का ल उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा सुरू होती. समाजवादी पक्षाने भाजपपुढे मोठे आव्हान उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या बाजूने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू होते. गेली पाच वर्षे उत्तरप्रदेशावर निर्विवाद सत्ता गाजवलेल्या भाजपच्या महिला प्रवक्त्या उत्तरप्रदेशच्या दुरावस्थेला भाजपेतर पक्ष कसे जबाबदार आहेत हे ओरडून सांगत होत्या तर योगी आदित्यनाथ आणि भाजप कसा उत्तरप्रदेशमध्ये अपयशी (नकारा) ठरले आहेत हे समाजवादी पक्षाचा प्रवक्ता सांगत होता. योगी आदित्यनाथ यांना त्याने नकारा म्हणताच भाजपच्या महिला प्रवक्त्या जोरदार सांतापल्या. ही महिला प्रवक्त्याची दखल घेण्याइतकी मोठी नसली तरी 2014 साली अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना उत्तरप्रदेशातील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करताना अखिलेश यांना बांगड्यांच्या आहेर पाठविला होता त्यामध्ये ही महिला प्रवक्ता आघाडीवर होती. ही बाब ही चर्चा घडवून आणणाऱ्या सूत्रसंचालकाच्या पक्की लक्षात होती. चर्चा म्हणजे विरोध होणारच याचे भान न राहिलेल्या या महिला प्रवक्त्याला त्यांनी प्रश्न केला, "2014 मध्ये अखिलेश यादव मुख्यमंत्री असत...