Skip to main content

Posts

कविता -पायरी

कविता- पायरी बाप माझा म्हणायचा, आपण आपल्या पायरीनं रहावं. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा, मुंगी होऊन साखर खावं. बाप माझा म्हणायचा! बाप माझा म्हणायचा, वरच्या पायरीवर गर्दी असते. जातीवाद्यांची वर्दी असते. पायात पाय घालून कुणी तोंडावर आपटतील, चुकून झालं! चुकून झालं! म्हणत पाठ वरून थोपटतील. बाप माझा म्हणायचा! बाप माझा म्हणायचा, विश्वास आपला जिंकण्यासाठी, वरच्या पायरीवरचे कुणी खाली सुद्धा येईल. आले कुणी खाली म्हणून विचारात बदल होत नाही, जात ही अशीच असते, जाता जात नाही. बाप माझा म्हणायचा! बाप माझा म्हणायचा, आलं कुणी आडवं म्हणून, वरच्या पायरीवर जायचं कधी सोडायचं नाही. पाडलं! पाडलं! म्हणत रडत-कुढत बसायचं नाही. बाप माझा म्हणायचा! बाप माझा म्हणायचा, नकळत कुणी करील घात, आपले वाटणारेच घालतात आपल्या अब्रूला हात. चुकलं! चुकलं! म्हणून कुणी पाय सुद्धा धरतात, 'आम्ही असे नाहीत' म्हणत खात्या घराचे वासे हेरतात. बाप माझा म्हणायचा! बाप माझा म्हणायचा, आम्ही आता बदललोय म्हणत कुणी घरातसुद्धा घुसतील. गूज मनीचे जाणून घेण्यासाठी अश्रू सुद्धा पुसतील, सरळपणावर आपल्या ...
ओढवलेला पराभव लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आता पंधरा दिवस झालेले आहेत. पाशवी बहुमतासह मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेत आले असून सत्ताग्रहन ही झाले आहे. मोदी सरकारचा शपथविधीही अगदी थाटामाटात पार पडला आहे. भाजप यात जिंकला

संपूर्ण नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९

        राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९ भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा मसुदा जनतेसमोर ठेवला असून पूर्व प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत अनेक बदल यात सुचविले आहेत. इस्रोचे माजी प्रमुख डॉ. डी. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय समितीने हा मसुदा तयार केला असून त्यातील काही ठळक तरतुदी खालील प्रमाणे सांगता येतील: भाग १ १. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण: ∆सध्याचा ५+२+३ हा पॅटर्न रद्द करून उच्च माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण एकत्र करण्यात आले आहे म्हणजे इयत्ता ९ वी ते १२वी एकत्र करून चार वर्षाचा कोर्स प्रस्तावित आहे ज्यात कला, वाणिज्य आणि शास्त्र असा शाखा निहाय फरक रद्द केला असून एकूण 8 सेमिस्टर चा हा कोर्स असेल ज्यात भाषा, गणित आणि शास्त्र हे विषय बंधनकारक करून इतर कोणतेही विषय आपल्या आवडीनुसार निवडता येतील. ∆पूर्व प्राथमिक शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सुरू होईल. अंगणवाडी शिक्षण हे छोटा शिशु आणि मोठा शिशू या वर्गाबरोबर जोडले जाईल. ६व्या वर्षी मूल पहिलीच्या वर्गात प्रवेश घेईल. ∆ स्वतंत्र B.Ed. रद्द क...
कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर राज्यस्तरीय शिबीर ४ थे वर्ष संकल्पना : आपला भारत-बहुविध भारत ३१.०५.२०१९ पहिला दिवस: उदघाटन सत्र : प्रास्ताविक - मंजूश्री जयसिंग पवार प्रमुख पाहुणे- राम पुनियानी, कॉ. दिलीप पवार, प्रा. एन आर भोसले, इरफान इंजिनियर, पत्रकार जतीन देसाई, मेधा पानसरे, कमलताई विचारे. अध्यक्ष- जयसिंगराव पवार. #हिंदुबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, इसाई हेही आपले बांधवच आहेत. #भारत हा कधीच एकपंथी, एकजाती, एकधर्मा चा नव्हता परंतु आता एकधर्म आणि सरंजामशाही मूल्ये घट्ट होताना दिसत आहेत. # विचारांचा वारसा सांगून चळवळ आणि विचार रुजत नाहीत त्यासाठी विचारांचा पाया भक्कम असावा लागतो. # चांगली माणसे आणि चांगले विचार मोडून किंवा गाडून दुसरे चांगले विचार आणि माणसे उभी राहत नाहीत म्हणून चांगल्या माणसांनी एकमेकांबरोबर काम करणे गरजेचे आहे नाहीतर चांगले विचार आणि माणसे मागे पडतील. मा. राम पुनियानी # शिबिरातील विचारधारा आंदोलनाची भाषा व्हायला हवी. # गुलामगिरी भोगलेल्या राष्ट्रात राष्ट्रवाद भयंकर रूप धारण करतो. या देशांमध्ये प्रामुख्याने धर्माच्या नावाने राष्ट्रवाद फोफावते. ...