कविता - त्यांनी.....
त्यांनी घोषणा केल्या,
त्यांनी आश्वासने दिली,
त्यांनी जमिनी घेतल्या,
त्यांनी जंगले तोडली,
त्यांनी विस्थापन केले,
त्यांनी नद्या आडवल्या,
त्यांनी धरणे बांधली,
त्यांनी महामार्ग बांधले,
त्यांनी दंगली घडविल्या,
त्यांनी समाजात दुफळी निर्माण केली,
त्यांनी शिक्षण महाग केले,
त्यांनी प्रदूषण वाढविले,
त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केला,
त्यांनी खाजगीकरण केले,
त्यांनी भांडवलशाही आणली,
कशासाठी?
विकासासाठी!
पण कोणाच्या ते मात्र आजपर्यंत सांगितले नाही.
Comments
Post a Comment