औरंगजेबाला तब्बल ७ वर्ष रोखून धूळ चाखायला लावणाऱ्या “महाराणी ताराबाई” हंबीरराव मोहित्यांच्या लेकीची शौर्य गाथा
सरनोबत हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम राजे यांची पत्नी “ताराराणी” एक कर्तबगार राजश्री म्हणून इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले. संभाजी राजे यांच्या मृत्यु नंतर स्वराज्याचा कारभार त्यांनी अगदी कणखरपणे सांभाळला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, दक्षिण भारतात तंजावरपर्यत मुघलांना त्यांनी सळो की पळो करून सोडले. १४ एप्रिल १६७५ साली तळबीड येथे ताराराणी यांचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजे यांच्यासोबत झाले. पुढे राजाराम राजेंच्या निधनानंतर विखुरलेल्या सरदारांना एकत्रित करून मराठ्यांचे सामर्थ्य वाढवले.
अनेक पेचप्रसंगाला सामोरे जाऊन मोघलांना धूळ चाखण्यास भाग पाडले.आपला करारीपणा दाखवत त्यांच्याकडून चौथाई, सरदेशमुखी गोळा करून आपले आर्थिक बळ वाढविले. कोल्हापूर च्या राजगादीची स्थापना देखील त्यांनीच केली. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी दिलेली साथ स्वराज्याची घडी बसविण्यात यशस्वी ठरली. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी तिने मोगली मुलुखावर स्वार्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ निर्माण केले.
१७०० ते १७०७ या काळात औरंगजेबाला दक्षिणेत मुक्काम ठोकायला लावला. या सात वर्षात औरंगजेबाला यशस्वी झुंज दिली. अखेरीस १७०७ साली औरंगजेबाचा याठिकाणी मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांनी मराठ्यामध्ये फूट पाडावी म्हणून पहिला शाहू महाराज यांची कैदेतून मुक्तता केली. यामुळे मोघलांना पाठबळ मिळत गेले आणि ताराराणी यांचे बळ कमी पडू लागले.पुढे बाजीराव पेशवे आणि कान्होजी आंग्रे यांनी एकत्रित येऊन ताराबाईंना पराभूत केले. पन्हाळ्यावर ताराराणी यांना त्यांच्या मुलासह नजरकैदेत ठेवन्यात आले. पहिले शाहू महाराज यांच्या मृत्यूनंतर पुन्हा ताराबाईना राज्याची घडी बसवण्याची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय समोर ठेऊन स्वराज्याच्या अनेक चढउताराला त्या खंबीरपणे सामोरे गेल्या आणि अखेरीस १७६१ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची तिने स्थापना केली. महाराणी ताराबाईंच्या रूपाने त्याकाळी महाराष्ट्राला असे करारी नेतृत्व मिळाले याचा इतिहासालाही नक्कीच अभिमान आहे. स्वराज्याच्या या रणरागिणीला आमचा मानाचा मुजरा!!!….

Comments
Post a Comment