कुठे आहेस सांग मला,
कधी यायचा धावून.
वाट तुझी बघण्यात,
होतं नव्हतं गेलं वाहून.
आई माझी म्हणायची,
सकाळ संध्याकाळ तेल वात लावत जा.
अधून मधून संकष्टीला,
दुर्वांची जुडी वाहत जा.
तेल-वात, दुर्वांची जुडी सगळं झालं करून,
खरं सांग कुठं आहेस, सगळं तमाशा पाहून.
वाट तुझी बघण्यात..........
घर गेलं, दार गेलं.
गोठ्यातलं जनावर दावणीलाच मेलं,
आभाळ फाटलं, चूल विझली.
पाहतोस कसा शांत राहुन.
वाट तुझी बघण्यात............
धान गेलं, रान गेलं,
उभं पीक सडून गेलं.
कुढाची झोपडी पडून गेली.
डोळे भरून येतात हे सगळं पाहून.
वाट तुझी बघण्यात..........
सत्ताधारी येतात, विरोधक येतात,
मदतीचं गाजर दाखवून फोटो काढून जातात.
पोकळ बोलून असं काय दुःखं दूर होतात.
जीव द्यायचा विचार येतो पुन्हा राहून राहून.
वाट तुझी बघण्यात................
पुन्हा पुन्हा वाटतं,
खरंच तू आहेस का?
लोभ नाही फार, पोटापूरतं मिळू दे.
दुःख आमचं अधूनमधून तुलाही कळू दे.
आता तरी येशील का सांग आमच्यासाठी धावून?
वाट तुझी बघण्यात..........
©के.राहुल 9096242452.
कधी यायचा धावून.
वाट तुझी बघण्यात,
होतं नव्हतं गेलं वाहून.
आई माझी म्हणायची,
सकाळ संध्याकाळ तेल वात लावत जा.
अधून मधून संकष्टीला,
दुर्वांची जुडी वाहत जा.
तेल-वात, दुर्वांची जुडी सगळं झालं करून,
खरं सांग कुठं आहेस, सगळं तमाशा पाहून.
वाट तुझी बघण्यात..........
घर गेलं, दार गेलं.
गोठ्यातलं जनावर दावणीलाच मेलं,
आभाळ फाटलं, चूल विझली.
पाहतोस कसा शांत राहुन.
वाट तुझी बघण्यात............
धान गेलं, रान गेलं,
उभं पीक सडून गेलं.
कुढाची झोपडी पडून गेली.
डोळे भरून येतात हे सगळं पाहून.
वाट तुझी बघण्यात..........
सत्ताधारी येतात, विरोधक येतात,
मदतीचं गाजर दाखवून फोटो काढून जातात.
पोकळ बोलून असं काय दुःखं दूर होतात.
जीव द्यायचा विचार येतो पुन्हा राहून राहून.
वाट तुझी बघण्यात................
पुन्हा पुन्हा वाटतं,
खरंच तू आहेस का?
लोभ नाही फार, पोटापूरतं मिळू दे.
दुःख आमचं अधूनमधून तुलाही कळू दे.
आता तरी येशील का सांग आमच्यासाठी धावून?
वाट तुझी बघण्यात..........
©के.राहुल 9096242452.
Comments
Post a Comment