कविता - असा मी...
असा मी कसा मी,
असा कसा मी,
माझे मलाच कळले नाही,
माझे असूनही गाव अनोळखी,
मन माझे तिकडे वळलेच नाही.
असा मी कसा मी.........
मी भटकत राहिलो अनवाणी,
कुणी घोटभर पाणीसुद्धा दिले नाही.
मी तडफडत राहिलो वेदनेने,
कुणी जवळ सुध्दा आले नाही.
असा मी कसा मी.........
ते मारत राहिले मला,
गुन्हेगार समजून,
मी मेलो भुकेल्या पोटी,
कुणाचेच काही अडले नाही.
माझा माझा म्हणणारे,
कुणीच रडले नाही.
आप्त सारे दूर निघून गेले,
परक्यांनी जेव्हा स्मशानात नेले,
दुर्दैव माझे असे की सरणही होते ओले.
असा मी कसा मी.........
Comments
Post a Comment