दया येते अश्या देशाची........!
दया येते अश्या देशाची जिथले नागरिक मेंढरासारखे असतात
आणि देशातील पुढारी त्यांना मेंढपाळासारखे हाकत असतात.
दया येते अश्या देशाची जिथले पुढारी खोटारडे असतात.
जिथे बुद्धिवादी लोक शांत बसून आणि ताकदवान लोक सतत घाबरून असतात.
दया येते अश्या देशाची जिथले लोक आवाज उठवत नाहीत आणि आणि संकट काळी देवा धर्माच्या धावा करत बसतात.
आणि पुंडांना आपला नेता निवडतात,
आणि अन्यायाने व गैरमार्गाने देशावर राज्य करण्यासाठी प्रयत्न करतात.
दया येते अश्या देशाची जिथले नागरिक फक्त आपलीच भाषा, धर्म आणि संस्कृती यांचा पुरस्कार करतात.
दया येते अश्या देशाची जिथले नागरिक आपल्या मतलबालाच आपला श्वास समजतात,
आणि पोटाची खळगी भरली की झोपून राहतात.
दया येते असल्या देशाची आणि नागरिकांची सुद्धा जे आपल्या अधिकारांवर बालंट येऊ देतात,
आणि टाकतात घाण आपले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता,
तेव्हा स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा सूंदर आणि सुखाचे नंदनवन असलेला माझा देश अश्रू ढाळत असतो.
--------------------- लॉरेन्स फर्निंगघेट्टी.

Comments
Post a Comment