कविता - देशाची संसद मौन आहे.
एक माणूस,
जाे भाकरी थापतोय.
दुसरा एक माणूस,
जाे भाकरी खातोय.
एक तिसरा माणूसपण आहे,
जो ना कधी स्वतः भाकरी थापतो,
ना कधी स्वतः भाकरी खातो.
जो फक्त त्या भाकरीशी खेळतो,
माझा प्रश्न फक्त एवढाच आहे -
"हा तिसरा माणूस कोन आहे?"
या देशाची संसद मात्र मौन आहे.
मूळ कवी - सुदामा पाण्डेय 'धूमिल'
अनुवाद - के. राहुल, 9096242452
Comments
Post a Comment