कविता - मनाचा मंत्र
हा जेलमध्ये गेला,
तो जेलमध्ये गेला,
रोज कुणी ना कुणी जेलमध्ये गेला,
ऐकून माझा त्रागा झाला.
हाच माझा त्रागा मग,
चर्चेचा धागा झाला.
आई म्हणाली,
याला सतत जगाची काळजी,
बाबा म्हणाले,
तू तुझे बघ,
आजी म्हणाली,
लष्कराच्या भाकऱ्या भाजू नको.
आजोबा म्हणाले,
हे असेच चालू राहणार.
मित्र म्हणाले,
हा पुढे जाऊन संत होणार.
सगळ्यांची बोलणी ऐकून प्रश्न विचारला मनाला,
मनाने मग मेंदूला मंत्र दिला,
ह्या सगळ्याची सवय करायची असेल,
दुःख करायचे नसेल तर,
तूही थोडा स्वाभिमान विक,
हळूहळू तूही आता थोडे खायला शिक!
Comments
Post a Comment