Skip to main content

Posts

आर्थिक दारिद्र्यासह वैचारिक दारिद्र्याकडे

आर्थिक दारिद्र्यासह  वैचारिक दारिद्र्याकडे! १९१२ साली इटालियन सांख्यिकी तज्ञ कॉर्रडो गिनी यांनी इटलीमधील आर्थिक विषमता मोजण्यासाठी एक परिमाण शोधून काढले. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती गृहीत धरून त्याने आर्थिक विषमतेच्या काही संकल्पना शोधल्या.  त्या इतक्या प्रभावी आणि कालसुसंगत ठरल्या की, गिनी यांचे हे परिमाण जागतिक बँकेने आणि संपूर्ण जगानेही आपापल्या देशातील आर्थिक विषमता मोजण्यासाठी स्वीकारले.  जगभर हे परिमाण आज "गिनी सहगुणक (Gini coefficient)" म्हणून ओळखले जाते. त्यानुसार आर्थिक विषमता मोजण्यासाठी प्रामुख्याने मालमत्ता, उत्पन्न आणि उपभोग या तीन घटकांचा वापर केला जातो आणि त्यानुसार ० ते १ च्या दरम्यान सहगुणक काढला जातो. जर सहगुणक ० आला तर त्या देशात संपूर्ण समानता आहे असे मानले जाते तर सहगुणक १ आला तर संपूर्ण विषमता आहे असे मानले जाते (आजच्या घडीला जगात एकाही देशाचा सहगुणक ० नाही ही जशी दुर्दैवाची बाब, तसेच एकही देशाचा सहगुणक १ नाही हे ही विशेष!)  अनेक संशोधनानंतर हे तीनही घटक समाविष्ट करून मानव विकास निर्देशांक आणि मानव समाधान निर्देशांक हे समानता आणि समाधान...

कोरोनाचा फैलाव आणि चीनी अर्थकारण

कोरोनाचा फैलाव आणि चीनी अर्थकारण!         कोरोना विषाणूच्या संसर्गाने सर्व जग सध्या भयभीत झाले असले तरी अविकसित आणि भारत वगळता इतर विकसनशील देशांना त्याचा फटका बसलेला नाही. कारण या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला नाही किंवा तशी लक्षणे असलेला एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेले देश हे एकतर विकसित देश आहेत किंवा चीनशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे स्पर्धा करणारे आहेत. शिवाय चीन अमेरिकेसह या सर्व देशांना मागे टाकून जगातील बलवान अर्थव्यवस्था बनण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. त्या बाजूने विचार करता चीनने बरीच मजल मारली असली तरी त्यामध्ये त्यांना अद्यापही अपेक्षित यश आलेले नाही आणि चीन ही हे सगळे जाणून आहे. त्यासाठी चीन अत्यंत अमानवी पद्धतीने आणि धुर्तपणे पावले टाकत असला तरी चीनला बाह्यजगाशी स्पर्धा करत असतानाच अंतर्गत अडथळ्यांवर मात करता आलेली नाही. त्यामधील प्रमुख अडथळा हा त्यांच्या लोकसंख्येचा आहे. चीनची लोकसंख्या आज १५० कोटीच्या घरात आहे. त्यामुळे जगातील दोन नंबरची अर्थव्यवस्था (जीडीपी १२ ट्रेलियन डॉलर, पहिल्या क्रमांकावर जीडीपी २४ ट्...

वाळवंटातील रखरख: रुदाली

वाळवंटातील रखरख: रुदाली           प्रथा आणि परंपरा या भारतीय समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे.  भारतातील भाषिक, धार्मिक, प्रांतिक, पेहराव आणि चालीरीती यातील वैविध्य या प्रथा आणि परंपरांच्या मुळाशी आहे. प्रत्येक धर्माच्या आणि प्रांताच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी थोडे बारकाईने पाहू गेल्यास त्यात काही समान धागे आपल्या निदर्शनास येतात. त्यातील काही धागे हे भारतभर तर काही जगभरही समान असल्याचेच दिसून येतात. त्यामध्ये केंद्रस्थानी असलेले काही घटकही सर्वत्र समान असल्याचे दिसते. या घटकांत स्त्री, तिची जात आणि तिचा आर्थिक स्तर हे कळीचे घटक असल्याचे दिसून येते. बहुतांश प्रथा आणि परंपरा या स्त्रिया साठी आणि त्यातल्या त्यात ती स्त्री कोणत्या जातीची आणि तिचा आर्थिक स्तर कोणता आहे यावर अवलंबून राहतो.          राजपुतांचा प्रांत म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावलेल्या राजपुताना म्हणजेच आजच्या राजस्थानमध्येही अशीच एक प्रथा आहे. परंतु त्यासाठी जयपूरच्या बाहेर जाऊन वाळवंटाने वेढलेल्या आणि बारा महिने-अठरा काळ रखरखत असलेल्या ग्र...

मराठी नाटक, चित्रपट, वेबसिरीजच्या लिंक

[24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/kNAnZL0czs0 [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/jcYGdBdgDS8 [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/NIMIgL-OLXc [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/FqnS0PSZ02w [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/JZl_zwm_IPI [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/SVY0mq7FO1Y [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/kFgEoB5-75Y [24/03, 14:09] +91 94049 99285: https://youtu.be/U7350LnlKCk [24/03, 17:16] +91 98220 16455: https://youtu.be/NIMIgL-OLXc [24/03, 17:16] +91 98220 16455: https://youtu.be/JZl_zwm_IPI •𝐐𝐔𝐀𝐑𝐀𝐍𝐓𝐈𝐍𝐄 𝐒𝐓𝐀𝐑𝐓𝐄𝐑 𝐏𝐀𝐂𝐊• ___ MOVIES: https://drive.google.com/drive/mobile/folders/1z9TE9dCdWe1epUWxHbpCZSSUoAF4DQdj GAMES: https://drive.google.com/drive/mobile/folders/1_rk2Y2Dm4t95OqA4RJT1T3oTv6Q7J9o8 SERIES: https://drive.google.com/drive/mobile/folders/16vVbSTKIwGCdr1wFttAK_INuvXjXjH9Z MUSIC: https://drive.google.com/drive/mobile/folders...

त्रियाचरित्र

त्रियाचरित्र          "त्रियाचरित्र" ही प्रेमचंद यांची अत्यंत वास्तवदर्शी आणि भारतीय समाजमानचे चित्रण करणारी साहित्यकृती आहे. या कथेवर आधारित "त्रियाचरित्र" याच नावाचा चित्रपटही ८० च्या दशकात आलेला होता आणि तो समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी तितकाच उचलून धरला होता. कोरोनाच्या कृपेने अपघाताने का होईना ही साहित्यकृती वाचण्याच्या आणि चित्रपट पाहण्याचा योग आज जुळून आला.  भारतातील अनेक भाषांमध्ये प्रांतिक गरज लक्षात घेऊन विषय आणि आशय तोच ठेवून "त्रियाचारित्र" हा चित्रपट आला आणि गाजला सुद्धा. त्याला कारण म्हणजे भाषा वेगळी असली तरी स्त्री शोषण आणि त्याचे स्वरूप सर्वत्र सारखे असणे होय. त्यातही आणखी एक साम्य म्हणजे शोषित स्त्री खालच्या वर्गातील असणे होय. पण तरीही प्रेमचंद यांचे वेगळेपण म्हणजे खालच्या जातीची माणसे सवर्णांना हाताशी धरून आपल्याच स्त्रियांचे शोषण कसे करतात हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.  एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती करणे किंवा तिला बदनाम करणे ही सामान्यपणे विकृती समजली जाते कारण तो पुरुषही त्यात बदनाम होतो पण आपले सामाजिक स्...

अर्थसंकल्प २०२०-२१

अर्थसंकल्प २०२० - २१: तरतूदी आणि अपेक्षा !              महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ६ मार्च २०२० रोजी महाराष्ट्राचा ३ , ९० , ००० कोटी रुपयांचा S अर्थसंकल्प जाहीर केला . मंदीसदृश्य परिस्थिती , वाढत्या कर्जाचा डोंगर , उत्पन्नात झालेली लक्षणीय घट आणि केंद्र सरकारने राज्याचा उत्पन्नाचा वाटा देताना घेतलेला आखडता हात या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला . त्यामुळे अर्थसंकल्पातून आपल्या हाती काय येणार याकडे शेतकरी , नोकरदार वर्ग आणि महागाईने भरडलेली सामान्य जनता डोळे लावून बसली होती . त्यामुळे सामान्य जनतेच्या आणि शेतकरी - नोकरदार आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहायला हवे : # महत्वाच्या आणि जमेच्या बाजू : १ . ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी   संपूर्ण कर्ज भरावे म्हणून एकरकमी  त डजोड योजना राबविणे . त्यामुळे शेतकऱ्यांन...