Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

कौन है वह।

कौन है वह! मजबूत कंधोपर वो हलका सर लिए घूमता है। चेहरा फीका लेकिन तेज दिमाग लिए घूमता है। दर्द अपना बाजू रखकर अपनोंकी खुशियाँ चूमता है। आंखोमें नमी और चेहरे पे मुस्कान लिए घूमता है। माँका लाडला बनके उसके कदम चूमता है। जोरू का गुलाम बनकर आगे पीछे घूमता है। पिसता है  दाने बनकर चक्की के, हररोज पत्थर चूमता है। जिंदगीभर बीवी के ताने और माँ के माने सुनता घूमता है। दिल की बेचैनी दिखानेवाली आँखे छुपाये घूमता है। दिनभरकी थकान भुलाने के लिए बच्चोंके कदम चूमता है। हुआ क्या है यह किसीको कहे बिना घूमता है। दिल का दर्द छुपाकर घुटन चूमता है। ढलती शाम के साथ ढल जाना भूलकर घूमता है। रात को करवट बदलकर बिस्तर चूमता है। कंधोपर सर रखकर रोना भूलकर घूमता है। माँ की तरह जो कभी सहेला ना सके वो गोद चूमता है। आज तुम आराम करो ऐसे कहनेवाला ढूंढते घूमता है। थोड़ीसी खुशियाँ पाने के चक्कर मे कभी कभी गलत राह चूमता है। दिखता है हमेशा उलझा हुआ ना जाने किसके तलाश में घुमता है। ना जाने कब, कहाँ और किसे चूमता है। शायद वो सुकून की तलाश में घूमता है। ©के . राहुल, 9096242452

कोरोना संसर्ग आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

हॉलिवूडचे चित्रपट म्हणजे सगळेच भव्यदिव आणि डोळे दिपवणारे. उच्च निर्मिती मूल्य आणि अविश्वसनीय तंत्रज्ञान! सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सत्याच्या जवळ जाणा-या पण सद्यपरिस्थितीत असत्य वाटणा-या आणि सामान्य माणसांच्या विचारांच्या आवाक्याबाहेरच्या कथा, पटकथा! असाच केविन फिग आणि मार्व्हल स्टुडिओ निर्मित,  अँथनी आणि ज्यो रुसो  दिग्दर्शित "अँव्हेंजर्स: एन्डगेम" हा २०१९ साली प्रदर्शित झालेला आणि तिकीट बारीवर अत्यंत यशस्वी ठरलेला अँव्हेंजर्स साखळीतील चौथा आणि म्हटले तर हा शेवटचा चित्रपट. चित्रपटातील खलनायक पृथ्वीवरील मनुष्य जातीला संपवायला निघाला आहे आणि तो इतका ताकतवर आहे की सामान्य माणूस तर दूरच पण कोणतेही संहारक अस्त्र त्याचे काहीच करू शकत नाही अश्या वेळेस सर्वांना अपेक्षित असणारे आणि कल्पनेतील अनेक सुपर हिरो एकत्र येतात आणि त्याचा पराभव करतात.  ही कथा बघितली तर अत्यंत साधी आणि अनेकवेळा पाहिली-ऐकली असल्याचे लक्षात येईल. पण यात एक वेगळेपण आहे आणि ते आजच्या काळाच्या सुसंगत आहे. खलनायकाला वर्तमानात हरविणे शक्य नाही म्हणून हे सगळे सुपर हिरो एकत्र येतात आणि टाईम मशीनचा वापर करून खलनाय...

कविता- गंगा तेरे गोद में।

  गंगा तेरे गोद में गंगा तेरे गोद में ना जाने कितने राज छुपे है। आंखे खोल के देख जरा, तेरे किनारे लाशोंके ढेर बिछे है। लेकिन शव इन्सान के है, बहुत आम बात है। बात कुछ और होती अगर इन्सान की जगह गाय होती। गाय को अपनी माई कहने वालों की बड़ी अलग राय होती। अखबारों की सुर्खियों में होते छाती पिटकर रोने वाले। रास्तों पर उतर आते तिलक, तराजू और तलवारवाले। राम नाम के नारे लगते, हिन्दू खतरें में सारे लगते। लेकिन शव इन्सान के है, बहुत आम बात है। हर रोज मरते है इंसान तेरे किनारे। कुछ जिंदगीसे तंग आकर, और बहुत सारे मारे जाते है जात, धर्म और लिंग देखकर। कुछ लग जाते है गले तुम्हारे, राजी खुशी से माँ समझकर। तो कुछ फेके जाते है, कफन के पैसे न होनेसे बेबस होकर। लेकिन शव इन्सान के है, बहुत आम बात है। सुना है गंगा, तेरी गोद मे डुबकी लगाने से सारे पाप धुल जाते है। जो इन्सान इन्सान ना रहे  वह खाक में मिल जाते है। यह कहावत है या हकीकत, मालूम नही। लेकिन तू चुपचाप बह रही रह है, शव किनारे धकेलकर। चुप्पी तेरी देखकर कभी कभी लगता है, तु भी हम सबकी तरह आम है। जिनके बगल में छुरी, उनकेही मुँह में राम है। क्योंक...

बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक: महाराजांच्या साम्राज्याचे नेत्र मूळ बहुरुपी असलेले आणि नक्कल करणे व वेश बदलविण्यात पांरगतअसलेले बहिर्जी नाईक ह्यांना, त्यांचे या कलेतील कौशल्य पाहून मराठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या गुप्तहेर खात्यात सामील केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशयजरी आला तरी कत्तल करणारे...

भाकरीची गोष्ट

भाकरीची गोष्ट! एक आई असते. तिला १०० मुले असतात. त्यातील काही खूप मोठी तर काही खुप लहान असतात. त्यातल्या त्यात पहिली १५-२० मुले वयाने, मानाने आणि ताकदीने खुप मोठी असतात. साहजिकच त्यांना जास्त खायला लागत असते. आई काबाडकष्ट करून कमवून आणलेल्या पैशातून रोज १०० भाकरी करत असे. ती बिचारी समतेची पाईक असल्याने प्रत्येक मुलाला एक भाकरी वाटून देत असे. पण जो पर्यत लहान आणि नकळती असलेली ही ८० मुले जास्त खात नव्हती तोपर्यंत त्यांच्या ताटातील शिल्लक भाकरी या मोठ्या १५-२० मुलांमध्ये वाटली जायची त्यामुळे या मुलांना भरपेट जेवण मिळायचे. साहजिकच या मुलांना आपल्या गरजेपेक्षा जास्त खायची सवय लागली आणि इतर मुलांचा मिळणारा जास्तीचा वाटा हा आपला हक्क आहे असे वाटायला लागले. त्या १५-२० मुलातील पहिली ३-४ मुले खूपच हुशार, चलाख आणि पाताळयंत्री होती. ती एकत्र येऊन या ८० मुलांचा वाटा तर बळकवायचीच पण आपल्या १५-२०मधील इतरांच्या वाट्यातील काही भाग फस्त करत असायची. पण ते इतर मुलांच्या लक्षात येत नसे. कालांतराने लहान मुले मोठी होऊ लागली आणि त्यांचीही भूक वाढत गेली. अगोदर चतकोर-अर्ध्या भाकरीच्या ज्यांचे भागत होते  ते आ...

बंगालच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ!

बंगालच्या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ!   २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यातील आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाममध्ये भाजप, केरळमध्ये डावी आघाडी, तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (आण्णा द्रमुक), आणि पुद्दुचेरीमध्ये  रंगास्वामी काँग्रेस आणि भाजप आघाडी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. यातील कोणत्याच राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली नाही. सर्व राज्यात मतदारांनी स्पष्ट कौल देऊन येणाऱ्या सत्ताधारी पक्षाला भविष्यात आपल्या अपयशाचे रडगाणे गाता येणार नाही याची तजवीज केली हे चांगले झाले.  पाच राज्यांची निवडणूक होत असली तरी सगळ्यात जास्त गाजावाजा झाला तो पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा. कारण येथील निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती. तसाही भाजप २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून काहीही करून प्रत्येक निवडणूक जिंकायचीच या निर्धारानेच मैदानात उतरतो हे पाठीमागील विविध राज्यातील निवडणुका पाहिल्यास लक्षात येते. त्याचप्रमाणे गेली १० वर्षे ममता बॅनर्जी यांची सत्ता अ...

कविता : बघू ऑक्सिजन मिळतोय का?

बघू ऑक्सिजन मिळतोय का? होऊ द्या दंगली, कापू द्या गळे, बघू ऑक्सिजन मिळतोय का? हिंदू-मुस्लिम आमनेसामने,  धर्म धर्म खेळुया, बघू ऑक्सिजन मिळतोय का? तुम्ही आमची घरे जाळा, आम्ही तुम्हांला जिवंत  जाळू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? तुम्ही आमची दोन मारा, आम्ही तुमची चार मारू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? होऊ द्या जयघोष, निघू द्या झेंड्यांचे  जुलूस, बघू ऑक्सिजन मिळतोय का? तुम्ही आमची जात काढा, आम्ही तुमची जात काढू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? तुम्ही आमची वाट आडवा, आम्ही तुमचा रस्ता खोदू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? तुम्ही आमची जिरवा, आम्हीही तुमची जिरवू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? स्वप्ने दाखवू विकासाची, गप्पा मारू देशभक्तीच्या, बघू ऑक्सिजन मिळतोय का? शत्रूवर हल्ला चढवू, सर्जिकल स्ट्राईकचा डंका पिटू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? मन की बात बोलत राहू, परदेश वाऱ्या करत जावू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? स्वदेशीचा नारा देऊ, रोज न चुकता गोमूत्र पिऊ, बघू ऑक्सिजन मिळतोय का? विज्ञानाला ठोकर मारू, ज्योतिषाची वाट धरू, बघू ऑक्सिजन मिळतोय का? पैसाचा तर पाऊस पाडू, हॉस्पिटल सुद्धा विकत घेऊ, बघू ऑक्सिजन मिळतोय का? श्वास तुटू द्या, डो...