*🌹🌹|| आद्यक्रांतीविर नरवीर उमाजी नाईक जयंती.||🌹🌹*
मंगळवार दि. ०७ सप्टेंबर २०२१
सशस्त्र क्रांतीचे पाहिले जनक स्वतंत्र भारताचे आद्यक्रांतीविर पुरंदरचे वीर वाघ, गरिबांचा वाली जनतेला ज्यांनी लुबाडले छळले त्यांचे कर्दनकाळ इंग्रना सलग चौदा वर्षे सळोकीपळो करून सोडणारे आणि सर्व प्रथम इंग्रजांविरुद्ध स्वराज्यासाठी क्रांती करून बंड पुकारणारे क्रांती घडवणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर वाघ आद्यक्रांतीविर नरवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा प्रथमतः मुजरा.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारे आद्यक्रांतीविर नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी रामवंशी बेडर समाजात लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.
नरवीर राजे उमाजी नाईक यांचं कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या स्वंराक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी प्राप्त झाली. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले. नरवीर राजे उमाजी नाईक जन्मापासूनच हुशार चंचल शरीराने धडधाकट उंचपुरे करारी असल्यामुळे त्यांना पारंपरिक रामवंशी हेरकला लवकरच त्यांनी आत्मसात केली होती.
जसे उमाजी राजे मोठे होत गेले तसतसे त्यांना दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, भाला, तलवार, तिरकामट, गोफणी चालविण्याची कला त्यांनी अवगत करून घेतली. याच काळामध्ये इंग्रजांनी भारतात सत्ता स्थापयला सुरुवात केली होती. हळू हळू मराठी मुलुख जिंकत ते पुण्याकडे चालले होते. १८०३ मध्ये पुन्हा दुसरा बाजीराव पेशवे स्थापन्य केले. त्यांनी इंग्रजी पाल्य म्हणून सर्व प्रथम त्यांनी इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी रामवंशी बेडर समाजाकडून कडून परत घेऊन आपल्या मर्जीतील जवळचे लोक यांना दिले होते त्यामुळे रामवंशी समाजातील लोक नाराज होती त्याच बरोबर इंग्रजांचे त्याकाळी जनतेवरचे अत्याचार वाढू लागले होते. आपल्या समाजबांधवावरील आत्याचारविरुद्ध उमाजी नाईक हे तरुण पेटून उठले होते.
श्री छत्रपती शिवरायांना स्फूर्तीस्थान देत त्यांचा आदर्श घेत स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार केला. माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही असा पण,नीश्चय त्यांनी करत विठोजी नाईक, कृष्णा नाईक, कुशाबा रामवंशी बाबू सोळंखी यांना घेऊन त्यांनी आपले कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडेरायाला भंडारा उधळत शपथ घेतली.
आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांशी झुंज दिली. आणि इंग्रजांविरुद्ध पहिल्या बंडाची गर्जना केली. जंगल दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवशांना त्यांनी जवळ केले. आणि प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचे जसे तानाजी, बाजी होते त्याच प्रमाणे यांचे भुजबा, पांडू हे दथीदार होते.
उमाजी राजे यांनी इंग्रजांचे खजिने वैगरे त्याच बरोबर इंग्रजी राजवटीला शरण आलेले वतनदार सावकार या लोकांना लुटून गरिबांना मदत सुरू केली. कोणत्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार झाल्यावर तेथे भावसारखे धावून जात होते.
इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजींना सरकारने १८१८ मध्ये एका वर्ष्याची तुरुंगवासाची शिक्षा दिली होती.पण तो काळ त्यांनी सत्कर्मी लावला. त्यांनी लिहणे वाचणे यावर वेळ घालवला. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्ध बंड होते ते आणखी वाढत गेले.
शिवाजी राजे यांच्या सारखेच हे देशासाठी लढत असल्यामुळे जनतेमधून त्यांना खूप साथ मिळाली. त्यामुळे इंग्रज मेटाकुटीला आले होते. उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी यांनी सासवड पुरंदरच्या मामलेदार याना फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या एका पश्चिमेला घेऊन त्या खेड्यामध्ये गेले असता त्यांच्या मध्ये आणि उमाजी नाईक यांच्या सैनिकामध्ये त्यांचे प्रचंड युद्ध झाले.
त्यात इंग्रजांना पराभव सहन करावा लागला. उमजींनी पाच इंग्रजांची मुंडकी उडवून इंग्रजांकडे पाठवली. त्यावेळी इंग्रज चांगले धास्तावले. उमजीचे सैन्य डोंगर दऱ्या मध्ये राहत होते. एका टोळीमध्ये पाच हजार सैनिक असायचे. १८२४ मध्ये उमाजी नाईकांनी भांबुरडी येथील इंग्रज खजाना लुटून तो देवळांच्या देखभालीसाठी वाटला होता.
तसेच त्यांनी इ.स.३० नोव्हेंबर १८२७ मध्ये इंग्रजांना त्यांना ठणकावून सांगितले हे एक आज बंड आहे. तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील फक्त हा इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना चळोकीपळो करून सोडले होते.
इ.स. २१ डिसेंबर १८३० ला उमाजी नाईक यांनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बाईट आणि त्याच्या सैनिकांना मंडारदेवी गडावरुन बंदूक व गोफणी, तोफा चालवून घायाळ करून सोडले होते.त्यामध्ये त्यांचे प्राण घेतले होते.
नरवीर उमाजी नाईक यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरोधी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजांच्या नोकऱ्या सोडाव्यात देशवाशीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा. आणि इंग्रजांच्या विरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा व घरपट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणी मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे उमाजी नाईक यांनी सांगून एक प्रकारे स्वराजाचा पुकारच त्यांनी केला होता.
त्यामुळे उमाजी नाईक झाले जनतेचे राजे आद्यक्रांतीविर नरवीर उमाजी नाईक यांच्या या सर्व प्रकारेमुळे इंग्रज गडबडले. त्यांनी उमजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. उमजींच्या सैन्यातील काहींना फितूर करण्यात आले होते. त्याच वेळी इंग्रजांना जो उमजींची माहिती देईल त्यांना दहा हजाराच बक्षीस त्याच बरोबर चारशे बीगे जमीन देण्याची घोषणा केली होती.
काळोजी नाईक त्याचबरोबर नाना चव्हाण फितूर झाले. या दोघांनी उमजींची सर्वगुपित माहिती इंग्रजांना देण्यास सुरुवात केली.
इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने इ.स. १८२० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला लिहलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे उमजींचा रामवंशी बेडर समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्यातरी राजकीय बदलाची वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना मदत करत असून हे उमाजी राजे होऊन ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नवीन राज्य निर्माण करतील.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे राजे उमाजी नाईक शूरवीर योद्धा होते. आणि विशेष म्हणजे ते निरवेसनी होते. *राजे उमाजी नाईक हे एक पत्नी आणि स्त्रियांचा आदर करणारे होते.*
राजे उमाजी नाईक हे रुबाबदार निरलोभी आणि उदार व्यक्तिमत्त्वाचे होते. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरवली या गावात रात्री बेसावध असताना इंग्रजांनी उमजींना पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले. उमजींवर देशद्रोहाचा खटला चालविण्यात आला आणि या नरवीर उमाजी नाईक यांना न्यायाधिस जेम्सस्टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली गेली. आणि जशी कैद्याला अखेरची इच्छा विचारली जाते त्याप्रमाणे उमजींनाही अखेरची इच्छा इंग्रजांनी विचारली तेव्हा उमाजी नाईक म्हणाले इंग्रजांणो तुम्ही माझ्या देशातून चालते व्हा.
आणि ३ फेब्रुवारी १८३४ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी उमजींना फाशी देण्यात आली. उमाजी नाईक यांच्या बरोबर साथीदार कुशाबा नाईक बाबू सोळंखी यांना देखील फाशी देण्यात आली.
*उमजींना पकडणारा इंग्रज अधिकारी म्याकिंगटॉस म्हणतो उमाजी नाईकांना वेळीच आवरले नसते तर ते भारतातील दुसरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रति शिवाजी ठरले असते.*
हे केवळ उदगार नसून सत्य आहे. जर इंग्रजांनी कूट नीतीचा उपयोग करून पकडलं नसतं तर आपल्या भारत देशाला स्वतंत्र केव्हांच मिळाले असते. देशासाठी फाशीला जाणारे या सर्व क्रांतीविरांना मानाचा मुजरा.
🙏🙏💐💐 आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी राजे नाईक जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏
Comments
Post a Comment