मी त्याला म्हणालो,
धर्म राहू दे बाजूला, लोकशाही बळकट कर
तर तो थेट धावून आला अंगावर.
म्हणाला धर्मसत्तेत गैर काय?
धर्म म्हणजे आपलीच माती अन् आपलीच माय.
मग मी त्याला म्हणालो,
माती कोणा एकाची नसते,
प्रत्येक जाती-धर्माचे बियाणे तिच्या पोटात रुजते.
मायला प्रत्येक लेकरू सारखं असतं,
मायेला कुणी तिच्या पारखं नसतं.
मग तो म्हणाला,
तरीही धर्मसत्ता आली तर होऊन होऊन होईल काय?
मग मी म्हणालो,
धर्मसत्ता म्हणजे जुलूस झेंड्यांचा,
धर्मसत्ता म्हणजे कळप गेंड्यांचा.
धर्मसत्ता म्हणजे माणसाचं मरण,
माणसांनीच रचलेलं माणुसकीचं सरण.
तो म्हणाला, हे बुवा कसं काय?
मग मी म्हणालो,
धर्मसत्तेत हिंदू-मुस्लिम दंगल होईल,
भारत नावाचं जंगल होईल.
सवर्ण-दलित भेद होईल,
रोज कोणाचा तरी जीव जाईल.
तुझ्या माझ्या रक्ताचे पाट वाहतील,
भांडणे लावणारे आपसूक बाजूला होतील.
मग तो मला म्हणाला,
धर्मसत्ता नेमकी असते काय?
मी म्हणालो,
धर्मसत्ता म्हणजे राजकारण,
आपल्या खिशावर दुसऱ्याचे अर्थकारण.
धर्मसत्ता म्हणजे भोंदूचा आब,
दोघांचे भांडण तिस-याचा लाभ.
भांडणं लावणारे घरात बसतील,
आपल्यासारखे तिढयात फसतील.
कुणाचा तरी बाप, भाऊ, पोरगा, नवरा, मुलगा जीवानिशी जाईल,
कुणीतरी कोणाच्या तरी मायेला पारखा होईल.
राहती घरे जळून जातील,
लचके तोडून लांडगे पळून जातील.
मग तो म्हणाला,
तेही आपली माणसे मारतील,
आपली माणसे अशीच झुरतील!
आपण काय नुसते पहात रहायचे?
आपल्याच देशात परागंदा व्हायचे?
धर्म आपल्याला भान देतो,
आपल्या माणसाची जाण देतो.
मग मी म्हणालो,
तुझे म्हणणे खरे आहे,
धर्माला कवटाळणे बरे आहे.
पण धर्म पाळावा माणुसकीचा,
सुखाकडून समाधानाकडे,
अन् समाधनाकडून शांतीकडे जाण्याचा.
प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा.
सगळेच झालो माणूस तर मुद्दा वादाचा राहणार नाही,
उगीच कुणी कुणाला पाण्यामध्ये पाहणार नाही.
मग तो म्हणाला,
त्यांनी पण असेच वागले पाहिजे,
दिल्या वचनाला जागले पाहिजे.
मग मी म्हणालो,
सुरुवात आपल्यापासून करू,
त्यांचाही हात हातात धरू.
आपल्या बाजूने विश्वास देऊ,
घुसमटणा-याला श्वास देऊ.
माणुसकीचं नातं असंच फुलतं,
प्रेमाच्या झुल्यावर आनंदानं झुलतं.
हातात हात घेऊन मग तो म्हणाला,
तुझं म्हणणं खरं आहे,
चार पावलं आपण चालू,
चार पावलं ते चालतील.
लोकशाहीचे झुले मग आनंदाने झुलतील,
माणुसकीच्या बागा मग देशभर फुलतील; एकमेकांच्या साथीने.
©के. राहुल, ९०९६२४२४५२
धर्म राहू दे बाजूला, लोकशाही बळकट कर
तर तो थेट धावून आला अंगावर.
म्हणाला धर्मसत्तेत गैर काय?
धर्म म्हणजे आपलीच माती अन् आपलीच माय.
मग मी त्याला म्हणालो,
माती कोणा एकाची नसते,
प्रत्येक जाती-धर्माचे बियाणे तिच्या पोटात रुजते.
मायला प्रत्येक लेकरू सारखं असतं,
मायेला कुणी तिच्या पारखं नसतं.
मग तो म्हणाला,
तरीही धर्मसत्ता आली तर होऊन होऊन होईल काय?
मग मी म्हणालो,
धर्मसत्ता म्हणजे जुलूस झेंड्यांचा,
धर्मसत्ता म्हणजे कळप गेंड्यांचा.
धर्मसत्ता म्हणजे माणसाचं मरण,
माणसांनीच रचलेलं माणुसकीचं सरण.
तो म्हणाला, हे बुवा कसं काय?
मग मी म्हणालो,
धर्मसत्तेत हिंदू-मुस्लिम दंगल होईल,
भारत नावाचं जंगल होईल.
सवर्ण-दलित भेद होईल,
रोज कोणाचा तरी जीव जाईल.
तुझ्या माझ्या रक्ताचे पाट वाहतील,
भांडणे लावणारे आपसूक बाजूला होतील.
मग तो मला म्हणाला,
धर्मसत्ता नेमकी असते काय?
मी म्हणालो,
धर्मसत्ता म्हणजे राजकारण,
आपल्या खिशावर दुसऱ्याचे अर्थकारण.
धर्मसत्ता म्हणजे भोंदूचा आब,
दोघांचे भांडण तिस-याचा लाभ.
भांडणं लावणारे घरात बसतील,
आपल्यासारखे तिढयात फसतील.
कुणाचा तरी बाप, भाऊ, पोरगा, नवरा, मुलगा जीवानिशी जाईल,
कुणीतरी कोणाच्या तरी मायेला पारखा होईल.
राहती घरे जळून जातील,
लचके तोडून लांडगे पळून जातील.
मग तो म्हणाला,
तेही आपली माणसे मारतील,
आपली माणसे अशीच झुरतील!
आपण काय नुसते पहात रहायचे?
आपल्याच देशात परागंदा व्हायचे?
धर्म आपल्याला भान देतो,
आपल्या माणसाची जाण देतो.
मग मी म्हणालो,
तुझे म्हणणे खरे आहे,
धर्माला कवटाळणे बरे आहे.
पण धर्म पाळावा माणुसकीचा,
सुखाकडून समाधानाकडे,
अन् समाधनाकडून शांतीकडे जाण्याचा.
प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा.
सगळेच झालो माणूस तर मुद्दा वादाचा राहणार नाही,
उगीच कुणी कुणाला पाण्यामध्ये पाहणार नाही.
मग तो म्हणाला,
त्यांनी पण असेच वागले पाहिजे,
दिल्या वचनाला जागले पाहिजे.
मग मी म्हणालो,
सुरुवात आपल्यापासून करू,
त्यांचाही हात हातात धरू.
आपल्या बाजूने विश्वास देऊ,
घुसमटणा-याला श्वास देऊ.
माणुसकीचं नातं असंच फुलतं,
प्रेमाच्या झुल्यावर आनंदानं झुलतं.
हातात हात घेऊन मग तो म्हणाला,
तुझं म्हणणं खरं आहे,
चार पावलं आपण चालू,
चार पावलं ते चालतील.
लोकशाहीचे झुले मग आनंदाने झुलतील,
माणुसकीच्या बागा मग देशभर फुलतील; एकमेकांच्या साथीने.
©के. राहुल, ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment