कर्नाटकातील "कुरबू" आदिवासी जमातीने आपल्या हक्कांसाठी दिलेला लढा. कंबाला ही रेड्यांची शर्यत. डोल्ल्यु कुनिथा हे कथकली नृत्याशी साधर्म्य साधणारी नृत्यकला. या आदिवासी समाजाचा देव हा महादेवाचा अवतार समजला जातो आणि तो वराह रूपात आहे. त्याचे कान्नड भाषेतील नाव "पांजूर्ली" आहे. हा देव कांतारा म्हणजेच जंगलात वास्तव्यास आहे असे समजले जाते. या आदिवासी समाजाचा भूत कोला हा महोत्सव प्रसिध्द असून या दिवशी पांजुर्ली देव प्रत्यक्ष अवतरतो आणि आदिवासी समाजातील संकट दूर करतो असा समज रूढ आहे.
दफ्तर दिरंगाई कायदा, 2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...
Comments
Post a Comment