शिवकालीन वजने(मापे) अठवे- शेराचा 1/8 अडशेरि- अडीच शेर अदपाव- अर्धा पावशेर अदमण- अर्धा मण अदशेर- अर्धा शेर अधोली- अर्धी पायली अंजली- ओजळभर पानी आटके- अर्धा शेर आढक- चार शेर, पायली कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण कार्त- पाव रत्तल किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे कुडव- आठ शेर कुंभ- वीस खंडी कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी कोड- खंडी, वीस मण कोळवे- शेराचा अष्ठमांश खारी- 16 द्रोण, एक खंडी गरांव- अर्ध गूंज माप गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप गुंज- एक वजन परिमाण चंपा- दोन शेर धान्याचे माप चवाटके- छटाक चवाळामण- एक प्रकारचा मण चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण चाळीसा- चाळीस शेरांचे माप चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप चिपटे- पावशेराचे माप चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग चोथवा- एक पायली चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके चौशेरी- चार शेरांचे माप छटाकी- छटाक छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन टवणा- पांच शेरांचे माप टांक- एक तोळा टिपरी- मापी पावशेर टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा ...