बघू ऑक्सिजन मिळतोय का?
होऊ द्या दंगली,
कापू द्या गळे,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
हिंदू-मुस्लिम आमनेसामने,
धर्म धर्म खेळुया,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
तुम्ही आमची घरे जाळा,
आम्ही तुम्हांला जिवंत जाळू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
तुम्ही आमची दोन मारा,
आम्ही तुमची चार मारू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
होऊ द्या जयघोष,
निघू द्या झेंड्यांचे जुलूस,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
तुम्ही आमची जात काढा,
आम्ही तुमची जात काढू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
तुम्ही आमची वाट आडवा,
आम्ही तुमचा रस्ता खोदू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
तुम्ही आमची जिरवा,
आम्हीही तुमची जिरवू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
स्वप्ने दाखवू विकासाची,
गप्पा मारू देशभक्तीच्या,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
शत्रूवर हल्ला चढवू,
सर्जिकल स्ट्राईकचा डंका पिटू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
मन की बात बोलत राहू,
परदेश वाऱ्या करत जावू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
स्वदेशीचा नारा देऊ,
रोज न चुकता गोमूत्र पिऊ,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
विज्ञानाला ठोकर मारू,
ज्योतिषाची वाट धरू,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
पैसाचा तर पाऊस पाडू,
हॉस्पिटल सुद्धा विकत घेऊ,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
श्वास तुटू द्या,
डोळे मिटू द्या,
बघू ऑक्सिजन मिळतोय का?
शव नंबरला लावूया,
रांगेत नेऊन जाळूया,
आतातरी बघू ऑक्सिजन मिळतोय का?
©के.राहुल, ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment