरोबर पकडली. माझ्या मनात खोलवर कुठेतरी ही आशा होती की, आपण हा उपवास पार पाडू शकू. लिंबूचा उल्लेख मी त्यामुळेच केला.' असे म्हणून त्यांनी पेन्सिल उचलली व निवेदनातले 'लिंबूचा रस' हे शब्द खोडून टाकले!

पान नंबर – 11

[25/05, 05:56] +91 90221 21242: *गांधी समजून घेताना…*
📖📖📖📖📖📖📖
#151
हिंदू समाजातील दुभंगलेपणा संपविण्यासाठी आणि देशातील वंचित, उपेक्षित वर्गाला आपलेसे करण्यासाठी एक पत्रकार म्हणून गांधीजींनी हरिजन या व्यासपीठाचा उपयोग केला. या नियतकालिकाचे हरिजन हे नाव आपण मागास वर्गातील कार्यकर्त्यांच्या सूचनेवरूनच स्वीकारले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. हरिजनच्या अंकासाठी आंबेडकरांनी संदेश पाठवावा, अशी विनंती गांधीजींनी केली होती. तथापि, आंबेडकरांचे यासंबंधी तीव्र आक्षेप होते. बाबासाहेब म्हणाले होते, जातिव्यवस्था आहे तोपर्यंत अस्पृश्यता टिकणारच, ही जातिव्यवस्था उखडली तर अस्पृश्यता संपेल. त्यांच्या या मताची दखल घेत गांधीजींनी हरिजनच्या अंकात लिहिले होते, 'अस्पृश्यता ही आंबेडकरांना नाही, तर उच्चवर्णीय हिंदूंना शरम वाटावी अशी गोष्ट आहे.' समाजाच्या धारणा आणि मानसिकता बदलण्याच्या भूमिकेतून गांधीजी या नियतकालिकातून लिहीत होते आणि समाजाला जागे करीत होते.

[26/05, 06:02] +91 90221 21242: *गांधी समजून घेताना…*
📖📖📖📖📖📖📖
#152
*न्यायावर विश्वास*
अंतिमतः न्यायाचाच विजय होईल असे मानण्याकरिता माझ्याजवळ काही पुरावा आहे म्हणून नाही, तर या गोष्टीवर माझा अदम्य विश्वास आहे म्हणून मी आशावादी आहे,... अंतिमतः केवळ न्यायाचाच विजय होईल या विश्वासामुळेच आपल्याला प्रेरणा मिळत असते. (हरि. १०-१२-१९३८, पृ. ३७२)
कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसातील सर्वोत्कृष्ट गुण बाहेर काढून त्यांचा उपयोग करण्यात मी यशस्वी होतो आणि त्यामुळे ईश्वर व मानवी स्वभावावरील माझा विश्वास कायम राहतो.
(हरिजण १५-४-१९३९, पृ. ८५)

[27/05, 06:04] +91 90221 21242: *गांधी समजून घेताना…*
📖📖📖📖📖📖📖
#153
*तुपाचा दिवा - लल्लूभाई पटेल*
त्या दिवशी सेवाग्राममध्ये नित्य सायंप्रार्थनेनंतर बापू प्रवचन करणार होते. त्या दिवशी गांधी जयंती होती. त्यामुळे जवळपासच्या गावांमधीलही बरेच लोक प्रार्थनेत हजर होते. गांधीजींसाठी एक उंच आसन तयार करण्यात आले होते. कुठल्याही पद्धतीची सजावट नव्हती. फक्त सफेद खादीने ती बैठक सुशोभित करण्यात आली होती. दूर एका ताम्हनात तुपाचा एक दिवा जळत होता. गांधीजी आले. त्यांचे लक्ष त्या दिव्याकडे गेले. त्यांनी डोळे बंद केले व प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर काही बोलायला सुरुवात करण्याआधी बापूंनी प्रश्न केला. “हे ताम्हन कुणी आणले ?” बा म्हणाल्या...” “ते मी आणले आहे”
बापू - “कुठून मागवले ?”
बा - “गावातून.”
क्षणभर गांधीजी बा कडे पहात राहिले. स्वत:च्या पतीला दीर्षायुष्य व आरोग्य लाभावे यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करणे हा प्रत्येक हिंदू स्त्रीचा धर्म आहे असे मानून कस्तुरबांनी ते ताम्हन मागवले व दिवा लावला. मग बापूंनी हा प्रश्न का विचारला ते बां ना कळले नाही.
गांधीजी म्हणाले, “आज सर्वांत वाईट काम कुठले झाले असेल ते हे की बा ने ताम्हन मागावून त्यात तुपाचा दिवा लावला. आज माझा जन्मदिवस आहे. त्यासाठी हा दिवा लावण्यात आला? माझ्या जवळपासच्या गावातील लोकांचे जगणे मी रोज पाहात असतो. भाकरीवर लावायला त्यांना साधे तेलाचे दोन थेंबसुद्धा मिळत नाही आणि आज माझ्या आश्रमात तुपाचा दिवा जळतोय! आज माझा जन्मदिवस असला म्हणून काय झाले? आज तर सत्कर्म करायला हवे. पाप नव्हे. गरीब खेडूतांना जी वस्तू मिळत नाही, त्याचा दुरुपयोग करण्याची परवानगी आपल्याला कुणी दिली ?”

पान नंबर – 12

http://mythoughtinmyway.blogspot.com/
ReplyDelete