निबंध- माझे बाबा,
नमस्कार, मी इयत्ता चौथीत आहे. माझे नाव मोना आहे पण लाडाने मला सगळे चिंगी म्हणतात. लाडावरून आठवले, बाबा आईशी खूप गोड बोलायला लागले की आई म्हणते,"जास्त लाडात येऊ नका, मला तुमचे सगळे धंदे ठाऊक आहेत". त्यावर बाबा म्हणतात, "अंग टेरेसवर चिमन्यांना पाणी ठेवणे यात कसला आलाय धंदा!" त्यावर आई म्हणते, "त्या शेजारच्या टवळीला बघण्यासाठी तुम्हांला रोज चिमण्यांचा पुळका येतो". पुळक्यावरून आठवले, मंगी माझ्या वर्गात आहे. ती मामाकडे शिकायला असते. तिची आई माहेरी आली की बाबांना तिचा पुळका येतो. ते लगेच त्याचं सामान उचलायला जातात. ती बाबांना मामा म्हणते. तर बाबांचे मित्र मंगीच्या आईला बाबांचे सामान म्हणतात. आई बाजारावरून आली की मला "चिंगे सामान घरात ने असे म्हणते!". मग मला प्रश्न पडतो, सामान म्हणजे नक्की काय? एकदा मंगीची आई घरी आल्यावर मी आईला "बाबांचं सामान आलंय", असं म्हणलं. आणि आई बाबांचं कडक्याचं भांडण झालं. बाबांना गोठ्यात झोपावं लागलं. झोपण्यावरून आठवलं. मी रोज आई बाबांच्या मध्ये झोपते पण सकाळी उठल्यावर मी एका बाजूला असते. बाबा म्हणतात, तूच उठून तिकडे जाऊन झोपते. पण मला वाटते बाबा खोटे बोलतात. म्हणून काल मी झोपचे सोंग घेतले तर बाबाच मला रोज उचलून बाजूला टाकतात आणि लाईट बंद करून मारामारी करतात. त्या आवाजाने मी घाबरले की, 'भुत्या आलंय गप्प झोप' असं म्हणतात. पण मला ही मारामारी वेगळीच वाटते.
मारामारीवरून आठवले. काल माझी आणि गल्लीतल्या टिनाची मारामारी झाली. रस्त्याने चाललेले एक आजोबा म्हणाले, "बहिणी बहिणी असताना भांडता कशाला?" ते आजोबा असे का म्हणाले ते कळले नाही म्हणून मी आईला विचारले तर बाबांना अचानक घाम फुटला. घामावरून आठवले, बाबांना आता थोडं टक्कल पडलंय आणि त्यांच्यावर सारखा घाम येत असतो. अधुनमधून ट्युबलाईटच्या उजेडासारखे ते चमकते. आई म्हणते, टक्कल पडले पण या माणसाला अजून संसार कसा करायचा याची अक्कल नाही. अकलेवरून आठवले, आई म्हणते शेजारच्या काकुला अजिबात अक्कल नाही. बाबांशी सारखी निमित्त काढून बोलत असते. दोन पोरं झाली तरी शेण खायची सवय जात नाही. मी आईला शेण खाणं म्हणजे काय विचारले तर तिने माझ्या पाठीत धपाटा घातला. मला खूप रडायला आले. बाबांनी मग आई येडी आहे असे सांगितले आणू मला चॉकलेट घेऊन दिले. तेव्हापासून मी आई काही बोलली की खोटे खोटे रडते आणि बाबा मला लगेच चॉकलेट घेऊन देतात. म्हणून मला माझे बाबा खूप आवडतात.
चिंगी ढमाले,
इयत्ता चौथी,
तुकडी फ

Comments
Post a Comment