संपानाना सकाळी लवकर उठून कारखान्यावर सगळ्यात अगोदर हजर झालं व्हतं. गाळप बंद असल्यामुळे ऑफिस दहा वाजता उघडत व्हतं. आठ वाजल्या तरी गेट उघडलं न्हाय हे बघून नाना वॉचमनवर घसारलं, "आरं पगार काय झोपा काढायचा घेता काय? घड्याळात बघा जरा किती वाजल्या त्ये?". "नाना कालवा करू नका, कार्यक्रम दहा वाजता आहे", वॉचमन गेटच्या आत मधूनच म्हणाला. 'आरं कार्यक्रम रातच्या बाराला असू दि सभासद आला की गेट उघडलंच पायजे', नाना धोतराचा सोगा सावरत म्हणलं.
त्या म्हताऱ्याच्या नादाला लागू नको. लै खतरुड हाय त्ये, दुसरा वॉचमन पहिल्याला म्हणाला.
म्हातारा तुझा बाप असंन, असून धाकट्या पोराचं लगीन व्हायचंय माझ्या, नाना सुपारी कातरत वॉचमनला तावदारलं.
नाना बाप काढायचं काम न्हाय, न्हायतर चेरमनकडं तक्रार करीन तुमची.
अरं तुझ्या चेरमनचा बा पन माझं काय वाकडं करणार न्हाय. खुशाल तक्रार कर माझी पण पह्यलं आत सोड मला.
वॉचमननं मुकाट्यानं गेट उघडलं आणि नाना
Comments
Post a Comment