Skip to main content

Posts

लोकमान्य टिळक ते #क्रांतिकारक गांधी! - संजय आवटे

#लोकमान्य टिळक ते #क्रांतिकारक गांधी! - संजय आवटे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त परवा होत असलेल्या एका कार्यक्रमात अमित शहा प्रमुख वक्ते आहेत. म्हटले तर हे आश्चर्याचे आहे. कारण, टिळक हे कॉंग्रेसचे नेते. मात्र, शहांना ते 'आपले' वाटतात. शहाच नव्हे, त्यांच्या पूर्ण पक्षाला आणि संघटनेलाही लोकमान्य आपले वाटतात. शिवाय, हा प्रकार निव्वळ महापुरूषांच्या अपहरणाचा मानावा, असाही नाही. लोकमान्य टिळक हे खरोखरच असामान्य असे महापुरूष. प्रतिभावंत आणि सर्वगामी बुद्धिमत्ता असलेले. कॉंग्रेस नावाचा 'डिबेटिंग क्लब' हे आक्रमक आंदोलन झाले, ते लोकमान्यांमुळे. लोकमान्य ज्या 'तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी' म्हणून मानले गेले, त्या तेल्यांविषयी आणि तांबोळ्यांविषयी त्यांचे काय मत होते, हा मुद्दा वेगळा. पण, कॉंग्रेस आक्रमक अशी चळवळ व्हावी, हा प्रयत्न लोकमान्यांचाच. त्यासाठी त्यांनी अनेकविध कल्पना लढवल्या आणि त्यातून कॉंग्रेसला जनाधार मिळू लागला. १८९० मध्ये लोकमान्य कॉंग्रेसमध्ये आले आणि अल्पावधीतच महत्त्वाचे नेते झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर तर 'लाल-बाल-...

नागवंशाचा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकर

~ नागवंशाचा इतिहास ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागवंशाबद्दल नागपूरच्या दीक्षाभूमिवर १४ /१५ ऑक्टोबर १९५६ रोजी जे भाषण केले त्यात म्हणतात, "ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या मध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागाना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनिने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपन वंशज आहोत. ज्या नाग लोकांनी एवढा छळ सोसावा लागला. त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता, त्यांना तो महापुरुष गौतमबुद्ध भेटले. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. नाग लोकांनी मुख्य वस्ती नागपूर येथे येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास *'नागपूर'* म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे सत्ताविस मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी नदी आहे ती नागनदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरुण पडले आहे. यावरुन नागवंश हा या देशातला राज्यकर्ता वंश होता. त्य...

कथा

संपानाना सकाळी लवकर उठून कारखान्यावर सगळ्यात अगोदर हजर झालं व्हतं.  गाळप बंद असल्यामुळे ऑफिस दहा वाजता उघडत व्हतं. आठ वाजल्या तरी गेट उघडलं न्हाय हे बघून नाना वॉचमनवर घसारलं, "आरं पगार काय झोपा काढायचा घेता काय? घड्याळात बघा जरा किती वाजल्या त्ये?".  "नाना कालवा करू नका, कार्यक्रम दहा वाजता आहे", वॉचमन गेटच्या आत मधूनच म्हणाला.  'आरं कार्यक्रम रातच्या बाराला असू दि सभासद आला की गेट उघडलंच पायजे', नाना धोतराचा सोगा सावरत म्हणलं.         त्या म्हताऱ्याच्या नादाला लागू नको. लै खतरुड हाय त्ये, दुसरा वॉचमन पहिल्याला म्हणाला.         म्हातारा तुझा बाप असंन, असून धाकट्या पोराचं लगीन व्हायचंय माझ्या, नाना सुपारी कातरत वॉचमनला तावदारलं.        नाना बाप काढायचं काम न्हाय, न्हायतर चेरमनकडं तक्रार करीन तुमची.          अरं तुझ्या चेरमनचा बा पन माझं काय वाकडं करणार न्हाय. खुशाल तक्रार कर माझी पण पह्यलं आत सोड मला.        वॉचमननं मुकाट्यानं गेट उघडलं आणि नाना

माणगांव परिषद: बहिष्कृतांचे रणशिंग- उत्तम कांबळे

  Home   आमच्याविषयी   संपर्क   ▼ Thursday, 25 June 2020 माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे 'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’  हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐतिहासिक परिषदेच्या शंभर वर्षे मागे जाऊन तिला अस्वस्थ शतकाशी जोडणारा हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाजक्रांती घडवणार्‍या असंख्य संदर्भांशी जोडला गेला आहे. ग्रंथासाठी लेखकाने लिहिलेल्या दीर्घ मनोगताचा हा सारांश. . माणगाव येथे झालेल्या (२१ ,  २२ मार्च १९२० )  बहिष्कृत वर्गाच्या पहिल्या परिषदेमुळे अस्पृश्यतेतून मुक्त होण्यासाठी लढाईचं पहिलं मैदान तयार झालं. सामाजिक युद्धासाठी पहिला बिगुल वाजला तो माणगावातच. अस्पृश्यांना नवा , तडफदार ,  संघर्षशील ,  त्यागी ,  ज्ञानी नेता लाभला तो माणगावातच. युद्...

आणीबाणी आणि दलितहीत

आणीबाणीकडे बघायचा एक दलित दृष्टिकोनही आहे. त्याबद्दल चर्चा होत नसते. पण आणीबाणी दलितांसाठी एक मुक्तीचा मार्ग होता. तो त्यांचासाठी सुवर्णकाळ होता. दलित खर्या अर्थाने सामाजिक राजकीय नी आर्थिक स्वातंत्र्यचा अनुभव घेऊ लागले होते. दलितांना मिशा वाढवून फिरण सुद्धा ज्या देशात बंदी होती त्या देशात ते मिशा वाढवून अभिमानाने कोणतीही भिती वा तमा न बाळगता फिरू लागले होते. त्यांना आता गावातल्या धनदांडग्यांची, जमिनदारांची, जातपंचायतीची कसलीही भिती वाटतं नव्हती. कारण आणीबाणीचा काळात व्यवस्था एकदम शिस्तीत काम करत होती. प्रस्थापित वर्ग इंदिरा गांधीना घाबरत होता. दलितांवरचे अत्याचार अचानक कमी झाले होते. एवढचं नाही तर त्याकाळात इंदिरा गांधीनी दलित अदिवासी हिताचे अनेक निर्णय घेतले होते.इ इंदिरा गांधीं विरोधी गट हा इंदिराजींचा राजकीय आणीबाणीला विरोध करत असताना त्यांचा सामाजिक व आर्थिक निती काय होत्या? दलित वंचितांसाठी निती काय होत्या याकडे मात्र दुर्लक्ष करतात. इंदिरा गांधी विरोधी गट मुख्यतः आरक्षण नी बँकांचा राष्ट्रीयकरणा विरोधात होता. तो गट प्रस्थापित उद्योगपतींचा बटिक होता. काँग्रेस मध्ये फुट पडण्यास ...

वैचारिक पंढरीची वारी

********** 🚩 *|| वैचारिक पंढरीची वारी ||* 🚩 *। आप आपल्या घरी ।* 🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁 संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना महामारीची वर्तमान स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, देहू आणि आळंदीहून पंढरपूर ठिकाणी पायीवारी जाणार नाही हा वैचारिक निर्णय घेणार्या सर्व वारकरी संप्रदायाचे अभिनंदन••••• पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते. हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा जपणार्‍या वारीत टाळ, मृदंग गर्जत आणि मुखी पांडुरंगाचे नाव घेत, नाचत लाखो वारकरी सहभागी होतात. आषाढी वारीचा हा आनंद सोहळा बहुजनांच्या आयुष्यांला धन्य धन्य झाल्याचा अनुभव देतो पंढरीची वारी, संताच्या दिंड्या, ज्ञानदेव व तुकाराम पालख्या ह्या सोहळ्याची सुरवात नेमकी कोणत्या काळात झाली तसेच वारी, दिंड्या, पालख्याचा आरंभ कोणी केला या सारख्या प्रश्नात न पडता आपण सरळसरळ पाहणार आहोत••••• पंढरपूरला जाणार्या दिंड्या किंवा वारीचा गाभा हा नक्कीच समाजभिमुख आहे आणि वारीचा *संदेश जित...