तोलून घ्यावं,
बोलून घ्यावं.
गरज वाटली तर सोलून घ्यावं,
अनोळखी माणसाला!
श्वास द्यावा,
विश्वास द्यावा.
मदतीचा हात द्यावा,
आपल्या माणसाला!
तोडून टाकावं,
मोडून टाकावं.
उगाच कुढत बसण्यापेक्षा,
दुभंगलेलं नातं!
सोक्ष लावावा,
मोक्ष लावावा.
रुजवात एकदाची घालावी,
खऱ्या-खोट्याची!
धुंद व्हावं,
बेधुंद व्हावं.
विचार सोडावा जगाचा,
जीवन जगताना!
ऊतू द्यावं,
मातू द्यावं.
घेतला वसा टाकू द्यावा,
उन्मत्तनाऱ्याला!
चुकू द्यावं,
टाकू द्यावं.
आपलेआप कळू द्यावे,
नकळत्याला!
छंदी व्हावं,
फंदी व्हावं.
मनसोक्त जगावे आयुष्य,
आनंदाने!
झुरू द्यावं,
मरू द्यावं.
फळ कर्माचं भोगू द्यावं,
पाप्याला!
शिंपीत जावं,
गुंफीत जावं.
वेचत जावी फुलं,
चांदण्यांची!
सूर द्यावा,
धीर द्यावा.
मदतीचा हात द्यावा,
गरजवंताला!
दंगू द्यावं,
रंगू द्यावं.
प्रेमपाखराला चिंब भिजू द्यावं,
प्रेमामध्ये!
©के.राहुल 9096242452.
बोलून घ्यावं.
गरज वाटली तर सोलून घ्यावं,
अनोळखी माणसाला!
श्वास द्यावा,
विश्वास द्यावा.
मदतीचा हात द्यावा,
आपल्या माणसाला!
तोडून टाकावं,
मोडून टाकावं.
उगाच कुढत बसण्यापेक्षा,
दुभंगलेलं नातं!
सोक्ष लावावा,
मोक्ष लावावा.
रुजवात एकदाची घालावी,
खऱ्या-खोट्याची!
धुंद व्हावं,
बेधुंद व्हावं.
विचार सोडावा जगाचा,
जीवन जगताना!
ऊतू द्यावं,
मातू द्यावं.
घेतला वसा टाकू द्यावा,
उन्मत्तनाऱ्याला!
चुकू द्यावं,
टाकू द्यावं.
आपलेआप कळू द्यावे,
नकळत्याला!
छंदी व्हावं,
फंदी व्हावं.
मनसोक्त जगावे आयुष्य,
आनंदाने!
झुरू द्यावं,
मरू द्यावं.
फळ कर्माचं भोगू द्यावं,
पाप्याला!
शिंपीत जावं,
गुंफीत जावं.
वेचत जावी फुलं,
चांदण्यांची!
सूर द्यावा,
धीर द्यावा.
मदतीचा हात द्यावा,
गरजवंताला!
दंगू द्यावं,
रंगू द्यावं.
प्रेमपाखराला चिंब भिजू द्यावं,
प्रेमामध्ये!
©के.राहुल 9096242452.
Comments
Post a Comment