Skip to main content

कविता - उडदामाजी काळे गोरे

 कविता - उडदामाजी काळे गोरे

कालचे चोर आजचे साव,

कालचे रंक आजचे राव.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे ,

उडदामाजी काळे गोरे.


कालचे बलात्कारी आजचे ब्रह्मचारी.

कालचे कनिष्ठ आजचे श्रेष्ठ.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालचे शत्रू आजचे मित्र,

कालचे कावळे आजचे पित्र.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालचे चूक आजचे बरोबर,

कालचे फरार आजचे थोर.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालचे पाप आजचे पुण्य,

कालचे हतबल आजचे धन्य.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालची घाण आजचा मान,

कालचा कलंक आजची शान.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालचा तमाशा आजचे कीर्तन,

कालचा धिंगाणा आजचे नर्तन.

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


काल विरोध आज पाठिंबा,

काल मोर्चा आज चर्चा.

काल भ्रष्ट आज कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


काल मनाई आज रवानगी,

काल अडथळे आज परवानगी.

काल भ्रष्ट आज कोरे,

उडदामाजी काळे गोरे.


कालचे विरोधी आज सत्तेत,

कालचे कफल्लक आज मत्तेत.

म्हणूनच,

कालचे भ्रष्ट आजचे कोरे,

उडदामाजी काळे गोरे.




Comments