कविता- आपलं काय?
चूल मातीची,
माती तलावाची,
तलाव पाटलाचा.
भूक भाकरीची,
भाकरी बाजरीची,
बाजरी रानातली,
रान पाटलाचं.
बैल पाटलाचा,
नांगर पाटलाचा,
नांगरट करायची आपण,
पण पीक पाटलाचं.
विहीर पाटलाची,
पाणी पाटलाचं,
शेती-वाडी पाटलाची,
गल्लीबोळ पाटलाची,
मग आपलं काय?
गाव?
शहर?
देश?
अनुवाद: के. राहुल.
मूळ कविता: ओमप्रकाश वाल्मिकी.
Comments
Post a Comment