Skip to main content

कविता - मी मुस्लिम स्त्री आहे








विता - मी मुस्लिम स्त्री आहे


होय मी मुस्लिम स्त्री आहे,

कृपया माझा बाजार मांडू नका.

मी तीच आहे जिने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलंय,

मी तीच आहे जिने ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केलंय.

मीच शाहीन बाग आहे,

मीच आहे कश्मीर आणि  माणिपूरमधील तुमचा भयग्रस्त स्वर.

मीच उभी आहे अन्यायाविरुद्ध,

मीच आहे जामीया आणि अलीगढमधील तुमचा जयघोष.

मी तोच इतिहास आहे,

जो तुम्हांला पुसून टाकायचा आहे,

मी तोच भूगोल आहे,

ज्याचे तुम्हांला समूळ उच्चाटन करायचे आहे.

मीच भगिनी आहे अन्यायग्रस्त बंधूंची,

मीच आहे आपला पुत्र गमावलेली माता.

मीच आहे पतीच्या आजारपणात उपचार करणारी, 

काळजी घेणारी प्रेमळ पत्नी.

मीच आहे धरती, मीच आहे आग,

मीच आहे आकाश, 

मीच आहे लबाडीने त्रस्त झालेल्यांचा बुलंद आवाज.

मीच आहे नर्स, डॉक्टर, वार्ताहर, सैनिक आणि खुपकाही,

मी असते बुरख्यात आणि बुरख्याशिवायही.

मीच आहे दीन-दुबळ्यांचा आवाज.

मीच आयुब, मीच खांनुम,

मीच सिद्रा, मीच अझीम,

मीच इस्मत, मीच राणा,

मीच लक्षावधी दीप,

सप्तसिंधूत चमचमणारी.

होय मी मुस्लिम स्त्री आहे,

जी तुमच्यासाठी सतत ज्योत घेऊन वावरत असते.

होय मी मुस्लिम स्त्री आहे,

माझा लिलाव मांडू नका.


मूळ लेखिका: मौमिता आलम




अनुवाद : के. राहुल




_Written by celebrated poet_ ✍🏼 _*Moumita Alam*_ I am A Muslim Woman I am a Muslim Woman And I am not for sale I sacrifice my life for freedom struggle I stand against the British rule I am Shaheen bagh I am the voice you are afraid of In kashmir, In Manipur I stand against the oppression I call out your name In Jamia, In Aligarh I am the history You want to wipe I am the geography You want to annihilate I am the sister Who stands for all oppressed brothers I am the mother Whose sons disappear I am the wife Who heals you in your sickness I am the carer I am the lover I am in land I am in fire I am in sky I am with mike against the vicious power I am nurse, doctor, fighter, reporter And so on I am with Burqa without Burqa I am the voice for the voiceless I am Ayub, I am Khanum I am Sidra, I am Azim, I am Ismat, I am Rana I am million lights That blink in Singhu I am a Muslim woman I carry light in my eyes For you Oh coward , Oh wilful blinds. Yes I am a Muslim Woman And I am not for auction. Moumita Alam 4/1/21 (In protest against the Bulli Deals) _(About the Poem : This poem is in protest against the heinous attempt of some right wing elements in India. They have made an app named Bulli Bai where they have put a list of names of muslim women for auction. In July last year this right wing element made a similar app named Sulli Deals. In recent years Muslim women in India are being targeted for their religious identity and for speaking up against the agendas of the fascist government)_


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...