कविता - पोरगा झाला.
पोरगा झाला, पोरगा झाला.
घरदार नाचलं तुफान.
माय रडली मनात,
किती पोरी पोटात दफन.
किती देवांना नवस,
पोराची हौस घरादाराला.
बाई सुकून गेली नित्याचे दमन,
माय रडली मनात,
किती पोरी पोटात दफन.
वंश घराण्याला मिळाला,
बाईला हायसे वाटले.
आता होणार नाही गर्भपात,
मनी अश्रू दाटले, सुखदुःखाचे.
Comments
Post a Comment